सूर्यकिरणयुक्त
जल चिकित्सा
पाश्चात्त्य
देशात याला क्रोमोपॅथी म्हणतात. सूर्यकिरणात सात रंग आहेत.
त्यातील तांबडा, निळा व हिरवा या रंगात जास्त प्रमाणात
औषधी तत्त्वे आहेत. कफ, वात, पित्त विकारांवर हे तीनही रंग उपयोगी आहेत. कफ,
वात, पित्त या तीन दोषांमुळेच अनेक रोग होतात.
तांबडा
रंग:- हा उष्णता व अग्नी यांचा घ्योतक आहे व कफ विकारात
उपयोगी आहे. ह्यामुळे शरीरात शक्ती व उत्साह निर्माण होतो.
संधिवात, लकवा, रक्ताल्पता,
तांबड्या पेशींची कमी, कफ दोष हे विकार होत नाहीत.
हिरवा
रंग:- वात विकारात उपयोगी व कफ, पित्ताचे संतुलन करणारा आहे. ह्यामुळे सर्दी,
पडसे, मलेरिया, दृष्टीदोष,
अल्सर, लैंगिक विकार, कॅन्सर,
मधुमेह, आम्लपित्त, मज्जातंतूचे
विकार यांना पायबंध बसतो.
निळा
रंग:- हा थंड व वेदनाशामक आहे. पित्त विकारात उपयोगी आहे. आमांश, दमा, श्वसनविकार, उच्च रक्तदाब
यांवर गुणकारी आहे.
आपल्याला
हव्या असलेल्या रंगाचे सूर्यजल तयार करण्यासाठी जरूर त्या रंगाची काचेची बाटली
दोनतृतियांश पाण्याने भरा. बाटलीला बुच लावुन ती लाकडी पाटावर किंवा
फळीवर सूर्यकिरणात सहा तास ठेवा. बाटलीतील वरच्या रिकाम्या भागावर
वाफ धरल्यासारखे दिसले म्हणजे हे औषधी पाणी तयार झाले.
हिरव्या
व निळ्या रंगाच्या बाटलीतील हे औषधी पाणी फक्त एक पेला
घ्यावे. लाल रंगाच्या बाटलीतील
औषधी पाणी फक्त पाव कप घ्यावे. दोन ते तीन दिवसातून हे
पाणी संपवावे.
वॉटर
बरीज कंपाउंड या औषधाची बाटली लाल रंगाची असते ती लाल रंगाच्या सूर्यजलासाठी वापरता
येते, मिल्क ऑफ मॅग्नेशीया या औषधाची बाटली निळ्या
रंगाची असते ती निळ्या रंगाच्या सूर्यजलासाठी वापरता येते, काही
दारूच्या बाटल्या हिरव्या रंगाच्या असतात त्या हिरव्या रंगाच्या सूर्यजलासाठी वापरता
येतात. अन्यथा पारदर्शक काचेची बाटलीला हव्या त्या रंगाचा सेलोफेन
पेपर (दिवाळीत आकाश कंदिलासाठी वापरतात तो पारदर्शी चमकणारा कागद)
लाऊन वापरता येते.
Rate This Article
या लेखात, आम्ही आपणाला सूर्यकिरणयुक्त जल चिकित्सा. याबाबत माहिती दिली आहे आम्हाला आशा आहे की, तुम्हाला ती आवडली असेल. माहिती आवडली असेल तर, सदरची माहिती तुमच्या मित्रांनाही शेअर करा.
आपले महसूल कायद्याविषयक प्रश्न विचारण्यासाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या. आणि आमच्या टेलिग्राम चॅनेललाही आजच जॉईन व्हा. Website Link Telegram Channel Link धन्यवाद !