म.ज.म.अ. कलम १५५ -ऑफ-लाइन-ऑन-लाइन
दुरूस्ती
१. दिनांक १ ऑगस्ट २०२३, "महसूल दिन" पासून शासन निर्णय क्र. संकीर्ण-२०२३/प्र.क्र.१४९/ई-१, दिनांक २५.७.२०२३ अन्वये "महसूल सप्ताह’’ साजरा करण्यात येत आहे. यावेळी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६, कलम १५५ बाबत अर्ज दाखल करण्याच्या सुविधा देणाऱ्या ‘‘ई- हक्क पोर्टल’’ची मोठ्या प्रमाणात प्रचार व प्रसिद्धी करावी.
२. म.ज.म.अ., कलम १५५ खालील ऑफ-लाइन प्रकरणांच्या निपटारा हा कालबद्ध पद्धतीने करण्यासाठी जिल्हाधिकारी स्तरावरून तहसिलदार निहाय प्रकरण संख्याबाबत माहिती घेण्यात यावी.
३. पंधरा दिवसाच्या कालावधीमध्ये ऑफ-लाइन प्रकरणांचा निपटारा करण्याच्या सूचना तहसिलदारांना देऊन पंधरा दिवसानंतर प्रलंबित राहणाऱ्या सर्व ऑफ-लाइन, म.ज.म.अ., कलम १५५ अन्वये दाखल प्रकरणांची माहिती ही तहसिलदार स्तरावर ‘‘ई-हक्क पोर्टल’’मध्ये अर्ज स्वरूपात भरण्यात यावी. जेणेकरुन या प्रकरणांचा समावेश MIS प्रणालीत होईल व यांचा आढावा हा सर्व वरिष्ठ पातळीवर घेता येईल.
‘‘ई हक्क पोर्टल’’वर दिनांक ७ ऑगस्ट २०२३ पूर्वी करावयाची आहेत जेणेकरून म.ज.म.अ., कलम १५५ ची
सर्वच्या सर्व प्रकरणे ही ‘‘ई- हक्क पोर्टल’’च्या माध्यमातून तहसिलदार स्तरावर प्राप्त
होतील व त्यांचे पर्यवेक्षण MIS द्वारे करता येईल.
८. ई-हक्क पोर्टलवर
प्राप्त अर्ज संख्या वृद्धीचे MIS
च्या माध्यमातून जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्त यांनी पर्यवेक्षण
करावे. ‘‘ई-हक्क पोर्टल’’वर प्राप्त
प्रकरणांच्या निर्गतीचे प्रमाण देखील सातत्त्याने आढावा घेऊन संनियंत्रित करावे तसेच प्रलंबित ऑफलाईन
नोंदी प्रकरणांची पडताळणी / तपासणी
खात्री उपविभागीय अधिकारी यांचे कडून करण्यात यावी.
¡ म.ज.म.अ., कलम १५५ ची तरतूद:
एखाद्या मूळ दस्तऐवजात/आदेशात केलेला उल्लेख किंवा आदेश नोंदविण्यात चूक झाली असेल किंवा नजर
चुकीने राहून गेले असेल तेव्हाच आणि सर्व हितसंबंधितांना नोटीस देऊन आणि त्यांना त्यांचे म्हणणे मांडण्याची संधी
दिल्यानंतरच अशी
चूक किंवा लेखन प्रमाद कलम १५५ अन्वये
आदेश पारित करून दुरुस्त करता येतो.
¡ म.ज.म.अ., मधील
कलम १५५ ची शब्द रचना : लेखन प्रमादांची दुरुस्ती:
कोणतेही लेखन प्रमाद किंवा
अधिकाराभिलेखात किंवा या प्रकरणांन्वये ठेवण्यात आलेल्या नोंदवहीत ज्या चुका
झाल्या असल्याचे हितसंबंधित पक्षकारांनी कबूल असेल किंवा ज्या चुका एखाद्या महसूल
अधिकाऱ्यास, तो निरीक्षण करीत असताना आढळतील अशा कोणत्याही
चुका जिल्हाधिकाऱ्यास कोणत्याही वेळी दुरुस्त करता येतील किंवा दुरुस्त करवून घेता
येतील.
परंतु,
जेव्हा एखाद्या महसूल अधिकाऱ्यास, तो
निरीक्षण करीत असताना, कोणतीही चूक आढळून आली असेल,
तेव्हा पक्षकारांना नोटीस देण्यात आल्याशिवाय व वादात्मक नोंदीसंबंधीच्या कार्यपद्धतीनुसार कोणत्याही हरकती असल्यास
अशा हरकती अंतिमरीत्या निकालात काढल्याशिवाय अशी कोणतीही चूक दुरुस्त करता येणार नाही.
The
Collector may, at any time, correct or cause to be corrected any clerical any
errors which the parties interested admit to have been made in the errors and
record of rights or registers maintained under this Chapter or which a Revenue
Officer may notice during his inspection:
Provided
that, when any error
is noticed by a Revenue Officer during his inspection, no such error shall
be corrected unless notice has been given to the parties
and objections, if any, have been disposed of finally in accordance with the procedure relating to disputed
entries.
१. खातेदारांच्या नावातील काना, मात्रा, वेलांटी,
ऊकार, नावातील शब्द चुकलेला असणे
२. धारणाधिकार हस्तलिखीत गाव नमुना सात-बारा नुसार
नमूद नसणे.
३. क्षेत्राचे एकक हस्तलिखीत गाव नमुना सात-बारा
नुसार नमूद नसणे.
४. लागवडीलायक क्षेत्र, पोट खराब क्षेत्र हस्तलिखीत
गाव नमुना सात-बारा नुसार नमूद नसणे.
५. भूमापन क्रमांकाचे एकूण क्षेत्र हस्तलिखीत गाव
नमुना सात-बारा नुसार नमूद नसणे.
६. खातेदाराच्या नावे असलेला स्वतंत्र हिस्सा हस्तलिखीत
गाव नमुना सात-बारा नुसार नमूद नसणे.
अर्थात ज्या लेखन प्रमाद दुरूस्तीमुळे खातेदाराच्या
हक्कांवर कोणताही परिणाम होणार नाही त्यासाठीच वापरण्यात यावे.
hf
Rate This Article
या लेखात, आम्ही आपणाला कलम १५५ -ऑफ-लाइन-ऑन-लाइन दुरूस्ती. याबाबत माहिती दिली आहे आम्हाला आशा आहे की, तुम्हाला ती आवडली असेल. माहिती आवडली असेल तर, सदरची माहिती तुमच्या मित्रांनाही शेअर करा.
आपले महसूल कायद्याविषयक प्रश्न विचारण्यासाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या. आणि आमच्या टेलिग्राम चॅनेललाही आजच जॉईन व्हा. Website Link Telegram Channel Link धन्यवाद !