सेफ
ड्रिंकिंग
मद्यपान मुळात वाईटच. परंतु आजच्या अत्याधुनिक
युगात मद्यपान न करणारी व्यक्ती अनेकवेळा एकाकी पाडली जाते. कधीतरी रिलॅक्स
होण्यासाठी मद्यपानाचा सल्ला डॉक्टरही देतात. यात कधीतरी हा शब्द महत्वाचा
आहे. तथापि, कोणत्याही कारणांसाठी काही औषधोपचार चालू असल्यास आपल्या डॉक्टरना
विचारल्याशिवाय मद्यपान करू नये. काही औषधे व मद्य यांचा एकत्रित परिणाम शरीरासाठी
अत्यंत हानिकारक ठरू शकतो.
काही टाळता न येणार्या परिस्थितीमध्ये मद्यपान
करणे भाग पडते, त्यावेळेस सेफ ड्रिंकिंग कसे असावे याबाबत हा लेख आहे.
मद्य व
केवळ पाणी यांचे मिश्रण सर्वोत्तम. कारण मद्याने शरीरारील पाण्याचे प्रमाण कमी
होते. ते सोबतच्या पाण्याने भरून निघते. मद्य व सोडा यांचे मिश्रण त्यातील
कार्बन-डाय-ऑक्साईड मुळे जठरात चांगले शोषले जाते. तसेच सोडा हा फक्त पाणी व
कार्बन-डाय-ऑक्साईडचे मिश्रण असल्याने पोटातील अॅसिडिटीची पातळी वाढत नाही. मद्य
फळांच्या रसाबरोबर घेण्याने शरीराला आवश्यक पाणी व चोथा दोन्ही मिळतात. तसेच
त्यातील शर्करा रक्तातील साखरेची कमी होणारी पातळीही थोडीफार नियंत्रणात ठेवते.
उपाशी पोटी मद्यपान करणे अत्यंत घातक ठरू शकते. त्यामुळे
मद्यपानाच्या आधी पोट पूर्णत: रिकामे नसावे याची दक्षता घ्यावी. मद्य प्राशनापूर्वी
जीवनसत्त्व
‘ब’ व ‘क’ युक्त गोळ्या खाणे उपयुक्त ठरू शकते. आपल्याकडे साधारणत:
६० मि.लि. चा पेग दिला जातो. मद्याचे शोषण शरीरात होण्यासाठी चयापचय प्रक्रियेची
फारशी गरज नसते. मद्य रक्तप्रवाहात मिसळून त्याचा मेंदूवर परिणाम होण्यासाठी काही
वेळ जाणे आवश्यक असते. पण या मधल्या काळात नशा येत नाही असे पाहून अधिकाधिक
मद्यपान केले जाते. हे नक्कीच टाळावे.
कमी उजेडात केलेले मद्यपान अधिक परिणामकारक ठरते
असे मानले जाते. म्हणूनच घरच्या मद्यपानापेक्षा बार मधील अत्यंत कमी प्रकाशात
केलेले मद्यपान अधिक परिणाम करते. याला कारण आपल्या मेंदूत नियमित अंतराने
स्त्रवणारे मेलॅटोनिन हे संप्रेरक होय. आपल्याला झोप येण्यास हेच कारणीभूत असते.
जेटलॅगचे कारणही याचेच संतुलन बिघडणे होय.
मद्य
प्राशन करतांनाची दक्षता:
¤ मद्य प्राशनाची सवय असलेल्यांनी प्रमाणाबाहेर मद्य
प्राशन करणे टाळावे.
¤ अति दु;खात
किंवा अति आनंदात मद्य प्राशन करणे टाळावे.
¤ विविध प्रकारची मद्ये
एकत्र करून किंवा एकावर एक पीऊ नयेत.
¤ रिकाम्यापाटी कधीही
मद्य प्राशन करू नये.
¤ मद्य प्राशनाबरोबर
गोड पदार्थ खाणे टाळावे. अल्कोहोलमुळे रक्तातील साखरेची पातळी वाढते.
त्यावर पुन्हा साखर खाल्ल्याने त्रास होऊ शकतो.
¤ कोणी कितीही
आग्रह केला,
काहीही म्हणाले, चिडवले, हिणवले, काहीही झाले तरी दोन पेग पेक्षा अधिक
मात्रेत कधीही मद्यपान करू नये. स्त्रियांसाठी या मर्यादा अजूनही कमी असावी.
एखादी व्यक्ती "टाकी" आहे, ती
व्यक्ती खंबा रिचविते पण जराही परिणाम होत नाही.... वगैरे पोकळ गोष्टी आहेत. हा
तद्दन मूर्खपणा आहे. यांना कधीही आदर्श मानू नये.
¤ महाग मद्य उच्च
प्रतीचे असते वगैरे मार्केटींगचा भाग आहे. त्यावर विश्वास ठेऊ नये.
मद्यपान
करतांना:
¤ मद्यामधे
कोल्ड्रिंक मिक्स करू नये, कोल्ड्रिंक मधील शर्करा घातक असते.
¤ चखणा म्हणून बटाटा वेफर्स खाऊ नये. बटाटा
पिष्टमय असतो.
¤ चखणा म्हणून प्रोटीन युक्त पदार्थ,
कर्बोदकयुक्त (Carbohydrates) आहार
घ्यावा. कर्बोदकयुक्त पदार्थ अल्कोहोल शोषुन घेतात ह्यामुळे अल्कोहोलचे
रक्तात शोषण होण्याची प्रक्रिया मंदावते.
¤ पापड घ्यायचे असतील तर रोस्टेडच
घ्यावे, तळलेचे पापड वजन वाढण्यास कारणीभूत ठरतात.
¤ अंडी घेतलीत तर उकडलेली घ्यावीत.
त्यावर मीठ पेरू नये. मिठामुळे रक्त पातळ होऊन अल्कोहोलचे रक्तात शोषण होण्याची प्रक्रिया
जलद होते.
¤ मद्याबरोबर
किंवा मद्यात जास्तिजास्त पाणी टाकून प्यावे. मद्यामधील इथेनॉलमुळे शरीरातील मूत्र
बनण्याची प्रक्रिया वाढते परंतु मद्याबरोबर पुरेसे पाणी पोटात न गेल्यामुळे शरीरातील
पाण्याची पातळी कमी (निर्जलीकरण- Dehydration) होते त्यामुळे पोटाच्या आवरणावर अल्कोहोलचा अनिष्ट परिणाम होतो.
मद्यपानानंतर:
¤ मद्यपानानंतर
मेंदूची विचारक्षमता अंधुक होते. अंतराचा अंदाज चुकतो. नजर धूसर होऊ शकते. CNS म्हणजे मध्यवर्ती चेतासंस्थेला आलेल्या ग्लानिमुळे स्नायूंवर नियंत्रण
रहात नाही. परिणामी तोल सांभाळता येत नाही. यामुळेच मद्यपानानंतर स्वत:स कितीही OK
वाटत असले तरी पोहणे, ड्रायव्हिंग, तसेच मशिनरीवर काम इत्यादी कधीही करू नये.
¤ मद्यपानानंतर शक्यतो
चौरस आहार घ्यावा.
मद्याची पश्चात नशा (Hang-over)
मद्याची पश्चात नशा याचा अर्थ प्रमाणाबाहेर
किंवा चुकीच्या व चुकीच्या पद्धतीने मद्य प्राशनानंतर शरीर व मेंदूवर होणारे दु:खकारक परिणाम. याचे प्रमुख लक्षण म्हणजे 'पुन्हा
इतकी आयुष्यात कधीही पिणार नाही' हे वारंवार स्वत:लाच कबूल करणे.
लक्षणे:- मद्याचे पश्चात परिणाम वय,
लिंग, शरीर प्रकृती इत्यादींनुसार वेगवेगळे असू
शकतात. यांत डोकेदुखी, चक्कर येणे,
ओकारी येणे, पोट बिघडणे, घाम येणे, तिटकारा (Nausea) येणे,
तोंडात कडवट चव येणे, सतत तहान लागणे आणि मुख्य
म्हणजे अति मद्य प्राशनाचा पश्चाताप ही लक्षणे दिसतात. खरेतर
अशा पश्चातापाचा उपयोग नसतो कारण शरीरावर व्हायचे ते परिणाम झालेले असतात.
कारणे:- रिकाम्यापोटी मद्य प्राशन करणे,
शरीरात पाण्याचे प्रमाण कमी होणे, मद्य प्राशनानंतर
पुरेशी झोप न होणे, कमी प्रतीचे/दर्जाचे
मद्य पाशन करणे.
उपाय:-
* जास्तीत जास्त पाणी पिणे. ह्यामुळे लघवीबरोबर शरीरातील विषद्रव्ये
व अल्कोहोल शरीराच्या बाहेर निघुन जाईल.
* जीवनसत्त्व ‘क’
युक्त पदार्थांच्या रसाचे (मोसंबी, संत्री, लिंबू, टोमॅटो)
सेवन करावे. अथवा जीवनसत्त्व ‘क’ युक्त गोळी/औषध घ्यावे.
* गरम कॉफी किंवा कोको (Hot
Chocolate) घ्यावे.
* आले, पुदिना टाकुन
गरम चहा प्यावा.
* बर्फाच्या थंड पाण्यात नॅपकीन बुडवुन,
पिळुन मस्तकावर ठेवावा.
* गरम पाण्याने शॉवरखाली स्नान करावे.
* सुक्रोज स्वरूपातील साखर (केळे, मध) घेणे उपयुक्त ठरते.
* साखर न टाकता, लिंबाचा रस टाकुन घेतलेली काळी कॉफी परिणामकारक ठरते.
मद्यपानाची
सवय सोडणे:
* दारू पिण्याची इच्छा झाल्यास
दहा ग्रॅम ओवा दोन - तीन वेळा खाण्यास देणे.
* अर्धा किलो ओवा चार लीटर पाण्यात पाणी
अर्धे होईल इतपत उकळून, थंड झाल्यावर गाळून, काचेच्या बाटलीत फ्रिज मध्ये ठेवावा. जेवणा आधी रोज
एक कप द्यावा.
आणि सर्वात महत्वाचे म्हणजे स्वत:च्या मनाचा
निर्धार.
दिल खामोश है मगर होंठ
हँसा करते हैं, बस्ती वीरान है मगर लोग बसा करते हैं,
नशा मयकदों में अब कहाँ है
यारों.. लोग अब मय का नहीं...."मैं
" का नशा करते हैं.
b|b
Rate This Article
या लेखात, आम्ही आपणाला सेफ ड्रिंकिंग. याबाबत माहिती दिली आहे आम्हाला आशा आहे की, तुम्हाला ती आवडली असेल. माहिती आवडली असेल तर, सदरची माहिती तुमच्या मित्रांनाही शेअर करा.
आपले महसूल कायद्याविषयक प्रश्न विचारण्यासाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या. आणि आमच्या टेलिग्राम चॅनेललाही आजच जॉईन व्हा. Website Link Telegram Channel Link धन्यवाद !