आपले महसूल कायद्याविषयक प्रश्न आमच्या वेबसाईटवर विचारावेत. 📌 Mahsul Guru 📌 YouTube Channel Link!
Posts

कंठविकार :

Please wait 0 seconds...
Scroll Down and click on Go to Link for destination
Congrats! Link is Generated

 * घोरणे (Snoring)

घोरण्याची प्रमुख कारणे- 1) खालचा जबडा (Lower Jaw) वरच्या जबड्यापेक्षा लहान व आत असणे, ह्यामुळे वायूच्या आवागमनात अडथळा निर्माण होऊन आवाज येतो.
 2) जीभ (Tongue), टाळू (Palate), पडजीभ (Uvula), मान जाड असणे 3) स्थूलता (Over Weight) 4) दोन्हीपैकी एक नाकपुडी बंद असणे (Nasal Congestion) 5) नाकात मांसाच्या गाठी असणे (Nasal Polyps)  6) टॉन्सील्स सुजलेले असणे (Enlarged Tonsils)  
* घोरण्यावर रामबाण इलाज म्हणजे रात्री झोपताना नाकांत दोन थेंब कोमट केलेले गाईचे तूप टाकणे. पंधरा दिवसांत घोरणे कमी होते. हा उपाय नियमित केला तर घोरण्याची सवय बंद होते.
* पाठीवर न झोपता कुशीवर झोपल्याने घोरणे कमी होते.
* नियमित प्राणायाम केल्याने  घोरणे कमी होते.

 * घसा खवखवणे

* चार पाकळ्या लसुण व चार लवंगा घेऊन त्यांची एकत्र पेस्ट करावी. या पेस्टमध्‍ये मध मिसळुन हे चाटण दिवसातून चारवेळा चाटावे.
* पानात (Betal Leaf) इतर काहीही न घालता फक्त एक चमचा मुलेठी चूर्ण टाकुन खावे.
* मेथीचे दाणे पाण्यात ऊकळुन त्या पाण्याने गुळण्या कराव्यात.    
* खडे मीठ (Rock Salt) पाण्यात ऊकळुन त्या पाण्याने गुळण्या कराव्यात.
* मुलेठी चूर्ण मधातन चाटण करून घ्यावे.
* पंधरा तुळसीची पाने पाण्यात उकळुन त्या पाण्याने गुळण्या कराव्यात.  

 * घसा बसणे

* ज्येष्ठमध पूड व काळीमिरी चूर्ण मधातून दिवसातून तीन वेळा घ्‍यावे.
* घश्याची कुठलीही तक्रार अननस खाल्ल्याने दुर होते.
* काथ (पानाला लावतात तो) पाण्यात उकळून ते पाणी प्यायल्याने व त्‍यच्‍या गुळण्‍या केल्‍याने आवाज खुलतो.
* घसा बसला असेल तर एक चमचा आल्याचा रस, एक चमचा लिंबाचा रस, एक चमचा ब्रँडी, एक चमचा मध एकत्र करून दिवसातून तीनदा घेणे.
* कलकत्ता पानावर फक्त काथ लावुन चावुन खाणे.
* काळीमिरीचे पाच दाणे, तुपात परतुन, गुळाबरोबर खावेत. यावर पाणी पिऊ नये.
* प्रत्येकी एक चमचा ज्येष्ठमध पूड, हळद पूड, एक कप गरम दुधातुन दिवसातून तीन वेळा घेणे.
* एक मोठा चमचा मध दिवसातून तीन वेळा घेणे.
* 5-6 बत्तासे व 5-6 काळी मिरी रात्री झोपताना चावून खाणे, त्यावर पाणी पिऊ नये.
* एक कप दुधात अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा सुंठ व 4-5 काळी मिरी उकळुन ते रात्री झोपताना पिणे, त्यावर पाणी पिऊ नये.
* एक चमचा हिंग गरम पाण्यातून दिवसातून तीन वेळा घेणे.
* डाळिंबाचा रस मधाबरोबर घेतल्याने आवाज उघडतो.

 * गालगुंड

* कानाच्या मागे गाठ आल्यास त्याला उंबराचे चीक थोडा शेंदूर मिसळून लावावे.
* गालगुंडाला पपईचे चीक लावावे.
* सूजेवर धने पावडर किंवा कोथिंबिरीचा लेप, गरम पाण्यातून लावावा.

  * गंडमाळ

हा क्षयाचा प्रकार असून मानेजवळील ग्रंथीच्या क्षयाला गंडमाळ म्हणतात.
* आमसूलाच्या बियांपासून काढलेल्या तूपासआमसूल तूपम्हणतात. हे जाडसर, घट्ट, व पांढर्‍या रंगाचे असते. गंडमाळ विकारात वीस ग्रॅम आमसूल तूपात थोडी खडीसाखर घालून सेवन करावे व आमसूल तूप गंडमाळेच्या सुजेत जिरवावे.
* उंबराच्या पानावरील फोडांची पूड करून दही व खडीसाखर बरोबर रोज एकदा पंधरादिवस घेणे.
* धने पावडर किंवा कोथिंबिरीचा लेप, गरम पाण्यातून लावावा.

 * टॉन्सिल्स्

* मध व पाणी एकत्र करून गुळण्या करणे.
* टॉन्सिल्स् मुळे घसा दुखत असेल तर हळद, सुंठ व लसूण एकत्र उगाळून तो लेप घश्याला बाहेरून दिवसातून दोनदा पाच दिवस लावावा.
* एक चमचा लसणाचा रस एक चमचा मधात टाकुन, एका काडीला कापुस गुंडाळुन, त्याने टॉन्सिल्सर लावावा.
* शिंगाड्यामध्‍ये (Waterchest Nut) आयोडीन भरपुर प्रमाणात असते. शिंगाड्याचे सेवन केल्याने टॉन्सिल्समध्‍ये आराम पडतो.
* बेलाच्या पानाचा काढा दिवसातून तीन वेळा घ्यावा व त्‍याने गुळण्‍या कराव्‍यात.
* सुकलेले अंजीर पाण्यात उकळून त्याच्या काढ्याने गुळण्या कराव्यात.
* एक चमचा तुरटी पावडर, पाण्यात उकळून त्याच्या पाण्याने गुळण्या कराव्या.
* अर्धा चमचा हळदपुड तोंड उघडून घश्यात सोडावी व अर्धा तास मौन पाळावे. हा प्रयोग घश्याच्या सर्व विकारांवर करता येतो.
* रोज रात्री झोपतांना, एक कप दुधात, पाव चमचा हळद ऊकळुन ते दूध गरम असतांनाच (हवे असल्यास बशीने) प्यावे. नंतर पाणी पीऊ नये.
* देशी बाभळीची (Acacia tree) (किकर/बबुल) पाने/साल, लवंग व काळीमिरी थोडे मीठ टाकून उकळून त्या पाण्याने गुळण्या केल्यास टॉंसिल्स बरे होतात.
* धने पावडर किंवा कोथिंबिरीचा लेप, गरम पाण्यातून गळ्याजवळ लावावा.

  * थायरॉईड

* या विकाराने पिडीत व्यक्तींसाठी एक रामबाण उपाय म्हणजे, रात्री एक लिटर पाण्‍यात चार मोठे चमचे अख्खे धणे काचेच्या भांड्‍यात भिजवून ठेवावे, सकाळी ते पाणी धण्यासह अर्धे होईल इतपत उकळावे, कोमट करून, गाळून प्यावे. सकाळी पुन्हा एक लिटर पाण्‍यात चार मोठे चमचे धणे भिजवून तसाच प्रयोग रात्री करावा. पंधरा दिवसात निश्‍चित आराम येतो.
* गहू, काळे चणे व जौ (Barley) यांचे सम प्रमाणात घेऊन, या पिठाची पोळी किमान सहा महिने नियमित खाल्यास निश्‍चित आराम येतो.
* दुसरा एक उपाय म्हणजे, कोथिंबिरीचा पाला वाटून अंदाजे एक मोठा चमचा वाटण तयार करावे, हे वाटण अर्धा ग्लास कोमट सकाळ-संध्याकाळ पाण्यातून दररोज घ्यावे. दोन महिन्यात निश्‍चित आराम येतो.

  * उचकी (Hiccups)

उचकी थांबत नसेल तर
* दोन मोठे चमचे पाण्यात सुंठ उगाळून कोमट पाण्याबरोबर घेणे.
* आल्याचे लहान तुकडे चघळणे.
* पेटत्या कोळशावर कापूर टाकून हुंगणे.
* नारळाच्या शेंड्या जाळून ती राख मधाबरोबर घ्यावी.
* वेलदोड्याच्या टरफलांची धुरी तोंडात घ्यावी.
* लोखंडाची एखादी वस्तू आगीत लाल तापवून लगेच ग्लासमध्‍ये थंड पाणी घेऊन त्यात बुचकळावी व ते पाणी प्यावे.
* तुळशीची पाच पाने, जायफळाचा लहान तुकडा एकत्र चघळल्याने उचकी थांबते.
* कोवळ्या मुळ्याचा काढा पाजावा.
* आंब्याच्या ताज्या पानांचा दोन मोठे चमचे रस घेतल्याने उचकी बंद होते.
* बर्फाचा खडा तोंडात धरून चोखल्यास उचकी बंद होते.
* काळीमिरीचा एक दाणा सुईमध्‍ये खुपसुन तो जाळावा. आग विझल्यावर येणारा धुर नाकाने दर्घ श्वास घेऊन हुंगावा. उचकी लगेच थांबते.


Rate This Article

या लेखात, आम्ही आपणाला कंठविकार :. याबाबत माहिती दिली आहे आम्हाला आशा आहे की, तुम्हाला ती आवडली असेल. माहिती आवडली असेल तर, सदरची माहिती तुमच्या मित्रांनाही शेअर करा.

आपले महसूल कायद्याविषयक प्रश्न विचारण्यासाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या. आणि आमच्या टेलिग्राम चॅनेललाही आजच जॉईन व्हा. Website Link Telegram Channel Link धन्यवाद !

Getting Info...

About the Author

Deputy Collector in Revenue Dept. Government of Maharashtra

Post a Comment

Cookie Consent
We serve cookies on this site to analyze traffic, remember your preferences, and optimize your experience.
Oops!
It seems there is something wrong with your internet connection. Please connect to the internet and start browsing again.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.