आपले महसूल कायद्याविषयक प्रश्न आमच्या वेबसाईटवर विचारावेत. 📌Mahsul Guru📌

लहान मुलांचे रोग व उपाय

तुम्हांला तुमची मुले खरोखरच निरोगी ठेवायची असतील तर एक साधा-सोपा उपाय म्हणजे मुलांना लाल मातीत किंवा हिरवळीवर खेळू द्या. ह्यामुळे त्यांची प्रतिकार शक्ती वाढेल. मुलांना पारंपरिक भारतीय खेळ खोखो, कबड्डी, कुस्ती, ल्लखांब, लगोरी हे किमान एकदा खेळायला लावुन त्यांची ओळख तरी करून द्या.
लाल मातीत किंवा हिरवळीवर न खेळल्याने व पारंपरिक भारतीय खेळ न खेळल्याने मुले Allergy prone होतात व पुढे दमा, त्वचा विकार इत्यादींना सहज बळी पडतात.
* अगदी तान्‍ह्‍यामुलाला पोटदुखी, कानदुखी इ. त्रास झाल्‍यास सांगताही येत नाहीत. असा त्रास मुलाला होत आहे असा संशय आल्‍यास मुलाच्‍या आईला डॉ.बाख यांच्‍या पुष्‍पौषधीमधील ‘रेस्‍क्‍यू रेमेडी’ हे पाच पुष्‍पौषधींचे मिश्रण असणारे होमिओपॅथीच्‍या दुकानात उपलब्‍ध असणार्‍या औषधाचे पाच थेंब द्रव अर्धा ग्‍लास पाण्‍यात टाकुन पाजावे अथवा पाच गोळ्‍या खायला द्‍याव्‍यात. 


 1) दूध पिताच उलटी होणे :- मूल जर दूध पिताच उलटी करीत असेल तर त्याला एक चमचा संत्र्याचा रस एक चमचा पाण्याबरोबर देणे.

 2) मुलांना दात निघतांनाचे त्रास:-
* लहान मुलांना दात निघत असतील तेव्हा एक ग्रॅम पिपळी (Long pepper) चूर्ण मधात कालवुन हिरड्‍यांवर घासावे.
* मुलाला दात निघत असतांना  दोन चमचे बडीशेप एक कप पाण्यात उकळून गाळून घ्‍यावी व ते पाणी एक एक चमचा दिवसांत तीन-चार वेळा पाजावे. तसेच ताज्या आवळ्याचा रस किंवा तुळशीचा रस, मधाबरोबर हिरड्यांना लावावा.
* डिकेमालीची पावडर हिरड्यांना चोळावी.

3) प्रतिकारशक्ती कमी असणे:- मुलाला कोरफडीचा गर, हवे असल्यास मधासोबत दिल्यास त्याची प्रतिकारशक्ती वाढते.

4) घरगुती ग्राईप वॉटर:- कच्ची बडीशेप, पाण्यात उकळून त्यांत चवीसाठी साखर व मीठ टाकून थंड झाल्यावर गाळून घ्यावे.

5) पोटात कृमी होणे:- रोज सकाळी रिकाम्यापोटी, एक पेरू कुस्करून त्यात एक चमचा मध घालून दिल्यास पोटातील जंतू, विषमज्वराचे जंतू मरतात. हे लहान मुलांसाठी एक टॉनिक आहे.
* बेलपत्रचा काढा द्यावा.
* बडीशेप पावडर, मधाबरोबर द्यावी.
* ओवा, खायच्या पानात टाकून चावून खाणे.
* रात्री झोपताना वावडिंग व ओवा यांचे चूर्ण समप्रमाणात गरम पाण्याबरोबर द्‍यावे.
* पोटातटेप वर्मझाल्यास तुतीचे फळ सलग 15 दिवस खायला द्यावे.
* पोटात कृमी झाल्या असल्यास कच्च्या केळाची भाजी पंधरा दिवस नियमीत खायला द्यावी.
* एक गुळाचा खडा खाऊन त्यावर एक चमचा ओवा खाणे, वरून एक ग्लास गरम पाणी प्यावे. एक महिन्यात फरक पडतो.
* डाळिंब व सफरचंदाचा रस समप्रमाणात घ्यावा. एक महिन्यात फरक पडतो.
* लाल भोपळ्याच्या बिया सावलीत सुकवून त्याची साल काढून घेणे, याची पावडर करून दिल्यास पोटातील कृमी नाश पावतात.
* लहान मुलाच्या पोटात कृमी असता जिर्‍याची एक छोटा चमचा पावडर पाण्यात उकळून तो काढा पाजावा.
* रात्री झोपतांना वेखंडाचे दोन ग्रॅम चूर्ण, 125 मिलीग्रॅम भाजलेल्या हिंग बरोबर पाच दिवस द्यावे.

6) अपचन:- एक चमचा संत्र्याचा रस मधातून द्यावा.
* पोट दुखत असेल तर पुदिन्याचा एक चमचा रस पाजावा.
* ओव्‍याचे चूर्ण मधासोबत द्‍यावे.

 7) अशक्त मुले:-
 * लहान मुलांत अशक्तता, भूक न लागणे इत्यादी समस्या असतील तर त्यांना रोज गहुच्या दाण्याइतका खाण्याचा चुना दही, लस्सी, उसाचा रस, गूळ पाण्यात विरघळवून, किंवा पाण्यातून जरूर द्यावा. (मुतखडा/पथरी/किंवा इतर खडा असणार्‍यांनी चुन्याचा हा प्रयोग करू नये तसेच चुना दुधातून घेऊ नये)
* अशक्त मुलांना नियमितपणे 10-12 बेदाणे (Raisins) खायला द्यावीत. हे उत्तम शक्तिवर्धक टॉनिक आहे.
* मूल अशक्त निपजले असेल तर पिकलेली केळी सावलीत सुकवून त्याची भुकटी करावी. ही वस्त्रगाळ करून दूध/मधाबरोबर मुलाला द्यावी.

8) डी हायड्रेशन:- नारळपाण्यात लिंबाचा रस टाकून घेतल्यास डी-हायड्रेशन होत नाही.

9) अंथरुणात लघवी होणे:- वावडिंग व ओवा प्रत्येकी अर्धा ग्रॅम घेऊन त्‍याची वस्त्रगाळ पूड दिवसातून दोनदा मधातून देणे.
* गुळवेलीच्या काड्यांचा एक चमचा रस दिवसातून दोनदा मधातून देणे
* मेंदीच्या पाल्याचा एक चमचा रस दिवसातून दोनदा मधातून देणे.
* भाजलेला ओवा व वावडिंग चूर्ण गुळातून देणे.
* झोपण्याआधी लघवीला जाण्याची सवय लावावी.
* काळेतीळ थोडे भाजून त्याची पावडर करावी, त्यात गूळ व कोरफडीचा गर टाकून लाडू करून खायला द्यावेत. किंवा तीळ व गुळाचे लाडु करून द्‍यावेत.
* हळद आणि आवळाचूर्णच्या गोळ्या गुळात करून नियमितपणे द्याव्यात.

 10) कॅल्शियमची कमतरता :-
 शरीरात कॅल्शियमचे प्रमाण कमी झाले तर लहान मुलांना माती/खडु/पेंसिल खावीशी वाटते. यासाठी...
* तीळ किंवा तिळाचे पदार्थ जास्त प्रमाणात द्यावेत. शरीरात कॅल्शियमचे प्रमाण वाढून माती खाण्याची सवय सुटते.
* मुलांना माती खाण्याची सवय असल्यास मधात पिकलेले केळे मधात कालवुन खायला घालावे.
* दोन चमचे पांढरे तीळ रात्री एक कप पाण्यात भिजवून सकाळी त्याची पेस्ट करावी, हवे असल्यास मध किंवा दुधाबरोबर द्यावी.
* अर्धाग्लास पाण्यात गव्हाच्या दाण्या इतका खाण्याचा चुना मिसळून ते पाणी नियमित घ्यावे.
* लहान मुले माती खात असतील तर भृंगराज, केशराज, मार्कव (Hassk) नावाच्या झाडाच्या पानांचा एक चमचा रस दिवसातून दोनदा एक महिना देणे.

11) सर्दी :-
* 200 ग्रॅम दुधात अर्धा ग्रॅम जायफळाचे चूर्ण उकळुन ते दूध पाजावे.
* 100 मि.लि. तीळाच्या तेलात बारा पाकळ्या लसुन ठेचुन घालावा, दोन चमचे ओवा टाकुन हे तेल चांगले उकळुन घ्यावे. कोमट झाल्यावर या तेलाने छाती, पाठ येथे मसाज करावा.
* सतत गरम कपडे घालुन ठेवावे.
* एक लहान चमचा मध दिवसातून दोनवेळा द्यावा.

12) अडखळत बोलणे (Stammering)
* दोन चमचे अख्खे धणे रात्री काचेच्या ग्लासमध्‍ये पाण्यात भिजवून ठेवावे, सकाळी ते पाणी धण्यासह अर्धे होईल इतपत उकळावे, कोमट झाल्यावर गाळून या पाण्याने गुळण्या (Gargles) करावे, उरलेले पाणी प्यावे.
* अंगठा व तर्जनी यांना मध लावावे. जीभ बाहेर काढून अंगठा जिभेखाली व तर्जनी जिभेवर ठेवून जिभेला आतून बाहेर अशी आठ-दहा वेळा मधाने मालीश कराव, या वेळेस मनातचा उच्चार करावा.
* पिंपळाची पिकलेली फळे आणून सावलीत वाळवावीत, याचे अर्धा चमचा चूर्ण मधातून दिवसातून दोनदा एक महिना सेवन करावे.
* वेखंडाचा एक ग्रॅम चा तुकडा दिवसातून दोनदा एक महिना चोखल्याने हा विकार दूर होतो.

13) उंची कमी असणे:-
* लहान मुलांची उंची वाढविण्यासाठी त्यांना रोज गव्हाच्या दाण्याइतका खाण्याचा चुना द्‍यावा तसेच दही, लस्सी, उसाचा रस, गूळ पाण्यात विरघळवून, किंवा पाण्यातून जरूर द्यावा.
* दोन चमचे पांढरे तीळ रात्री एक कप पाण्यात भिजवून सकाळी त्याची पेस्ट करावी, हवे असल्यास मध किंवा दुधाबरोबर द्यावी.

14) टॉन्सिल्स्:-
* मध व पाणी एकत्र करून गुळण्या करणे.
* टॉन्सिल्समुळे घसा दुखत असेल तर हळद, सुंठ व लसूण एकत्र उगाळून तो लेप घश्याला बाहेरून दिवसातून दोनदा पाच दिवस लावावा.
* बेलाच्या पानाचा काढा दिवसातून तीन वेळा घ्यावा.
* सुकलेले अंजीर पाण्यात उकळून त्याच्या काढ्याने गुळण्या कराव्या.
* अर्धा चमचा हळदपड तोंड उघडून घश्यात सोडावी व अर्धातास मौन पाळावे. हा प्रयोग घश्याच्या सर्व विकारांवर करता येतो.

15) गालगुंड:-
* गालगुंड हा लाळग्रंथींचा विकार असून सर्वसाधारणपणे उन्हाळ्याच्या सुरुवातीला पाच ते पंधरा वयोगटातील मुलांना होतो. हा उष्णतेचा विकार असून संसर्गजन्य आहे. थंडीत जास्त प्रमाणात गरम पदार्थ, संक्रांतीला जास्त प्रमाणात तिळगूळ खाल्ल्याने हा विकार होण्याची शक्यता निर्माण होते.
या विकारात जबड्याच्या बाजूला सूज येऊन खूप दुखते. कानाची पाळी वर उचलली जाते व ताप येतो. या विकाराची काळजी घेतली गेली नाही तर भविष्यात स्वादुपिंडाचे, मेंदूचे विकार, प्रजनन शक्ती कमी होणे असे विकार उद्भवू शकतात.
गालगुंड या विकारात बार्लीचे पाणी, रसाळ फळांचा रस, नारळपाणी, लिंबू रस, भाताची पेज, साळीच्या लाह्या रात्री गरम पाण्यात भिजत घालून, सकाळी ते पाणी पाजणे असे उष्णता कमी करणारे, थंड पदार्थ द्यावेत.
सूज असलेल्या ठिकाणी हरड्याच्‍या पावडरचा लेप, कडुलिंबाच्‍या पानांच्‍या पावडरचा लेप, हळदीच्‍या पावडरचा लेप लावावा.

16) गोवर/कांजण्या:-
गोवर हा उष्णतेचा विकार असून संसर्गजन्य आहे. गोवर सर्वसाधारणपणे पाच ते दहा वयोगटातील मुलांना होतो व खोकला किंवा शिंकेतून जे तुषार उडतात त्यातून पसरतो
हा विकार सर्वसाधारणपणे सात ते चौदा दिवस टिकतो.
या विकारात सर्दी होऊन नाक व डोळ्यांतून पाणी येते, ताप येतो, सुरुवातीला तोंडावर पुरळ येऊन नंतर मानेवर व शरीरभर पसरत व आग होते.
गोवरचा ताप मेंदूत चढण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे याची खबरदारी घ्यावी.
गोवर झालेल्या रुग्णाला हवा खेळती राहील अशा खोलीत पण लोकांपासून दूर ठेवावे.
* रोज सकाळी एकवेलची केळेखाणे.
* कच्चा पापड खायला द्यावा.
* ओल्या नारळाचे दूध अंगाला चोळावे. व नारळाचे दूध खडी साखरेबरोबर पाजावे.
* ज्येष्ठमध काढा, मधाबरोबर ज्येष्ठमध, पोटाला थंडावा देणारे द्रव पदार्थ, सुपाच्य आहार, साळीच्या लाह्यांचे पाणी व वेलची केळी द्यावीत.
* संत्र्याचा रस, लिंबू पाणी द्यावे ज्यामुळेसीजीवनसत्त्व मिळून प्रतिकारशक्ती वाढेल.
* कारल्याचा रस, मध, हळद व हरडा द्यावा.
* बार्ली वॉटर मध्‍ये एक चमचा बदामाचे तेल टाकून द्यावे.
* बीट (Beet root) आणून त्याची साले काढून तो पाण्यात उकळून घ्यावा. हे पाणी गोवर/कांजण्या झालेल्या व्यक्तीस प्यायला द्यावे. यात जीवनसत्त्वव आर्यन मोठ्याप्रमाणात असते.
* तापानंतर तहान शमत नाही यावर दहा-बारा काळ्या मनुका (बेदाणे) रात्री पाण्यात भिजवून सकाळी ते पाणी प्यायला द्यावे व मनुका (बेदाणे) चावून खायला देणे. कुठल्याही तापानंतर तहान शमत नसेल तर हा प्रयोग करावा.
* कपाळ व पोटावर थंड पाण्याच्या व ओल्या मातीच्या पट्ट्या ठेवून ताप कमी करण्याचा प्रयत्न करावा. गोवरचा ज्वर जर पोटात राहिला तर सततच्या पोटदुखीचा विकार जडण्याची शक्यता असते.
* शरीरातील उष्णता नाहीशी करण्यासाठी उंबराच्या मुळाला छेद देऊन, त्यातून स्रवणारे जल पाजावे व अंगाला लावावे. (असे जल, पावसाळ्याच्या अखेरीस मूळ तोडून किंवा मुळाचा छेद घेऊन त्यातून पाझरणारे जल गोळा करतात.)

17)  घामोळ्या होणे:-
* उन्हाळ्यात घामोळ्या होणे, खाज सुटणे हा प्रकार नवीन नाही. यावर...
* जांभळाच्या बिया मिक्सरमध्‍ये थोडे पाणी टाकून बारीक कराव्यात. हा लगदा एका काडीवर कापूस गुंडाळून त्याने घामोळ्यांवर लावावा. अंगावर चट्टे पडले असतील तरी हा लगदा लावावा. पंधरा मिनिटांनी धुऊन टाकावा. दिवसातून चार-पाच वेळा हा प्रयोग करावा.
* एका मोठ्या भांड्यात पाणी भरून ते चार तास सूर्यकिरण त्यात पडतील असे ठेवावे. एक मोठी कैरी, कुकरमध्‍ये उकळून तिचा गर संपूर्ण शरीराला चोळावा व सूर्यकिरणात ठेवलेल्या पाण्याने आंघोळ करावी.
* शरीरातील उष्णता नाहीशी करण्यासाठी उंबराच्या मुळाला छेद देऊन, त्यातून स्रवणारे जल पाजावे व अंगाला लावावे. (असे जल, पावसाळ्याच्या अखेरीस मूळ तोडून किंवा मुळाचा छेद घेऊन त्यातून पाझरणारे जल गोळा करतात.)

18) लहान मुलात अतिसार/हगवण:-
* आंब्याची कोय फोडून त्यातील पांढरा गर भाजून त्याची दोन ग्रॅम पावडर, एक चमचा मधातून द्यावी.
* लहान मुलाला अतिसार झाला असेल तर एक छोटा चमचा भाजलेल्या जिर्‍याची (Cumin Seeds) पावडर पाण्यातून द्यावी.
* जायफळाचा लहान तुकडा, पाण्याबरोबर उगाळुन अर्धा चमचा चाटण द्यावे.
* आंब्याची कोय फोडून त्यातील पांढरा गर खायला द्यावा.
* कांदा ठेचुन तो लगदा बेंबीवर बांधुन ठेवावा.

19) लहान मुलात बध्दकोष्ठता:-
* कांद्याचा एक चमचा रस पाजावा.
* सुकलेले अंजिर दुधात ऊकळुन ते दूध द्‍यावे तसेच अंजिर चावुन खावेत. मुल लहान असेल तर फक्‍त हे दूध पाजावे.
* रात्री एक ग्‍लास पाण्‍यात पाच मनुका भिजवुन ते सकाळी चावुन खावेत. मुल लहान असेल तर फक्‍त हे पाणी पाजावे. 

20)  बाल निमोनिया:-
* कारल्याच्या पानांचा रस 10 ग्रॅम रस कोमट करून द्यावा.
* 100 मि.लि. तीळाच्या तेलात बारा पाकळ्या लसुन ठेचुन घालावा, दोन चमचे ओवा टाकुन हे तेल चांगले उकळुन घ्यावे. कोमट झाल्यावर या तेलाने छाती, पाठ येथे मसाज करावा.
* सतत गरम कपडे घालुन ठेवावे.

*  एक लहान चमचा मध दिवसातून दोन वेळा द्यावा

Comments

  1. Maza mulga achanak man halvu laglay kashamule kahi kalenay

    ReplyDelete
  2. Maza mulga aadich varshacha aahe aani tyache varche daat 4 daat pivale aasun 1 daat aata padla aahe tase daat padtat ka etakya lavkar?

    ReplyDelete
  3. माझा मुलगा १० वर्षीय आहे ,गणमाळ झालेला आहे

    ReplyDelete
  4. Mazi mulgi 1 varsh yachi ahe..tila constipation cha khup tras hotoy..plz kahi upay asel tar sanga..

    ReplyDelete

Archive

Contact Form

Send

Mahsul Guru

Subscribe YouTube Channel