* डोकेदुखी (Migraine)
* दालचिनीचे
चूर्ण पाण्यात भिजवून डोक्यावर लेप द्यावा.
* दालचिनीचे
चूर्ण व सुंठ पाण्याबरोबर सेवन करावे.
* या विकाराने
पिडीत व्यक्तींसाठी एक रामबाण उपाय म्हणजे, रात्री झोपताना गाईचे
शुद्ध तूप, कोमट करून दोन्ही नाकपुडींमध्ये दोन थेंब नियमित
घालावे.
* जेवताना
उत्तरेकडे तोंड करून जेवावे.
* झोपताना
दक्षिणेकडे डोके करून झोपावे.
* कलिंगड अर्धा कापुन त्यातील
लाल गर काढुन घ्यावा व साल हेल्मेट प्रमाणे पंधरा मिनिटे डोक्यावर ठेवावी.
* कोथिंबिरीची
पाने वाटून, त्याचा लेप डोक्यावर लावावा.
* उन्हामुळे
डोके दुखत असल्यास कांदा बारीक किसुन तो लगदा हात-पायांच्या तळव्यावर बांधावा.
* अर्धशिशी
* सुंठ कोमट
पाण्यात उगाळून माथ्यावर लेप द्यावा.
* अर्धा कच्चा
पेरु पाण्यात उगाळून त्याचा लेप डोक्यावर करावा.
* गाजराच्या
पानांना दोन्ही बाजूंनी तूप चोळून गरम करावे. या पानांचा रस काढून
दोन थेंब दोन्ही नाकपुड्यांत टाकावे.
* पहाटे तोंड
न धुता, दुधाबरोबर जिलबी खावी. नंतर तोंड
धुवावे.
* लसणाच्या दोन थेंब
रसात दहापट पाणी घालावे, हे मिश्रण दोन थेंब प्रत्येक नाकपुडीत सकाळी व सायंकाळी
टाकावे.
4. कर्ण विकार:
* कान दुखत
असल्यास कांदा राखेत भाजून त्याचा कोमट रस कानांत टाकावा.
* कानात दडा
बसला तर थोडासा हिंग कापसात गुंडाळून कानात ठेवावा.
(शुद्ध हिंग जाळल्यास निळसर ज्योत येते. अशुद्ध हिंग पाण्यात
विरघळल्यास पाणी दूधट होते.) * पांढर्या कांद्याचा रस
सर्व कर्णविकारांवर गुणकारी आहे.
* कानात दडा
बसला तर सालं काढलेली लसणाची पाकळी कापसात गुंडाळुन कानात ठेवावी.
* कान दुखत
असल्यास गाजराचा रस कोमट करून कानात घालावा.
* सकाळी ताजे
गोमूत्र कानात दोन थेंब टाकावे. हे गोमूत्र गरोदर गाईचे नसावे.
ताजे गोमूत्र
कानात टाकल्याने कानातील मळ, पू,
दुखणे, हमिंग साऊंड इ. विकार नाहीसे होतात.
* कोरफडीचे
ताजे पान मधोमध कापून त्यातून निघणारा रस (चीक नव्हे)
कानात टाकावा.
* कान दुखत
असेल तर दहा ग्रॅम ओवा पन्नास ग्रॅम तिळाच्या तेलात उकळून कोमट झाल्यावर
चार थेंब कानात टाकावे.
* तिळाच्या
तेलात चार लसणाच्या पाकळ्या उकळून तेल कोमट झाल्यावर गाळून कानात
घालावे.
* मक्याचा
रस गरम करून कोमट झाल्यावर कानात घालावा.
* तिळाच्या
तेलात ओवा उकळून तेल कोमट झाल्यावर गाळून कानात घालावे.
* कानात किडा
गेल्यास समईतील गरम तेल कापसाच्या बोळ्यात घेऊन कानात घालावे.
* कानात किडा
गेल्यास ग्लिसरीन किंवा तुरटी तेलात घालून कानात घालावे.
* कानात किडा
गेल्यास मोहरीचे तेल गरम करून कोमट झाल्यावर कानात घालावे.
* कान दुखत
असेल तर आल्याचा किंवा तुळशीचा किंवा विड्याच्या पानाचा रस थोडा गरम करून कानात टाकावा.
* कान दुखत
असेल तर पाच पाकळ्या लसूण, एक चमचा ओवा, एक चमचा आल्याचा रस, एक चमचा रुईच्या झाडाचे
(मारुतीला वाहतात) चीक, मोहरी/तिळाच्या तेलात पाण्याचा अंश संपेपर्यंत उकळावे. हे तेल,
गाळून चार थेंब कानात टाकावे.
* कानात पू
झाल्यास, चार-पाच थेंब कांद्याचा रस कोमट
करून तीन-चार वेळा कानात घालावा.
* कानात पू
झाल्यास, चार-पाच थेंब कारल्याच्या फुलांचा
रस तीन-चार वेळा कानात घालावा.
5. नाकाचे विकार :
विशेषत: थंडीत,
वातावरणातील प्रदुषणाची पातळी खाली येते त्यामुळे अनेकांना, नाकातून सतत पाणी येणे, सतत शिंका येणे, नाक लाल होणे, डोके दुखणे हे विकार जाणवतात. यासाठी
* निलगिरीचे
तेल कापसावर घेऊन हुंगावे.
* निलगिरीचे
पाच थेंब तेल, उकळत्या पाण्यात टाकुन त्याची वाफ नाकात घ्यावी.
* एक चमचा
सुंठ पावडर, मधातुन, दिवसातून तीनवेळा चाटावी.
* पाच काळीमिरी,
पाच तुळसीची पाने व एक इंच आल्याचा तुकडा टाकुन एक लिटर पाणी
उकळुन घ्यावे व ते थर्मासमध्ये भरून ठेवावे. हे पाणी
दिवसभर गरम गरम प्यावे.
* नाकातून रक्त येत असल्यास थंड
पाण्याची धार डोक्यावर धरावी.
* नाकातून रक्त येत असल्यास डाळिंबाच्या फुलांचा रस नाकात
घालावा.
* नाकातून रक्त येत असल्यास आवळ्याचा
रस नाकात घालावा.
* रोज रात्री
झोपतांना नाकात चार थेंब बदामाचे तेल किंवा गायीचे तूप नाकात घालावे. ह्यामुळे
नाकाचे विकार होत नाहीत व मेंदू शांत रहातो.
* नाकाचा
घुळणा फुटुन रक्त येत असल्यास नाकात चार थेंब कोथिंबिरीचा रस घालावा.
Rate This Article
या लेखात, आम्ही आपणाला डोक्याचे विकार :. याबाबत माहिती दिली आहे आम्हाला आशा आहे की, तुम्हाला ती आवडली असेल. माहिती आवडली असेल तर, सदरची माहिती तुमच्या मित्रांनाही शेअर करा.
आपले महसूल कायद्याविषयक प्रश्न विचारण्यासाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या. आणि आमच्या टेलिग्राम चॅनेललाही आजच जॉईन व्हा. Website Link Telegram Channel Link धन्यवाद !