महाराष्ट्र
शेतजमीन (ज.धा.क.म.) अधिनियम १९६१ अन्वये शेतजमीनीची कमाल धारणा मर्यादा
महाराष्ट्र
जमीन (धारणेची कमाल मर्यादा) अधिनियम १९६१,
कलम ५ अन्वये शेतजमिनीची कमाल धारणा मर्यादा खालील
प्रमाणे आहे.
(अ) जलसिंचनासाठी खात्रीचा पाणीपुरवठा
असलेली आणि वर्षात निदान दोन पिके देण्याची क्षमता असलेली जमीन- ६ हेक्टर २८.४३ आर (१८ एकर)
(ब) जलसिंचनासाठी खात्रीचा बारमाही पाणी
पुरवठा नसलेली परंतु वर्षातून एका पिकासाठीच खात्रीचा पाणी पुरवठा असलेली जमीन- १० हेक्टर ९२.६५ आर (२७
एकर)
(क) राज्यशासनाने किंवा कोणत्याही जिल्हापरिषदने बाधंलेल्या
कोणत्याही नैसर्गिक साधनापासुन
हंगामात पाटाने पाणी मिळणारी जमीन- १४ हेक्टर
५६.८६ आर (३६
एकर)
(ड) कोरडवाहू पिकाची जमीन म्हणजेच वरिल
(अ),
(ब),
किंवा
(क)
खाली येणार्या जमिनीं
व्यतिरिक्त मुंबई उपनगर व ठाणे, कुलाबा,
रत्नागिरी, आणि भंडारा हे जिल्हे आणि चंद्रपूर जिल्हयाचे ब्रम्हपूरी, गडचिरोली आणि सिरोंचा या तालुक्यात असलेली जमीन आणि दिनांक २६.१.१९६२ या दिनांकाच्या निकटपूर्वी
तीन वर्षाच्या अखंड कालावधीसाठी भाताच्या लागवडीखाली असलेली जमीन- १६
हेक्टर ५६.८६ आर (३६ एकर)
(इ) कोरडवाहू जमीन म्हणजेच उपरोक्त अ), (ब), (क) किंवा
(ड) खाली येणार्या जमिनीं
व्यतिरिक्त इतर जमीन- २१ हेक्टर ८५.२९ आर (५४
एकर)
u उपरोक्त माहिती १ हेक्टर म्हणजे
२.४७ एकर म्हणजेच ९८.८४ गुंठे म्हणजेच ११.८६ बिघा या सुत्रानूसार देण्यात आली आहे.
b b b
Rate This Article
या लेखात, आम्ही आपणाला महाराष्ट्र शेतजमीन (ज.धा.क.म.) अधिनियम १९६१ अन्वये शेतजमीनीची कमाल धारणा मर्यादा. याबाबत माहिती दिली आहे आम्हाला आशा आहे की, तुम्हाला ती आवडली असेल. माहिती आवडली असेल तर, सदरची माहिती तुमच्या मित्रांनाही शेअर करा.
आपले महसूल कायद्याविषयक प्रश्न विचारण्यासाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या. आणि आमच्या टेलिग्राम चॅनेललाही आजच जॉईन व्हा. Website Link Telegram Channel Link धन्यवाद !