वारस कायदा विषयक प्रश्नोत्तरे" 92 to 110
·
प्रश्न ९२: भारतीय वारसा कायदा, १९२५ अन्वये मृत्युपत्राशी संबंधीत कलमे कोणती?
F
उत्तर: ·
भारतीय वारसा कायदा,
१९२५, कलम- २(एच) अन्वये मृत्युपत्राची
व्याख्या दिली आहे.
· भाग ६
मध्ये कलम ५७ पासून मृत्युपत्राबाबत तरतुदी दिलेल्या आहेत.
· कलम- ५९
अन्वये मृत्यूपत्र करण्या्स सक्षम व्यक्ती कोण हे नमूद आहे.
· कलम ३०
अन्वेये हिंदू व्यक्तीला एकत्र कुटुंबाच्या मिळकतीमधील स्वत:च्या हिश्शाबाबत
मृत्यूपत्र करता येते.
· कलम ७६
अन्वये मृत्यूपत्रातील नाव,
क्रमांक मिळकतीचे वर्णन, हिस्सा
इत्यायदींबाबतचा लेखन प्रमाद, त्याचा नेमका अर्थ लक्षात येत
असेल तर दुर्लक्षित करण्यात यावा.
· कलम ८८
अन्वये मृत्यूपत्रातील विसंगत प्रदानांबाबत भाष्य केले आहे. जर एखाद्या
मृत्यूपत्रात नमूद दोन कलमात नमूद इच्छा दाने विसंगत असतील आणि त्या दोन्ही इच्छा
एकत्रपणे पूर्ण करणे शक्य नसेल तर शेवटी नमूद इच्छा विधिग्राह्य ठरेल.
· कलम ९९
अन्वये नात्यांची व्याख्या दिलेली आहे.
· कलम १५२
अन्वये,
फक्त स्वत:च्या मालकीच्या मिळकतीचे किंवा मिळकतीतील स्वत:च्या,
हिश्शाचेच मृत्यूपत्र करता येते.
·
प्रश्न ९३: 'मृत्युपत्राची शाबिती' (Probate of
Will) म्हणजे काय?
F
उत्तर: प्रोबेट
म्हणजे अशी कायदेशीर प्रक्रिया ज्यात भारतीय उत्तराधिकार अधिनियम, १९२५ कलम ५७, २१३ अन्वये, फक्त
मुंबई उच्च न्यायालयाचे मूळ अधिकार क्षेत्र असलेल्या मुंबई, कलकत्ता, चेन्नई याठिकाणचीच दिवाणी न्यायालये मृत्युपत्राची सत्यता (authenticity)
प्रमाणित करतात. फक्त याच न्यायालयांना प्रोबेटचा अधिकार आहे.
याबाबतचा निर्णय भगवानजी करसनभाई राठोड वि. सुरजमल आनंदराज मेहता या प्रकरणात
दिनांक ८ जुलै २००३ रोजी मुंबई उच्च
न्यायालयाने दिला आहे. इतर दिवाणी न्यायालये मृत्युपत्रातील वाटणी योग्य की
अयोग्य याबाबत निर्णय देऊ शकतात. भारतीय वारसा कायदा, १९२५
चे कलम २१३ मुस्लिम व्यक्तीला लागू होत नाही. त्यामुळे त्यांना प्रोबेटची आवश्यकता
नाही.
मृत्युपत्र
खरे नाही,
ते खोटे आहे हे सिद्ध करण्याची जबाबदारी जो तसा अरोप करतो
त्याच्याकडे आहे. (चंद्रकांत मेढी वि. लखेश्वरनाथ ए.आय.आर- १९७६ गोहत्ती पान -९८)
·
प्रश्न ९४:
मृत्युपत्राचे काय महत्व आहे?
F
उत्तर: मृत्युपत्र
हा एक पवित्र दस्त मानला गेला आहे. अशा दस्ताद्वारे मृत व्यक्ती आपल्या
संपत्तीच्या विल्हेवाटीबाबतची इच्छा व्यक्त करीत असते. म्हणून मृत्युपत्राचे एक
गंभीर व पवित्र दस्त म्हणून पालन केले गेले पाहिजे. (रामगोपाल लाल वि. ऐपिनकुमार
४९.ए. आय. आर ४१३)
·
प्रश्न ९५:
न्यायालयाकडून वारस दाखला मिळविण्याची
प्रक्रिया कशी असते?
F
उत्तर: मृत्युपत्र
न करता मयत झालेल्या व्यक्तीचा कायदेशीर वारस कोण किंवा सात किंवा अधिक वर्षे
परागंदा असलेल्या व्यक्तीचा कायदेशीर वारस कोण याबाबत संभ्रम असल्यास दिवाणी
न्यायालयाकडून वारस दाखला (Succession Certificate) मिळवावा
लागतो.
यासाठी
मयत व्यक्तीच्या कायदेशीर वारसाने संबंधित दिवाणी न्यायालयात दावा दाखल करावा.
दाव्यात, दावा करणार्याचे नाव, पत्ता, रेशन कार्ड पॅन कार्ड, मयत व्यक्तीशी
असलेले नाते, मयत व्यक्तीचे अन्य वारस आणि त्यांचे पत्ते, पॅन कार्डस्, रेशन
कार्ड, वंशावळ, मयताचा मृत्यू दाखला आणि मयत व्यक्तीच्या नावावर असलेली सर्व
स्थावर व जंगम मालमत्ता यांचा तपशील नमुद असावा.
अर्जावर
कोर्ट फी अधिनियम, १८७० अन्वये आवश्यक ती कोर्ट फी अदा करावी. दावा दाखल झाल्यानंतर,
न्यायालय ४५ दिवस मुदतीची नोटीस वर्तमान पत्रात प्रसिध्द करते. जर त्याबाबत
कोणाचीही तक्रार प्राप्त झाली नाही तर वादीच्या नावे वारस दाखला दिला जातो. या
सर्व प्रक्रियेला अंदाजे ५ ते ७ महिन्यांचा कालावधी लागतो.
·
प्रश्न ९६: आजीने
१.२१ हेक्टर आर शेतजमिनीपैकी ०.८१ आर जमीन १९९५ साली तिच्या तीन वर्षाच्या नातवाच्या
नावे नोंदणीकृत बक्षीसपत्राने दिली. परंतु सात-बारा सादरी त्या आजीचेच नाव कायम
राहिले व जमीन त्या नातवाच्या वडीलांच्या ताब्यात राहिली. १९ वर्षानंतर सन २०१४
मध्ये त्याच आजीबाईने तिचे संपूर्ण १.२१ हेक्टर आर क्षेत्र तिचा मुलगा (तिच्या
नातवाचे वडील) याला नोंदणीकृत मृत्युपत्रान्वये दिले. आजी मयत झाल्यानंतर, आज तलाठी यांना दोन्ही कागदपत्रे प्राप्त झाली. या प्रकरणात काय करावे?
F
उत्तर: सदर
प्रकरण आधी विवादग्रस्त नोंदवहीला नोंदवून यावर
मंडलअधिकारी यांनी सुनावणी घ्यावी.
बक्षीसपत्र नोंदणीकृत असल्याने तो कायदेशीर दस्त आहे. १९९५ साली बक्षीसपत्र
करून दिल्यावर आजीचा त्या बक्षीसपत्रात नमुद क्षेत्रावरील (०.८१ आर) मालकी हक्क
संपुष्टात आला आहे. ते क्षेत्र तिच्या मालकीचे राहिले नाही. जे क्षेत्र तिच्या मालकीचे नाही त्याबाबत मृत्युपपत्र
करण्याचा तिला कायदेशीर अधिकार नाही. या तरतुदीन्वये एकूण १.२१ हेक्टर आर क्षेत्रापैकी
०.८१ आर क्षेत्र नातवाच्या नावे तर उर्वरीत क्षेत्र तिचा मुलगा (तिच्या नातवाचे वडील)
यांच्या नावे नोंदवावे.
·
प्रश्न ९७: दानपत्र/बक्षीसपत्र/विना मोबदला बहिणीचे हक्कसोडपत्र, रुपये
शंभरच्या स्टँप पेपरवर नोटरीकडे नोंदविलेले आहे. त्याची नोंद फेरफार सदरी करता येईल काय?
F
उत्तर: नाही. नोंदणी
अधिनियम १९०८, कलम १७ अन्वये, रूपये शंभरपेक्षा जास्त किंमतीच्या मिळकतीचे हस्तांतर
दुय्यम निबंधकाकडे नोंदणीकृत केलेले असणे बंधनकारक आहे.
·
प्रश्न ९८: पूर्वी मुलींची व महिलांची नावे
सात-बाराच्या इतर हक्कात दाखल करण्याची पध्दत होती. त्याचे कारण काय? आज ज्या
मुलींची व महिलांची नावे सात-बाराच्या 'इतर हक्कात' दाखल आहेत ती कब्जेदार सदरी नोंदविता येतील
काय?
F
उत्तर: २२
जुन १९९४ पूर्वी मुलींना/महिलांना मिळकतीमध्ये समान वारसा हक्क नसल्यामुळे त्यांची
नावे सात-बाराच्या 'इतर हक्कात' दाखल करण्याची पध्दत अस्तित्वात होती.
दिनांक
२२ जुन १९९४ रोजी हिंदू उत्तराधिकार अधिनियम १९५६, महाराष्ट्रात लागू करतांना त्यात
सुधारणा करुन हिंदू उत्तराधिकार (महाराष्ट्र सुधारणा) अधिनियम १९९४ लागू करून त्यात
खालील सुधारणा करण्यात आली आहे.
"हिंदू
उत्तराधिकार अधिनियम १९५६, कलम ६ मध्ये काहीही अंतर्भूत असले तरी -
(एक)
मिताक्षर कायद्याने नियंत्रीत केल्या जाणार्या संयुक्त हिंदू कुटूंबामध्ये सहदायकाची
कन्या, ज्या रीतीने पुत्र सहदायाद होतो, त्याच रीतीने जन्मापासून, तिच्या स्वत:च्या
हक्कामुळे सहदायाद होईल आणि ती पुत्र असती तर तिला जे जे अधिकार, दायित्वे,
नि:समर्थता प्राप्त झाली असती, ती प्राप्त होईल.
(दोन)
उपरोक्त संयुक्त हिंदू कुटुंबामधील वाटणीच्या वेळेस पुत्राला वाटून देण्यात
येत असलेल्या हिस्स्याइतका हिस्सा कन्येलाही मिळेल.
(तीन)
उपरोक्त प्रमाणे हिस्सा मिळालेली स्त्री, त्या हिस्स्याबाबत मृत्यूपत्रद्वारे
किंवा अन्य प्रकारे अशा मिळकतीची विल्हेवाट सुध्दा लावू शकेल.
(चार)
उपरोक्त तरतुदी हिंदू उत्तराधिकार (महाराष्ट्र सुधारणा) अधिनियम-१९९४ च्या प्रारंभाच्या दिनांकापूर्वी (२२ जुन १९९४ पूर्वी) ज्या मुलींचे
लग्न झाले आहे त्यांना लागू असणार नाही.
(पाच)
दिनांक २२ जुन १९९४ पूर्वी ज्या वाटण्या घडून आल्या असतील त्यांना उपरोक्त
तरतुदींमुळे बाधा येणार नाही."
उपरोक्त
तरतुदींन्वये तहसिलदार स्वत: किंवा संबंधिताचा अर्ज प्राप्त झाल्यानंतर,
म.ज.म.अ. १९६६ कलम १४९, १५० अन्वये कार्यवाही करून इतर हक्कातील मुली/महिलांची
नावे कब्जेदार सदरी नोंदविण्याची कार्यवाही करू शकतील.
·
प्रश्न ९९: एका
खातेदाराने, त्याच्या वडिलांनी सन २००३ मध्ये त्याच्या नावे फक्त नोटरी समोर
केलेले मृत्यूपत्र सादर केले आहे. नोटरी समोर केलेले मृत्यू पत्र ग्राह्य धरले
जाईल काय?
F
उत्तर: नोंदणी
अधिनियम १९०८ कलम १८ अन्वये ज्या दस्तांची नोंदणी करणे वैकल्पिक आहे त्याच्या
यादीत मृत्युपत्राचा समावेश होतो. त्यामुळे
मृत्युपत्राची नोंदणी अनिवार्य नाही. तसेच मृत्युपत्र साध्या कागदावर असले आणि
मृत्युपत्र करणार्याची आणि किमान दोन साक्षीदारांची स्वाक्षरी त्यावर असली तरी
ग्राह्य धरले जाते. सदर खातेदाराच्या वडिलांनी नोटरी समोर केलेले मृत्युपत्र निश्चितच
ग्राह्य धरले जाईल.
·
प्रश्न १००: एका
खातेदाराने अनोंदणीकृत मृत्यूपत्र
सादर केले आहे. त्यावर इतर वारसांनी ते खोटे असल्याचा दावा केला आहे. प्रकरण संबंधित मंडळ अधिकारी यांनी विवादग्रस्त नोंदवहीत
नोंदविले आहे. काय निर्णय घ्यावा?
F
उत्तर: मृत्युपत्र नोंदणीकृत असण्याची आवश्यता नाही. तथापि,
मृत्युपत्राच्या सत्यतेबाबत संभ्रम असल्यास ते मृत्युपत्र संबंधितांनी न्यायलयाकडून
सिध्द करून आणावे. तोपर्यंत सर्व वारसांची नावे गाव दप्तरी दाखल करावी. न्यायालयाच्या
आदेशान्वये नंतर पुन्हा फेरफार घेता येईल.
·
प्रश्न १०१: पोलीस
पाटील व सरपंच यांनी दिलेल्या वारस दाखल्याचे आधारे वारसांची नोंद मंजूर करण्यात
आली आहे. सदर वारस दाखल्यामध्ये एक वारस वगळला गेला होता हे आता निदर्शनेस आले
आहे. या वारसाने त्याची नोंद करावी म्हणून अर्ज दिला आहे. काय कार्यवाही करावी?
F
उत्तर: वगळले
गेलेल्या वारसांची चौकशी करून नवीन फेरफारने त्यांची नावे दाखल करण्यास काहीच हरकत
नाही. किंवा आधी मंजूर करण्यात आलेला फेरफार अहवालासह उपविभागीय अधिकारी यांच्याकडे
पुनर्विलोकनासाठी पाठवून त्यांना निर्णय घेण्याची विनंती करावी.
·
प्रश्न १०२: १९९७
मध्ये झालेल्या नोंदणीकृत खरेदी खताची नोंद घेण्यासाठी आज अर्ज आला आहे. खरेदी
देणार मयत असून त्याच्या वारसांची नावे सात-बारा सदरी दाखल आहेत. काय कार्यवाही
करावी?
F
उत्तर: खरे
तर खरेदी खत करून दिल्यानंतर खरेदी देणार याचा संबंधित जमिनीवरील मालकी हक्क
संपुष्टात आला आहे. त्यामुळे त्याच्या वारसांची झालेली नोंद पोकळ ठरते. अर्थात
सदर खरेदी खताची माहिती नसल्यामुळे वारस नोंद घेण्यात आली होती. आता नोंदणीकृत खरेदीखताप्रमाणे फेरफार नोंदवून वारसांना नोटीस बजवावी.
त्यांचे म्हणणे/जबाब घ्यावा. तक्रार नसेल तर नोंद मंजूर करावी. वारसांनी तक्रार
केली तर केस चालवावी. मयत खातेदार आणि खरेदी घेणार यांच्यात झालेला व्यवहार हा
नोंदणीकृत दस्ताने झालेला आहे. दस्त नोंदणीच्या तारखेस खरेदी देणार हयात होते.
हक्काची नोंद ही दस्तावर आधारीत असते, दस्त
हा कितीही जुना झाला तरीही त्याची पत/किंमत (Value) कमी होत
नाही. खरेदी देणार मयत झाल्यामुळे त्यात फरक पडत नाही. सबब नोंद मंजूर या आशयाचा
निकाल द्यावा.
·
प्रश्न १०३: एका
व्यक्तीने एका मागास समाजाच्या स्त्रीचे मागील पंधरा वर्षांपासून पालनपोषण
केलेले आहे आता ती स्त्री म्हातारी झाली असून तिची इच्छा तिच्याजवळ असलेली, तिच्या
नवर्यापासून वारस हक्काने मिळाली तीन एकर जमीन त्या व्यक्तीला द्यावी अशी आहे.
सदर स्त्रीला मुलबाळ नाही.
तिच्या दिराच्या मुलांची याला हरकत आहे. अशा वेळी
काय करावे?
F
उत्तर: हिंदू
उत्तराधिकार अधिनियम१९५६, कलम १४ अन्वये हिंदू स्त्रिची मालमत्ता याबाबत तरतुद
आहे. त्यानुसार हिंदू उत्तराधिकार अधिनियम१९५६ या अधिनियमापूर्वी किंवा नंतर,
हिंदू स्त्रिची,
तिच्या कब्जात असलेली कोणतीही संपत्ती, मग अशी
मालमत्ता तिला विवाहापूर्वी किंवा नंतर वारसाहक्काने, मृत्युपत्रीय दानाने,
वाटणीमध्ये पोटगी म्हणून, नातलगांकडून मिळालेली असो किंवा तिने अशी मालमत्ता स्वत:च्या
कौशल्याने, परिश्रमाने किंवा एखादी संपत्ती दान म्हणून, मृत्युपत्रान्वये,
इतर कोणत्याही लेखान्वये, दिवाणी न्यायालयाच्या
हुकूमनाम्यान्वये, आदेशान्वये किंवा एखाद्या निवाड्यान्वये संपादित
केली गेली असेल किंवा अन्य कोणत्याही मार्गाने संपादित केलेली असो, अशी संपत्ती,
हिंदू स्त्री संपूर्ण स्वामी म्हणून धारण करील, मर्यादित स्वामी म्हणून नव्हे. या तरतुदीनुसार संबंधित स्त्रीला, सदर मिळकतीचे मृत्युपत्र किंवा
बक्षीसपत्र, तिचा सांभाळ करणार्याच्या नावे करता येईल.
·
प्रश्न १०४: हिंदू वारसा अधिनियम, २००५ अन्वये
वारसा कायदा १९५६ नेमकी काय दुरुस्ती करण्यात
आली?
F
उत्तर: १९५६ च्या वारसा कायद्यानुसार एखाद्या कुटूंबातील वडिलोपार्जित
मिळकतीत मुलीला वडिलांच्या पश्चात फक्त त्यांच्या हिश्श्यामधील वारसा हक्काने
मिळणारा हिस्सा प्राप्त होत असे, तर मुलांना
वडिलांच्या पश्चात त्यांच्या हिश्श्यामधील वारसा हक्काने मिळणारा हिस्सा अधिक
जन्मतःच सहहिस्सेदार म्हणून प्राप्त होणारा हिस्सा असा दुहेरी हिस्सा प्राप्त होत असे.
ही तफावत दूर व्हावी या दृष्टीने हिंदू वारसा अधिनियम, २००५
च्या कलम ६ मध्ये दुरुस्ती करणेत आली की, '९
सप्टेंबर २००५ पूर्वी जन्मलेल्या मुलींना तसेच दिनांक ९ सप्टेंबर २००५ रोजी हयातअसलेल्या
हिंदू अविभक्त कुटुंबातील मिळकतीत मुलाप्रमाणेच आणि मुलाइतकाच जन्मजात हक्क असेल.'
याचा
मुख्य उद्देश असा की मुलींना देखील त्यांच्या माहेरच्या अथवा वडिलांकडील
वडिलोपार्जित मिळकतीत जन्मतःच सहहिस्सेदार म्हणून मानले जाईल व मुलाप्रमाणेच
वडिलोपार्जित संपत्ती मधील सर्व अधिकार व जबाबदार्या मुलींना देखील प्राप्त करुन
देण्यात याव्यात. मा. सर्वोच्च न्यायालयाने, दिनांक १६/१०/२०१५ रोजी, दिवाणी अपिल क्र. ७२१७/२०१३ (प्रकाश आणि इतर विरुध्द फुलवती आणि इतर) या
खटल्यात असा निर्णय केला की, ‘वडिलोपार्जित हिंदू अविभक्त कुटूंबातील मिळकतीत मुलाप्रमाणेच आणि मुलाइतकाच
जन्मजात हक्क मिळणारी मुलगी आणि त्या मिळकतीत हक्क असणारा सहदायक (कोपार्सनर) हे दोन्ही दिनांक ९ सप्टेंबर २००५ रोजी हयात
असावेत, मग ती मुलगी कधीही जन्मली असो.'
·
प्रश्न १०५: एका
मयत खातेदाराची दोन लग्न झाली होती. दोन्ही बायकांना त्याच्यापासून झालेली
मुले आहेत. आता वारस दाखल करण्यासाठी अर्ज आला आहे. अशावेळेस कोणाचे नाव वारस म्हणून
दाखल करावे? अनौरस संततीला वडिलांच्या मिळकतीमध्ये
वारसाहक्क मिळतो काय?
F
उत्तर: हिंदू
विवाह कायदा १९५५, कलम ५ मध्ये विविहासाठी ज्या शर्ती आहेत त्यांन्वये
विवाहाच्या प्रसंगी वर आणि वधू पैकी कोणीही मनोविकल, मानसिक रूग्ण, भ्रमिष्ट,
अपस्माराचे झटके येणारा, वयाने अज्ञान, निषिध्द नातेसंबंधी नसावा.
कलम
१७ व १८ अन्वये, विवाहाच्या प्रसंगी वराची पत्नी आणि वधुचा पती हयात (जीवंत)
नसावा. भारतीय दंड संहिता १८६०, कलम ४९४ हा गुन्हा आहे. (कायदेशीर घटस्फोट झाला
असेल तर अपवाद). बेकायदेशीरपणे लग्न झालेल्या दुसर्या पत्नीला नवर्याच्या
मिळकतीत हक्क येत नाही. (ए.आय.आर. २००२, गोहत्ती ९६) दुसरे लग्न अवैध असल्यामुळे
आणि दुसर्या पत्नीला नवर्याच्या मिळकतीत हक्क येत नसल्यामुळे तिचे नाव
अधिकार अभिलेखात दाखल करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.
तथापि,
हिंदू विवाह कायदा, कलम १६(३) अन्वये अनौरस संततीला
वडिलांच्या स्वकष्टार्जित तसेच वंशपरंपरागत संपत्तीमध्ये वारसाहक्क आहे.
(सर्वोच्च न्यायालय, रेवनसिदप्पा वि. मल्लिकार्जून-३१/३/२०११).
त्यामुळे
वर नमुद प्रकरणांमध्ये मयताचा वारस ठराव, मयताची पहिली पत्नी व मुले/मुली तसेच
दुसर्या पत्नीची सर्व आपत्ये यांचे नावे नोंदवावा. स्थानिक चौकशी करावी. वारस
ठराव मंजूर करून त्याचा फेरफार नोंदवावा. नोटीस बजावल्यानंतर जर दुसर्या पत्नीने
हरकत नोंदवी तर मंडल अधिकार्यांनी तक्रार केसची सुनावणी घ्यावी. सर्वांचे म्हणणे
नोंदवावे. व वरील तरतुदी नमूद करून निकाल द्यावा. जरूर तर दुसर्या पत्नीला
दिवाणी न्यायालयातून तिचा वारस हक्क सिध्द करून आणण्यास सांगावा.
वारस
ठराव/ फेरफार नोंद नोंदविण्याआधीच सर्वांनाच दिवाणी न्यायालयातून वारस हक्क
सिध्द करून आणण्याचा सल्ला देऊ नये. कायद्यात नमूद तरतुदींचे पालन करून काम
करणे हे आपले कर्तव्य आहे.
·
प्रश्न १०६: हिंदू
विधवेने पुनर्विवाह केल्यास तिला मयत पतीच्या मिळकतीत हिस्सा मिळेल काय?
F
उत्तर: होय.
पतीचे निधन होताच त्याच्या पत्नीचा वारसा हक्क सुरू होतो. पतीच्या निधनानंतर
त्याची विधवा पत्नी, हिंदू वारसा कायदा १९५६, कलम १४ अन्वये, मयत पतीच्या
मिळकतीची पूर्ण मालक (Absolute
Owner) ठरते. (सर्वोच्च न्यायालय- चेरोट्टे सुगाथन वि. चेरोट्टे
भारेथी-ए.आय.आर. २००८-एससी १४६५) अशा हिंदू विधवेने पुनर्विवाह केल्यास तिचा
हिंदू वारसा कायदा १९५६, कलम १४ अन्वये मिळालेला हक्क नष्ट होत नाही.
पती-पत्नीचा
घटस्फोट झाल्यावर, घटस्फोटित पतीच्या हयातित जर अशा असतांना, घटस्फोटित पत्नीने
दुसरे लग्न केले असेल तर तिला घटस्फोटित पतीच्या मृत्यू नंतर त्याच्या
मिळकतीत हिस्सा मिळण्याचा अधिकार नाही.
·
प्रश्न १०७: मयत
व्यक्तीच्या वित्तिय संपत्तीची नामनिर्देशित व्यक्ती, मयताच्या वित्तिय
संपत्तीची मालक होते काय?
F
उत्तर: नाही.
नामनिर्देशन म्हणजे एखाद्या व्यक्तीने,
अशा व्यक्तीचे नाव कागदोपत्री दाखल करणे जी व्यक्ती, असे नाव दाखल करणार्या
व्यक्तीच्या मृत्यूनंतर, त्याच्या नावे जमा असलेली रक्कम ताब्यात घेण्यास
पात्र असेल. विमा कायदा, १९३८, कलम ३९. (The Insurance Act
1938, Section 39) अन्वये नामनिर्देशनाची तरतुद आहे. नामनिर्देशित
व्यक्ती म्हणजे मयत व्यक्तीला मिळणार्या वित्तिय संपत्तीची मालक किंवा वारस
झाली असे कायदा मानत नाही. अनेक न्यायालयीन निकालांत ही बाब स्पष्ट करण्यात
आलेली आहे.
नामनिर्देशित
व्यक्ती ही मयत व्यक्तीच्या वित्तिय संपत्तीची विश्वस्त (Trusty) असते. फक्त मयत व्यक्तीची वित्तिय संपत्ती ताब्यात घेणे आणि ती
संपत्ती, मयत व्यक्तीच्या कायदेशीर वारसांकडे सुपूर्द करणे हे नामनिर्देशित
व्यक्तीचे कर्तव्य असते.
·
प्रश्न १०८: उत्तराधिकार प्रमाणपत्र (Succession
certificates) देण्याचे अधिकार कोणाला आहेत?
F
उत्तर: उत्तराधिकार
म्हणजे अशी प्रक्रिया,
ज्यामुळे मृत्युपत्र करणार्याच्या इच्छेनुसार (testator's
will) किंवा मृत्युपत्र न करता मयत झालेल्या (intestacy) व्यक्तीची मालमत्ता मिळण्यास लाभार्थी पात्र ठरतात.
भारतीय
उत्तराधिकार अधिनियम,
१९२५ च्या कलम ३७० अन्वये उत्तराधिकार प्रमाणपत्र प्रदान करण्याचा
अधिकार फक्त दिवाणी न्यायालयालाच आहे. कोणत्याही मयताच्या स्थांवर मालमत्तेबाबत
वारसांमध्ये वाद असल्यास उत्तराधिकार प्रमाणपत्र आवश्यक असते. असे प्रमाणपत्र
प्रदान करण्यापूर्वी न्यायालयातर्फे दोन्ही पक्षांना त्याची बाजू आणि पुरावे सादर
करण्याची संधी देण्यात येते.
·
प्रश्न १०९: विनामृत्युपत्र मयत हिंदू स्त्रिची मालमत्ता
कशी प्रक्रांत होईल?
F
उत्तर: हिंदू
उत्तराधिकार अधिनियम१९५६, कलम १५ अन्वये विनामृत्यूपत्र मयत झालेली हिंदू स्त्री खातेदाराची
संपत्ती पुढील प्रमाणे वारसाहक्काने जाईल.
अ) पहिल्यांदा, मुलगे व मुली (कोणताही
मयत मुलगा किंवा मुलगी यांची अपत्ये धरून) आणि पती यांच्याकडे
आ) दुसर्यांदा, पतीच्या वारसाकडे
इ) तिसर्यांदा, तिच्या माता आणि पिता यांच्याकडे
ई) चवथ्यांदा, पित्याच्या वारसाकडे आणि
उ) शेवटी, मातेच्या वारसांकडे प्रक्रांत होईल.
तथापि, हिंदू स्त्री जर विनामृत्यूपत्र मरण पावली तर तिला तिच्या पित्याकडून किंवा
मातेकडून वारसा हक्काने मिळालेली कोणतीही संपत्ती त्या मृत स्त्रिचा कोणताही मुलगा
किंवा मुलगी (कोणत्याही मयत मुलाची किंवा मुलीची अपत्ये धरून)
यांच्याकडे जाईल. असे वारस नसल्यास अशी संपत्ती
मृत स्त्रिच्या पित्याच्या वारसाकडे प्रक्रांत होईल आणि हिंदू स्त्रिला तिच्या पतीकडून
किंवा तिच्या सासर्याकडून वारसा हक्काने मिळालेली कोणतीही संपत्ती, त्या मृत स्त्रिचा कोणताही मुलगा किंवा मुलगी (कोणत्याही
मयत मुलाची किंवा मुलीची अपत्ये धरून) यांच्याकडे जाईल.
असे वारस नसल्यास, मृत स्त्रिच्या पतीच्या वारसाकडे
प्रक्रांत होईल.
·
प्रश्न ११०: हिंदू उत्तराधिकार कायद्यान्वये उत्तराधिकाराचा
क्रम कसा असतो?
F
उत्तर: हिंदू
उत्तराधिकार अधिनियम१९५६, कलम ९ अन्वये उत्तराधिकाराचा क्रम खालील प्रमाणे असेल:
· वर्ग
एकमध्ये समाविष्ट असलेल्या वारसांना एकाच वेळी मालमत्ता मिळेल आणि वर्ग दोन,
तीन आणि चारचे वारस वर्जित होतील.
· वर्ग एकच्या वारसांअभावी वर्ग दोनच्या वारसांना
मालमत्ता मिळणार असेल तेव्हा वर्ग दोनच्या पहिल्या नोंदीत येणार्या (वडील)
वारसांना, दुसर्या नोंदीतील वारसांपेक्षा (मुलाच्या मुलीचा मुलगा, मुलाच्या मुलीची मुलगी, भाऊ, बहीण) प्राधान्य मिळेल.
याप्रमाणे पुढे.
जर एखादी पत्नी चा नावे सपती असेल व ती चारीयञ हीन असेल व ती सगळी सपती (पतीने स्वकशटावर कमवली असेल तर ती सपती कशी मीळवायची कार तीला दोन मुल आहे व ते दोनी मुल बापा सोबत आता भाडोत्री राहतात आनी ती सगळी सपती पतीचा चेकनी खरेदी झाली आहे?
ReplyDeleteEka muliche don Vela laggn jale asel tr varsa hakk milu skel ka
ReplyDeleteवडिलांना वारसाहक्काने मिळालेली जमीन जर त्यांना 2 मुले व 1 विवाहित मुलगी असेल तर ते मृत्युपत्र करून एकाच मुलाच्या नवे करू शकतात का?
ReplyDeleteno
Deleteवडील हयात नाहीत 2001/7/16 रोजी त्यांची मृत्यु झाली त्यांच्या मागे 4 मुले व 1 मुलगी आहे.मुलीचा जन्म 1952 चा आहे वडील 2001 साली वारले अश्या स्थितीत वडलोपार्जित 67 गुंठे आणि वडलोअर्जित 5 गुंठे मध्ये कसे वाटप करावे.
Deleteआईची आई म्हणजे आजी आजीच्या संपत्तीवर आई वारल्यानंतर आजीच्या संपत्तीवर नातवांचा अधिकृत हक्क मिळेल का?
Deleteमयत स्त्री शी तिचा पतीने दुसरे लग्न केले असेल तर तो वारसदार होवू शकतो का?
Deleteवडिलांना वारसाहक्कने मिळालेली जमीन जर तया ना 3 मुले व 5 विवाहित मुली असतील तर ते मृत्यूपत्र करून एकाच मुलाच्या नावे करू शकतात का . नंतर त्यात इतर मुलांचा हक्क मिळतो का.
ReplyDelete9 भाग करून फक्त 2 भाग कुणास देवून शकतो
Deleteवारस म्हणून भाच्याच्या मालमत्तेवर मामाचे नाव लागू शकते का
Deleteमाझ्या आजोबांनी चुलत्याचा मुलाच्या नावावर एका जमीनेचे बक्षिसपत्र केले आहे तर ते कसे रद्द करता येईल??
ReplyDeleteआजोबांच्या उतरत्या वयाचया मानसिकतेचा आणि माझे वडील वारले नंतर ३-४ महिन्या मध्ये या परस्तीतीचा फायदा घेऊन चुलत्याने घडवून आणले आहे
जर एखादी स्त्री मृत्युपत्र न करता मरण पावली व तिचा पती आधीच मरण पावलेल्या आहे. त्या स्त्री ला 3 मुले व 1 मुलगी आहे.मरण पावलेल्या स्त्री ने स्वकष्टाने कष्ट करून जमीन खरेदी केलेली आहे ती जमीन तिला तिच्या 3 मुले व 1 मुलगी यांच्यापैकी फक्त 2 मुलांच्या नावावरच ती करायची होती ही 2 मुले 3ऱ्या मुलापेक्षा लहान आहेत हा 3रा मुलगा सर्वात मोठा आहे या मुलाने आईचा सांभाळ केला नाही म्हणून तिला तिच्या 2 मुलांच्या नावेच ही जमीन करायची होती. व ती जमीन इतके दिवस ही 2 मुलंच कसत होती.अशा वेळेस त्या 2 मुलांना ही जमीन मिळवायची असेल तर काय करावे?
ReplyDeleteएक वर्षाने वारस नोंद होऊ शकते का
ReplyDeleteहो
Deleteजर एखाद्या व्यक्तीने त्यांच्या संपत्तीचे मृत्यूपत्र 2001 या सआली त्यांच्या नातवांच्या नावे केले असेल आणि त्या व्यक्तीच्या मृत्यू पत्राची नोंद झाली नसेल आणि त्या मृत्युपत्रातली संपत्ती जर त्या मृत्यू पावलेल्या मुलाच्या नावे झाली असेल तर 2001 सालि तयार करून ठेवलेल्या त्या मृत्युपत्रची नोंद आता त्या मृत्युपत्रातल्या वारसदरांच्या म्हणजे (नात्वांच्या) नावे होऊ शकेल का आणि त्यासंबंधी काय करावे
ReplyDeleteवारस नोंद करणे साठी कालावधी नेमून दिला आहे का ? जर वारस नोंदी ४० ते ५० वर्षे झाली नसेल तर
ReplyDeleteउतर द्या
DeletePremprakarnatun jhalyalya mulila tichya vadilanchya sampatit varsa Hakka gheta yeto ka
ReplyDeleteविनोद गडाख
ReplyDeleteवाटप पत्र नोटरी पद्धतीने होते काय? वारस दारांना हरकत असल्यास किती वर्षांनी अपील करू शकतो.
जर एखाद्या व्यक्तीला दोन पत्नी होता पहिली पत्नी व नवरा मयत झाले असून त्यांना मुलबाळ नाही व दुसरी हयात पत्नीस मुलबाळ नाही तर नवऱ्याची प्रॉपर्टी दुसऱ्या पत्नीचे नावावर झालेली असून सदर मध्ये नवऱ्याचे भाऊ (तिचे दीर) हक्क सांगू शकतात का
ReplyDeleteवारस मुलगा व मुलगी असताना भाचा वारस लावुन जमिन विकली तर ती जमिनीत मुलगा व मुलगी वारस नोंद करु शकतात का ?
ReplyDeleteवडील हयात मुले आजोबा कडूनच आली जमिनी वाटणी करून मागणी दिवाणी कोर्टात काय निर्णय होईल
ReplyDeleteकायदा काय आहे
ReplyDeleteWaras nod kartana wadilankadil property made muliche nav ahe ti warli ahe tila ek mulga waras ahe pan taychi waras nod sathi kay kay paper lagel kalwa
ReplyDeleteमुलीला माहेरच्या वारस हक्का साठी त्रास देत असल्यास काय करावे
ReplyDeleteJar muliche hawk sod part zale asel tar vadilarzit property cha hawk milu sakto ka
ReplyDeleteXii madhe (cultivator) majiya wadilancha nav nond aahe tiyawar me varas nond kasi keliya pahije ?
ReplyDeleteवडिलोपार्जित जमिनीत 3 मुलांपैकी एका मुलास प्लॉटिंग जमिन असल्यामुळे कमी देली तर तो भविष्यात काही अडचणी निर्माण करु शकतो का ?
ReplyDeleteमाझ्या बहीनीने शेतजमिनीत वाटणी हवी म्हणुन दिवाणी खटला दाखल केला आहे.परंतु आमच्या वाटण्या १९९२ ला झाल्या आहेत.बहीणीस वाटणी मिलु शकेल का???
ReplyDeleteमी गावात घराची खरेदी केली आहे. पन सदर घरातील एका वारसाचा मृत्यू झाला आहे त्याचे नाव त्या मालमत्तेवर आहे. त्याचे नाव कमी न करता मला त्या घराची पक्की खरेदी करता येईल का नाही करता येत असेल तर त्याचे नाव कमी करण्यासाठी काय करावे लागेल.
ReplyDeleteमाझ्या आईचे घर माझ्या नावावर आहे पण माझी पत्नी म्हणती हे घर मी! बांधले आहे म्हणुन ते माझेच आहे अणि मला gharat राहू देत नाही तर आता मला तिलाच घराबाहेर काढायचे आहे तर असा कायदा कोणता आहे
ReplyDeleteजर एखाद्या व्यक्तीने कोर्टाकडून कायदेशीर बाबींची पूर्तता करून वारसदाखला हातात घेतला.आणि अनवधानाने तो गहाळ झाला तर कायद्यात अशी कोणती तरतुद आहे का कि अर्जदार कोर्टाकडून दुसरा वारसदाखला मागू शकेल.
ReplyDeleteएका स्त्री चे दोन लग्न झाले आहेत.त्या पैकी तिने पहिल्या नवर्या पासुन सोडचिठ्ठी घेतली आहे.सात बारा यावरती पहिल्या नवर्या सोबत चे नाव आहे (नोंद करते वेळी सोडचिठ्ठी झाली नव्हती)दुसरे लग्न झाले नंतर देखील ते नाव तसेच आहे.सदर स्त्री मयत असुन तिला दोन मुले आहेत. तर या मुलांना त्यांच्या आईचा शेतातील हक्क मिळु शकतो का.त्या स्त्री चे वडील मयत असुन आई व भाऊ जिवंत आहेत.
ReplyDelete((नाव नोंदणी ही १९८२ यावर्षी झाली होती .तर सोडचिठ्ठी ही १९८४ या वर्षी.दुसरे लग्न १९९४ या वर्षी ती स्त्री २०१३ वर्षी मयत झाली आहे))
माझ्या वडिलांना तीन भाऊ होते मोठा भाऊ गोपल शिन्दे हे गावी सातारा खिंडवाडी स्थाई होते बाकीचे पुणे या
ReplyDeleteठिकाणी नोकरी ला होते मोठ्या भावाने रेकॉर्ड ला ह्या तिन्ही भावाची नावे लावली नाही आता हे चारही भाऊ वारले आता मोठ्या भावाच्या मूल्यांना सोडुन बाकी मुलांना नावे नसल्याने काहीच मिळत नाही व आता तिर्हाईत माणसाने घर बांधले आहे.त्या चे रेकॉर्ड ला नाव नाही आता हे मिळवण्यासाठी काय करावे.
divani nyaylayamde dava kra, tumcha varasa hakk tumhala miltoch
Deleteआमच्या आजोबांनी सण l976 मध्ये जमीन खरेदी खताआधारे विकत घेतली आहे आज काही तांत्रिक अडचणी मुळे त्यांनी त्या जमिनीचा ताबा मिळावं म्हणुन ताहेसिल समोर उपोषणाला बसले आणि तहसीलदार यांनी त्यांना आदेश दिले की तुम्ही कोर्टाकडून तुमचे वारस प्रमाणपत्र आणा मगच आम्ही तुम्हाला ताबा देऊ मग त्या वरसाच्या कारवाईला आम्ही कोर्टात आक्षेप घेतला असता समोरील वकील म्हणत आहे की तुम्ही मुस्लिम समाजाचे आहे आणि आमचे क्लाइन्ट sc समाजाचे आहे म्हणुन तुम्ही आमच्या नात्यातील नाही जातीचे नाही म्हणुन तुमचे आक्षेप चालणार नाही
ReplyDeleteतर आम्हाला तुमची मददत हवी आहे याबाबत आक्षेप चालतो म्हणुन एखाद सायटेशन असेल तर प्लिज मला माझ्या ह्या नंबर 8605094l86 वर पाठवून मददत करावी ही विंनती
वारस नोंद करणे साठी कालावधी नेमून दिला आहे का ? 1944 ची वारस नोंद आता करता येईल का
ReplyDeleteमुलगा वरल्यावर संपती मध्ये व पेशेन मध्ये आई वडीलांना वाटा मिळेल का काय करावे लागेल
ReplyDeleteवडलांची जमीन एक बहीण एक भाउ अशीं वाटप झालेली असताना नंतर भाऊ मयत होतो तर भावाला अपत्य किंवा पत्नी नाही अशा वेळी बहीण वारस होईल काय
ReplyDeleteवडील हयात नाहीत, आजोबांच्या नावावर जमीन होती आजोबा मयत आहे त्यांची जमीन माझ्या नावावर करायची आहे उपाय सांगा
ReplyDeleteमयत वेक्ती चे दुसरे लग्न झाले असून त्याच्या पत्नी च्या पहिल्या नवरायचे अपत्याना वारसा हक्क कसा मिळू शकेल ?
ReplyDeleteते पण ते मयत चे वारस नसताना त्यांना कस मिळू शकेल?
आम्ही एका आजीचे पालनपोषण केले होते,तिचा मृत्यू सन 2010 ला झाला असून तिची गावात 30*30 जागा आहे आता त्या जागेवर तिच्या भावाने वारस नोंद व्हावि म्हणून कोर्टाकाडून एक aaffidavite दाखल केले आहे,आम्ही त्या सदरच्या जागेवर 10 वर्षे राहतोय,तिचा सांभाळ आम्ही केला म्हणून आम्हाला त्या जागेवर हक्क सांगता येईईल का
ReplyDeleteएखांदी स्त्री वीणा मृत्युपत्र मरण पावली वतीला सखी मुलगा व मुलगी नसेल अशा वेळेस तिच्या वडिलोपार्जित (माहेरच्या) मिळकतीमध्ये पतीचा हक्क पोहोचतो का किंवा सावत्र मुलांचा हक्क पोचतो का तसेच अशा प्रकरणांमध्ये माहेरच्या वडिलोपार्जित मिळकतीमध्ये वडिलांचे वारस म्हणजे भाऊ-बहिण वगैरे यांच्या वारस नोंद करण्यासाठी कोर्टाकडून वारसा प्रमाणपत्र द्यावे लागते का
ReplyDeleteभाऊ मयत झाल्या नंतर त्याचे दुसरे उर्वरित भाऊ वारस होवू शकतात का.
ReplyDeleteआमचे आजोबा मयत असुन त्यांना सात मुल आणि दोन मुली आहेत आता आम्हाला जर आजोबांच्या नावाने जी काही संपत्ती आहे त्या तुन आमचा हिस्सा जर कोर्टा मार्फत कसा घेता येईल
ReplyDeleteआमचे आजोबा मयत असुन त्यानी 2003 साली रोटरी समोर त्याचे वाटणीपत्र केले असुन प्रत्येकाचे हिस्से एका भावाने विकत घेतले आहेत व बहिणीची वाटणी त्या वाटणी पत्रात नाही.तर वारस म्हणून त्या एका भावाची नोंद होऊ शकते का ???
ReplyDeleteBandhlele ghr asel tr tyacha vatnya he ujvi baju mothya mulala ani Davi baju lahan mulala asa kayda ahe ka..mg madhlya mulala khup kami jaga ahe asha veles KY karave ki purn jaga mapun tyache 3 hisse krayche
ReplyDeleteएखादी विवाहित व्यक्ती मयत झाल्यावर वारस म्हणून बायको ,मुले यांच्या बरोबरच मयताचे आई वडील वारस लागतात का?
ReplyDeleteमाझ्या सख्या आजोबांचा खून माझ्या मोठ्या सख्या चुलत्यानी 1 जानेवारी 1962 रोजी केला. या प्रकरणात माझे वडीलही सहआरोपी होते.न्यायालयाने माझ्या चुलत्याना दोषी ठरवून 6 वर्षाची सजा ठोठावली, तर वडिलांना दोषमुक्त केले. हिंदू वारसा कायदा 1956 नुसार जर मुलाने अगर मुलीने आपल्या आईचा किंवा वडिलांचा खून केल्यास आणि ते सिद्ध झाल्यास खून करणाऱ्या व्यक्तीला ज्याचा खून झाला आहे त्याची मालमत्ता जरी तो वारस असला तरीही मिळत नाही असे मी वाचले आहे. माझे चुलते 2005 साली तर वडील 2011 साली मयत झाले आहेत. चुलत्याना 1 मुलगा वारस आहे. आता मी माझ्या चुलत्यानी आपल्या वडिलांचा म्हून केला म्हणून त्यांची संपत्ती घेण्याचा अधिकार नाही किंवा ते वारस म्हणून लायक ठरत नाहीत सबब त्यांचा मुलगाही ही संपत्ती धारण करण्यास/ उपभोगण्यासाठी लायक ठरत नाही, तेंव्हा त्यांचा हक्क डावलावा असा दावा करु शकतो काय, चुलत्यानी शिक्षा भोगल्याची कागदपत्रे माझ्याकडे आहेत,त्याचा या साठी कसा वापर करता येईल.
ReplyDeleteभावा खून वडलांनी केला मुलांनी नाही त्याचा त्याच्यात काय दोष. कायद्याने त्याला हिस्सा मिळो किंवा नाही पण तू त्याला त्याचा हिस्सा देऊन टाक. जर त्याच्या जागी तूच असता त काय झाले असते विचार करून पहा
DeleteAajji maran Pavli 23/4/2020 sra madhe tiche zhopde patra aahe Va till 269 sq.ft sadnika bhetnar aahe aajji an 2 natti (mulachya milk) ekatra rahat hote doghichi lagna jhale tarihi nattichi juney navane shidhapatriket aajji sahit nave aahet ,aajji chi ek Vivahi mulgi aahe,aajicha sabhal aajarpan ,davakhana, davakhnrche bill sarva nattinech kele. ata prasna ashe ki tichi sadnika konal betel
ReplyDeleteKalam99?
ReplyDeletePlease mrga dakhava
Deleteघरातील उतारात 6 मावशीचे नाव होतं त्यात पर्वा एक मावशीचे निधन झाले आहे तर त्या मावशीला 2 मुली व एक मुलगा आहे तरी त्या मावशीचे नाव उतारा ला लावता येईल का ?
ReplyDeleteमाझ्या मोठ्या भावाच्या नावाने जमीन घेतली होती आता तो मयत आहे आणी त्यची मुले जमीन वाटून देत नाहीत
ReplyDeleteतर मी काय करावे
बहिणीचे लग्न जर 22 जून 1994 पूर्वी झाले असेल आणि तिचे नाव वडिलांच्या मृत्यूनंतर 22 जून 1994 पूर्वी वारसा हक्कात लागलेली असेल आणि आज ते सातबारा दिसत असेल तर ते आत्ता रद्द करता येईल का?
ReplyDeleteNamaskar sir...Mazi aaji mrutyu pawli ahe aata mazya kade tine dilela stamp ahe yawar 2 sakshidar suddha ghetle ahet....Parantu itar warsani satbara var waras dakhal kele ahe....Tar yamadhe pudhe kay karawe...
ReplyDeleteवडिलोपार्जित संपत्ती त्याच कुटुंबातील सख्ख्या काकिने पुतण्याला गावठाणातील घर द्यायचे आहे तर ते कोणत्या कागदपत्रं वापरून द्यावे.
ReplyDeleteमी शेखर पवार बोलत आहे.माझा प्रश्न असा आहे की माझे वडिल धरून 3 चुलते आहेत.आमची 2 गावामध्ये जमिनी आहेत.आम्ही रजिस्टर ऑफिस मधून वाटपपञानुसार खातेवाटप करून ज्याची त्याला जमिन दिलेली आहे.त्यामधील 2 चुलत्यांची जमिन वाघाळे गावात असून त्यांना दिलेल्या जमिनीची नोंद सुद्धा झालेली आहे.पण आता आमच्या नोंदीस अडचण आणत आहेत.तलाठी साहेबांनी दिलेली
ReplyDeleteहक्कसोड नोटीस वर सह्या करत नाही.
आम्हाला अडथळा आणत आहेत.हक्कसोड सुद्धा झालेल आहे रजिस्टर ऑफिस मधून... तर आता आमच्या नोंदीचा प्रश्न कसा सुटेल..कळावे..
सण १९६० साली माझे वडील १० वर्षांचे असताना त्यांच्या नावे जमीन खरेदी झाली अ पा. क म्हणुन माझी आज्जी होती. त्यानंतर १९६४ साली ती जमीन गहाण खत म्हणून १५ वर्षासाठी ठेवण्यात आली, अ पा. क म्हणुन माझी आज्जी होती,गहाण ठेवताना त्यात १५ वर्षांनंतर जर बोजा फेडण्यास असमर्थ ठरले तर हेच खरेदीखत मान्य करण्यात यावे अशी अट घातली गेली. गहाणखत करताना माझे वडील अज्ञान होते व आवश्यक असणारी न्यायालयाची परवानगी काढली असण्याची शक्यता कमी आहे. सध्या जमिनीची ७/१२ वर त्या व्यक्तीची वंशावळ लागली आहे. माझ्या स्वर्गवासी वडिलांना नोकरीनिमित्त बाहेरगावी असल्यामुळे या प्रकरणाची काही माहिती असेन याची शक्यता कमी होती. त्या गहाणखताचा जुना दस्त मला मिळाला त्यावरून मला या प्रकरणाची माहिती झाली. तरी वरील प्रकरणात जमिनीची मालकी हस्तांतरित होते का ? माझ्या आज्जीला गहाणखत करण्याचा अधिकार होता का ? सदर तीनही व्यक्ती सध्या मृत आहेत. वरील प्रकरणात मला वारस म्हणून दाद मागता येईल का ? आम्हास मार्गदर्शन करावे.
ReplyDeletemazya nawawar asleli jamin bhawachya watyala geli bhawachya nawawarchi jamin mazya hisyala ali tr ekmekachi badal kartana rajisty karaw lagel ka
ReplyDeleteJar vadil hayat astil ani vadilani tyanchi sarkari nokri mothya mulas dili ki motha mulga ghar ani chotya mulache shikshan baghel
ReplyDeletePn mothyane tase kele nahi
Tr ky karayla have. .. .???
माझ्या वडीलानी दुसरे लग्न केले आहे तर् जमीन वडीलानी
ReplyDeleteसावत्र भावाचे नावे केली आहे तर् मला माझा हक्क मिळवन्यरीत काय करावे 🙏pls
बहिणीचे सासरे वारले आहेत त्यांची सर्व मालमत्ता टेन्शन एकाच मुलांनी ताब्यात घेतलेले आहे तेव्हा त्यांना दुसरा मुलगाही आहे परंतु ते त्यांना संपत्ती मध्ये वाटा नाही असे सांगतात व वडिलांच्या मृत्यूनंतर मिळणारी पेन्शन यावर कोणाचाअधिकार असतो
ReplyDelete7/12 मध्ये वडील व त्यांची 3 मुले अशी वारस नोंद लावली होती 1990 साली. वडील 2014 साली मयत झाले. त्यानंतर त्यांचे 7 वारस म्हणजे 3 मुले आणि 4 मुली अशी नावे सामायिक क्षेत्रात लागले.ह्याचे वाटपत्र कसे होईल
ReplyDeleteवडिलांचे वय 70वर्षे आहे, मुलाचे वय 48वर्षे आहे. मुलाला वडीलोपार्जित संपत्ती कधी मिळवण्याचा आधिकार आहे?
ReplyDeleteवडिल मुलांच्या संमती शिवाय जमीन विकु शकतात का?
ReplyDeleteमाझ्या वडिलांची आई हि तिच्या ७ भावांमध्ये एकुलती एक होती. आणि तिच्या वडिलाच्या मृत्यू आधी तिचा मृत्यू झाला. त्यामुळे तिच्या वडिलांच्या वारस हक्कासाठी तिच्या मुलांना विचारले. तेव्हा त्यांनी आईचा हक्क सोडला. पण आता परिस्थिती चांगली नसल्यामुळे तो हक्क पुन्हा मिळवता येत का.
ReplyDeleteNamaskar aamhi Don bhau aahe vadiloparjit Ghar asmchya vadilachya navar aahe vadiloparjit mayat aahe bhavachya navane Ghar aahe tar bhavacha hissa vadiloparjit gharamadth aahe
ReplyDeleteआमच्या वडिलकडे ३५ एकेरी जमीन होती(वडिलांचा व आई चा मृततु झालं )मला 3५ एकरामधील फॅक्ट 1.३५ आली बाकीची उर्वरित जमीन यांनी स्वतःच्या नावावर चदवली काय करावं मार्गदर्शन करा ..
ReplyDeleteआईच्या अकाली मृत्यू नंतर उर्वरित संपत्ती अथवा घराचे वाटप कशा प्रकारे होते? रोख बँकेतील जमा रक्कम आणि राहते घर यांचे समान वाटप होते का?
ReplyDelete1993 साली बहिणींची नावे इतर हक्कात लागलेले आहेततर आज रोजी त्यांची नावे हक्कात येऊ शकतात का?
ReplyDeleteवारस एकाच असेल तर कोर्टातून certificate आणावे लागते का
ReplyDeleteमयत व्यक्तीच्या दुस-या पत्नीला व तिच्या दोन मुलीला वडीलोपार्जीत संपतीत येणाचा अधीकार आहे का? मयत व्यक्तीची पहीली पत्नी जिवंत नाही.मग खरा वारसा प्रमानपञ कोणाला मिळते. आणखी एक बाब अशी आहे की मयताची दुसरी पत्नी ही पहील्या मयत पत्नीच्याच नावाचा उपयोग करीत आहे.तिच नाव अधारकार्डवर वेगळे आहे .कस कराव
ReplyDeleteमाझी आई मयत असून मी व माझी बहिण यांनी तिच्या नावे असलेला फ्लॅट माझ्या मृत बंधू ची पत्नी चे नावे करण्यासाठी हक्क सोड पत्र केलं आहे
ReplyDeleteआता वारस दाखला साठी वकिलाने तिच्या तीनही मुलींची नावे टाकली आहेत
आम्ही सोड पत्र फक्त वहिनी चा नावे केले आहे
कृपया मार्गदर्शन करावे
माझा एक प्रश्न आहे...
ReplyDeleteअशा आहे की आपल्या बहुमूल्य वेळेतील काही काळ माझ्यासाठी देऊन आपण माझ्या प्रश्नाचे निरसन कराल...
माझ्या आईचे वडील हे एका कुटुंबातील दत्तक पुत्र होते..
त्यांचे दत्तक आईच्या नावे असलेली एक जमीन ही कित्तेक (40-45) वर्षांपासून दत्तक आईच्याच नावे असून ती पुढे माझ्या आईच्या वडिलांच्या किवा वरसाने माझ्या आईच्या नावे लागलेली नाही ती जमीन आज मितीस दत्तक आईच्याच नावे आहे..
सदर जमीन आमच्याच भवकितील एक व्यक्ती वाहीवटत असून तो देखील आज मितीस त्या जमिनीचा मालक नाही आहे...
आजही सदर जमीन सात बारा दत्तक आईच्या नवेच आहे..
आम्ही तिचे वंशपरंरागत वारस असल्याने सदर मिळकतीस आमची नावे कशी दाखल करावी??
आमच्याकडे दत्तक आईची इतर जमीन नावावर झाल्याचा पुरावा आहे..
वंशावळ आहे...
मृतुदाखला आहे..
फेरफार,नकाशे, या गोष्टी आहेत
आजोबांचा मयत झाल्याने माझा वडिलांचा नावाने शेत झाली पण,वडिलांचा बहिणींच्या(अत्यांचा)नावे 7/12 मध्ये इतर अधिकार/बिगर/वारस मध्ये नाव आहेत, त्यांचा लग्न 1994 पूर्वी झालेले, माझा वडील 65 वर्ष वयाचा आहे माझा वडिलाना 3 मुले आहेत, आता आम्हाला अत्यांचा नाव काढून 3 नि मुलांचे नाव घालायचा आहे? वडिलांचा मयत झाल्यावर खरे वारस कोणाला समजण्यात येईल,
ReplyDeleteइतर दिवाणी न्यायालये मृत्युपत्रातील वाटणी योग्य की अयोग्य याबाबत निर्णय देऊ शकतात.
ReplyDeleteमृत्युपत्र खरे नाही, ते खोटे आहे हे सिद्ध करण्याची जबाबदारी जो तसा अरोप करतो त्याच्याकडे आहे.त्यासाठी वेळ पडल्यास खोटे बक्षीसपत्राची फॉरेन्सिक टेस्ट, त्या व्यक्तीची नार्कोटिक्स करता येते का
नमस्कार,
ReplyDeleteमाजी सहाय्यक पोलीस आयुक्त यांच्या नावे त्यांच्या दत्तक आईने शेती संबंधात नोंदणीकृत मृत्यूपत्र तयार करून ठेवले आहे, त्या मृत्यू पत्रावरून त्यांनी आपले नाव 7/12 वर लावून घेतले मात्र त्यांच्या दत्तक आईनी एक जमीन डिसेंबर 1979 मध्ये विकत घेतली होती आज त्या जमिन मालकाच्या हयात नसलेल्या बहिणीच्या वारसांनी प्रांताधिकारी कडे अपील दाखल केले असता मृत्युपत्र शाबीत केलेले नाही म्हणून त्याचे नाव 7/12 नोंद झालेला फेरफार रद्द करण्याचा आदेश दिला. आम्हाला मुंबई उच्च न्यायालयात मृत्यपत्र शाबीत करून घ्यावे लागेल का?
- अशोकानंद
वडिल वारले जमीन आईच्या नावे करायची आहे होईल का
ReplyDeleteVaras नोंदणी 13 वर्षा nanter करत आहोत penalty किती asel
ReplyDeleteNamskar sir mazya aaiche wadil Yani wadiloparjit zamin madhe tyancha natu mhanje mulacha mulga yachts nave 10 acre paiki 2acre zamin tya natvachya navavar mrutyupatra Kele she ye manta hoil Ka the radd karnyasathi Kay karavr
ReplyDeleteमाझ्या आईचे वडिलांनी त्यांच्या नातू म्हणजे मुलाचा मुलगा यांच्या नावे वडिलोपार्जित जमीनीमधील 10एकर जमीनीपैकी 2 एकर जमीन केली आहे हे मान्य होईल का मान्य झाले तर रद्द कसे करावे
ReplyDeleteHeirship certificate मधे नोंद केलेल्या सात वारसापैकी दोन वारसाचे निधन झाले आहे. मृत वारसांना उत्तराधिकारी आहे. मग heirship certificate मधे उत्तराधिकारी वारसांची नावे कशी समावीष्ट करावी
ReplyDeleteवडीलाजित मिळकत असेल तर त्याचे मृत्युपत्र होऊ शकते का किंवा कायदेशीर वारस सोडून दुसऱ्या चे नवे मृत्युपत्र करून घेऊ शकतात का ?
ReplyDeleteएकत्र कुटूंबातील एखाद्या भावाने स्वकष्टार्जीत शेती घेतली तर त्याच्या मृत्यूनंतर वारस कोण लागतील ?
ReplyDeleteआज्जी चे आई वडील 1941 ला वडील व नंतर आई 1943 मयत झाली, आज्जी पण आत्ता मयत आहे, परंतु आज्जी नाव तिच्या वडिलांनंतर वारसा हक्काने लागले नाही आज्जी ला भाऊ नव्हता, तर आज्जी ची व तिच्या वारसाची नोंद होऊल का
ReplyDeletePlzz help😥,माझी 2 महिन्याआधी आईची मुत्यु झाली,आणि माझे बाबा दुसरे लग्न करायला निघाले,तर माझ्या वाटे माझ्या बाबानी काहीच दिले नाही तर मी यावर काय करू शकतो 🙏🙏
ReplyDeleteनमस्कार सर
ReplyDeleteमाझे वडील 1986 साली वारले आहेत. आम्ही 4 भाऊ बहीण आहोत. मी एकटाच आणि मला तीन बहिणी आहेत. त्यापैकी थोरली बहीण ही 1988 साली वारली आहे. धाकट्या दोन बहिणीची हक्कसोड पत्र घेतले आहे. थोरली बहीण वारल्याने तिचे राहिले आहे. तेव्हा आता माझ्या वाचनात असे आले आले आहे की 2005 साली जर माझी बहिण हयात असेल तरच हक्क मागू शकेल. म्हणजे आता तिचा हक्क लागू शकतो की नाही हे मला समजेल का ?
दोन सखे भाऊ मृत झाली तर त्यांचे वारसदार आपली नोंद कशी करतात
ReplyDeletexyz व्यक्तीला वडीलोपार्जित मिळकत मिळाली तेव्हा त्याला पाच अज्ञान मुली होत्या मुली सज्ञान होईपर्यंत त्या व्यक्तीने पुष्कळ वडीलोपार्जित मिळकत विक्री केली त्या पाच मुलींपैकी एक मुलगी घटस्फोटीत असुन तीला एक मुलगी आहे तर ती अस्तित्वात असणाऱ्या व विक्री केलेल्या मिळकतीत हक्क मागु शकेल का?
ReplyDeleteJar eka navrychi proparti navra jivant astana tyachya sw khushine ti baykochya navavar karaychi ahe tar kay prosees aseil sir
ReplyDeleteमाझ्या वडिलंनी एका सावकाराला वडिलोपार्जित जमीन रजिस्त्री करून दिले आहेत. आम्ही 3 भावंडं व आई आहोत. त्यावेळी आम्ही तिघेही अज्ञान होतो. Rajistri करतांना आई व आमची कोणाचीही सही नाही. तर आम्हाला जमीन परत मिळवण्यासाठी काय करावे लागेल.plz मार्गदर्शन करण्यात यावे ही विनंती.
ReplyDeletemazhya vadilanchya chultyane varas nond madhe swatache naav taakle,vadlanchya vadlanche naav takle naahi aata aamchi vaaras nond kashi karaychi
ReplyDeleteनोंदणीकृत मॗत्यूपत्र रद् करण्यासाठी फक्त मुंबई मेट्रोपोलीयन कोर्टातच दावा दाखल करता येतो,अन्यत्र दाखल केल्यास दावा कालांतराने फेटाळला जातो,
ReplyDeletePahilya patni chya mulana v dusarya patnichya mulana hissa kasa asel..mhanje 50/50 asel ka
ReplyDeleteMurtu patransar byako astana.mzya mrtunatar propati hise kartana mazya baykochi samati anivarya aahe pan mazi bayko adhi mrutu pavali mzya mrutunatar to coz tasach aahe mag priparti vatni kartana ti vastu mazya sagla mulanchi hote ka.
ReplyDeleteमाझ्या वडिलांनी रजिस्टर व्हील केले आहे, वारस त्यांचा मुलगा आहे मुंबई महानगर पालिकेत ती रूम आहे, वारस हक्कने ती नावावर कशा प्रकारे होऊ शकतो,
ReplyDeleteव्हिल प्रोबेट केला आहे,
Sir
ReplyDeleteआमचे वारस नोंदीतून नाव वगळले आहे, म्हणजे मृत्यूचा दाखला देऊन आमचे नाव नाही लावले इतर वारसांनी, मला समजायला लागल्यावर आणि document काढायला आणि केस करायला 11 वर्षाचा विलंब झाला, विलंब माफीचा अर्ज पण मंजूर झाला, त्यातील दोन वारसांनी कबूल पण केले हा आमचा वारस आहे म्हणून बाकीचे एकच तारखेला हजर राहिले, मी सर्व तारखा हजर राहिलो, तरी प्रांत यांनी विलंब झाला म्हणून अर्ज फेटाळला, नंतर दुसऱ्या lettr मध्ये सांगितले, या न्यायालयास वारस नोंद ठरविण्याचा अधिकार नाही, मग मी दुसरे अपील 60 दिवसाच्या आतच जिल्हाधिकारी यांच्या कोर्टात दाखल केले, तिथे तर पुढची पार्टी एकपण तारखेला हजर नाही, त्यांचे mhnane नाही, मी 4 वेळा mhnane दिले सर्व तारखा हजर, तरीपण जिल्हाधिकारी यांनी खालच्या कोर्टाचाच निकाल दिला, विलंब झाला म्हणून, योग्य त्या न्यायलायत जा, असा निकाल दिला, असं का बरं केलं असेल, याला काय नियम आहे का, पुढचे कोणीच नसताना असा निकाल दिला, हे चूक आहे का बरोबर,याला पर्याय काय, योग्य न्यायलय कोणते, यांना अधिकार नाही तर मग केस कशी चालवतात हे, म्हणजे परत अपील, त्यांनी पण असाच निकाल द्यावा म्हणजे झालं, मग यांना विचारणार कोण, असे असते का
मंदिर ट्रस्ट च्या मालकीची जागा आहे, जागेत भुईभाडोत्री आहेत १९४३ पासून. सध्या मंदिराचे पुनर्निर्माण काम चालू आहे. एकाही भुईभाडोत्री ल्या विचारात न घेता. सध्या भाडोत्रीच्या जागेला हात लावलेले नाहीत पण प्रस्तावित प्लॅन मध्ये भाडोत्रीच्या जागा दाखवल्या आहेत. भाडोत्रींना जागा मिळू शकतात का जर कोर्टात केस फाईल केली तर.काय शक्यता असू शकते. भाड्याने गाळे/घरे किंवा मालकी हक्काचे घरे किंवा दुकाने.
ReplyDeleteJar patiche property mulana sodun patnila milnesati kay karave
ReplyDeleteNamaskar sir
ReplyDeleteMazi aji mrut pawlyavar babani dusre lagn kele ter tyanchya malkivar vadiloparjit samptivar tyanch hakk asel ki nahi
काकाचे लग्न न होता मयत झाल्यास वारसा हक्क मोठ्या पुतण्याच्या नावे होते का???
ReplyDeleteमाझे आजोबा 1951 साली वारले, आता त्यांच्या वडिलोपार्जित संपत्ति त आतेचा भाग लागतो का?
ReplyDeleteवडिलांनी मृत्यूपत्र रजिस्टर केल्यानंतर हयातीतच दोन मुलांपैकी मोठ्या मुलाला वडीलोपार्जित मालमत्तेपैकी ५०% भाग बक्षीस पत्राने दिला आहे उर्वरित ५०% भाग वडीलांनी स्वतः कडे ठेवला आहे. पुढे वाटणीचा मुद्दा आल्यास मोठा मुलगा उर्वरित ५०% भागात हिस्सा मागु शकतो का? वडिलांच्या हयातीनंतर मृत्यू पत्र अस्तित्वात असताना, त्यांनी हयातीतच केलेले बक्षीस पत्र कायदेशीर राहु शकते कि बक्षीस पत्राचा अंमल संपूष्टात येतो?
ReplyDeleteEka vayktiche 2 lagan zal he tyana pahilya patnikadun 2 mul ahe. Ti patni mrutyu zali mhanuntyani ya mulana sambhalnyasathi dusar lagan kel 2 patni kadun tyana 1 mulga ahe. Pahilya patnichya nava var room hoti dusrya patnine tichya nava var karun ghetli ata jar pahilya aai chya mulana tyancha hissa paije pan dusri aai na tyana hissa det nahi ahe kay karave.
ReplyDeleteMaja ? Maji aaji varli tyanantr maje kaka Ani vadil aahe. Aatya adich varli dilelya ghari.
ReplyDeleteMg satbara mde aatyache mulanche nav lagli gelit. Te ksi kmi krta yetil.
आईने खरेदी घेतलेली जमीन
ReplyDeleteसमजा एका व्यक्तीला दोन मुले आहेत. आनी त्या दोन मुलापैकी एका मुलाला सरकारी जमीन मिळाली आहे.तर जमीन मिळालेली व्यक्ती मयत झाल्यास वारस नोंद म्हनुन त्याचा भाऊ लागणार का त्याची मुले आनी बायको लागणार.
ReplyDeleteवडील करोना मध्ये मृत्यू झाले आम्ही दोन बहिणी आणि तीन भाऊ आहे. वडील वारल्या पासुन दोन भाऊ आईचा मानसिक छळ करतात.बहीनीना शिव्या गाळी करतात.तर माझी अशी विनंती आहे. जमिनीवर कसा टे लावावा.
ReplyDeleteमाझ्या आजोबा ची मावस बहिन म्हणजे माझ्या वडिलांची मावस आत्या आमच्या कडे 30 ते 35 वर्ष राहत होती व तिचा पुर्ण सांभाळ माझ्या वडिलांनी केला आहे तीच्या नावावर दोन हेक्टर जमीन होती ती जमीन गावातील आमच्या समाजाच्या लोकांना भाडे तत्वाने करायला दिली होती परंतु त्यांनी कोर्या कागदा वर त्या आजीचे डुप्लीकेट मुत्युपत्र तयार करुन ते मुत्युपत्र 14 वर्षानी सब रजिस्टार कडे नोंदवून ती जमीन नावे लावुन घेतली आहे तर मुत्युपत्र नोंदवण्या साठी काही कालावधी आसतो का त्या बाबत मार्गदर्शन करावे धन्यवाद
ReplyDeleteजर प्रॉपर्टी ही नवरा आणि बायको यांच्या नावे आहे पण बायको नवऱ्याला सोडून माहेरी राहत असेल आणि नवऱ्याला त्या प्रॉपर्टी वरून बायको चे नाव कमी करायचे असेल तर काय करावे
ReplyDeleteमाझ्या वडीलांनीआजीकडुन 20 वर्षापुर्वी आजीच्या वडीलाकडुन मिळालेली जमिन खुश खरेदी करुन घेतली आहे व त्या दस्तामधे ऍ कु म आसा आहे त्या शब्दाच्या जोरावर आज 20 वर्षानी वडिलांचे भाऊ त्यामध्ये हिस्सा मागत आहेत सध्या आजी मयत आहे त्या लोकांनी ती जमिन एकत्र कुटुंबाच्या उत्तपनातुन घेतली आसे सांगितले आहे तत्तपुवी सर्व भाऊ है विभक्त व सज्ञान होते वडिलांचे म्हणने ऍ कु म हा शब्द माझ्या बायको व मुलासाठी केला आहे आता आम्ही काय करावे
ReplyDeleteमयत व्यक्तीचे 2 लग्ना झाले असून पहिली पत्नी यांचे निधन झाले होते .त्या नंतर काईदा ne दोघांनी लग्ना केले असून सर्व property मध्ये 2rya पत्नीला सर्व हक्क betla आहे...पण पहिल्या पत्नी ani 2ri पत्नी यांचे नाव सेम आहे नावाचा फायदा घेऊन घरच्यांनी 2rya पत्नी यांचे नाव property मध्ये कमी करून पहिल्या पत्नी che documents जमा केले आहे की त्या मयत झाल्या आहेत....यावर काय करता येईल
ReplyDeleteपहिली पत्नीचे वारस नोंद रद्द करून दुसऱ्या पत्नी चे वारस नोंद करता येईल. का? पहिली पत्नी आजारी असल्यामुळे दुसरी केली. सध्या पेशंन मिळते.
ReplyDeleteवडिलोपार्जीत प्रॉपर्टी मध्ये माझ्या वडिलांच्या प्रतिण्या पत्रावरुन् माझ्या चुलत काका चे वारस म्हणून नोद झाली आहे ,ही नोद कायदेशीर आहे का?
ReplyDeleteएक जमिनीत संयुक्त कुळा पैकी एकाचा वारस आहे आणि एकाचा मृत्यूपत्राने वारस आहे तरी तो त्या जमीन चा कुळ वारस होतो का
ReplyDeleteमुलाने कर्ज घेतले असल्यास त्याच्या वडिलांच्या मिळकतीवर जमीन महसूल कुल कायदा नुसार बोजा नोंद कार्तायेते का
ReplyDeleteमुलाने कर्ज घेतले असल्यास त्याच्या वडिलांच्या ७/१२ वर जमीन महसूल कायदा नुसार बोजा नोंद करता येते का येत असेल तर त्याची प्रोव्हिजन काय आहे
ReplyDeleteजर माझे दुसरे लग्न झाले व माझ्या दुसऱ्या बायकोला एक मुलगी आहे (आधीच्या नवऱ्या पासून झालेली ) व मला पहिल्या लग्नापासून एक मुलगा आहे तेव्हा माझ्या आई कडून माझ्याकडे मृत्यूपत्राद्वारे किंवा बक्षीसपात्र द्वारे आलेल्या प्रॉपर्टीचे संपूर्ण अधिकार माझे राहतील का व ती (आई कडून आलेली )प्रॉपर्टी मी मृत्यूपात्र किंवा बक्षीसपत्र द्वारे मला वाटेल त्याला मी देऊ शकतो का
ReplyDelete