· प्रश्न १: शेत जमिनीत वहिवाट करण्याच्या रीत
कोणत्या होत्या?
F उत्तर: सन १९३२ ते
१९७३ पर्यंत शेतजमिनीत वहिवाट करण्याच्या सहा रीत खालील प्रमाणे होत्या:
ñ रीत-१:- शेतजमिनीत स्वत: वहिवाट
करणे, याला 'खुद्द' जमीन कसणे असे म्हणत.
ñ रीत-२:- शेतजमीन स्वत:च्या देखरेखीखाली
मजुरांकडून कसुन घेणे.
ñ रीत-३:- शेतजमीन खंडाने (रोख) कसावयास देणे व शेत जमीन कसल्याचा मोबदला म्हणून रोख रक्कम देणे.
ñ रीत-४:- शेतजमीन कसल्याचा मोबदला म्हणून पिकातील वाटा खंड
म्हणून घेणे. याला 'बराईने' जमीन कसणे म्हणत असत.
ñ रीत-५:- शेतजमीन कसल्याचा मोबदला म्हणून पिकातील निश्चित
वाटा घेणे याला 'अर्धेलीने' जमीन कसणे म्हणत.
ñ रीत-६:- शेतजमीन कसल्याचा मोबदला म्हणून रोख रक्कम
आणि पीक असा एकत्रित मोबदला घेणे.
ज्या
प्रकारच्या रीतने जमीन कसली जात असे त्याचा उल्लेख जुन्या गाव नमुना बारा सदरी
'रीत' या स्तंभात केला जात असे. याचा उपयोग कुळ हक्क ठरविण्यासाठी होत असे. सध्या
हा प्रकार अस्तित्वात नाही.
· प्रश्न २: शेतकरी म्हणजे कोण?
F उत्तर: महाराष्ट्र
कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम, कलम २(२) अन्वये, शेतकरीची व्याख्या दिलेली आहे.
कोणत्याही
व्यक्तीने शेतीची जमीन नोंदणीकृत कागदपत्रान्वये विकत घेतली असल्यास ती व्यक्ती
शेतकरी आहे की नाही हे ठरविण्याचा अधिकार दिवाणी न्यायालयाला नसून तो योग्य त्या
अधिकार्याचा आहे. (हौसाबाई पां. झवर वि. सुभाष श्री. पाटील, २००६(५), महा. लॉ
जर्नल ७६५ ; २००६(६) ऑल महा. रिपो.(ए.ओ.सी.)
· प्रश्न ३: शेतमजूर म्हणजे कोण?
F उत्तर: महाराष्ट्र
कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम, कलम २(१-अ) अन्वये, अशी व्यक्ती जी कोणत्याही
प्रकारची स्वत:ची शेत जमीन धारण करत नाही आणि कसत नाही परंतु राहते घर धारण करते आणि
तिचे एकूण ५०% उत्पन्न शेत मजुरीपासून मिळते त्याला शेतमजूर म्हणतात.
· प्रश्न ४: कुळ म्हणजे कोण?
F उत्तर: महाराष्ट्र
कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम, कलम १८ अन्वये, पट्ट्याने जमीन धारण करणारी व्यक्ती,
जिला,
ñ
कलम ४ अन्वये कुळ मानले गेले आहे.
ñ
कलम ४-अ अन्वये संरक्षीत कुळ मानले गेले आहे किंवा
ñ
कलम २ (१०-अ) अन्वये कायम कुळ मानले गेले आहे.
· प्रश्न ५: कायदेशीर कुळ म्हणजे कोण?
F उत्तर: कुळांना
संरक्षण देण्यासाठी आणि त्यांचे शोषण थांबविण्यासाठी मुंबई कुळ वहिवाट अधिनियम, १९३९ आणि मुंबई कुळवहिवाट व शेत जमीन अधिनियम १९४८ हे दोन महत्वाचे कायदे करण्यात आले. महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन
अधिनियम २०११, (पूर्वीचा मुंबई कुळवहिवाट
व शेत जमीन अधिनियम १९४८) कलम ४ अन्वये कुळ म्हणून
मानावयाच्या व्यक्तींची व्याख्या दिलेली आहे. त्याप्रमाणे:
१.
जो इसम दुसर्याच्या मालकीची जमीन वैध किंवा कायदेशीररित्या कुळ या नात्याने कसत असेल
आणि
२. जमीन मालक आणि अशा कुळात करार झाला असेल, तथापि, जर असा
करार तोंडी असेल तर तो न्यायालयात सिध्द होण्यास पात्र असेल आणि
३. असा कुळ जमीन प्रत्यक्षात स्वत: कसत असेल आणि
४. जमीन कसण्याच्या बदल्यात असा कुळ, जमीन मालकास नियमितपणे खंड देत असेल आणि
जमीन मालकाने तो खंड स्वीकारत असेल आणि
५. अशी व्यक्ती जमीन मालकाच्या कुटुंबातील नसेल आणि
६. अशा व्यक्तीकडे ती जमीन गहाण नसेल आणि
७. अशी व्यक्ती पगारावर ठेवलेला नोकर नसेल आणि
८. अशी व्यक्ती जमीन मालकाच्या किंवा जमीन मालकाच्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीच्या
प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष देखरेखीखाली
जमीन कसत नसेल तर अशी व्यक्ती कायदेशीर कुळ आहे.
· प्रश्न ६: 'संरक्षित कुळ’ म्हणजे कोण?
F उत्तर: महाराष्ट्र
कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम २०११, (पूर्वीचा मुंबई कुळवहिवाट
व शेतजमीन अधिनियम
१९४८) कलम
४-अ अन्वये ‘संरक्षित कुळ’ ची व्याख्या दिलेली आहे. त्याप्रमाणे:
सन १९३९ च्या कुळ कायद्यानुसार, दिनांक ०१/०१/१९३८ पूर्वी सतत
६ वर्षे कुळ म्हणून जमीन कसणार्या व्यक्तीची किंवा दिनांक ०१/०१/१९४५ पूर्वी सतत ६ वर्षे कुळ म्हणून जमीन कसणार्या
व्यक्तीची आणि दिनांक ०१/११/१९४७ रोजी कुळ
म्हणून जमीन कसणार्या व्यक्तीला ‘संरक्षित कुळ’ म्हटले गेले आहे. अशा व्यक्तीची नोंद अधिकार अभिलेखात ‘इतर हक्क’ सदरी ‘संरक्षित कुळ’
म्हणून केली गेली आहे.
· प्रश्न ७: 'कायम कुळ’ म्हणजे कोण?
F उत्तर: महाराष्ट्र
कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम २०११, (पूर्वीचा मुंबई कुळवहिवाट
व शेतजमीन अधिनियम
१९४८) कलम
२ (१०-अ) अन्वये ‘'कायम कुळ’ ची व्याख्या दिलेली आहे. त्याप्रमाणे:
मुंबई कुळवहिवाट व शेतजमीन (सुधारणा) अधिनियम १९५५ अंमलात येण्याच्या निकटपूर्वी ज्या व्यक्तींना वहिवाटीमुळे, रुढीमुळे किंवा न्यायालयीन निकालामुळे कायम कुळ ठरविले गेले त्यांची तसेच जे
मूळगेणीदार किंवा मिरासदार म्हणून जमीन धारण करीत होते आणि ज्यांच्या
कुळवहिवाटीसा प्रारंभ किंवा अवधी तिच्या प्राचिनत्वामुळे समाधानकारक रीतीने सिध्द
करता येत नसेल आणि ज्यांच्या पूर्वहक्काधिकार्याचे नाव कोणत्याही अधिकार
अभिलेखात किंवा सार्वजनिक अभिलेखात उपरोक्त सन १९५५ चा अधिनियम अंमलात येण्याच्या निकटपूर्वी कायम कुळ म्हणून दाखल
होते, त्यांची नोंद अधिकार अभिलेखात ‘इतर हक्क’ सदरी ‘कायम कुळ’ म्हणून केली गेली.
· प्रश्न ८: बेदखल कुळ म्हणजे कोण?
F उत्तर: महाराष्ट्र
कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम, २०११ च्या कलम १४ अन्वये कुळांच्या कसुरीमुळे
कुळवहिवाट समाप्त करण्याची तरतूद आहे. कुळांचा कसूर म्हणजे:
अ)
कोणत्याही महसूल वर्षाचा खंड वर्षानुवर्षे आणि जाणूनबुजून त्या त्या वर्षांच्या
३१ मे पूर्वी न भरणे.
ब)
जमिनीची खराबी अथवा कायम स्वरुपी नुकसान होईल असे कृत्य जाणूनबुजून करणे.
क)
जाणूनबुजून महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियमाच्या कलम २७ चे उल्लंघन
करुन जमिनीची पोट विभागणी, पोटपट्टा किंवा अभिहस्तांतरण करणे.
ड)
व्यक्तीश: जमीन न कसणे.
इ)
जमिनीचा उपयोग शेती किंवा शेतीसंलग्न जोडधंद्यासाठी न करता इतर प्रयोजनांसाठी
करणे.
उपरोक्त
पध्दतीने कुळांनी कसूर केला असता जमीन मालकाने कुळास तीन महिन्यांची लेखी नोटीस
दिली असल्यास कुळवहिवाट समाप्त करण्याची तरतूद आहे. अशा कुळास बेदखल कुळ म्हणतात.
· प्रश्न ९: शेतजमिनीवर जमीन मालकाचा 'प्रत्यक्ष
ताबा' आहे असे कायद्याने केव्हा मानले जाते?
F उत्तर: जर एखाद्या
शेत जमिनीची वहिवाट-
अ.
जमिनीचा मालक किंवा त्याचे कुटुंबीय करीत असतील किंवा
आ.
कुळ कायद्यानुसार असलेले कुळ करीत असेल किंवा
इ.
उपरोक्त व्यक्तीशिवाय अशी इतर व्यक्ती करीत असेल, जी कायदेशीर कागदोपत्री
पुराव्याद्वारे स्वत:च्या वहिवाटीचे समर्थन करू शकेल तर अशा शेतजमिनीवर जमीन
मालकाचा 'प्रत्यक्ष ताबा' आहे असे कायदा मानतो.
अनाधिकाराने
अथवा दंडेलशाहीने जमिनीचा कब्जा घेणार्या इसमाविरूध्द महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम,
१९६६ चे कलम ५९ आणि कलम २४२ अन्वये कारवाई करता येते.
· प्रश्न १०: 'व्यक्तिश: जमीन कसणे’ म्हणजे काय?
F उत्तर: ‘व्यक्तिश: जमीन कसणे’ याची व्याख्या महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम, कलम २(६) मध्ये
दिलेली आहे. त्यानुसार: जी व्यक्ती ‘‘स्वत:साठी
(एक) स्वत:च्या मेहनतीने,
अथवा
(दोन) स्वत:च्या कुटुंबातील कोणत्याही
व्यक्तीच्या कष्टाने अथवा
(तीन) स्वत:च्या किंवा स्वत:च्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीच्या प्रत्यक्ष देखरेखीखाली, मजुरीने कामावर लावलेल्या मजुरांकडून, त्यांना पिकाच्या
हिश्श्याच्या स्वरूपात मोबदला न देता रोख रक्कम अथवा वस्तूंच्या रूपात वेतन/मोबदला देऊन जमीन कसून घेते’’ त्याला ‘व्यक्तिश: जमीन कसणे’ असे म्हणतात.
तथापि,
विधवा, अज्ञान, शारीरिक किवा मानसिकदृष्या
अपंग आणि सशस्त्र दलात नोकरी करणारी व्यक्ती जरी नोकरामार्फत,
मजुरामार्फत किंवा कुळामार्फत जमीन कसवून घेत असली तरी अशी व्यक्ती ‘व्यक्तिश: जमीन कसते’ असे मानण्यात येते.
याचाच
अर्थ अधिकृत अधिकाराशिवाय कोणालाही कोणाचीही जमीन वहिवाटता येत नाही.
· प्रश्न ११: कुळाने खरेदी करावयाच्या जमिनीची
किंमत कशी ठरविली जाते?
F उत्तर: जर एखादी
व्यक्ती कायदेशीर कुळ आहे असे शेतजमीन न्यायाधिकरणाने जाहीर केल्यानंतर महाराष्ट्र
कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम, कलम ३२-ग अन्वये कुळाने द्यावयाची जमिनींची किंमत
ठरविण्यात येते.
कलम
३२-ह अन्वये अशा खरेदीची किमान किंमत व कमाल किंमत काय असावी याची तरतुद आहे. अशी
किंमत कायम कुळ व संरक्षीत आणि साधे कुळ यांबाबत वेगवेगळी असु शकते.
æ
कायम कुळांच्या बाबतीत:
१)
शेतजमिनीच्या खंडाच्या सहापट रक्कम अधिक
२)
कृषकदिनी येणे असलेल्या खंडाची रक्कम (असल्यास) अधिक
३)
कुळाने न भरलेल्या परंतु जमीन मालकास भरावयास लागणार्या जमीन महसूल उपकराच्या
रकमा अधिक
४)
कृषकदिनापासून कलम ३२-ग अन्वये जमीन खरेदीची किंमत ठरविण्यात येण्याच्या
दिनांकापर्यंतच्या कालावधीसाठी, खरेदी किंमतीवर द.सा.द.शे. ४.५% यादराने होणारे
व्याज.
वरील
सर्वांची बेरीज.
æ
संरक्षित आणि साध्या कुळांच्या बाबतीत:
१)
शेतजमिनीच्या आकारणीच्या वीस पटीहून कमी नाही आणि २०० पटीहून जास्त नाही अशी
रक्कम अधिक
२)
जमीन मालकाने बांधलेल्या वास्तू, विहिरी, बांधारे, लावलेली झाडे यांचे मूल्य
अधिक
३)
कुळाने न भरलेल्या परंतु जमीन मालकास भरावयास लागणार्या जमीन महसूल उपकराच्या
रकमा अधिक
४)
कृषकदिनापासून कलम ३२-ग अन्वये जमीन खरेदीची किंमत ठरविण्यात येण्याच्या
दिनांकापर्यंतच्या कालावधीसाठी, खरेदी किंमतीवर द.सा.द.शे. ४.५% यादराने होणारे
व्याज.
वरील
सर्वांची बेरीज.
कुळाने
जर जमीन मालकास जमिनीच्या भरपाईपोटी काही रक्कम दिली असल्यास अशी रक्कम तसेच
त्या जमिनीत जर काही झाडे असतील आणि जमीन मालकाने त्या झाडांचे काही उत्पन्न
घेतले असेल तर ती रक्कम खरेदी किंमतीतून वजा करण्यात येईल.
· प्रश्न १२: महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम,
कलम ३२ ते ३२-र बाबतची माहिती थोडक्यात सांगा.
F उत्तर: æ
कलम-३२: यात दिनांक १/४/१९५७ हा कृषकदिन ठरविण्यात आला आहे. या दिनांकास जर
कुळाने कायदेशीर कुळ म्हणून जमीन धारण केली असेल तर त्या कुळाने ती जमीन सर्व
बोजांपासून मुक्त अशी आपल्या जमीन मालकाकडून खरेदी केली आहे असे मानण्यात येईल.
æ
कलम-३२-अ: कुळाने कमाल क्षेत्रापर्यंत जमीन खरेदी केली आहे असे मानण्यात येईल.
कमाल क्षेत्रापेक्षा जास्त जमीन कुळाला खरेदी करता येणार नाही.
æ
कलम-३२-ब: कुळाने अंशत: मालक आणि अंशत: कुळ म्हणून जमीन धारण केली असेल आणि त्याने
अंशत: मालक म्हणून जमीन धारण केलेल्या जमिनीचे क्षेत्र कमाल धारण क्षेत्राइतके
किंवा त्याहून जास्त असेल तर कुळाने जमीन खरेदी केली आहे असे मानण्यात येणार
नाही.
æ
कलम-३२-क: जेव्हा कुळाकडे एकापेक्षा अधिक जमीन मालकांकडील जमिनी स्वतंत्रपणे
कसण्यासाठी ताब्यात असतील तेव्हा कुळाला प्रत्येक जमीन मालकाकडून खरेदी
करावयाचे क्षेत्र व ठिकाण पसंत करण्याचा अधिकार असेल.
æ
कलम-३२-ड: कुळाच्या ताब्यात कुळ म्हणून असणारी एखादी जमीन मुंबई धारण जमिनीचे
तुकडे पाडण्यास प्रतिबंध व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत अधिनियम १९४७ अन्वये
तुकडा असेल तरीही कुळाला तो तुकडा खरेदी करण्याचा अधिकार असेल.
æ
कलम-३२-इ: कुळाने जमीन खरेदी केल्यानंतर शिल्लक राहिलेल्या जमिनींची विल्हेवाट
कलम १५ अन्वये लावता येईल.
æ
कलम-३२-फ: जर जमीन मालक अज्ञान, विधवा, सशस्त्र सैन्य दलात नोकरीस असेल किंवा
शारीरिक अथवा मानसिकदृष्ट्या अपंग असेल तर अशा जमीन मालकास कलम ३१ मध्ये नमुद
केलेल्या अवधीत कुळ वहिवाट समाप्त करण्याचा हक्क असतो. अज्ञान व्यक्ती
सज्ञान झाल्यानंतर, विधवा स्त्रीचे हितसंबंध नष्ट झाल्यानंतर, सशस्त्र सैन्य
दलातील नोकरी संपुष्टात आल्यानंतर किंवा शारीरिक अथवा मानसिकदृष्ट्या अपंग व्यक्ती
बरा झाल्यानंतर एक वर्षाच्या काळात कुळाला आपला जमीन खरेदीचा हक्क बजावता येईल.
हा एक वर्षाचा काळ, वर नमूद घटना पूर्ण झाल्यापासून
मोजण्यात येईल, कुळाला माहिती मिळाल्यापासून नाही. (अप्पा
न. मगदुम वि. अकुबाई ग. निंबाळकर, ८९९३/१९९४- ए.सी. ए.आय.आर. १९९९)
æ
कलम-३२-ग: यानुसार शेतजमीन न्यायाधिकरणाने, कुळाने द्यावयाची जमिनींच्या
खरेदीची किंमत ठरविण्यात येते.
æ
कलम-३२-ह: यानुसार कुळाने खरेदी करावयाच्या जमिनीची किमान किंमत व कमाल किंमत
ठरविली जाते.
æ
कलम-३२-आय: यानुसार कायम कुळाने धारण केलेली जमीन जर पोटकुळाला पोट-पट्ट्याने
दिली असेल तर अशा पोटकुळाने विहित मर्यादेपर्यंत कृषकदिनी जमीन खरेदी केली आहे असे
मानण्यात येते. पोटकुळाने द्यावयाच्या खरेदीच्या किंमतीतून सहापट रक्कम जमीन
मालकास व उर्वरीत रक्कम कायम कुळास द्यावी लागते.
æ
कलम-३२-जे: वगळण्यात आले आहे.
æ
कलम-३२-के: यानुसार खरेदीदार कुळाने जमीन खरेदीची रक्कम एक वर्ष कालावधीच्या आत
एक रकमी किंवा द.सा.द.शे. ४.५% व्याजासह, बारापेक्षा जास्त नाही इतक्या वार्षिक
हप्त्यांनी वसूल करण्याचा न्यायाधिकरणाला अधिकार आहे.
æ
कलम-३२-ल: निरसित करण्यात आला.
æ
कलम-३२-म: यानुसार कुळाने जमीन खरेदीची संपूर्ण रक्कम शासकीय तिजोरीत जमा केल्यानंतर
कुळाला न्यायाधिकरणामार्फत जमीन खरेदीचे प्रमाणपत्र देण्यात येते. जर अशी रक्कम
कुळाने जमा करण्यात कसूर केला आणि ती रक्कम जमीन महसूलाच्या थकबाकीप्रमाणे वसूल
केली गेली तर खरेदी परिणामशून्य होईल.
æ
कलम-३२-मम: यानुसार जर वर नमूद केल्यानुसार खरेदी परिणामशून्य झाली असेल परंतु
जमीन खरेदीदार कुळाच्या कब्जात असेल तर सदर खरेदी रक्कम एक रकमी भरण्यासाठी न्यायाधिकरण
चौकशीअंती कुळाला आणखी एक वर्षाचा अवधी देऊ शकेल.
æ
कलम-३२-न: यानुसार खरेदी परिणामशून्य झाली असेल तर जमीन मालकाला कुळाकडून खंड
वसूल करण्याचा अधिकार आहे.
æ
कलम-३२-ओ: यानुसार जर कृषकदिनानंतर कुळवहिवाट निर्माण झाली असेल तर, कुळवहिवाट
निर्माण झाल्यापासून एका वर्षाच्या आत कुळाने जमीन खरेदीसाठी न्यायाधिकरणाकडे
अर्ज करण्याची तरतुद आहे.
æ
कलम-३२- पी: यानुसार कुळाने जमीन खरेदीचा हक्क मुदतीत बजावला नसेल तर जमिनी परत
घेण्याचा व त्यांची विल्हेवाट लावण्याचा हक्क न्यायाधिकरणाला आहे.
æ
कलम-३२- क्यू: यानुसार कलम ३२-ग ची प्रक्रिया चालू असतांना न्यायाधिकरण जमिनीवर
असलेल्या बोज्यांची निश्चिती करते.
æ
कलम-३२- आर: यानुसार जमीन खरेदीदाराने, खरेदीनंतर अशी जमीन व्यक्तीश: कसण्यात
कसूर केल्यास त्याला जमिनीतून काढून टाकून त्या जमिनीची विल्हेवाट लावण्याचा
हक्क न्यायाधिकरणाला आहे.
· प्रश्न १३: काही ठिकाणी सात-बारा उतार्याच्या
इतर हक्कात 'कु.का. ४३ च्या बंधनास पात्र' असा शेरा लिहिलेला असतो. त्याचा
नेमका अर्थ काय?
F उत्तर: महाराष्ट्र
कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम, कलम ४३ अन्वये, कुळाने कलम ३२, ३२-फ, ३२-आय, ३२-ओ,
३३-क किंवा ४३-१-ड अन्वये खरेदी केलेली तसेच कलम ३२-प किंवा ६४ अन्वये विक्री
केलेली जमीन जिल्हाधिकार्यांच्या पूर्वपरवानगीशिवाय हस्तांतरित करता येणार
नाही, गहाण, बक्षीस किंवा पट्ट्याने देता येत नाही.
तथापि,
महाराष्ट्र शासनाने फेब्रुवारी २०१४ मध्ये या कलमात सुधारणा केली आहे. त्यान्वये,
ज्या कुळांना, कुळ कायदा कलम ३२-म चे प्रमाणपत्र मिळून १० वर्षाचा
कालावधी लोटला आहे अशा जमिनींची खरेदी/ विक्री/ देणगी/ अदलाबदल/ गहाण/ पट्टा/ अभिहस्तांतरण करण्यासाठी शासनाच्या परवानगीची आवश्यकता असणार नाही अशी
तरतुद केली आहे. ज्याला कलम ३२-म चे प्रमाणपत्र
मिळून १० वर्षाचा कालावधी लोटला आहे आणि त्याला सदर जमीन विकण्याची इच्छा आहे
त्याने शेतजमीन विक्री करण्यापूर्वी, त्याचा शेतजमीन विक्रीचा इरादा तहसिल कार्यालयास
लेखी कळवावा लागतो. असा अर्ज मिळाल्यानंतर दोन दिवसात तहसिल कार्यालय,
त्या अर्जदारास, तो विक्री करणार असलेल्या शेतजमिनीची महसूल आकारणीच्या चाळीस पट नजराणा
रकमेचे, लेखाशिर्ष नमुद असलेले चलन तयार करुन देते. ही चाळीस पट नजराणा रक्कम संबंधीत
शेतकर्याने, चलनाव्दारे शासकीय कोषागारात जमा करावी. त्यानंतर
तो विक्री व्यवहार करू शकतो.
हे
चलन आणि खरेदीची कागदपत्रे पाहून, तलाठी यांनी गाव नमुना ६ मध्ये त्याची नोंद करायची
असते. या चलनाशिवाय इतर कोणत्याही आदेशाची आता आवश्यकता असणार नाही.
जर
संबंधीत शेतकर्याला त्याच्या सात-बारावर असलेला 'कु.का.कलम ४३ च्या बंधनास पात्र' हा शेरा जरी रद्द
करायचा असेल तरी वरील प्रमाणे चलन आणि अर्ज हजर केल्यास असा शेरा रद्द करता येतो.
परंतु
महत्वाचे म्हणजे, ही तरतुद फक्त कुळ कायदा कलम ४३ च्या बंधनास पात्र असलेल्या जमिनींनाच
लागू असेल.
वाटप केलेल्या नवीन शर्तीवरील शासकीय जमीनी, कु.का.कलम ८४ क अन्वये वाटप केलेल्या नवीन शर्तीवरील जमीनी,
वतन/इनाम जमीनी, सिलींग कायद्याखाली
वाटप केलेल्या नवीन शर्तीवरील जमिनींना ही तरतुद लागू होणार नाही.
जर
कुळ कायदा कलम ३२-म प्रमाणपत्राला १० वर्षाचा कालावधी लोटला नसेल तर सक्षम अधिकार्याकडून कुळ
कायदा कलम ४३ अन्वये परवानगी घेणे बंधनकारक आहे.
कुळ
कायदा कलम ४३ अन्वये परवानगी न घेता जमिनीचा विक्री व्यवहार करून ताबा दिल्यास
असा ताबा अवैध असेल तसेच अशा जमिनीचा विक्री व्यवहार करतांना, कलम ४३ अन्वये परवानगी
नसेल तर विक्रीची सर्व कागदपत्रे अवैध ठरतील. कोणतेही न्यायालय असा व्यवहार वैध
ठरविण्यास असमर्थ असेल. (लोतन रामचंद्र शिंपी वि. शंकर ग. कश्यप- १९९५(१)-
महा. लॉ जर्नल ८०: १९९४(४) बॉम्वे केसेस रिपोर्ट-५७५)
· प्रश्न १४: एखाद्या जमीन मालकाने, थेट त्याच्याच
कुळाला जमिनीची विक्री केली तर ते विधीग्राह्य ठरेल काय?
F उत्तर: नाही, कुळवहिवाट
अधिनियम हा कुळांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी, त्यांची पिळवणूक होऊ नये
आणि त्यांना कोणी फसवू नये या उद्देशाने तयार करण्यात आला आहे. जमीनमालकाला,
कुळ कसत असलेली जमीन, त्यालाच विकत देण्याची इच्छा असल्यास कलम ६४ अन्वये त्याची
पध्दत विहित केलेली आहे. कुळवहिवाट अधिनियमाखालील कोणत्याही जमिनीची खरेदी किंवा
विक्री शेत जमीन न्यायाधिकरणाच्या परवानगीशिवाय होऊ शकत नाही.
· प्रश्न १५: शेतजमीन मालकाव्यतिरिक्त अन्य व्यक्तीचे
नाव वर्षभर वहिवाट सदरी लागले म्हणजे तो आपोआप कुळ बनतो हा समज योग्य आहे काय?
F उत्तर: नाही, हा फार
मोठा गैरसमज आहे. कुळ कायदा कलम ४ मध्ये 'कुळ म्हणून मानावयाच्या व्यक्ती' ची
व्याख्या नमूद आहे.
कुळ
कायदा कलम '३२ ओ' मध्ये कुळ कायदा कलम '३२
ओ' मध्ये 'जमीन मालकाने दिनांक
०१/०४/१९५७ नंतर निर्माण केलेल्या कोणत्याही कुळवहिवाटीच्याबाबतीत, जातीने जमीन कसणार्या कुळास अशी कुळवहिवाट सुरु झाल्याच्या तारखेपासून एक
वर्षाच्या आंत, त्याने धारण केलेली जमीन मालकांकडून खरेदी
करण्याचा हक्क असतो.' असे नमुद असले तरीही कुळ कायदा कलम '३२
ओ' अन्वये कुळ जाहिर करणेसाठी खालील पात्रता अत्यावश्यक
आहे.
१)
कुळकायद्याने कुळास दिलेला हक्क बजावण्याची ज्याची इच्छा असेल त्याने एक वर्षाच्या
आंत,
त्या संबंधात जमीन मालकास व शेतजमीन न्यायाधिकरणास (तहसिलदार) विहीत
रितीने कळविले पाहिजे.
२)
अशा प्रकारे कळविल्यानंतर शेतजमीन न्यायाधिकरण (तहसिलदार) याप्रकरणी नोटीस बजावून
चौकशी करतात. या चौकशीच्यावेळी खालील मुद्दे स्पष्टपणे/निसंदिग्धापणे सिध्द होणे
अत्यावश्यक असते.
अ)
अर्जदार कुळ आणि जमीन मालक यांच्यात 'कुळ व मालक' असे नाते सिध्द होत आहे काय?
ब)
कुळ आणि मालक यांच्यात 'कुळ व मालक' नाते सिध्द करणारा आणि न्यायालयात
निसंदिग्धपणे सिध्द होणारा करार झाला आहे काय?
क)
कुळ मालकाला रोखीने खंड देत आहे काय?
ड)
कुळ देत असलेला रोख खंड मालक स्वीकारत आहे काय आणि त्याबाबत पावती देत आहे काय?
वरील
बाबी सिध्द झाल्या तरच वहिवाटदार कुळ ठरू शकतो.
जोपर्यंत
जमीनमालक कुळाचा कायदेशीर कुळ म्हणून स्वीकार करत नाही किंवा ती व्यक्ती कुळ
नाही हे विधान कायदेशीररीत्या फेटाळले जात नाही तो पर्यंत कुळाचा, कुळकायदा कलम
३१-ओ नुसार दिलेला एक वर्षाचा कालावधी सुरू होत नाही. (लक्ष्मण धोंडी झुरळे
वि. यशोदाबाई, २००५(२)- ऑल महा. रिपो.-८१२)
· प्रश्न १६: एखाद्या जमीन मालकाने, कुळाव्यतिरिक्त
अन्य व्यक्तीला शेतजमिनीची विक्री केली तर ते विधीग्राह्य ठरेल काय?
F उत्तर: नाही, कुळवहिवाट
अधिनियम हा कुळांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी आणि त्यांच्या ताब्यात
असलेली जमीन कोणी बेकायदेशीरपणे हिरावून घेऊ नये या उद्देशाने तयार करण्यात आला
आहे. जमीनमालकाने, कुळ कसत असलेली जमीन, कुळाने खरेदी करण्यास नकार दिला तरीही
कलम ६४ अन्वये त्याला शेतजमीन न्यायाधिकरणाच्या परवानगीशिवाय अन्य व्यक्तीला
विकत देण्यास कायद्याने मनाई केली आहे. अशी विक्री बेकायदेशीर ठरून कलम ८४ क अन्वये
कारवाई होणेसाठी पात्र ठरेल.
· प्रश्न १७: एखाद्या सहकारी संस्थेने अथवा
सहकारी संस्थेमार्फत शेतजमिनीची खरेदी विधीग्राह्य ठरेल काय?
F उत्तर: होय, कुळवहिवाट
अधिनियम, कलम ६४-अ अन्वये, सहकारी संस्थेस अथवा अशा सहकारी संस्थेमार्फत शेतजमिनीची
खरेदी विधीग्राह्य ठरेल. अशा व्यवहारास कुळकायद्याची कलमे ६३ व ६४ लागू होणार
नाहीत. तथापि, अशी सहकारी संस्थेची नोंदणी, खरेदी दिनांकाच्या आधी, मुंबई सहकारी
संस्था अधिनियम, १९२५ अन्वये झालेली
असावी अन्यथा असा व्यवहार अवैध ठरून कुळ कायदा कलम ८४-क अन्वये कारवाईस पात्र
ठरेल. (विनायक रत्नागिरी वि. राज्य, २०११(२), महा. लॉ जर्नल-७४०)
· प्रश्न १८: नगरपालिका क्षेत्रात कुळवहिवाट अधिनियम
लागू असतो काय?
F उत्तर: नाही, महाराष्ट्र
कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम, कलम ४३-क अन्वये बृहन्मुंबई, मुंबई प्रांतिक
महानगरपालिका अधिनियम १९४९, मुंबई बरो नगरपालिका अधिनियम १९२५, मुंबई जिल्हा
नगरपालिका अधिनियम १९०१ अन्वये स्थापित नगरपालिका किंवा महानगरपालिका क्षेत्रे,
कटक क्षेत्रे, मुंबई नगररचना अधिनियम १९५४ अन्वये नगररचना योजनेत समाविष्ट
क्षेत्रे यांना महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियमातील कलम ३१ ते ३२-र,
३३-अ,ब,क आणि ४३ च्या तरतुदी लागू होत नाहीत.
· प्रश्न १९: शेतकरी नसलेल्या व्यक्तीने
महाराष्ट्र राज्यात शेतजमीन खरेदी करणे विधीग्राह्य ठरेल काय?
F उत्तर: नाही,
महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम, कलम ६३ अन्वये, शेतकरी नसलेल्या व्यक्तीला
महाराष्ट्र राज्यात शेतजमीन खरेदी खरेदी करता येत नाही. असा व्यवहार बेकायदेशीर
ठरून कलम ८४ क अन्वये कारवाई होणेसाठी पात्र ठरेल.
तथापि,
ज्या व्यक्तीची शेतजमीन सार्वजनिक प्रयोजनासाठी संपादित करण्यात आली आहे, त्याने
त्याबाबत पुरावा सादर केल्यास, त्याला शेतकरी मानण्यात येईल.
· प्रश्न २०: शेतकरी नसलेली व्यक्ती खर्याखुर्या
औद्योगिक वापरासाठी जमीन खरेदी करू शकते काय?
F उत्तर: होय, महाराष्ट्र
कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम, कलम ६३-एक-अ अन्वये, खर्याखुर्या औद्योगिक
वापरासाठी शेतकरी नसलेली व्यक्ती, प्रारूप किंवा अतिम प्रादेशिक विकास
योजनेतंर्गत असलेल्या औद्योगिक किंवा शेतकी क्षेत्रामध्ये स्थित शेतजमीन, दहा
हेक्टर मर्यादेस आधिन राहून खरेदी करू शकते. परंतु, खरेदीच्या दिनांकापासून
पंधरा वर्षाच्या कालावधीत त्या जमिनीचा औद्योगिक वापर सुरु करणे बंधनकारक असेल
अन्यथा ती जमीन, मूळ खरेदी किंमतीस परत घेण्याचा हक्क मूळ जमीन मालकास असेल.
· प्रश्न २१:
अल्पभूधारक शेतकरी म्हणजे कोण?
F उत्तर: जो शेतकरी
मालक व/किंवा कुळ म्हणून एक हेक्टर पर्यंत (२.५ एकर) शेत जमीन वहिवाटतो त्याला
अल्पभूधारक शेतकरी म्हणतात.
· प्रश्न २२: लहान शेतकरी म्हणजे कोण?
F उत्तर: जो शेतकरी
मालक व/किंवा कुळ म्हणून एक हेक्टर (२.५ एकर) पेक्षा जास्त शेत जमीन वहिवाटतो
त्याला लहान शेतकरी म्हणतात.
· प्रश्न २३:
दूर्बल घटक म्हणजे कोण?
F उत्तर: दोन हेक्टरपेक्षा
जास्त नाही अशी कोरडवाहू जमीन धारण करणारा (दुष्काळ प्रवण म्हणून जाहीर
क्षेत्रात तीन हेक्टर) लहान शेतकरी आणि ज्याचे बिगर शेती वार्षिक उत्पन्न
रु. १३,५००/- पेक्षा जास्त नाही त्याला दूर्बल घटक म्हणतात.
F उत्तर: ज्याचे
पैसा अथवा माल किंवा अंशत: पैसा आणि अंशत: माल अशा सर्व मार्गांनी मिळणारे एकूण
वार्षिक उत्पन्न ग्रामिण भागात रु. २०,०००/- पेक्षा आणि शहरी भागात रु. २५,२००/-
पेक्षा जास्त नाही त्याला दारिद्र रेषेखालील व्यक्ती म्हणतात.
· प्रश्न २५: शेतकरी नसलेली एखादी व्यक्ती,
सक्षम अधिकार्याच्या परवानगीने महाराष्ट्र राज्यात शेतजमीन खरेदी करू
शकते?
F उत्तर: होय, ज्या
व्यक्तीचे वार्षिक उत्पन्न रु. बारा हजार पेक्षा जास्त नसेल अशा बिगर शेतकरी
व्यक्तीला महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम, कलम ६३(१)(ब) अन्वये
शेतजमीन विकत घेण्याची परवानगी जिल्हाधिकारी देऊ शकतात.
Rate This Article
या लेखात, आम्ही आपणाला कुळकायदा विषयक प्रश्नोत्तरे" 1 to 25. याबाबत माहिती दिली आहे आम्हाला आशा आहे की, तुम्हाला ती आवडली असेल. माहिती आवडली असेल तर, सदरची माहिती तुमच्या मित्रांनाही शेअर करा.
आपले महसूल कायद्याविषयक प्रश्न विचारण्यासाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या. आणि आमच्या टेलिग्राम चॅनेललाही आजच जॉईन व्हा. Website Link Telegram Channel Link धन्यवाद !