* मुलीला वयाच्या नऊ ते दहा वर्ष वयात मासिक पाळीबाबत पूर्व कल्पना शास्त्रीय
कारणांसह द्यावी.
* मासीक पाळीत त्रास होत असल्यास
गाजराच्या बिया पाण्यात वाटून गुळाबरोबर पाच दिवस घ्याव्यात.
* मासिक पाळी वेळेवर येत नसेल तर
मासिक पाळीच्या संभाव्य तारखेआधी पाच दिवस भरपुर प्रमाणात पपई खावी.
* मासीक पाळीत खुप थकवा येत
असेल तर शतावरी चूर्ण, आस्कंद चूर्ण, ज्येष्ठमध
पावडर यांची समभाग वस्त्रगाळ पूड दिवसातून दोनदा तूप-साखरेतून
घेणे.
* प्रवासात असतांना मासीक पाळीचा खुप त्रास होत असल्यास डॉ.बाख यांच्या पुष्पौषधीमधील
‘रेस्क्यू रेमेडी’ हे पाच पुष्पौषधींचे मिश्रण असणारे होमिओपॅथीच्या दुकानात
उपलब्ध असणार्या औषधाचे पाच थेंब द्रव अर्धा ग्लास पाण्यात टाकुन ते पाणी
पाजावे.
* स्त्रियांना मासिक पाळीच्या वेळेस कंबर दुखीचा त्रास होतो, त्यावर मासिक पाळीच्या आधी तीन दिवस, पाळीच्या काळात
व नंतर तीन दिवस, गरम पाणी प्यावे व रात्री एक कप गरम दुधात,
एक चमचा हळद पावडर, सहा मनुका टाकून ते उकळून घ्यावे
व कोमट झाल्यानंतर प्यावे. शक्य झाल्यास या काळात डाळिंबाचा रस
प्यावा.
* मासिक पाळीच्या आधी तीन दिवस, पाळीच्या काळात व नंतर
तीन दिवस, रात्री एक मूठ गहू, अर्धा लीटर
पाण्यात भिजवावा, सकाळी मिक्सरमध्ये पाण्यासह बारीक करावा व
गरम करून, चवीला साखर किंवा मीठ, तिखट घालून
खाणे.
* मासिक पाळीच्या काळात एक मोठा टर्किश टॉवेल बर्फ टाकलेल्या थंड पाण्यात भिजवून
, हलका पिळून पोटावर ठेवावा. (यावेळेस पंखे,
ए.सी. बंद ठेवावेत)
दिवसातून तीनदा हा प्रयोग करावा.
* दहा ग्रॅम ओवा, 50 ग्रॅम जुना गूळ, 200 ग्रॅम पाण्यात उकळून दिवसातून दोनदा एक महिना घेतल्याने गर्भाशय शुद्ध होते
व थांबलेला मासिक धर्म सुरू होतो.
* कच्चा कांदा नियमित खाण्याने मासिक धर्म नियमित होतो.
* पिंपळाची पिकलेली फळे आणून सावलीत वाळवावीत, याचे
2 ग्रॅम चूर्ण निरशा दुधातून मासिक धर्म संपल्यानंतर 14 दिवसानंतर दिवसातून दोनदा एक महिना सेवन केल्यास गर्भाशय शुद्धी होते व वांझपणा
मिटतो.
* एक चमचा तीळ भाजुन घ्यावेत व ते गुळासह खावेत. (बाजारातुन आणलेल्या तीळाचा
आहारात वापर करण्यापूर्वी तीळांवर गरम पाणी टाकुन ते चांगले धुवून घ्यावेत.
यामुळे तीळांवरील Oxalic Acid निघुन जाते. नंतर ते उन्हात चांगले सुकवू घ्यावेत.)
* मासीक पाळीच्या काळात दररोज सकाळी आणि सायंकाळी दोन चमचे तीळाचे तेल प्यावे
वर एक कप कोमट पाणी प्यावे.
Rate This Article
या लेखात, आम्ही आपणाला उपाय: मासिक पाळीचे इतर त्रास. याबाबत माहिती दिली आहे आम्हाला आशा आहे की, तुम्हाला ती आवडली असेल. माहिती आवडली असेल तर, सदरची माहिती तुमच्या मित्रांनाही शेअर करा.
आपले महसूल कायद्याविषयक प्रश्न विचारण्यासाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या. आणि आमच्या टेलिग्राम चॅनेललाही आजच जॉईन व्हा. Website Link Telegram Channel Link धन्यवाद !