आपले महसूल कायद्याविषयक प्रश्न आमच्या वेबसाईटवर विचारावेत. 📌Mahsul Guru📌

वारस कायदा विषयक प्रश्‍नोत्तरे" 26 to 50


· प्रश्‍न २६: हिंदू स्‍त्री, विनामृत्युपत्र मयत झाल्‍यास, हिंदू उत्तराधिकार अधिनियम, १९५६ अन्‍वये तिच्‍या मालमत्तेबाबत वारसक्रम कसा असतो?
F उत्तर: हिंदू उत्तराधिकार अधिनियम-१९५६, कलम १५ अन्‍वये, विनामृत्युपत्र मयत झालेल्‍या हिंदू स्त्री खातेदाराची संपत्ती पुढील प्रमाणे वारसाहक्काने जाईल.
) वर्ग-१: मृत स्‍त्रिची मुले/मुली (कोणताही मयत मुलगा किंवा मुलगी यांची अपत्ये धरून), तिचा पूर्व मृत मुलगा किंवा मुलगी, त्यांची आपत्ये यांसह आणि मृत मृत स्‍त्रिचा पती.
) वर्ग-२: मृत स्‍त्रिच्‍या पतीच्या वारसाकडे,
) वर्ग-३: मृत मृत स्‍त्रिचे माता व पिता यांच्याकडे,
) वर्ग-४: मृत स्‍त्रिच्या पित्याच्या वारसाकडे आणि
) वर्ग-५: मृत स्त्रिच्या मातेच्या वारसांकडे, कलम १६ मध्ये दिलेल्या नियमानुसार प्रक्रांत होईल.
तथापि,
() हिंदू स्त्री जर विनामृत्युपत्र मरण पावली तर तिला तिच्या पित्याकडून किंवा मातेकडून वारसा हक्काने मिळालेली कोणतीही संपत्ती त्या मृत स्‍त्रिचा कोणताही मुलगा किंवा मुलगी (कोणत्याही मयत मुलाची किंवा मुलीची अपत्ये धरून) यांच्याकडे जाईल. असे वारस नसल्यास अशी संपत्ती मृत स्‍त्रिच्या पित्याच्या वारसाकडे प्रक्रांत होईल आणि
() हिंदू स्‍त्रिला तिच्या पतीकडून किंवा तिच्या सासर्‍याकडून वारसा हक्काने मिळालेली कोणतीही संपत्ती, त्या मृत स्‍त्रिचा कोणताही मुलगा किंवा मुलगी (कोणत्याही मयत मुलाची किंवा मुलीची अपत्ये धरून) यांच्याकडे जाईल. असे वारस नसल्यास, मृत स्‍त्रिच्या पतीच्या वारसाकडे प्रक्रांत होईल.

· प्रश्‍न २७: हिंदू स्‍त्रिने स्‍वत:ची मिळकत, मृत्‍यूपत्राने अन्‍य व्‍यक्‍तीला दिली आहे. तिच्‍या मुलांनी वारसा हक्‍काने मिळकत त्‍यांना मिळण्‍याचा अधिकार आहे अशी हरकत घेतली आहे. काय निर्णय घ्‍यावा?
F उत्तर: हिंदू उत्तराधिकार अधिनियम-१९५६, कलम १४ अन्‍वये, हिंदू उत्तराधिकार अधिनियम-१९५६ या अधिनियमापूर्वी किंवा नंतर, हिंदू स्‍त्रिची, तिच्या कब्जात असलेली कोणतीही संपत्ती, मग अशी मालमत्ता तिला विवाहापूर्वी किंवा नंतर वारसाहक्‍काने, मृत्‍यूपत्रीय दानाने, वाटणीमध्‍ये पोटगी म्‍हणून, नातलगांकडून मिळालेली असो किंवा तिने अशी मालमत्ता स्‍वत:च्‍या कौशल्‍याने, परिश्रमाने किंवा एखादी संपत्ती दान म्हणून, मृत्यूपत्रान्वये, इतर कोणत्याही लेखान्वये, दिवाणी न्यायालयाच्या हुकूमनाम्यान्वये, आदेशान्वये किंवा एखाद्या निवाड्यान्वये संपादित केली गेली असेल किंवा अन्‍य कोणत्‍याही मार्गाने संपादित केलेली असो, अशी संपत्ती, हिंदू स्‍त्री संपूर्ण स्वामी (पूर्ण मालक) म्हणून धारण करील अशी तरतुद आहे.
अशा मिळकतीची विल्‍हेवाट मृत्‍यूपत्राने किंवा अन्‍य प्रकारे लावण्‍याचा त्‍या मयत स्‍त्रिला पूर्ण अधिकार होता.
वरील तरतुदीन्‍वये मयत स्‍त्रिच्‍या मुलांचा हरकत अर्ज, निकालाद्‍वारे फेटाळता येईल.  

· प्रश्‍न २८: हिंदू उत्तराधिकार अधिनियम, १९५६ अन्‍वये गर्भस्थ आपत्याबाबत काय तरतुद आहे?    
F उत्तर: हिंदू उत्तराधिकार अधिनियम-१९५६, कलम २० अन्‍वये, अकृतमृत्युपत्र खातेदाराच्या मृत्यूसमयी जे अपत्य गर्भात होते व नंतर जिवंत जन्मले, त्याला किंवा तिला जणुकाही अकृतमृत्युपत्र व्यक्तिच्या मृत्यूपूर्वी जन्मले होते अशाच प्रकारे अकृतमृत्युपत्र व्यक्तीचा वारस होण्याचा अधिकार असेल.

· प्रश्‍न २९: हिंदू उत्तराधिकार अधिनियम, १९५६ अन्‍वये हिंदू स्‍त्रिला एकत्र कुटुंबाच्‍या मालमत्तेत वाटप मागण्‍याचा अधिकार आहे काय?  
F उत्तर: हिंदू उत्तराधिकार अधिनियम-१९५६, कलम २३ अन्‍वये, हिंदू स्‍त्रिला एकत्र कुटुंबाच्‍या मालमत्तेत वाटप मागण्‍याचा अधिकार नव्‍हता परंतु हिंदू उत्तराधिकार (सुधारणा) अधिनियम, २००५ सदरचे कलम २३ रद्‍द झाल्‍यामुळे आता हिंदू स्‍त्रिला एकत्र कुटुंबाच्‍या मालमत्तेत वाटप मागण्‍याचा अधिकार प्राप्त झाला आहे.   

· प्रश्‍न ३०: हिंदू उत्तराधिकार अधिनियम, १९५६ अन्‍वये, कोणाला वारसाने संपत्ती मिळण्यास अनर्ह ठरण्यात आले आहे?
F उत्तर: हिंदू उत्तराधिकार अधिनियम-१९५६, कलम २५ अन्‍वये जी व्यक्ती खातेदाराचा खून करेल किंवा खून करण्यास अपप्रेरणा देईल ती खून झालेल्या खातेदाराच्या संपत्तीत वारसाने अथवा उत्तराधिकाराने हिस्सा मिळण्यास अपात्र ठरेल;    
कलम २६ अन्‍वये या अधिनियमाच्या प्रारंभानंतर, एखादी व्यक्ती धर्मांतर केल्याने हिंदू राहिली नसेल तर अशी व्यक्ती, धर्मांतरानंतर तिला झालेली आपत्ये व त्यांचे वारस एकत्र कुटुंबातील संपत्तीत वारसाने अथवा उत्तराधिकाराने हिस्सा मिळण्यास अपात्र ठरतील;
कलम २७ अन्‍वये वाटपास अपात्र उपरोक्‍त व्यक्ती जणू काही मयत आहे असे समजून वाटप करण्यात येईल. परंतु, कलम २८ अन्‍वये कोणतीही व्यक्ती, कोणत्याही व्याधी, वैगुण्य किंवा व्यंग असल्याच्या कारणावरून अथवा या अधिनियमात उपबंधित केलेले आहे ते खेरीज करून अन्य कोणत्याही कारणावरून कोणत्याही संपत्तीचा उत्तराधिकारी होण्यास अपात्र असणार नाही.

· प्रश्‍न ३१: अज्ञान मुलाच्‍या मालमत्तेबाबत काय तरतुदी आहेत?
F उत्तर: हिंदू अज्ञानत्‍व व पालकत्‍व अधिनियम १९५६, कलम ८ अन्‍वये, अज्ञानाच्‍या नैसर्गिक पालकाला, अज्ञान मुलाच्‍या भल्‍यासाठी काही अधिकार प्रदान केलेले आहेत. दर कायद्‍याच्‍या कलम ८ (२) अन्‍वये, अज्ञानाचा नैसर्गिक पालक, न्‍यायालयाच्‍या आदेशाशिवाय, अज्ञान मुलाच्‍या नावे असणारी कोणतीही मालमत्ता विकू शकणार नाही, गहाण ठेऊ शकणार नाही किंवा बक्षीस किंवा अन्‍य प्रकारे हस्‍तांतरीत करणार नाही. [अ.पा.क.च्‍या मिळकतीची विक्री, न्‍यायालयाच्‍या पूर्व परवानगी शिवाय होऊ शकत नाही.- (सर्वोच्‍च न्‍यायालयाचा दिनांक २५.११.२०१३ रोजी, सरोज विरूध्‍द सुंदरसिंग व इतर)]

· प्रश्‍न ३२: एकत्र कुटुंबाच्या मॅनेजरला, एकत्र कुटुंबाची मिळकत विकता येते काय?
F उत्तर: एकत्र कुटुंबाच्या मॅनेजरला एकत्र कुटुंबाच्या मिळकतीच्या फायद्यासाठी किंवा एकत्र कुटुंबाच्या गरजेसाठी एकत्र कुटुंबाची मिळकत विकण्याचा सशर्त अधिकार आहे.
फक्त खाली दिलेल्या करणांसाठीच त्याला एकत्र कुटुंबाची मिळकत विकता येते अथवा गहाण ठेवता येते. अशा कारणांसाठी केलेले हस्तांतरण सहहिस्सेदारांवर बंधनकारक असते.
() सरकारी कर किंवा कुटुंबावर असलेले कर्ज फेडण्यासाठी
() सहहिस्सेदार किंवा कुंटुंबीयांच्या पोटपाण्यासाठी किंवा आजारपणासाठी
() सहहक्कदार किंवा सहहिस्सेदाराच्या किंवा त्यांच्या मुलीच्या लग्नाच्या खर्चासाठी
() जरुरीचे कौटुंबीक अंत्यविधी संस्कार, श्राध्द किंव कौटुंबीक समारंभ खर्चासाठी
() एकत्र कुटुंबासाठी मालमत्ता मिळविण्यासाठी किंवा ती टिकविण्यासाठी होणारा खर्च भागविण्यासाठी
() एकत्र कुटुंबाच्या कर्त्यावर किंवा इतर सभासदांवर गंभीर फौजदारी तोहमत झाली असेल तर त्यांच्या संरक्षणासाठी करावा लागणारा खर्च भागविण्यासाठी
() एकत्र कुटुंबाच्या व्यवसायासाठी काढलेल्या कर्जाची परतफेड करण्यासाठी
() एकत्र कुटुंबाच्या इतर जरुरीच्या कारणांसाठी
उपरोक्त कायदेशीर गरजांसाठी संपूर्ण मिळकत विकण्याचा अधिकार फक्त एकत्र कुटुंबाचा कर्ता आणि वडिल यांनाच आहे. निव्वळ खरेदीखतात लिहिले आहे म्हणजे ती कुटुंबाची कायदेशीर गरज होती, असे कायदा समजत नाही. यास्तव खरेदीदाराने विक्रीकामी एकत्र कुटुंबाची खरोखरची गरज काय आहे याची खातरजमा करणे आवश्‍यक ठरते. बेकायदेशीर विक्रीबाबत कुटुंबाच्या कोणाही सदस्यास कोर्टातून मनाई हुकूम लावता येतो. या कामी हेतू महत्त्वाचा ठरतो. 
वडिलांचा विशेषाधिकार: एकत्र कुटुंबाची मिळकत किंवा ज्या मिळकतीत मुलांचा किंवा मुलांच्या मुलांचा हिस्सा आहे अशी एकत्र कुटुंबाची मिळकत विकण्याचा, गहाण देण्याचा विशेषाधिकार वडिलांना आहे. पूर्वीचे, नैतिक व कायदेशीर कारणासाठी घेतलेले कर्ज फेडण्यासाठीही अशी मिळकत विकण्याचा, गहाण देण्याचा विशेषाधिकार वडिलांना आहे.
वडिलांनी किंवा एकत्र कुटुंबाच्या कर्त्याने केलेले हस्तांतरण रद्द करणे कामी खरेदीच्या तारखेपासून १२ वर्षांपर्यंत किंवा सज्ञान झाल्यानंतर तीन वर्षांपर्यंत (एकूण १२ वर्षांपर्यंत) दावा लावता येतो, असा निवाडा अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिलेला आहे. मात्र, विक्री हस्तांतरण बेकायदेशीर असा ठराव मागण्यासाठी खरेदीदाराने मालमत्तेचा कब्जा घेतला असेल, तर लिमिटेशन कायदा १९६३, कलम ११३ नुसार तीन वर्षांची मुदत आहे. यात दावा लावण्याचा हक्क ज्या तारखेस सुरू होतो, तेव्हापासून तीन वर्षांची आहे.

· प्रश्‍न ३३: हिंदू विधवा स्‍त्रिने, तिच्या पतीच्या निधनानंतर पुनर्विवाह केला तर तिचा, पती निधनानंतर तिला मिळालेल्या मिळकतीवरील हक्क नष्ट होतो हे खरे आहे काय?
F उत्तर: नाही, हिंदू उत्तराधिकार अधिनियम-१९५६, कलम २४ अन्‍वये वरीलप्रमाणे तरतुद होती. परंतु हिंदू उत्तराधिकार (सुधारणा) अधिनियम, २००५ सदरचे कलम २४ रद्‍द झाल्‍यामुळे आता हिंदू विधवा स्‍त्रिने, तिच्या पतीच्या निधनानंतर पुनर्विवाह केला तरीही तिचा, पती निधनानंतर तिला मिळालेल्या मिळकतीवरील हक्क नष्ट होणार नाही. (.आय.आर. १९७१, मुंबई, ४१३ ; ए.आय.आर. २००८ ए.सी. १४६७).
कायद्‍यानुसार, ज्‍याक्षणी हिंदू स्‍त्रिच्‍या पतीचे निधन होते त्‍याक्षणी अशा स्‍त्रिचा वारसाधिकार सुरू होतो. त्‍यामुळे अशा स्‍त्रिने पुनर्विवाह केला तरीही तिचा सदर वारसाधिकार नष्‍ट होत नाही.
तथापि, पती हयात असतांना, जर हिंदू स्‍त्रिने, तिच्‍या पतीपासून कायदेशीर घटस्‍फोट घेऊन पुनर्विवाह केला असेल आणि नंतर तिच्‍या आधीच्‍या पतीचे निधन झाले तर तिला तिच्‍या आधीच्‍या पतीच्‍या मिळकतीत वारसाधिकार मिळणार नाही.

The provisions of Section 14 of the Hindu Succession Act, widow's remarriage did not divest her of rights in her late husband's property. Reliance was placed upon a decision of Hon'ble the Supreme Court in Cherotte Sugathan vs. Cherotte Bharathi, : RCR 2008(2) 697, Sukhbir vs. Smt. Maya, 1999(1) LJR 40(PH). As is so observed by the learned trial Court, in the aforesaid decision, the Hon'ble Supreme Court had further observed that provisions of Section 14 and 24 of the Hindu Succession Act, overrides the provisions of Hindu Widow Remarriage Act, 1856. Thus, having succeeded to the estate of her late husband and acquired rights therein, subsequent remarriage by the widow would not divest her of the share she had already acquired.

· प्रश्‍न ३४: वडिलांनी वाटपात मिळालेल्या मिळकतीतून इतर काही मिळकत खरेदी केल्यास, किंवा स्‍वकष्‍टाने कमावलेल्‍या मिळकतीवर त्यांच्‍या मुलांचा हक्‍क असेल काय?
F उत्तर: नाही, वडिलांनी वाटपात मिळालेल्या मिळकतीतून काही मिळकत खरेदी केल्यास ती मिळकत वडिलांच्या मालकीची होईल. अशा मिळकतीत तसेच वडीलांनी स्‍वकष्‍टाने कमावलेल्‍या मिळकतीत, त्यांची मुले सहदायाद (कोपार्सनर) नसतात. (ऑल महाराष्ट्र रिपोर्टर २००५ (), ७८९) त्‍यामुळे अशा मिळकतीत त्‍यांच्‍या मुलांचा हक्‍क नसेल. अशी मिळकतीची विल्‍हेवाट मृत्‍यूपत्राने किंवा अन्‍य प्रकारे लावण्‍याचा वडीलांना पूर्ण अधिकार आहे. त्‍यांची मुले याबाबत हरकत घेऊ शकणार नाहीत. तथापि, जर अशा मिळकतीची मृत्‍यूपत्राने किंवा अन्‍य प्रकारे विल्‍हेवाट न लावताच वडील मयत झाले तर त्‍यांची मुले अशा मिळकतीत कायदेशीर वारस ठरतील.
· प्रश्‍न ३५: एकत्र कुटुंबामध्ये एखादी मिळकत खरेदी केली असेल, तर ती मिळकत एकत्र कुटुंबाचीच होती असे सिध्द करावयाचे असल्यास काय पुरावा द्‍यावा लागेल?
F उत्तर: अशी मिळकत खरेदी करण्याच्या वेळेस, एकत्र कुटुंबाकडे पुरेसा पैशाचा गाभा/केंद्रक (न्युकलस) होता हे सिध्द करावे लागेल. (.आय.आर. १९६५, एस.सी., २८९) तरच अशी मिळकत एकत्र कुटुंबाचीच होती हे सिध्‍द होईल. 

· प्रश्‍न ३६: विधवेची शिलभ्रष्टता तिला वाटपास अपात्र ठरविते काय?
F उत्तर: नाही. विधवेची शिलभ्रष्टता तिला वाटपास अपात्र ठरवित नाही. विधवेची शिलभ्रष्टता तिला वाटपास अपात्र ठरवित नाही. विधवा जरी शिलभ्रष्ट असली तरीही तिच्या नवर्‍याचा हिस्सा तिला द्यावा. (.आय.आर. १९७६, कलकत्ता, ३५६; .आय.आर. १९७८, कलकत्ता, ४३१).

· प्रश्‍न ३७: वडिलांच्या मिळकतीत अनौरस मुलांचा हिस्सा असतो काय?
F उत्तर: हिंदू मॅरेज क्‍ट, कलम १६ अन्वये वडिलांच्या मिळकतीत अनौरस मुलांचा हिस्सा असतो. तथापि, वडिलोपार्जित मिळकतीत अनौरस मुलांचा हिस्सा नसतो. तसेच बेकायदेशीरपणे केलेल्या दुसर्‍या लग्नातील पत्नीला मयत नवर्‍याच्या मिळकतीत हक्क किंवा हिस्सा मिळत नाही. (.आय.आर. २००२, गोहत्ती, ९६)
दुसरे लग्‍न बेकायदेशीर असले तरीही दुसर्‍या बायकोपासून झालेली मुले वारस ठरतात. (.आय.आर. १९९६, एस.सी., १९६३ ; .आय.आर. १९८३, मुंबई, २२२) तथापि, एकत्र कुटुंबाची मिळकत वाडवडिलार्जित असेल तर अनौरस मुलांना हिस्सा प्राप्‍त होत नाही. (.आय.आर. १९८७, मुंबई १८२ एस.सी., १९६३; .आय.आर. १९९०, मद्रास ११०)   

· प्रश्‍न ३ एकत्र कुटुंबाच्या मिळकतीमध्ये एखाद्या सहवारसदाराचा प्रत्यक्ष कब्जा नाही म्हणून त्याचा हक्क संपतो असे मानणे योग्‍य आहे काय?  
F उत्तर: नाही. एकत्र कुटुंबाच्या मिळकतीमध्ये सर्व सभासदांचा एकत्र हक्क व एकत्र कब्जा असतो. प्रत्येक सहवारसदारास सामाईक कब्जा व मिळकतीचा उपभोग घेण्याचा समान हक्क असतो. केवळ एखाद्या सहवारसदाराचा प्रत्यक्ष कब्जा नाही म्हणून त्याचा हक्क संपत नाही. एकत्र कुटुंबाच्या मिळकतीमध्ये असणारा कब्जात जरी एकट्याचा असला तरीही असा कब्जा सर्वांचा मिळुन असतो. (.आय.आर. १९९५, एस.सी., ८९५).

· प्रश्‍न ३९: 'स्त्री-धन' मिळकत हिंदू एकत्र कुटुंबाच्या मिळकतीचा भाग असतो असे मानणे योग्‍य आहे काय?  
F उत्तर: नाही. 'स्त्री-धन' हिंदू एकत्र कुटुंबाच्या मिळकतीचा भाग नसतो. 'स्त्री-धन' मिळकत ही त्या स्‍त्रिच्या संपूर्ण मालकीची असते. तिला त्याची वैयक्तिक इच्छेनुसार विल्हेवाट लावता येते. (ऑल महाराष्ट्र रिपोर्टर २०११ (), ४२८ एस.सी.)
आईने मुलाला तिची शेतजमीन खरेदीखताने दिली. आज रोजी आई मयत झाल्यानंतर मुलाने खरेदी खत तलाठीकडे दिले व दुसऱ्या दिवशी मुलीने वारसाचा फेरफार घेण्यासाठी अर्ज केला, मुलीचा खरेदी खतावर आक्षेप आहे. काय करावे?
प्रथम आईकडे शेतीची मालकी कशी झाली हे निश्चित करावे लागेल. ती मिळकत आईची स्‍वयंसंपादित असल्‍यास, आई हिंदू वारसा कायदा १९५६, कलम १४ अन्‍वये पूर्ण मालक आहे. तिला त्‍या जमिनीची विल्‍हेवाट लावण्‍याचा अधिकार आहे. तक्रार प्रकरण चालवून मुलीची हरकत फेटाळावी. जरूर तर तिला दिवाणी न्‍यायालयातून, तिचा हक्‍क सिध्‍द करून आणण्‍यास सांगावे. 

· प्रश्‍न ४०: सर्वच वारस नोंदी हिंदू वारसा कायद्‍यानुसार केल्‍या जातात असे म्‍हणणे योग्‍य ठरेल काय?  
F उत्तर: नाही. वारस नोंद करतांना मयत खातेदारास लागू असलेल्या वारसा कायद्याप्रमाणे वारस नोंद करावी लागते. मयत हिंदू, बौध्द, जैन, शिख असल्यास हिंदू वारसा कायदा १९५६, मयत मुसलमान असल्यास मुस्लिम वारसा कायदा, मयत पारशी, ख्रिश्‍चन असल्यास भारतीय वारस अधिनियम, १९२५ अन्वये सदर चौकशी करावी लागते.

· प्रश्‍न ४१: रक्‍तसंबंधी नातेवाईकांमधील मालमत्ता हस्‍तांतरणाबाबत सन २०१५ मध्‍ये मुद्रांक अधिनियमात काय सुधारणा करण्‍यात आली?
F उत्तर: महाराष्‍ट्र अधिनियम क्रमांक २०, दिनांक २०/०४/२०१५ अन्‍वये शासनाने महाराष्‍ट्र मुद्रांक अधिनियमात अनुच्‍छेद ३४ मध्‍ये जादा परंतूक दाखल करुन खालीलप्रमाणे सुधारणा केली आहे.
(१) निवासी आणि कृषी मालमत्ता जर (१) पती (२) पत्‍नी (३) मुलगा (४) मुलगी (५) नातू (६) नात (७) मयत मुलाची पत्‍नी यांना बक्षीस म्‍हणून दिली असल्‍यास आकारणीयोग्‍य मुद्रांक शुल्‍काची रक्‍कम रुपये दोनशे असेल.
(२) महाराष्‍ट्र प्रांतिक महानगरपालिका अधिनियम १९४९ कलम १२७, महाराष्‍ट्र नगरपालिका अधिनियम १९६५ कलम १४७, महाराष्‍ट्र जिल्‍हा परिषद व पंचायत समिती अधिनियम १९६१ कलम १५८ अन्‍वये सदर मालमत्तेच्‍या मूल्‍यावर एक टक्‍का दराने (local bodies tax) अधिभार आकारण्‍यात येईल.
(३) नोंदणी अधिनियम १९०८ च्‍या फी तक्‍त्‍याच्‍या अनुच्‍छेद एक अन्‍वये दस्‍तऐवजास मालमत्तेच्‍या बाजार मूल्‍यावर एक टक्‍का दराने किंवा जास्‍ति जास्‍त रुपये तीस हजार नोंदणी फी आकारण्‍यात येईल.     
हा बदल फक्त शेतजमीन व सदनिका यांच्‍यासाठी लागू आहे. औद्योगिक व वाणिज्यीक प्रयोजनाच्या मिळकतींसाठी हा फायदा मिळणार नाही.

· प्रश्‍न ४२: 'एकत्र कुटुंबाच्या मिळकतीमध्ये सहवारसदाराचा प्रत्यक्ष कब्जा नसला तर त्‍याला हक्‍क मिळत नाही' हे विधान योग्‍य आहे काय?
F उत्तर: नाही, एकत्र कुटुंबाचा एखादा सहवारसदाराचा अन्‍यत्र राहतो, त्‍याचा मिळकतीवर प्रत्यक्ष कब्जा नाही म्हणून त्याला हिस्‍सा मिळण्‍याचा हक्‍क प्राप्‍त होत नाही असे मानणे अयोग्‍य आहे. एकत्र कुटुंबाच्या मिळकतीमध्ये सर्व सभासदांचा एकत्र हक्क व एकत्र कब्जा असतो. प्रत्येक सहवारसदाराला सामाईक कब्जा व मिळकतीचा उपभोग घेण्याचा समान हक्क असतो. केवळ एखाद्या सहवारसदाराचा प्रत्यक्ष कब्जा नाही म्हणून त्याचा हक्क संपत नाही. एकत्र कुटुंबाच्या मिळकतीमध्ये असणारा कब्जा जरी एकट्याचा असला तरीही असा कब्जा सर्वांचा मिळुन असतो. (ए.आय.आर. १९९५, एस.सी., ८९५),

· प्रश्‍न ४३: 'अपंग वारसदार संपत्तीचा उत्तराधिकारी होण्यास अपात्र असतो' हे विधान योग्‍य आहे काय? 
F उत्तर: नाही, हिंदू वारसा कायदा १९५६, कलम २८ अन्‍वये कोणतीही व्यक्ती, कोणत्याही व्याधी, वैगुण्य किंवा व्यंग असल्याच्या कारणावरून अथवा या अधिनियमात उपबंधित केलेले आहे ते खेरीज करून अन्य कोणत्याही कारणावरून कोणत्याही संपत्तीचा उत्तराधिकारी होण्यास अपात्र ठरत नाही.

· प्रश्‍न ४४: 'उपजत वेडा असणार्‍या व्‍यक्‍तीला एकत्र कुटुंबाच्‍या वाटपात हिस्‍सा मिळत नाही' हे विधान योग्‍य आहे काय? 
F उत्तर: होय, उपजत वेडा असणार्‍या व्‍यक्‍तीला एकत्र कुटुंबाच्‍या वाटपात हिस्‍सा मिळत नाही. तथापि, त्‍याच्‍या मुलांना हिस्‍सा मिळु शकतो. 

· प्रश्‍न ४५: वारसाहीन हिंदू विधवेला, पित्‍याकडून मिळालेली संपत्ती कशी प्रक्रांत होईल?
F उत्तर: हिंदू वारसा कायदा १९५६, कलम १५(२)(अ) अन्‍वये ज्या हिंदू स्त्रिला तिच्या पिता/मातेकडून वारसाने संपत्ती मिळालेली असते, अशी स्त्री मयत झाल्यास, तिची संपत्ती, त्या मृत स्‍त्रिच्या मुले/मुली (पूर्व मृत मुलगा/मुलगी किंवा त्याची अपत्ये यांसह) यांच्याकडे जाते. तथापि, मृत स्त्री जर विनाआपत्य मरण पावली तर  तिला तिच्या पिता/मातेकडून वारसाने मिळालेली संपत्ती तिच्या पित्याच्या वारसांकडे प्रक्रांत होते.

· प्रश्‍न ४६: 'अनोंदणीकृत मृत्यूपत्राची नोंद गाव दप्‍तरी घेता येणार नाही' हे विधान योग्‍य आहे काय?  
F उत्तर: नाही, मृत्युपत्र साध्‍या कागदावरही करता येते. ते स्‍टँपपेपरवर असावे आणि नोंदणीकृतच असावे असे बंधन नाही. नोंदणी कायदा १९०८, कलम १८ मध्‍ये ज्‍या दस्‍तांची नोंदणी वैकल्‍पिक आहे त्‍यांची यादी दिलेली आहे, त्‍यातील (ड) मध्‍ये मृत्‍यूपत्राचा समावेश आहे. त्‍यामुळे मृत्‍यूपत्राची नोंदणी वैकल्‍पिक आहे बंधनकारक नाही.
भारतीय वारसा कायदा, १९२५, कलम- २ (एच) अन्वये मृत्यूपत्राची व्‍याख्‍या दिली आहे. आणि याच कायद्‍याच्‍या भाग ६ मध्‍ये कलम ५७ पासून मृत्‍यूपत्राबाबत तरतुदी दिलेल्‍या आहेत.
तथापि, मृत्यूपत्राची नोंदणी करता येते. रुपये शंभरच्‍या स्‍टँपपेपरवर मृत्युपत्र नोंदणीकृत केलेले असल्यास पुढे कायदेशीर अडचणी उद्भवत नाहीत. मृत्युपत्र खरे नाही, ते खोटे आहे हे सिद्ध करण्याची जबाबदारी जो तसा अरोप करतो त्याच्यावर असते. (चंद्रकांत मेढी वि. लखेश्वरनाथ ए.आय.आर- १९७६ गोहत्ती पान -९८)

· प्रश्‍न ४७: मृत्युपत्र संबंधाने Testator, Intestate, Legatee/Beneficiary, Executor या इंग्रजी शब्‍दांचा अर्थ काय आहे?    
F उत्तर: Testator म्‍हणजे अशी व्यक्ती ज्याने मृत्यूपूर्वी मृत्युपत्र केले आहे; Intestate म्‍हणजे अशी व्यक्ती ज्याने मृत्यूपूर्वी मृत्युपत्र केलेले नाही; Legatee/Beneficiary म्‍हणजे अशी व्यक्ती ज्याला मृत्युपत्रान्वये मालमत्ता मिळाली आहे; Executor म्‍हणजे मृत्युपत्रानुसार मालमत्तेचे वाटप करण्यासाठी, मृत्युपत्र करणार्‍याने किंवा न्यायालयिन आदेशान्वये नेमणूक झालेली व्‍यक्‍ती. अशी व्‍यक्‍ती मृत्युपत्र करणार्‍या मयत व्यक्तीची कायदेशीर प्रतिनिधी म्ह्णून काम करते.

· प्रश्‍न ४८: मृत्यूपत्राची कायदेशीर तरतुद काय?
F उत्तर: भारतात मृत्युपत्र कसे असावे किंवा मृत्यूपत्राने वारसा कसा प्राप्त होतो यासंबंधीची तरतुद भारतीय वारसा कायदा, १९२५ मध्ये आहे. या कायद्‍याच्‍या कलम- २ (ज) अन्वये मृत्युपत्र-इच्छापत्राची व्याख्‍या खालीलप्रमाणे दिलेली आहे.
‘‘मृत्युपत्र म्हणजे मृत्युपत्र करणार्‍याने त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या सर्व प्रकारच्या मालमत्तेची विल्हेवाट कशी लावावी यासंबंधीची कायदेशीर रितीने घोषित केलेली इच्छा होय.’’
या कायद्‍याच्‍या भाग ६ मध्‍ये कलम ५७ पासून मृत्‍यूपत्राबाबत तरतुदी दिलेल्‍या आहेत. हे कलम ५७ म्‍हणजे हिंदू विल्‍स क्‍ट, १८७० च्‍या कलम २ ची पुनरावृत्ती आहे.
मृत्युपत्र हा एक पवित्र दस्त मानला गेला आहे. अशा दस्ताद्वारे मृत व्यक्ती आपल्या संपत्तीच्या विल्हेवाटीबाबतची इच्छा व्यक्त करीत असते. म्हणून मृत्यूपत्राचे एक गंभीर व पवित्र दस्त म्हणून पालन केले गेले पाहिजे. (रामगोपाल लाल वि. ऐपिनकुमार ४९.. आय. आर ४१३)
· प्रश्‍न ४९: मृत्युपत्र करण्‍यास सक्षम व्‍यक्‍ती कोण?
F उत्तर: भारतीय वारसा कायदा, १९२५, कलम- ५९ अन्वये:
æ मृत्युपत्र करणारी व्यक्ती वयाने सज्ञान असावी तसेच तिचे मानसिकदृष्‍ट्‍या सुदृढ असावी.
१८ वर्षाखालील व्यक्तीने केलेले मृत्युपत्र अंमलात येऊ शकणार नाही. तसेच जर ती व्यक्ती अज्ञान असतानाच मृत झाली तरी असे मृत्युपत्र विधिग्राह्‍य व प्रभावशाली ठरणार नाही. (के. विजयरत्नम वि. सुदरसनराव ए. आय.आर. १९२०, मद्रास-२३७)
æ मुक किंवा बधीर किंवा अंध व्‍यक्‍ती, जर त्‍यांना परिणामांची जाणीव असेल तर, मृत्युपत्र करु शकतात.  
æ मृत्युपत्र स्वसंपादित संपत्तीबाबत तसेच वंशपरंपरेने मिळालेल्या संपत्तीतील फक्त स्वत:च्या हिश्शाबाबत करता येते.
æ हिंदू वारसा कायदा, १९५६, कलम ३० अन्‍वये, हिंदू व्‍यक्‍तीला एकत्र कुटुंबाच्‍या मिळकतीमधील स्वत:च्या हिश्शाबाबत मृत्युपत्र करता येते.
æ वेडसर व्‍यक्‍ती, जेव्‍हा वेडाच्‍या भरात नसेल तेव्‍हा मृत्युपत्र करु शकते. परंतू वेडाच्या भरात, नशेत, आजारात, शुद्धीवर नसताना, फसवणुकीने, दबावाखाली करण्यात आलेले मृत्युपत्र विधीग्राह्य असणार नाही.

· प्रश्‍न ५०: हिंदू स्‍त्री किंवा विधवा स्‍त्री मृत्युपत्र करू शकते काय?
F उत्तर: होय, हिंदू उत्तराधिकार अधिनियम-१९५६, कलम १४ अन्‍वये, हिंदू स्‍त्रियांना किंवा विधवांना स्‍त्रीधन म्‍हणून मिळालेली, स्‍वकष्‍टार्जित किंवा वारसा हक्‍काने मिळालेली मालमत्ता ही त्‍यांच्‍या पूर्णत: मालकीची असते. त्‍यामुळे अशा मिळकतींबाबत हिंदू स्‍त्रियांना किंवा विधवांना मृत्युपत्र करता येते.   

Comments

 1. हिंदू विवाह कायद्यानुसार दुसऱ्या बेकायदेशीर पत्नीच्या मुलांना वडिलोपार्जित संपत्तीत हिस्सा असतो का?

  ReplyDelete
 2. ऐका स्रीला भाऊ, बहीन नसल्च्यायाने वडीलांकडुन शेती मीळाली, तर ती शेती तीने तीच्या चार मुला पैकी ऐकाच मुलाला बक्षीस दीली, तर है कादेशीर आहे का

  ReplyDelete
 3. वारसा हक्का नुसार मुलींचे नावे ही त्यांच्या वडिलांचे नाव लावतात की पती चे

  ReplyDelete
 4. वडिलोपार्जित सामाईक जमीनीतील आपला हिस्सा आपण विकू शकतो का? कसा?

  ReplyDelete
 5. वडिलोपार्जित संपत्ती मधून अनेक वारसदारांपैकी कोणत्याही एका वारसदाराचा हिस्सा कायदेशीर रित्या वेगाळा काढून देता येतो का? कसा?

  ReplyDelete
 6. वडिलोपार्जित - वाडवडिलार्जित जमीन, घर, ग्रामपंचायत मिळकत इत्यादी कोर्टातील वाटपाच्या दाव्याचा निकाल लागेपर्यंत कोर्टाकडे जमा करता येते का?

  ReplyDelete
 7. आपण प्रश्‍न 41 बद्दल अधिक माहिती देऊ शकता? म्हणजे शेवटी मला भरायचे आहे ते म्हणजे फक्त मुद्रांक शुल्क 200 कि 1% कर देखील भारवा लागेल

  ReplyDelete
 8. Aatya che nav kami karnyasathi kay karave lagte?

  ReplyDelete
 9. माझा प्रश्न हिंदू वारस हक्क संबंधित मुलीना मिळणारे समान हक्क विषयी आहे
  A ही व्यक्ती वडिलोपार्जित जमीनीची मालक होती
  या व्यक्ती चा मृत्यू 1995 साली झाला
  त्यांच्या पश्चात 5 वारसदार आहेत
  मूल 3
  मूली 2 दोन्ही मुलींची लग्न 1970 साली झालेली होती

  आज 7/12 उतारा वर 5 वारसदार ची नाव आहेत जमीन 5 एकर आहे.
  पहिल्या मुलीचा जन्म 1950 साली व दुसरया मुलीचा जन्म 1952 साली झाला होता
  A यांच्या बायको सुध्दा मृत्यू 1999 साली झाला आहे
  या विषयावर कोणताही दावा प्रलंबित नाही
  या प्रकरणात 2 दोन्ही मुलींना समान हिस्सा मीळनार काय?
  याविषयी मार्गदर्शन करावे ही नम्र विनंती

  ReplyDelete
 10. वडिलोपार्जित शेतजमिनीची जर बहिणीला डावलून वाटण्या केलेल्या असतील आणि जर त्या गोष्टीस 4 वर्ष झालेली आहेत आणि त्यांनंतर बहिणीला कळले तर सदर वाटप रद्द करता येऊ शकते का?

  ReplyDelete
 11. आईने जरj मृत्युपत्र मुलाच्या नावाने केले असेल तर मुलाचा मुलगा त्या संपती वर दावा करू शकतो का

  ReplyDelete
 12. वडलो पार्जीत जमिन बिल्डरला डेव्हलपीगसाठी देउन तयार झालेल्या फ्लॅटला दोन अज्ञान पालक व त्यांच्या वडीलाच्या नावे बिल्डरकडुन खरेदी पत्र केलेला फ्लॅट कायदेशिर नोंदनी करुन विकत घेतल्यावर मुले सज्ञान झाल्यावर हक्क दाखवु शकतात का?

  ReplyDelete
 13. माझ्या वडिलांची वडिलोपार्जीत ४ एकर जमीन शहापूर येथे आहे हि जमीन आम्हाला पुनर्वसाहत म्हणून दिलेली आहे माझे वडिलांची दोन लग्न झाली आहेत पहिल्या पत्नीला १ मुलगी आहे दुसऱ्या पत्नीची आम्ही ३ भावंडे आहोत मी एक मुलगा आणि दोन मुली. हा विवाह बेकायदेशीर आहे कारण एक पत्नी असताना तिच्या हयातीत दुसरे लग्न झाले आहे. पण माझी आई म्हणजे दुसरी पत्नी आणि माझे वडील आता मयत आहेत परंतु माझी दुसरी आई (म्हणजे पहिली पत्नी) अजून जिवंत आहे. अशा परिस्थितीत मला या जमिनीचा हिस्सा मिळू शकेल का त्यासाठी मी पात्र आहे का ?

  ReplyDelete
 14. जर मृत्यू पत्र करून देणार आणि घेणार अश्या दोन्ही व्यक्ती मरण पावल्या असतील तर जमीन कोणाच्या नावाने होणार ...जेवढे वारस मृत्यूपत्र करून देणार याचे आहे त्याचें नावाने की करून घेणार यांचे वारस नावाने होणार

  ReplyDelete
 15. आमचे आजोबा 2018 ला मयत असुन त्यानी 2003 साली रोटरी समोर त्याचे वाटणीपत्र केले असुन प्रत्येकाचे हिस्से एका भावाने विकत घेतले आहेत नोटरी मार्फत त्यांचे मुखत्यार /कब्जे पावती /साठेगत केलेले आहेत. सर्व जागे वर ताबा आमचाच आहे. सर्व व्यवहार चेक ने केलेले आहेत व बहिणीची वाटणी त्या वाटणी पत्रात नाही.तर वारस म्हणून त्या एका भावाची नोंद होऊ शकते का ???
  या कागदपत्राचे भविष्य काय आहे ते मला मार्गदर्शन करावे.

  ReplyDelete
 16. ऐका स्रीला भाऊ, बहीन नसल्च्यायाने वडीलांकडुन शेती मीळाली, तर ती शेती तीने तीच्या चार मुला पैकी तीन मुलांना बक्षीस दीली व एक मुलाला दिली नाही, तर है कादेशीर आहे का

  ReplyDelete
 17. सर माझ्या वडीलांचा मृत्यू 2006झाला आहे पण माझ्या वडीलांना दोन बायको आहेत पहीली सोडून गेल्यावर दुसरी केली आम्ही दोन नंबरच्या आईचे एक भाऊ आणि दोन बहिणी आता वडिलांच्या जमिनीत भाऊ एकटा हक्क सांगतो वडिलांना जमिन त्यांच्या वडिलांकडून मिळाली आहे तर आमचा हक्क नाही का

  ReplyDelete
 18. जर एका महिलेला तिन मुली असतील आणि त्या महिलेच्या नावावर मिळकत असेल पण आईच्या आधी एका मुलगीचे निधन (1961) झाले आसेल तर त्या मुलीच्या मुलीला वारसा हक्क मिळणार का

  ReplyDelete
 19. नमस्कार,
  मी अभय, रा. अंधानेर ता. कन्नड, जिल्हा औरंंगाबाद.

  ग्राम पंचायती मधे वडिलोपार्जीत घर नावावर करण्यासाठी किती खर्च लागतो? आणि नावावर झाल्यावर ग्राम पंचायतीतुन कुठले कागतपत्रे मिळतात?

  ReplyDelete
 20. बारव याठिकाणी पत्नी चे नावावर 5 गुंठे जागा विकत घेतली आहे आता पत्नी मयत आहे त्यावर वारस म्हणून पती चे नाव दाखल करता येईल काय

  ReplyDelete
 21. विधवा स्त्रीने पुनर्विवाह केल्यास आणि सासरच्या लोकांनी संपत्तीत नकार दिल्यास तिला हक्क प्राप्त होतो का?

  ReplyDelete
 22. वय 2 असलेल्या मुलांच्या नावावर घेतलेली शेत जमीन आई वडीलांच्या मृत्यू नंतर कोणाची आहे

  ReplyDelete
 23. घर आजीच्या नावावर आहे आणि ते घर आता वडील (as owner) आणि आत्या(as nominee) च्या नावावर करत आहेत
  आत्या च लग्न झालेले आहे पण नवरा सोडून divorce न घेता ती आमच्या सोबत 2 मुली घेऊन राहते त्यात एका मुलीचे लग्न झालेले आहे तर ती आमच्या सोबत नाही फक्त एक मुलगी आहे
  प्रश्न असा आहे की आत्या च्या नंतर तो हक्क कोणाला मिळणार

  ReplyDelete
 24. वडील पार्जित जमीन आजोबा आणि वडील मृत्यू झाले आहेया जमिनीवर अत्याचा अधिकार होतो का

  ReplyDelete
 25. १९९५ मध्ये केलेल्या वारस नोंदी ला नियमानुसार आवश्यक कागद पत्रे कोणती?

  ReplyDelete
 26. १९९५ मध्ये प्रतिज्ञापना शिवाय केलेली वारस नोंद कायदेशीर आहे का?

  ReplyDelete
 27. अविवाहित बहीणीचा वारस भाऊ होते का...?

  ReplyDelete
Mahsul Guru

Subscribe YouTube Channel