* टक्कल पडणे
* ज्या वयात
केस पुन्हा उगवू शकतात (अंदाजे 30 ते 35 वर्षे वय) अशा वयात
केस गळणे किंवा टक्कल पडणे अशी समस्या असल्यास, 200 ग्रॅम नारळाचे
तेल, 100 ग्रॅम मधमाशीचा छत्ता (Bees Hive), 200 ग्रॅम उंबराच्या (औदुंबर) पानांचा रस, एकत्र करून
हे मिश्रण एका भांड्यात, रंग काळा होईपर्यंत उकळावे. तयार झालेले हे मिश्रण एक महिना रोज डोक्याला लावावे.
* मेथीच्या दाण्याची पावडर किंवा मेथीची पाने वाटून पाण्यात कालवून ती पेस्ट
डोक्याला लावावी, 45 मिनिटानंतर धुवावी.
* लिंबू पिळून घेऊन त्याची साल टक्कल पडलेल्या जागी/डोक्याला
घासावी नंतर त्या ठिकाणी बोराच्या झाडाची पाने वाटून लावावीत. पाच-सहा महिन्यात फरक पडतो.
* वडाच्या झाडाच्या कोवळ्या पारंब्या आणून त्या वाटून घेऊन तेलात उकळाव्या.
हे तेल थंड झाल्यावर डोक्याला लावावे.
* टोमॅटो, गाजर, बीट यांचा रस समप्रमाणात
एकत्र करून सेवन करावा.
* दोन चमचे त्रिफळा पावडर रात्री अर्धा लीटर पाण्यात भिजवावी, सकाळी ते पाणी पिऊन खाली उरलेल्या त्रिफळात गरजेपुरते दही व मुलतानी माती कालवून
केसांना लावावे, अर्ध्या तासाने डोके धुवावे.
* वडाच्या झाडाची पिकलेली पाने जाळून ती राख तेलात खलून/ दुधाच्या सायीत मिसळुन डोक्याला/ टक्कल पडलेल्या ठिकाणी
लावावी. टक्कल दूर होते.
* कडुलिंब पानांचे चूर्ण व बोराच्या झाडाच्या (Jujube fruit) पानांचे चूर्ण समभाग पाण्यात
कालवून दररोज दोनदा एक महिना डोक्याला लावून एक तास ठेवावे. एक महिन्यात
टक्कल कमी होते.
* केस गळणे
* केस धुतल्यानंतर
ते सुकवण्यासाठी शक्यतो ‘हेअर ड्रायर’ चा
वापर करू नये.
* डोक्यात
चट्टे पडले असतील व त्यामुळे केस गळत असतील तर, काळीमिरी पावडर,
कांदा रस
व सैंधव मीठ एकत्र करून त्याचा लेप या चट्ट्यांवर
करावा.
* शक्य असेल तेव्हा नारळाचे तेल डोक्याला लावून
मसाज करावा.
* काळीमिरी
चूर्ण, मोहरीच्या तेलात कालवुन, केस गळलेल्या
ठिकाणी लावावे.
* कोथिंबीरचा
रस केसांना दोन तास लावुन ठेवावा नंतर धुवावे. केस गळणे थांबुन
ते लांब होतात.
* डोक्याचे
केस गळणे, भुवईचे केस विरळ होणे, स्त्रियांच्या
भुवईचे केस कधी कधी जास्त कापले जातात ते लवकर वाढत नाहीत या सर्व समस्यांसाठी एरंडेल
तेल (Caster Oil) डोक्याला, भुवईच्या
विरळ केसांना लावून अर्धातास ठेवावे. एरंडेल तेलामध्ये ओलावा
(Moisture) खेचून घेण्याची क्षमता
असते. ह्यामुळे केस लांब, काळे व दाट होतात,
रूक्षता जाऊन चमक येते. एरंडेल तेलामध्ये Anti fungal, Anti Bacterial गुणधर्म आहे. त्यामुळे
ते कोंडा नाशक, डोक्यात फोड आले असता त्यांना बरे करणारे,
व इतर संसर्ग (Infection) कमी करणारे आहे.
* सीताफळ
मिळत असेल तेव्हा त्याचा आहारात भरपूर वापर करावा. यात जीवनसत्त्व
‘अ’,‘क’, असल्याने केस निरोगी
राहून त्यांचे आरोग्य राखले जाते.
* अर्धा कप
‘ऑलिव्ह ऑईल’ घेऊन त्याला थोडे तापवावे.
या तेलाने केसांना मसाज करावी. तेल मुरण्यासाठी
अर्धा तास केस कापडाने बांधून /झाकून ठेवावे. नंतर धुवावेत. ह्यामुळे केसांतील रुक्षता, खाज कमी
होते. हे तेल एक तासापेक्षा जास्त वेळ डोक्याला लावून ठेवू नये.
* गाजराचा
लगदा करून केसांना लावल्यास केस गळणे बंद होते.
* आवळा चूर्ण
लिंबाच्या रसात कालवून ती पेस्ट केसांना लावावी.
* रात्री,
जरूर तेवढे आवळा चूर्ण, लोखंडाच्या कढईत, पाण्यात भिजवुन ठेवावे. सकाळी केसांवर त्याचा लेप करावा
व एक तासाने धुवावे.
* अर्धा ग्लास
सिरका (Vinegar) पाण्यात घालून त्याने केस
धुवावे. केस गळणे थांबून केसांना चमक येते.
* दोन वाटी
खोबरेल तेलात, तांबड्या जास्वंदाची मोठी चार फुले, चार-पाच मोसंबीच्या साली, मक्याचा
पाला एकत्र उकळवून घ्यावा. थंड झाल्यावर रोज केसांना लावावे.
* आवळा पावडर,
शिकेकाई पावडर, रिठा पावडर सम प्रमाणात घेऊन रात्री
भिजत ठेवावे. हे मिश्रण सकाळी अर्धातास केसांना लाऊन ठेवावे.
नंतर केस धुवावे.
* तेलकट केस
* आठवड्यात
तीन दिवस मुलतानी माती केसांना लावुन अर्धातास ठेवावी, नंतर आंघोळीच्या पाण्यात अर्धा लिंबु पिळुन या पाण्याने
केस धुवावे. केसांचा तेलकटपणा दुर होतो.
* रूक्ष केस
* आठवड्यात
तीन दिवस वीस ग्रॅम दुधाची साय व दहा ग्रॅम मध एकत्र करून केसांना लावुन अर्धातास ठेवावे,
नंतर पाण्याने केस धुवावे. केसांचा रूक्षपणा दुर
होतो.
* दह्याने
केस धुतल्यास केस चमकदार होऊन केसांचा रूक्षपणा दुर होतो.
* चाई
* अचानक केस
नाहीसे होऊन त्याठिकाणी चट्टा पडणे याला चाई म्हणतात. सीताफळाच्या
पानांचा रस त्याजागी लावल्याने हा रोग दूर होतो.
* डोक्यात
खवले, पुरळ झाले असल्यास, पारिजातकाची
(प्राजक्त) पाने वाटुन तो लगदा डोक्याला लावावा.
* केस पांढरे होणे
* सुकलेला
खोबरा चावून चावून तोंडातील लगदा केसांना लावावा.
* नारळाच्या
दुधाने केसांना मसाज करावा. केस काळे, Silky होतात, कोंडा दूर
होतो व त्यांची वाढ चांगली होते.
* केसांत कोंडा होणे
* गवती चहा
पाण्यात उकळून ते पाणी केसांना लावून नंतर केस धुवावे.
* मोहरीचे
शंभर ग्रॅम तेल (Musturd Oil), दहा ग्रॅम
कापूर एकत्र कालवून रोज रात्री डोक्याला लावावे.
* पेरू व
सीताफळाच्या पानांचा रस सम प्रमाणात घेऊन त्यांत तितकाच लिंबाचा रस मिसळून हे मिश्रण
केसांना लावून दोन तास ठेवावे. या मिश्रणाने केसातील कोंडा दूर
होतो.
* कापूर पूड,
हळदपुड व शिकेकाई चूर्ण समप्रमाणात घेऊन, लिंबू
रस व नारळाचे तेल यांत कालवून डोक्याला लावून अर्धा तास ठेवावे. या मिश्रणाने केसातील कोंडा दूर होतो.
* सीताफळाच्या
पानाचा लगदा केसांना लावावा.
* नारळाच्या तेलात एक लिंबु पिळुन ते मिश्रण रात्री केसांना लावावे. सकाळी मुलतानी मातीने केस धुवावे.
* केसांत उवा होणे
* पेरू व
सीताफळाच्या पानांचा रस सम प्रमाणात घेऊन त्यांत तितकाच लिंबाचा रस मिसळून हे मिश्रण
केसांना लावून दोन तास ठेवावे. या मिश्रणाने केसातील उवा व लिखा
मरतात.
* कापूर पूड,
हळदपुड व शिकेकाई चूर्ण समप्रमाणात घेऊन, लिंबू
रसात कालवून डोक्याला लावून अर्धा तास ठेवावे. या मिश्रणाने उवा
व लिखा मरतात.
(हळद पावडरवर थोडे हायड्रोक्लोरीक ऍसिड
टाकावे, हळदीस वांग्याचा रंग येतो, नंतर
थोडे पाणी टाकावे, रंग बदलला नाही तर हळद भेसळयुक्त आहे असे समजावे.)
* कांद्याचा
रस केसांना लावल्याने उवा व लिखा मरतात.
* दहा ग्रॅम
ओवा चूर्ण, पाच ग्रॅम तुरटी, दही किंवा
ताकात मिसळून केसांना लावावी. उवा व लिखा मरतात.
* 10-12 सीताफळ
बी, 6-7 काळीमिरी यांची पावडर करून मोहरीच्या (सरसो) तेलामध्ये उकळून कोमट झाल्यावर केसांना लावून
रात्रभर ठेवावे. उवा नष्ट होतात.
* कडुलिंबाचा
रस/तेल रात्री डोक्याला लावावा.
* आठवड्यात
दोनदा, दह्याने केस धुवावे.
Rate This Article
या लेखात, आम्ही आपणाला केश विकार :. याबाबत माहिती दिली आहे आम्हाला आशा आहे की, तुम्हाला ती आवडली असेल. माहिती आवडली असेल तर, सदरची माहिती तुमच्या मित्रांनाही शेअर करा.
आपले महसूल कायद्याविषयक प्रश्न विचारण्यासाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या. आणि आमच्या टेलिग्राम चॅनेललाही आजच जॉईन व्हा. Website Link Telegram Channel Link धन्यवाद !