उपाय: आमवात
संधिवातात ठरावीक सांधा नेहमी दुखतो
तर आमवातात दुखरे ठिकाण बदलत असते. (Transferable Pain) या बरोबरच दुखर्या भागावर दाह आणि सूज आलेली
असते.
आमवाताचे मुख्य कारण म्हणजे जठराग्नी
पूर्णपणे प्रज्वलित नसताना खाणे, कुपथ्य, सततचे अपचन, भूक लागलेली असताना न खाणे किंवा कुपथ्यकारक
खाणे, अति खाणे, वजन कमी करण्यासाठी अशास्त्रीय
‘डायटींग’ करणे इत्यादी.
आमवाताची
सुरुवात हात-पायाची बोटे आखडणे, सुजणे
यापासुन होऊन पुढे कंबर, गुडघे, जांघा इत्यादी
आखडणे, सुजणे अशी होते.
आमवातात
ओकारी होणे, अतिसार अथवा बद्धकोष्ठता, चक्कर येणे, वायुविकार इत्यादी लक्षणे दिसतात.
* आमवातावर कडू रसाचे पदार्थ उदा. कुळीथ, हरभरा, वाटाणे यांची भाजी व काढा आहारात ठेवावा.
* आमवात असणार्या व्यक्तीने दररोज दोन चमचे एरंडेल तेल प्यावे वर एक कप
कोमट पाण्यात एक चिमुट सुंठ घालून प्यावे.
* सुंठ, वेखंड, बडीशेपेचा काढा घ्यावा.
* सुंठ, गुळवेल, हिरडा आणि गुग्गुळ
यांचा काढा आमवातावर प्रभावी उपाय आहे.
* जीरा, धणे, सुंठ प्रत्येकी दहा
ग्रॅम, पुदिना व बडीशेप प्रत्येकी वीस ग्रॅम, एकत्र चूर्ण करून रोज जेवणानंतर गरम पाण्यातुन घ्यावे. हे ‘आम पाचक चूर्ण’ आमवातावर प्रभावी
आहे.
Rate This Article
या लेखात, आम्ही आपणाला उपाय: आमवात. याबाबत माहिती दिली आहे आम्हाला आशा आहे की, तुम्हाला ती आवडली असेल. माहिती आवडली असेल तर, सदरची माहिती तुमच्या मित्रांनाही शेअर करा.
आपले महसूल कायद्याविषयक प्रश्न विचारण्यासाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या. आणि आमच्या टेलिग्राम चॅनेललाही आजच जॉईन व्हा. Website Link Telegram Channel Link धन्यवाद !