प्रशासनपत्र - Letters of Administration
भारतातील वारसा व उत्तराधिकार कायद्यानुसार Letters of Administration द्वारे मयत व्यक्तीची मालमत्ता गोळा
करणे, तिचे कायदेशीर व्यवस्थापन करणे, देणी
व खर्च भागविणे आणि लागू कायद्यानुसार लाभार्थ्यांना मालमत्ता वितरित करणे यासाठी दिले
जाते.
|
कलम |
विषय |
|
२(अ) |
प्रशासकाची (Administrator) ची व्याख्या |
|
२१७–२२० |
कोणाला प्रशासनपत्र देता येते आणि त्याचा परिणाम |
|
२२१–२३६ |
प्रशासनपत्र देण्यासंबंधी नियम, पात्रता, प्राधान्यक्रम आणि अपवाद |
|
कलम २१८, २१९ आणि २३२ यांची लागूता मयत व्यक्तीचा
धर्म, मृत्युपत्र आणि वारसा हक्क यांवर अवलंबून असते. |
|
|
२३७–२६३ |
मृत्युपत्राशी संबंधित विशेष तरतुदी, मृत्युपत्राची
प्रत, अटी व न्यायालयीन दुरुस्ती |
|
२६४–२७३ |
न्यायालयाचे अधिकारक्षेत्र |
|
२७४–३०२ |
अर्ज, सुनावणी व न्यायालयीन आदेश, जिल्हा न्यायाधीशांच्या आदेशाविरुद्ध अपील |
|
३०३–३१६ |
कार्यकारी व प्रशासकाचे अधिकार, मालमत्तेचे व्यवस्थापन, हस्तांतरण व इतर अधिकार |
|
३१७–३३१ |
मालमत्तेची यादी व हिशेब, मालमत्तेचा तपशील, कर्जे व हिशेब सादर करणे |
|
३३२–३४८ |
मयत व्यक्तीच्या मालमत्तेचे प्रशासन, कर्जे, दायित्वे व लाभार्थ्यांचे हक्क |
|
३४९–३६९ |
वार्षिक उत्पन्न, वारसांना देय रक्कम व जबाबदारी, उत्पन्न,
देयके, मालमत्तेची हानी आणि प्रशासकाचे दायित्व |
भारतीय उत्तराधिकार अधिनियम, १९२५, कलम २(अ) अन्वये, मयत व्यक्तीच्या मालमत्तेचे
प्रशासन करण्यासाठी, मृत्युपत्राची अंमलबजावणी करणारा
Executor उपलब्ध नसताना, सक्षम प्राधिकाऱ्याने
नियुक्त केलेल्या व्यक्तीस प्रशासक (Administrator) म्हणतात.
(Administrator
means a person appointed by competent authority to administer the estate of a
deceased person when there is no executor.)
सामान्यतः खालील परिस्थितींमध्ये प्रशासक नियुक्त
करणे केव्हा आवश्यक ठरू शकते.
∙ व्यक्ती मयत झाली आहे; परंतु त्याने मृत्युपत्र (Will) केलेले नाही.
∙ मृत्युपत्र केलेले आहे; परंतु त्यात Executor नियुक्त केलेला नाही.
[Executor म्हणजे मृत्युपत्राचा ‘निष्पादक’ किंवा ‘मृत्युपत्राची
अंमलबजावणी करणारी व्यक्ती’
भारतीय उत्तराधिकार अधिनियम, १९२५ च्या कलम २(क) अन्वये मृत्युपत्र करणारी व्यक्ती
(Testator)
त्याच्या मृत्युपत्राची अंमलबजावणी
करण्यासाठी एखाद्या व्यक्तीची नियुक्ती निष्पादक (Executor) म्हणून करू शकते.]
∙ निष्पादक (Executor) नियुक्त केला आहे; परंतु तो कायदेशीरदृष्ट्या
अक्षम आहे, काम करण्यास नकार देतो किंवा मयत झाला आहे.
∙ मृत्युपत्रानुसार मालमत्तेचे प्रशासन पूर्ण झालेले नाही आणि
कायद्यानुसार दुसऱ्या प्रशासकाची आवश्यकता आहे.
∙ मयत व्यक्तीच्या मालमत्तेचे संकलन, व्यवस्थापन, देणी फेडणे किंवा
लाभार्थ्यांना वितरण करण्यासाठी न्यायालयीन अधिकार आवश्यक आहेत.
∙ वारस अल्पवयीन असल्यास, त्याच्या मालमत्तेचे संरक्षण आणि व्यवस्थापन करण्यासाठी परिस्थितीनुसार योग्य न्यायालयीन व्यवस्था आवश्यक असू शकते. मात्र, अल्पवयीनाच्या मालमत्तेचा पालक नेमणे आणि मृत व्यक्तीच्या संपत्तीचा प्रशासक नेमणे या वेगळ्या कायदेशीर प्रक्रिया आहेत.
∙ पात्र वारस उपलब्ध नसणे, वारसांमध्ये मतभेद असणे किंवा मालमत्तेचे प्रशासन आवश्यक असणे अशा परिस्थितीत, कायद्याच्या अटी व न्यायालयाच्या निर्णयानुसार अन्य पात्र व्यक्तीची नियुक्ती होऊ शकते.
∙ ज्येष्ठ नागरिकांच्या संपत्तीच्या व्यवस्थापनासाठी काही परिस्थितींमध्ये न्यायालयाकडून प्रशासनपत्र (Letters of Administration) दिले जाऊ शकते; परंतु केवळ व्यक्ती ज्येष्ठ नागरिक आहे म्हणून प्रशासनपत्र दिले जात नाही.
टिप: प्रत्येक प्रकरणात प्रशासनपत्र (Letters of Administration) घेणे अनिवार्य असतेच असे नाही.
त्याची आवश्यकता मालमत्तेचे स्वरूप, लागू कायदा, मृत्युपत्र, संबंधित संस्था किंवा बँकेची कायदेशीर
मागणी आणि न्यायक्षेत्र यावर अवलंबून असते.
w प्रशासनपत्राचा कायदेशीर परिणाम
न्यायालयाने दिलेल्या प्रशासनपत्र (Letters of Administration) ला मयत व्यक्तीच्या इस्टेटच्या प्रतिनिधित्वासंबंधी कायदेशीर परिणाम असतो. संबंधित कलमातील अटी व अपवादांच्या अधीन राहून, मयत व्यक्तीच्या मालमत्तेचा ताबा धारण करणाऱ्या व्यक्तींसाठी किंवा देणी देणाऱ्या व्यक्तींसाठी प्रशासकाच्या अधिकाराला महत्त्व प्राप्त होते.
w प्रशासनपत्रामुळे प्रशासकाला मालमत्तेत मालकी हक्क प्राप्त
होतो काय?
नाही. प्रशासनपत्र हे स्वतःहून मालकीहक्क निर्माण करणारे दस्तऐवज
नाही. वारसांचे हक्क, मृत्युपत्राची वैधता आणि
मालमत्तेतील हिस्से यांचा निर्णय लागू वारसा कायद्यानुसार होतो.
w न्यायालयाचे अधिकार (कलम २८३)
या कलमानुसार न्यायालयाला अर्जाच्या कार्यवाहीत
आवश्यक व्यक्तींना नोटीस देणे, इच्छुक
व्यक्तींना हरकत मांडण्याची संधी देणे आणि संबंधित परिस्थितीत आवश्यक चौकशी करणे
यासंबंधी अधिकार असतात. सबब अर्ज दाखल झाला म्हणजे प्रशासनपत्र आपोआप मिळते,
असे नाही. पात्रता, मालमत्तेचे तपशील, संबंधित व्यक्तींचे हितसंबंध आणि संभाव्य हरकती न्यायालयामार्फत तपासल्या
जाऊ शकतात.
प्रशासनपत्र मिळविणाऱ्या व्यक्तीकडून आवश्यकतेनुसार Administration Bond घेण्याची तरतूद आहे.
Administration Bond हा
प्रशासकाने इस्टेटचे कायदेशीर व योग्य व्यवस्थापन करावे, आवश्यक
हिशेब द्यावा आणि कायदेशीर जबाबदाऱ्या पार पाडाव्यात यासाठी असतो. तो प्रत्येक
परिस्थितीत एकसारख्याच अटींवर असेल असे नाही.
w मालमत्तेची यादी व हिशेब (कलम ३१७)
प्रशासकाला मयत व्यक्तीच्या मालमत्तेची यादी
आणि आवश्यक हिशेब न्यायालयात सादर करण्याची जबाबदारी असू शकते. यामुळे इस्टेटमध्ये
कोणती मालमत्ता होती, किती उत्पन्न मिळाले, कोणते खर्च किंवा देणी भागवली आणि मालमत्तेचे व्यवस्थापन कसे केले,
यावर न्यायालयीन नियंत्रण राहते.
w अल्पवयीन वारसाच्या मालमत्तेबाबत प्रशासनपत्र (Letters of Administration) आणि
पालक नियुक्ती/पालकत्व प्रमाणपत्र (Guardian
of Property- Guardianship Certificate) यातील फरक
अ. वडिलांचा मृत्यू झाला असून बँक ठेवी, भाडे उत्पन्न किंवा इतर मालमत्तेचे संकलन व व्यवस्थापन बाकी
आहे. अशा वेळी परिस्थितीनुसार भारतीय उत्तराधिकार अधिनियम, १९२५
अन्वये प्रशासनपत्र (Letters of Administration) चा विचार
होतो.
ब. वडिलांच्या मृत्यूनंतर मुलाला वारसाहक्काने जमीन मिळाली आहे
आणि आता त्या जमिनीचे उत्पन्न सांभाळण्यासाठी किंवा व्यवहार करण्यासाठी पालकाची
नियुक्ती आवश्यक आहे.
अशा वेळी पालक आणि पाल्य कायदा १८९० (Guardians and Wards Act, 1890) अन्वये पालक नियुक्ती/पालकत्व
प्रमाणपत्र (Guardian of
Property- Guardianship Certificate) आवश्यक आहे.
|
फरक |
||
|
मुद्दा |
पालक नियुक्ती/पालकत्व प्रमाणपत्र Guardian of Property/ Guardianship
Certificate |
प्रशासनपत्र Administration Certificate / Letters of Administration |
|
मुख्य उद्देश |
अल्पवयीन व्यक्तीच्या मालमत्तेचे संरक्षण व व्यवस्थापन |
मयत व्यक्तीच्या संपत्तीचे प्रशासन व व्यवस्थापन |
|
संबंधित व्यक्ती |
अल्पवयीन मालमत्ताधारक (Minor) |
मयत व्यक्तीच्या संपत्तीशी संबंधित वारस किंवा
पात्र प्रशासक |
|
लागू कायदा |
पालक आणि पाल्य कायदा १८९० Guardians and Wards Act, 1890 |
भारतीय उत्तराधिकार अधिनियम, १९२५ Indian Succession Act, 1925 |
|
प्रमाणपत्रधारकाची भूमिका |
अल्पवयीनाच्या मालमत्तेचा पालक |
मयत व्यक्तीच्या संपत्तीचा प्रशासक |
|
मालकी हक्क |
केवळ पालक नेमल्याने मालकी पालकाकडे जात नाही |
केवळ प्रशासक नेमल्याने तो स्वतःहून अंतिम लाभार्थी
किंवा मालक ठरत नाही. |
∙ पालकत्व प्रमाणपत्र (Guardianship Certificate): एखाद्या अल्पवयीन वारसाच्या नावावर
वडिलोपार्जित किंवा वारसाहक्काने शेतीची जमीन आली आहे आणि न्यायालयाने एका व्यक्तीची
पालक म्हणून नियुक्ती केली आहे किंवा /पालकत्व प्रमाणपत्र दिले आहे. तर मालमत्ता/जमीन अल्पवयीन व्यक्तीची असल्यास
केवळ पालक नियुक्तीच्या प्रमाणपत्रावर पालकाचे नाव मालक किंवा कब्जेदार म्हणून नोंदविता
येणार नाही.
∙ प्रशासनपत्र: (Letters of Administration):
हे प्रमाणपत्र मयत व्यक्तीच्या संपत्तीच्या प्रशासनासाठी दिलेले
असते. त्यावरून प्रशासकाला थेट मालकी हक्क मिळतो असे मानता येणार नाही. प्रमाणपत्रातील
अटी, मृत्युपत्र आणि वारसांचा हक्क स्वतंत्रपणे तपासणे आवश्यक
असते.
प्रमाणपत्रधारक हा स्वतःही कायदेशीर वारस किंवा
सहमालक असल्यास, त्याचा वारसाहक्काचा हिस्सा स्वतंत्रपणे नियमानुसार मालकी हक्काच्या
सदरी नोंदवता येईल.
भारतीय उत्तराधिकार अधिनियम १९२५, कलम २११ अन्वये,
executor किंवा
administrator हा मयत व्यक्तीचा कायदेशीर प्रतिनिधी असतो. मालमत्ता त्याच्याकडे
त्या प्रतिनिधीच्या नात्याने निहित होते. याचा अर्थ वैयक्तिक लाभासाठी मालकी मिळणे
असा होत नाही.
‘‘अर्जदाराने सादर केलेल्या अर्जासोबत भारतीय उत्तराधिकार अधिनियम, १९२५ अन्वये प्राप्त Letters of Administration /
Administration Certificate सादर केले आहे. सदर प्रमाणपत्रानुसार अर्जदाराची
नियुक्ती मयत व्यक्तीच्या संपत्तीचा प्रशासक म्हणून करण्यात आलेली आहे.
अभिलेखाची तपासणी करता, अर्जदाराने केवळ सदर प्रशासनपत्राच्या आधारे स्वतःचे नाव संबंधित
जमिनीच्या मालकी हक्काच्या किंवा कब्जेदार सदरी नोंदविण्याची मागणी केली आहे.
भारतीय उत्तराधिकार अधिनियम १९२५, कलम २११ व २२०
अन्वये प्रशासनपत्रधारकाचे अधिकार हे मयत व्यक्तीच्या संपत्तीच्या कायदेशीर प्रतिनिधित्वाशी
व प्रशासनाशी संबंधित आहेत. सदर नियुक्तीमुळे अर्जदारास वैयक्तिक मालकी हक्क प्राप्त
झाला आहे, असे केवळ प्रमाणपत्रावरून मानता
येत नाही. तसेच, प्रत्यक्ष कब्जाबाबत स्वतंत्र पुरावा किंवा त्यासंबंधी
स्पष्ट न्यायालयीन आदेश नसताना अर्जदाराचे नाव कब्जेदार सदरी नोंदविणे उचित ठरणार नाही.
त्यामुळे, उपलब्ध अभिलेख व सादर कागदपत्रांच्या आधारे अर्जदाराचे
नाव केवळ प्रशासनपत्राच्या आधारावर मालकी हक्काच्या किंवा कब्जेदार सदरी नोंदविण्याची
मागणी मंजूर करता येत नाही. अर्जदाराचे नाव ‘इतर हक्कात’ दाखल करण्यात यावे.’’
l
Rate This Article
या लेखात, आम्ही आपणाला प्रशासनपत्र - Letters of Administration. याबाबत माहिती दिली आहे आम्हाला आशा आहे की, तुम्हाला ती आवडली असेल. माहिती आवडली असेल तर, सदरची माहिती तुमच्या मित्रांनाही शेअर करा.
आपले महसूल कायद्याविषयक प्रश्न विचारण्यासाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या. आणि आमच्या टेलिग्राम चॅनेललाही आजच जॉईन व्हा. Website Link Telegram Channel Link धन्यवाद !