उपाय: रक्ताल्पता (Anemia)
रक्ताचे
दोन भाग असतात. 1. लाल रक्त पेशी (R.B.C.) व 2. हिमोग्लोबीन.
हिमोग्लोबीन
मध्ये दोन घटक असतात. 1. हिम- जे लोह (Iron) तत्वाचे बनलेले
असते.
2. ग्लोबीन-
जे प्रथिनांनी (Proteins) बनलेले असते.
रक्ताल्पता
हा विकार सर्वसाधारणपणे स्त्रियांना, गरोदर स्त्रियांना
होतो. रक्तातील हिमोग्लोबीनचे प्रमाण कमी झाल्यास रक्ताल्पता
हा विकार होतो. प्रोटीन व लोह यामुळे रक्त तयार होते.
(96% ग्लोबीन व 4% लोह) हिमोग्लोबीनमुळे
रक्ताला लाल रंग प्राप्त होतो. प्राणवायू वाहून नेणे हे हिमोग्लोबीनचे
महत्त्वाचे कार्य आहे.
दूध, अंडी, डाळी, मांस, मूग, मटकी, मसूर, सोयाबीन यातून प्रोटीन्स भरपूर प्रमाणात मिळतात तर पालेभाज्या, ब्रोकोली, चिक्कू, सफरचंद,
बीट, काकडी यांतून लोह प्राप्त होते.
* एक कप डाळिंब रसाचे नियमित सेवन करावे.
* कोहळ्याचा रस रोज शंभर मि.लि. सेवन
करावा.
* रात्री एक चमचा मेथीचे दाणे पाण्यात भिजवुन, सकाळी पाण्यासह
चावुन खावेत.
* आहारात नियमित पालेभाजी, विशेषतः पालक या भाजीचा समावेश
करावा. पालकाच्या भाजीत आर्यन, जीवनसत्त्व
‘क’, मिनरल्स, फोलीक ऍसिड भरपूर प्रमाणात असते, त्यामुळे रक्तातील
हिमोग्लोबीन वाढते.
* एक कप गव्हांकुराचा रस नियमित घ्यावा. गव्हांकुरात प्रोटीन व लोह भरपूर प्रमाणात असते, ह्यामुळे
रक्तातील हिमोग्लोबीन वाढते.
* अर्धाग्लास पाण्यात एक चमचा गूळ मिसळून त्यात गव्हाच्या दाण्याइतका खाण्याचा चुना मिसळून ते पाणी नियमित घ्यावे. ह्यामुळे शरीराला लोह व कॅल्शियम मिळते.
* बीटची साले काढून त्याचा एक
कप रस घेतल्याने रक्त वाढते, नवीन लाल रक्त पेशी (R.B.C.) निर्माण होतात.
* एक काचेचा पारदर्शक ग्लास घ्यावा, त्यात आठ-दहा हिरवी पाने स्वच्छ धुऊन घालावी (तुळस, पुदिना, मेथी, पालक इ.)
ग्लासात 3/4 पाणी भरावे व काचेच्या पारदर्शक झाकणाने
हा ग्लास झाकून त्यात सूर्यकिरण पडतील अश्याप्रकारे एक तास उन्हात ठेवावा. एका तासाने हे पाणी प्यावे व हिरवी पाने चावून खावीत. सूर्यकिरणात येताच ही पाने ऑक्सिजन निर्माण करतील, हिरव्या
पानातील क्लोरोफील पाण्यात उतरेल. शरीरातील रक्त वाढेल.
* सिताफळात मिळत असेल तेव्हा त्याचा भरपुर वापर करावा. यातील मॅग्नेशियम व पोटॅशियम मुळे रक्ताल्पता कमी होण्यास मदत मिळते, स्नायुना
आलेला थकवा नष्ट होतो.
* जास्वंद/गुडहलची (Shoe flower/China rose) सावलीत
वाळवलेल्या फुलांचे एक चमचा चूर्ण एक दुधात दिवसातून दोनदा एक महिना घेतल्यास रक्ताल्पता
दूर होते.
* केळ्यात लोह जास्त प्रमाणात असल्यामुळे एक केळे रोज खावे.
* पालक व बीट यांचा रस रोज एक कप घेणे.
* चार काळे ओले खजूर रोज खाणे.
* दहा-बारा बेदाणे रोज खाणे.
* कोथिंबिरीचा रस रोज अर्धा कप तीन वेळा घेणे. कोथिंबीरीमध्ये लोह व जीवनसत्त्व ‘क’ आहे. कोथिंबीर ही Anti
Fungus, Anti Bacterial आहे.
* ऊस, आवळा व डाळिंब रस समप्रमाणात दोन चमचे मध घालून पंधरा
दिवस घ्यावा.
Rate This Article
या लेखात, आम्ही आपणाला उपाय: रक्ताल्पता. याबाबत माहिती दिली आहे आम्हाला आशा आहे की, तुम्हाला ती आवडली असेल. माहिती आवडली असेल तर, सदरची माहिती तुमच्या मित्रांनाही शेअर करा.
आपले महसूल कायद्याविषयक प्रश्न विचारण्यासाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या. आणि आमच्या टेलिग्राम चॅनेललाही आजच जॉईन व्हा. Website Link Telegram Channel Link धन्यवाद !