उपाय: कोलेस्टेरॉल (Cholesterol)
कोलेस्टेरॉलचे
मुख्य दोन प्रकार आहेत.
1) एच.डी.एल.- याला चांगला कोलेस्टेरॉल मानतात. रक्तातील वाईट कोलेस्टेरॉलला खेचून पुन्हा यकृताकडे पचनासाठी पाठवणे हे एच.डी.एल. कोलेस्टेरॉलचे काम असते.
2) एल.डी.एल.- याला वाईट कोलेस्टेरॉल मानतात. रक्तप्रवाहात ह्यामुळे अवरोध निर्माण होतो. हा अवरोध
वाढत गेला की हृदयविकार, अंजायना-पेन,
बाय-पास इत्यादींना सामोरे जावे लागते. रक्तप्रवाहात अवरोध करणारा वाईट कोलेस्टेरॉल नियंत्रणात राहवा/कमी व्हावा यासाठी-
* दालचिनी ची पूड करून रोज सकाळ संध्याकाळ एक छोटा चमचा, मधाबरोबर घ्यावी.
* कडुलिंबाच्या पानांचा अर्क सेवन करावा.
* 20 ग्रॅम लसूण, 200 ग्रॅम दुधात उकळून त्याचा काढा अठ्ठावीस
दिवस नियमित घेतल्याने नसांतील कोलेस्टेरॉलचा थर/अवरोध (Blockage) निघून जातो.
नंतर पंधरा दिवस हे औषध बंद करावे. हवे
असल्यास पंधरा दिवसांनी पुन्हा घ्यावे.
* पांढरा कांदा कोलेस्टेरॉल कमी करतो. रक्त पातळ करतो.
* सत ईसबगोलचे नियमित सेवन करावे.
* गहू, तांदूळ, मूग, बाजरी प्रत्येकी 500 ग्रॅम; 20 ग्रॅम ओवा, 50 ग्रॅम पांढरे तीळ भाजून एकत्र करून जाड
दळून घ्यावे. याची पेज किंवा खिचडी खावी.
* रोजच्या जेवणात सकाळी लसणाच्या पाच ते सहा कच्च्या पाकळ्या न चुकता नियमित
खाव्यात.
* दोन पाकळ्या लसुण, सालं काढुन त्यावर एक थेंब तुप टाकावे,
ह्या पाकळ्या आगीवर थोड्या भाजुन, चावुन खाव्यात.
* रोज सकाळी रिकाम्या पोटी 100 मि.ली. पाण्यात दोन ग्रॅम दालचिनी पावडर, पाणी
50 मि.ली.
होईपर्यंत उकळावे. थंड झाल्यावर हवे असल्यास मधाबरोबर
घ्यावे. तीन महिन्यात कोलेस्टेरॉल कमी होतो.
* बेलपत्राचा पाव कप काढा रोज घेतल्याने ‘सिरम कोलेस्टेरॉलची’
पातळी कमी होते.
* आहारात कच्च्या कांद्याचे जास्त सेवन करावे.
* आहारात ब्रोकोली या भाजीचा वापर करावा.
* गहू, काळे चणे व जौ (Barley) यांचे
सम प्रमाण घेऊन पीठ थोडे भाजून घ्यावे. हे पीठ अर्धातास
भिजवून ठेवावे. या पिठाची पोळी किमान सहा महिने नियमित खाणे.
* रोजच्या आहारात हिंग व जिरेपूड घालून ताकाचा समावेश करावा.
* हिरवट, अपरिपक्व चेरी (Cherry) या फळाचा आहारात समावेश
करावा.
* रोजच्या आहारात बदाम व पिस्त्याचा समावेश करावा.
* आहारात कच्च्या कांद्याचा समावेश करावा. कांद्यामुळे
रक्तातील गुठळ्या कमी होतात.
* रोजच्या आहारात तिळाच्या तेलाचा समावेश करावा.
* 300
ग्रॅम काळे जिरे (आयुर्वेदिक/काष्ठौषधी दुकानात
मिळते), 100 ग्रॅम ओवा, 100 ग्रॅम दालचिनी
भाजून यांची बारीक पावडर करावी. सहा महिने रोज सकाळ-संध्याकाळ रिकाम्या पोटी एक मोठा चमचा घ्यावी, त्यावर
गरम पाणी प्यावे.
* ज्या व्यक्तींचा कोलोस्टेरॉल वाढलेला आहे त्यांनी आठवड्याचे चार दिवस,
रात्री दोन चमचे इसबगोल खाऊन वरून किमान दोन ग्लास कोमट पाणी किंवा अति
पातळ ताक प्यावे. इसबगोलमुळे
आतड्यांवर इसबगोलचे आवरण (Lining)
तयार होऊन मेदाचे शोषण (Fat absorption) कमी प्रमाणात होऊन कोलोस्टेरॉल कमी होतो.
* एक ग्रॅम पिपळी (Long
pepper) चूर्ण मधातून रोज सकाळी रिकाम्या पोटी एक महिना घ्यावे.
* सूर्यफुलाच्या (Sunflower)
बिया, मोड आणून खाण्याने कोलोस्टेरॉल
कमी होतो.
* सांबर शिंग उपलब्ध असल्यास रोज सकाळी ते निरशा दुधासह सहाणेवर उगाळुन त्याची
एक चमचा पेस्ट करून ती उपाशीपोटी सेवन करावी. वीस दिवसात कोलेस्टेरॉल निश्चित कमी होतो.
Rate This Article
या लेखात, आम्ही आपणाला उपाय: कोलेस्टेरॉल (Cholesterol). याबाबत माहिती दिली आहे आम्हाला आशा आहे की, तुम्हाला ती आवडली असेल. माहिती आवडली असेल तर, सदरची माहिती तुमच्या मित्रांनाही शेअर करा.
आपले महसूल कायद्याविषयक प्रश्न विचारण्यासाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या. आणि आमच्या टेलिग्राम चॅनेललाही आजच जॉईन व्हा. Website Link Telegram Channel Link धन्यवाद !