आपले महसूल कायद्याविषयक प्रश्न आमच्या वेबसाईटवर विचारावेत. 📌 Mahsul Guru 📌 YouTube Channel Link!
Posts

उपाय: संधिवात

Please wait 0 seconds...
Scroll Down and click on Go to Link for destination
Congrats! Link is Generated
 उपाय: संधिवात
 शरीरातील सांधे आपसात घासु नये म्हणुन दोन सांध्यांच्यामध्‍येकार्टिलेजनावाची द्रव गादी (Cushion) असते. शरीरात वाताचा प्रकोप वाढला तर हे द्रव सुकते व सांधे आपसात घासुन वेदना होतात.
दोन हाडांत (संधित) वायु (वात) शिरणे म्हणजे संधिवात.
सांधेदुखी हा विकार जर कफ प्राबल्यामुळे झाला असेल तर खाज/कंड सुटणे हे लक्षण जाणवते, जर पित्त प्राबल्यामुळे झाला असेल तर वेदना/लाली/सूज येणे हे लक्षण जाणवते, हा विकार जर वात प्राबल्यामुळे झाला असेल तर वेदना होणे हे लक्षण जाणवते. संधीवातात....
* कोरडे पदार्थ, थंड पदार्थ, वातवर्धक पदार्थ खाणे टाळावे.
* सांबरशिंग/मृगशिंग भस्म मधाबरोबर घ्यावे.
* आठवड्यात तीनवेळा, दोन चमचे एरंडीचे तेल रात्री झोपतांना घ्यावे.
* पन्नास मि.ली. ‘दशमुल काढादिवसातून दोनवेळा घ्यावा.
* वातामुळे गुडघे, कंबर दुखत असल्यास मेथीदाण्याची पावडर, हळद पावडर, सुंठ प्रत्येकी 100 ग्रॅम एकत्र करून दिवसातून दोनदा रिकाम्यापोटी गरम पाण्याबरोबर घ्यावी.
* तीळाचे तेल गरम करून त्याने हलकेच मसाज करावा.
* मेथीदाण्याचे चूर्ण, सुंठ चूर्ण व हळद पावडर सम प्रमाणात एकत्र करून मधाबरोबर घ्यावी.
* अर्धाग्लास पाण्यात गव्‍हाच्या दाण्याइतका खाण्याचा चुना मिसळून ते दही, वरण किंवा पाण्याबरोबर नियमित घ्यावे.
* एक चमचा शेंगदाण्याचे तेल दिवसातून दोनवेळा पोटात घ्यावे.
* काही लोकांना सांध्यांच्या विकारामुळे हालचाल करणेही अवघड जाते, गुडघे सुजतात. डॉक्टर गुडघ्याची वाटी बदलावी लागेल असा सल्ला देतात. यालागठीया रोगअसेही म्हणतात. अशांनी पारिजातक (पांढर्‍या पाकळ्या व केशरी दांडीचे फुल येणारे झाड) च्या झाडाची पाच पाने घेऊन ती वाटून त्याची चटणी करावी. एक ग्लास पाण्यात ती टाकून पाणी अर्धे होईल इतके उकळावे. पाणी थंड झाल्यावर प्यावे. हा प्रयोग नियमित केल्यास दोन महिन्यात गुण येतो.
* काळे तीळ थोडे भाजून त्याची पावडर करावी, त्यात गूळ व कोरफडीचा गर टाकून लाडू करून खावे.
* रोजच्या आहारात तिळाच्या तेलाचा समावेश करावा. स्‍थूल व्‍यक्‍तीने रोज दोन चमचे तीळाचे तेल प्‍यावे परंतु कृश व्‍यक्‍तीने दोन चमचे खोबरेल तेल प्‍यावे.
* संधिवाताच्या रोग्यांनी दोन बटाट्याच्या साली दोन कप पाण्यात उकडून काढा करून प्यावा व सालीचा लगदा दुखर्‍या भागावर लावावा.
* रोज रात्री गरम दुधात पाव चमचा हळद घालून किमान एक वर्ष घ्यावी.
* सांध्यावर सूज असल्यास रोज रात्री दोन चमचे अख्खे धणे रात्री काचेच्या  ग्लासमध्‍ये पाण्यात भिजवून ठेवावे, सकाळी ते पाणी धण्यासह अर्धे होईल इतपत उकळावे, कोमट करून, गाळून प्यावे. तसेच सकाळी त्याच ग्लासमध्‍ये दोन चमचे अख्खे धणे पाण्यात भिजवून असाच प्रयोग करावा.
* रोज रात्री झोपताना हात-पायांच्या नखांना मोहरीचे (सरसो) तेल कापसाच्या बोळ्याने लावावे. ह्यामुळे संधिवात, गठीया, गुडघे दुखी हे रोग होत नाहीत. वैदिक शास्त्रानुसार रोज रात्री झोपताना हात-पायांच्या नखांना मोहरीचे तेल लावल्याने राहू, केतू व शनि या ग्रहांचा अनिष्ट परिणाम नष्ट होतो. हा प्रयोग एक वर्ष न चुकता नियमितपणे केला असता व्यक्ती कर्जमुक्त होते.
* सिताफळ मिळत असेल तेव्हा त्याचा भरपुर वापर करावा. यातील मॅग्नेशियम मुळे शरीरातील पाण्याची पातळी समप्रमाणात राखली जाते त्यामुळे सांध्यातील विषारी द्रवपदार्थ बाहेर पडुन संधीवातासारख्या रोगात फायदा होतो.
* नागरमोथाच्या (Nut-grass) मुळाचे एक लहान चमचा चूर्ण दिवसातून दोनदा एक महिना घेतल्याने गुडघेदुखीत आराम येतो.
* वात विकारांवरदशमुलारीष्टहे औषध प्रभावी आहे.
* सांधेदुखीचा त्रास असणार्यांनी मिरची, मसाले, केक, चहा, कॉफी, ब्रेड, मांसाहार, भात, लोणचे, तूरडाळ इत्यादी पदार्थ खाणे फार कमी करणे गरजेचे आहे.
* शंभर ग्रॅम मोहरी तेल (Musturd Oil), थोडे आलं किंवा सुंठ पावडर, पाच पाकळी लसूण एकत्र उकळुन, कोमट झाल्यावर दुखत्या सांध्यांवर हलकेपणाने मुरवणे.
* कच्चा बटाटा चांगला धुऊन त्याची सालं पाण्यात भरपूर उकळवून त्याचा तयार झालेला अर्क पिणे. उरलेला चोथ्याचा सहनशक्तीनुसार गरम लेप दुखत्या सांध्यांवर लावणे.
* हिंग, लसूण, सैंधव मीठ प्रत्येकी पाच ग्रॅम, तेलात उकळवून त्या तेलाने मसाज करावा.
* फणसाचे गरे काढताना जे पांढरे धागे/पट्टे मिळतात ते वाटून एरंडेल तेलावर परतावे. हा लेप दुखत्या सांध्यांवर लावावा. लचक भरणे/मुरगळणे यावरही या लेपाचा चांगला उपयोग होतो.
* वडाची पाने तव्‍यावर गरम करून रात्री दुखत्या भागास बांधून ठेवावी. सकाळी सांधे सैल होतात.
* जायफळ चूर्ण मोहरीच्या तेलात मिसळून दुखत्या सांध्यांस मसाज केल्यास सांधे सैल होतात.
* निरगुडीच्या झाडाचा पाला, चांगला धुऊन, त्याला मातीच्या मडक्यात ठेवून, मडके लाल होई पर्यंत तापवावे. मडके लाल झाल्यावर हा पाला, कपड्यात गुंडाळून दुखता भाग शेकावा.
* निरगुडीच्या झाडाचा पाला, चांगला धुऊन, तो बुडेल इतके पाणी भांड्यात घेऊन चांगले उकळावे. नंतर हा पाला, कपड्यात गुंडाळून दुखता भाग शेकावा.

* निरगुडीच्या झाडाचा पाला, चांगला धुऊन, त्याचा रस काढावा, यांत दुप्पट तेल (मोहरीचे/तिळाचे) व दुप्पट दह्याचे पाणी टाकून, पाण्याचा अंश संपेल इतपत चांगले उकळावे. या तेलाने दुखत्या भागाचा मसाज करावा.

Rate This Article

या लेखात, आम्ही आपणाला उपाय: संधिवात. याबाबत माहिती दिली आहे आम्हाला आशा आहे की, तुम्हाला ती आवडली असेल. माहिती आवडली असेल तर, सदरची माहिती तुमच्या मित्रांनाही शेअर करा.

आपले महसूल कायद्याविषयक प्रश्न विचारण्यासाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या. आणि आमच्या टेलिग्राम चॅनेललाही आजच जॉईन व्हा. Website Link Telegram Channel Link धन्यवाद !

Getting Info...

About the Author

Deputy Collector in Revenue Dept. Government of Maharashtra

Post a Comment

Cookie Consent
We serve cookies on this site to analyze traffic, remember your preferences, and optimize your experience.
Oops!
It seems there is something wrong with your internet connection. Please connect to the internet and start browsing again.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.