* ओठ फुटणे/काळे होणे
* दुधाच्या
सायीत हळद कालवून चांगली घोटून ओठांना लावावी.
* निरशा दुधात,
गुलाबजल मिसळुन ओठांना लावावे.
* पिकलेल्या
पपईचा गर, कुस्करून ओठांना लावावा.
* कोमट तूप
रात्री झोपताना बेंबीत लावावे.
* आंब्याच्या
पानांचा रस ओठांना लावावा.
* बदामाचे
तेल ओठांना लावावे.
* तुपात किंचित
मीठ मिसळून ओठांना तसेच बेंबीत लावावे.
* ओठांना
ग्लिसरीन लावावे.
* पाच थेंब
ग्लिसरीन, लिंबाच्या रसात किंवा मलईबरोबर नियमितपणे ओठांना लावावे.
* ओठांना
नियमितपणे मध लावावा.
* रोज रात्री
झोपताना मोहरीच्या (सरसो) तेलाचे चार थेंब
बेंबीत (नाभी/ Navel) घालावे व ओठांना लावावे. पंधरा दिवसात निश्चित
परिणाम दिसतो.
* चेहर्यावर
केस येणे
काही स्त्रियांच्या चेहर्यावर
खूप केस येण्याची प्रवृत्ती असते. काही स्त्रियांना रजोनिवृत्तीच्या काळात ही
प्रवृत्ती निर्माण होते. यासाठी
* लिंबाचा
रस काढून राहिलेल्या सालीत अर्धा चमचा आल्याचा रस घालावा, व हे
साल चेहर्यावर चांगले घासावे. नंतर गुलाबपाण्याने चेहरा धुऊन
एक चमचा हळद थोडी गरम करून मध व थोड्या गुलाबपाण्याबरोबर कालवून चेहर्याला लावावी
व अर्ध्या तासानंतर साबण न लावता उटणे लावून चेहरा धुवावा.
उपाय: तारुण्य पिटिका/मुरूम
त्वचेच्या खालील तैलीय ग्रंथी (Sibetious Glands) त्वचेच्या रक्षणासाठी तेल (Sibum) उत्पन्न करत असतात, हे तेल त्वचेतील बारीक नलीकांव्दारे त्वचेवर येत असते. जेव्हा हे तेल जास्त प्रमाणात उत्पन्न होते व त्यास बाहेर येण्यास अडथळा निर्माण
होतो तेव्हा या तैलीय ग्रंथी (Sibetious Glands) फुगतात, याला आपण तारुण्य पिटिका म्हणतो.
विशेषत: पित्ताच्या आधिक्याने तारूण्य पिटिका होतात.
खालील कुठलाही उपाय करण्याआधी
चेहर्याला तेल अथवा तत्सम द्रवाने, दहा मिनिटे मसाज करावा, नंतर चेहरा कापसाने पुसुन दहा मिनिटे गरम पाण्याची वाफ घ्यावी. नंतरच उपाय करावे. त्वचेच्या आतील थरातील घाण निघुन जाण्यासाठी
हे आवश्यक आहे.
* लिंबाचा
रस व गुलाबपाणी सम प्रमाणात घेऊन दर तासाने ह्या पाण्याने चेहरा धुवावा. असे पंधरा दिवस करावे.
* आंघोळी
पूर्वी अर्धा तास लिंबाची साल चेहर्यावर घासावी.
* रात्री
झोपताना कच्च्या दुधात जायफळ उगाळून तारुण्य पिटीकांना लावावे, सकाळी
चेहरा धुवावा.
* संत्र्याच्या
साली व चण्याची डाळ रात्री भिजवून सकाळी त्याची पेस्ट करून चेहर्यावर लावावी,
हा लेप वाळल्यानंतर चेहरा धुवावा.
* चारोळी,
मसूर डाळ, पिवळी मोहरी, तांदूळ
व थोडा कापूर यांची एकत्र पावडर करून रात्री काकडीच्या रसाबरोबर अथवा कच्च्या दुधाबरोबर
चेहर्यावर लावावी व पंधरा मिनिटे ठेऊन चेहरा धुवावा.
* कडुलिंबाची
10 पाने पाण्यात उकळून त्या पाण्याने तोंड धुवावे.
* तुळशीचा
रस व लिंबाचा रस सम प्रमाणात घेऊन रात्री झोपताना चेहर्याला लावावा. सकाळी चेहरा धुवावा.
* कोथिंबीरचा
रस व पुदिन्याचा रस एकत्र करून चेहर्याला लावावा.
* कोरफडीचा
रस नियमीत प्यावा.
* कच्चा बटाटा,
गाजर, बीट, दुधी यांचा अर्धा
कप रस एकत्र करून रोज घ्यावा.
* धणे,
जिरे, वावडिंग पाण्यात उकळून ते पाणी गाळून प्यायल्यास
रक्त शुद्ध होते, त्वचा साफ होते.
* जायफळ व
वेखंड उगाळून त्याचा लेप मुरमांवर लावावा.
* काही व्यक्तींच्या
चेहर्यावर तारुण्यपिटिकांचे डाग दिसून येतात. यावर एक चमचा शेंगदाणा
तेलात एक चमचा लिंबू रस पिळून हा लेप चेहर्याला लावावा. वीस
मिनिटांनी चेहरा धुवावा. एक महिना नियमित हा उपचार केल्यास चेहर्यावरील
डागांत फरक पडतो.
* तारुण्यपिटिकांवर
पिकलेल्या पेरूचा गर आणि पाव चमचा हळद, थोड्या गुलाबपाण्याबरोबर
कालवून लावावा.
* जांभळाची
बी दुधात उगाळुन लावावी.
* आहारात
कलौंजी (Nigella) चा वापर
करावा.
* खजूर बी
दुधात उगाळून, त्यात थोडी जायफळ पावडर टाकून तारूण्यपिटीकांवर लावावी.
* कमळाचे
फुल आणून ते सावलीत सुकवावे, त्याची पावडर करून दूध किंवा दही
किंवा मध यांबरोबर लेप करून चेहर्यावर लावल्यास त्वचा उजळते.
* नारळाची
करवंटी जाळून, त्या राखेत, कापूर व नारळाचे
तेल मिसळून, तारुण्यपिटीकेवर लावावे. हा लेप
तारुण्यपिटीकेमुळे झालेल्या व्रणावरही लावता येतो.
* दूर्वा
चांगल्या कुटून त्याचा लेप तारुण्यपिटीकेवर लावावा. हा लेप तारुण्यपिटिकेमुळे झालेल्या व्रणावरही
लावता येतो.
उपाय: चेहर्यावर डाग /सुरकुत्या
पडणे (Wrinkles /Pigmentation)
बध्दकोष्ठता, ऊन्हात
जास्त काम करणे, धुम्रपान, मद्यपान,
अति रागावणे, मानसिक ताण, अनिद्रा, अति शारीरीक ताण ह्यामुळे चेहर्यावर सुरकुत्या
पडु शकतात.
खालील कुठलाही उपाय करण्याआधी
चेहर्याला तेल अथवा तत्सम द्रवाने, दहा मिनिटे मसाज करावा, नंतर चेहरा कापसाने पुसुन दहा मिनिटे गरम पाण्याची वाफ घ्यावी. नंतरच उपाय करावे. त्वचेच्या आतील थरातील घाण निघुन जाण्यासाठी
हे आवश्यक आहे. प्रत्येक लेप चहेर्यावर तीस मिनिटे ठेवावा
व नंतर साबण न लावता उटणे लाऊन चहेरा धुवावा.
* जांभळाच्या
बिया दुधात उगाळून किंवा जांभळाच्या बियांचे चूर्ण दुधात कालवून चेहर्याला लाववा.
* रोज एक
चमचा हळद थोडी गरम करून मध व थोड्या गुलाबपाण्याबरोबर कालवून चेहर्याला लावावा.
* सीताफळ
मिळत असेल तेव्हा त्याचा भरपूर वापर करावा. यात जीवनसत्त्व
‘अ’,‘क’, असल्याने त्वचेचे
आरोग्य राखले जाते.
* पिकलेले
अर्धे केळे चांगले कुस्करून चेहर्याला लावावे.
* चेहर्यावर
आठवड्यातुन तीनवेळा मध लावावा.
* पानकोबीचा रस व मध एकत्र करून
चेहर्याला लावावा.
* कांद्याचा
रस आणि पांढरे व्हिनेगर सम प्रमाणात घेवुन चेहर्यावर लावावा.
* चेहर्यावर
ताज्या कलिंगडाचा रस लावून तीस मिनिटांनी चहेरा धुवावा. सुरकुत्या कायमच्या निघून जातात.
* चेहेर्यावर
डाग असले तर प्रत्येकी पन्नास ग्रॅम आवळा चूर्ण, पुनर्नवा पावडर,
ज्येष्ठमध चूर्ण व दहा ग्रॅम आंबेहळद घेऊन एकत्र करून ठेवावी.
त्वचा रूक्ष असेल तर दूध किंवा लिंबाच्या रसात पेस्ट बनवून लावावी,
त्वचा तेलकट असेल तर गुलाबपाण्यात पेस्ट बनवून पंधरा दिवस नियमित चेहेर्याला
लावावी. यामुळे मृत त्वचा निघून जाते व चेहर्यावर तकाकी येते.
* चेहर्यावर
डाग असले तर जायफळ व अनंतमुळ चूर्ण सम प्रमाणात घेऊन दुधामध्ये उगाळून ही पेस्ट पंधरा
दिवस नियमित चेहर्याला लावावी.
* चेहर्यावर
ताजा लिंबू कापून त्याची फोड घासावी.
* काकडीचा
रस चेहर्यावर लावावा.
* चेहर्यावर
पपईचा गर लावावा.
* सफरचंद
व अननसचा रस समप्रमाणात घेऊन चेहर्यावर लावावा.
* ऊसाच्या
रसात, हळद टाकुन लेप तयार करून चेहर्याला लावावा.
* ओल्या नारळाचे
दूध चेहर्यावर लावावे, हे उत्तम Moisturizer असून चेहर्यावर तेज व गोरेपणा आणतो.
* सकाळी उठल्यावर
चेहर्यावर जे तेल येते ते Anti Wrinkle आहे. हे तेल चेहर्यावर हलका मसाज करून जिरवावे
नंतर चेहरा धुवावा.
* एरंडेल
तेल अथवा ग्लिसरीन मध्ये लिंबाचा रस, हळद, रक्तचंदन व कापराची वस्त्रगाळ पूड टाकून मलम तयार करावे. दाढी केल्यावर चेहर्याला लावावे. चेहरा कांतिमान होऊन
त्वचेखालील अतिरिक्त चरबी कमी होते.
* एरंडेल
तेल व दूध सम प्रमाणात घेऊन चेहर्यावर हलका मसाज करून जिरवावे नंतर चेहरा धुवावा.
* चेहर्यावर
डाग असतील तर आठवड्यात दोनदा, एक बटाटा उकडून थंड झाल्यावर त्यात
एका काकडीचा रस व अर्धा लिंबू पिळून एकत्र करून पेस्ट बनवुन चेहेर्याला लावावी.
* चेहर्यावर
सुरकुत्या असतील तर आठवड्यात दोनदा, एक चमचा पांढरे व्हिनेगर,
कच्च्या अंड्यातील पांढरे तरल द्रव्य व एक पिकलेले केळे एकत्र करून
पेस्ट बनवुन चेहर्याला लावावी.
* नारळाची
करवंटी जाळून, त्या राखेत, कापूर व नारळाचे
तेल मिसळून, तारुण्यपिटिकेमुळे झालेल्या व्रणावर लावावा.
* दूर्वा
चांगल्या कुटून त्याचा लेप तारुण्यपिटिकेमुळे झालेल्या व्रणावर लावावा.
* जीवनसत्व
‘अ’ युक्त गोळ्या घ्याव्या. गाजर, टोमॅटो, आवळा यांचे सेवन
करावे.
* नारळाच्या तेलाने चेहर्यावर मसाज करावा.
* तेलकट त्वचा
* लिंबाच्या
वाळलेल्या फोडींची पावडर करून ती गुलाबपाणी किंवा दुधाबरोबर उटणे म्हणून लावावी.
* एक सफरचंद
दररोज खावे तसेच त्याची फोड चेहर्यावर घासावी.
* दिवसभरात
10 ते 12 ग्लास पाणी प्यावे.
* त्वचा फार
तेलकट असेल, घाम जास्त येत असेल, घामाला
दुर्गंध असेल, चेहर्यावर मुरमे असतील तर, एका भांड्यात पाणी उकळून घ्यावे, गॅस बंद करावा,
उकळलेल्या पाण्यात एक चमचा धणे पावडर व एक चमचा जिरे पावडर टाकावी,
भांड्यावर झाकण ठेवावे. हे पाणी थंड झाल्यावर दिवसभरात
पिऊन संपवावे.
Rate This Article
या लेखात, आम्ही आपणाला चेहर्याचे विकार :. याबाबत माहिती दिली आहे आम्हाला आशा आहे की, तुम्हाला ती आवडली असेल. माहिती आवडली असेल तर, सदरची माहिती तुमच्या मित्रांनाही शेअर करा.
आपले महसूल कायद्याविषयक प्रश्न विचारण्यासाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या. आणि आमच्या टेलिग्राम चॅनेललाही आजच जॉईन व्हा. Website Link Telegram Channel Link धन्यवाद !