जबाब
‘जबाब’ म्हणजे एखाद्या व्यक्तीने, पक्षकाराने किंवा संबंधित अधिकाऱ्याने एखाद्या प्रकरणातील घटना, आरोप, वस्तुस्थिती, कागदपत्रे किंवा प्रश्न याबाबत लेखी अथवा तोंडी स्वरूपात दिलेले स्पष्टीकरण, निवेदन किंवा उत्तर होय. कायदेशीर व महसुली कामकाजात 'जबाबाला' विशेष महत्त्व आहे.
w जबाब
म्हणजे काय?
एखाद्या व्यक्तीविरुद्ध तक्रार,
अर्ज,
आरोप किंवा दावा दाखल झाल्यानंतर
त्या व्यक्तीला आपली बाजू मांडण्याची संधी दिली जाते. त्यावेळी संबंधित व्यक्तीने
दिलेले स्पष्टीकरण म्हणजे जबाब.
उदा.
∙ अर्जदाराने केलेल्या तक्रारीबाबत प्रतिवादीने दिलेले
उत्तर.
∙ ग्राम महसूल अधिकारी यांच्याकडे संबंधित व्यक्तीने
दिलेले स्पष्टीकरण.
∙ फेरफार नोंदीवर हरकत घेणाऱ्या व्यक्तीने दिलेला लेखी
जबाब.
∙ चौकशीदरम्यान साक्षीदाराने दिलेली माहिती.
w जबाबाचे
प्रकार:
∙ लेखी जबाब
∙ तोंडी जबाब
∙ प्रतिज्ञापत्रावरील जबाब
∙ साक्षीदाराचा जबाब
∙ आरोपीचा जबाब
∙ प्रतिवादीचा जबाब
∙ विशिष्ट बाबीबाबत दिलेला खुलासा
∙ प्रकरणात पक्षकाराने मांडलेली बाजू
∙मृत्युपूर्व जबाब इत्यादी.
w जबाब
आणि म्हणणे यातील फरक
|
मुद्दा |
जबाब |
म्हणणे |
|
|
स्वरूप |
उत्तर किंवा
स्पष्टीकरण |
स्वतःची
बाजू मांडणे |
|
|
उद्देश |
वस्तुस्थिती
स्पष्ट करणे |
मागणी किंवा
विरोध मांडणे |
|
|
वापर |
चौकशी व
सुनावणी |
न्यायालयीन
व प्रशासकीय कार्यवाही |
|
|
मांडणी |
प्रश्नांना
उत्तर |
मुद्देसूद
लेखी निवेदन |
|
१. ज्या कामासाठी जबाब
घेतला जात आहे त्याबाबत जबाब देणार्यास पूर्व कल्पना द्यावी.
२. जबाब देणारा हा स्वत: जबाब लिहित
आहेत असे समजून तशा भाषेत जबाब लिहावा.
३. मृत्युपूर्व जबाब वगळता, सर्वसाधारणपणे सर्व
जबाब शपथेवर नोंदविले जातात.
४. जबाबात कधीही खाडाखोड
करू नये. अनावधानाने खाडाखोड झाली तर, खाडाखोड झाली असेल त्या ठिकाणी जबाब देणार्याने
व जबाब घेणार्याने स्वत:ची स्वाक्षरी करावी.
५. जबाब एकाच रंगाच्या
शाईने लिहावा. जबाब लिहितांना पेन/शाई बदलू नये. पेन/शाई बदलणे अनिवार्य असल्यास पेन/शाई बदलण्याचे कारण
जबाबात नमूद करावे.
६.
जबाब सुवाच्य अक्षरातच लिहावा किंवा टंकलिखित करावा.
७. जबाब लिहून पूर्ण झाल्यानंतर त्यात कोणताही बदल करु नये.
८.
आधीच छापून/टंकलिखीत करून घेतलेल्या जबाबात शाईने रिकाम्या जागा भरू नयेत, न्यायालयात
असे जबाब ग्राह्य मानले जात नाहीत.
९.
जबाब जर टंकलिखीत केला जात असेल तर जबाबात तसे नमूद करावे.
१०. जबाबावर उजव्या
बाजूला जबाब देणार्याची दिनांकित सही घ्यावी.
११. जबाबावर डाव्या
बाजूला ज्याच्या समक्ष जबाब घेतला गेला आहे त्या अधिकार्याने ‘समक्ष’ असे लिहून त्याखाली
स्वत:ची दिनांकित स्वाक्षरी करावी आणि स्वत:च्या पदनामाचा
शिक्का उमटवावा.
१२.
जबाब देणारी व्यक्ती अशिक्षीत/निरक्षर असल्याने स्वाक्षरी म्हणून अंगठा उमटवित
असेल तर, त्याने स्वाक्षरी म्हणून उमटविलेल्या अंगठ्याखाली, जबाब घेणार्या
अधिकार्याने ‘सही निशाणी अंगठा --- (जबाब देणार्याचे नाव) यांचा असे’ असे लिहून स्वत:ची सही करावी.
मी, खाली सही करणार,
----------- (नाव) वय-----, राहणार (पत्ता)------, संपर्क क्रमांक -----, धंदा ----
आज
दिनांक / /२०.. रोजी, ------- (
ठिकाण) येथे समक्ष
हजर राहून किंवा ------- (ज्याने जबाबासाठी बोलविले आहे त्या अधिकार्याचे नाव) यांनी
बोलावले वरून समक्ष हजर राहून सत्यप्रतिज्ञेवर जबाब
देतो की,
............................................................................................................................
...............................................................................................................................
..............................................................................................................................
(ज्या कारणासाठी जबाब घेतला जात आहे त्याचा सविस्तर तपशील नमूद करावा)
सदरचा
जबाब मी स्वखुशीने दिला असून तो देण्याबाबत माझ्यावर कोणीही कोणत्याही प्रकारचे दडपण आणलेले नाही. हा जबाब मला वाचून
दाखविण्यात आला असून तो मी सांगीतल्यानुसारच लिहिला गेला आहे/माझ्या
समक्ष माझ्या सांगण्यानुसार टंकलिखीत केला गेला आहे.
वरील जबाबातील सर्व मजकूर माझ्या माहितीप्रमाणे खरा
आणि बरोबर आहे.
वरील
जबाबतील मजकुरास मी स्वत: व्यक्तीश: जबाबदार आहे.
वरील
जबाबातील कोणताही मजकूर खोटा ठरल्यास, मी भारतीय न्याय संहिता, २०२३ च्या
तरतुदीनुसार कारवाईस पात्र ठरीन याची मला जाणीव आहे.
समक्ष
सही/- सही/-
(ज्याच्या समक्ष जबाब घेतला
गेला आहे (जबाब देणार्याचे नाव आणि दिनांकित सही)
त्या अधिकार्याचे नाव आणि दिनांकित सही)
शिक्का (सील)
bb
Rate This Article
या लेखात, आम्ही आपणाला जबाब. याबाबत माहिती दिली आहे आम्हाला आशा आहे की, तुम्हाला ती आवडली असेल. माहिती आवडली असेल तर, सदरची माहिती तुमच्या मित्रांनाही शेअर करा.
आपले महसूल कायद्याविषयक प्रश्न विचारण्यासाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या. आणि आमच्या टेलिग्राम चॅनेललाही आजच जॉईन व्हा. Website Link Telegram Channel Link धन्यवाद !