आभुषणांची ओळख परेड



आभुषणांची ओळख परेड


काहीवेळा पोलिसांकडून आभूषणांची ओळख परेड घेण्याची विनंती करण्यात येते.

ज्‍याप्रमाणे फौजदारी प्रक्रिया संहिता कलम २० अन्‍वये नियूक्‍त कार्यकारी दंडाधिकारी दर्जाच्‍या
अधिकार्‍याकडे ओळख परेड घेण्‍याचे काम सोपविलेले आहे, त्‍याचप्रमाणे एखाद्या गुन्‍ह्यात काही मौल्‍यवान वस्‍तू किंवा आभूषणे हस्‍तगत करण्‍यात आली असल्‍या त्‍यांचीही  ओळख परेड कार्यकारी दंडाधिकारी यांनी घेणे न्‍यायाच्‍या दृष्‍टीने आवश्‍यक असते.
सर्व साधारणपणे अशा वस्‍तू म्‍हणजे सोने किंवा चांदीची चे, बांगड्या, कर्णफुले, हार अशा प्रकारच्‍या असतात.

आभुषणांची ओळख परेड म्हणजे एखादा साक्षीदार, एखाद्‍या गुन्‍ह्‍यात हस्‍तगत करून जप्‍त केलेली आभूषणे त्‍याची आहेत असे सांगतो किंवा एखादा साक्षीदार अशा आभूषणांना ओळखतो असा दावा करतो तेव्‍हा त्‍याबाबत खात्री करण्‍यासाठी अशी ओळख परेड आयोजित करण्‍यात येते.

आभूषणांची ओळख परेड कशी घ्यावी या बाबत सर्वसाधारण सूचना खालील प्रमाणे:

u आभूषणांच्‍या ओळख परेडचा उद्‍देश: एखाद्या गुन्‍ह्यात हस्‍तगत करून जप्‍त करण्‍यात आलेल्‍या मौल्‍यवान वस्‍तु किंवा आभुषणे ज्‍यांच्‍या मालकीची आहेत किंवा ज्‍याच्‍या परिचयाच्‍या आहेत त्‍यांनी अशा वस्‍तू अचूकपणे आणि न्‍यायरितीने ओळखणे हा आहे.

· आभुषणांच्‍या ओळख परेडला जातांना कार्यकारी दंडाधिकारी, त्‍यांचा लेखनिक, पोलीसांशी संबंध नसलेले, दोन निष्पक्ष आणि प्रतिष्ठित पंच, कार्यकारी दंडाधिकारी यांच्‍या कार्यालयातील एक किंवा दोन शिपाई यांनी जावे. पंच पोलीसांशी संबंधित नाहीत याची कार्यकारी दंडाधिकारी यांनी खात्री करावी.  

· अशी ओळख परेड कार्यकारी दंडाधिकारी यांच्या कार्यालयात किंवा पोलीसांनी आयोजित केलेल्‍या अन्‍य ठिकाणी घेतली जाऊ शकते.

· ओळख परेड सुरू करून संपेपर्यंत कार्यकारी दंडाधिकारी यांनी अत्यंत निष्पक्ष असावे. कार्यकारी दंडाधिकार्‍याकडून कोणतीही कृती अशी घडू नये जी त्‍याच्‍या निष्पक्षपातीपणाबाबत संशय निर्माण करेल. 

· ओळख परेड घेतांना कार्यकारी दंडाधिकारी, दोन निष्पक्ष, प्रतिष्ठित पंच, कार्यकारी दंडाधिकार्‍याचा लेखनिक व आरोपींचा एक मित्र किंवा वकील (असल्यास) हजर असावेत. या ओळख परेडच्‍या वेळेस तपासी अंमलदाराला उपस्थित ठेवता येईल.

· ओळख परेड सुरू होण्‍याआधी पंचाना प्रकरणाची व घटनेची कल्‍पना द्‍यावी. ओळख परेड सुरू करून संपेपर्यंत दोन्ही पंच सतत कार्यकारी दंडाधिकार्‍याबरोबरच असावे व कार्यकारी दंडाधिकारी ज्या-ज्या कृती करीत आहात त्यांचे वर्णन पंचनाम्यात लिहिण्याची दक्षता घ्यावी.

· ओळख परेड सुरू होण्‍याआधी, पोलीसांनी हस्‍तगत करुन जप्‍त केलेल्‍या आभुषणांसारखी दिसणारी भुषणे एकतर सोनाराकडून किंवा बाजारात उपलब्‍ध असतील तर ती उपलब्‍ध करून घेण्‍यात यावी. एक प्रकारच्‍या मूभुषणासाठी किमान ६ (सहा) डमी आभूषणे उपलब्‍ध करुन घेण्‍यात यावी.

· पोलीसांनी हस्‍तगत करुन जप्‍त केलेल्‍या अशा वस्‍तुंचे वजन करुन त्‍याला सिलबंद पाकीटात ठेवलेले असते. याबाबत प्रथम खात्री करावी.

· ओळख परेड सुरू करण्याआधी कार्यकारी दंडाधिकार्‍याने साक्षीदारांना भेटावे. त्यांना स्वत:ची ओळख करून द्यावी व घटनेची सविस्तर माहिती विचारावी. 

· कोणत्‍याही परिस्थित ओळख परेडच्या आधी साक्षीदाराला हस्‍तगत करुन जप्‍त केलेली आभूषणे दाखविण्‍यात आली नाहीत याची कार्यकारी दंडाधिकार्‍याने खात्री करावी.

· ओळख परेड सुरू करण्याआधी उपस्‍थितांना कार्यकारी दंडाधिकार्‍याने स्‍वत:ची ओळख देऊन त्यांना ओळख परेड प्रकियेबद्दल थोडक्यात समजावून सांगावे.

· सर्वसाधारणत: हस्‍तगत करुन जप्‍त केलेली मूळ आभूषणे पोलीसांकडून प्‍लास्‍टीकच्‍या पिशवीत सिलबंद करुन, त्‍यावर गु. र. क्रमांक, गुन्‍ह्याचे कलम, वस्‍तुचे वजन इ. ची ओळख चिठ्ठी लावून ठेवलेली असतात.
डमी अभुषणे त्‍याचप्रमाणे तयार करुन घ्‍यावीत. जरुरतर सिलबंद केलेली मूळ भुषणे ओळख परेड
घेण्‍यार्‍या दंडाधिकार्‍यासमोर सिलबंद पाकिटातून बाहेर काढण्‍यात येऊ कतील.

· ओळख परेड सुरू करण्याआधी साक्षीदारांना स्वतंत्र खोलीत बसवावे. तसेच एका साक्षीदाराची साक्ष संपल्यानंतर तो पुन्हा त्या खोलीत येऊन इतर साक्षीदारांना भेटणार नाही याची सुध्दा दक्षता घ्यावी. त्या खोलीच्या बाहेर कार्यकारी दंडाधिकार्‍याचा शिपाई ठेवावा.

· एका टेबलवर मूआभूषणे आणि डमी आभूषणे एकत्र करुन एका ओळीत ठेवण्‍यात यावीत.

· ओळख परेड सुरू करतांना कार्यकारी दंडाधिकार्‍याने, त्‍याचा लेखनिक, दोन निष्पक्ष, प्रतिष्ठित पंच, आरोपींचा एक मित्र किंवा वकील (असल्यास), तपासी अंमलदार यांचे शिवाय इतर सर्वांना बाहेर जाण्यास सांगावे. दाराबाहेर कार्यकारी दंडाधिकार्‍याचा शिपाई ठेवावा.

· ओळख परेडच्या पंचनाम्यात सुरूवातीला खालील गोष्टींचा उल्लेख जरूर असावा:
. ओळख परेड घेणार्‍याचे नाव आणि पदनाम.
२. ओळख परेड घेतल्याचा दिनांक, वेळ आणि स्थळ.
. दोन्ही पंचांचे पूर्ण नाव, वय, व्यवसाय, पत्ता.

· यानंतर कार्यकारी दंडाधिकार्‍याच्‍या शिपायामार्फत किंवा पंचामार्फत एका साक्षीदाराला तेथे बोलवावे. त्या साक्षीदारास टेबलावर ठेवलेल्‍या आभूषणांमधून, त्‍याला माहित असलेले/ चोरीला गेलेले आभूषण, जवळ जाऊन हात लाऊन ओळखायला सांगावे. साक्षीदाराने मूळ आभूषण ओळखले किंवा नाही याचा स्‍पष्‍ट उल्‍लेख पंचनाम्‍यात करावा.   

· पुढील साक्षीदाराला बोलविण्‍यापूर्वी, जरूरतर मूळ आभूषणाची ओळीतील जागा बदलावी. साक्षीदार आल्‍यावर त्याला टेबलावर ठेवलेल्‍या आभूषणांमधून, त्‍याला माहित असलेले/ चोरीला गेलेले आभूषण, जवळ जाऊन हात लाऊन ओळखायला सांगावे. साक्षीदाराने मूळ आभूषण ओळखले किंवा नाही याचा स्‍पष्‍ट उल्‍लेख पंचनाम्‍यात करावा.

· ओळख परेडची सर्व प्रक्रिया पंचनाम्‍यात सविस्‍तरपणे नमूद करावी.    

· ओळख परेड प्रकिया पूर्ण झाल्यानंतर मूळ आणि डमी आभूषणे पोलीसांच्या ताब्यात द्यावी.

· पंचनाम्यावर शेवटी, उपरोक्त पंचनामा आम्हाला वाचून दाखवण्यात आला. तो ओळख परेडच्या वेळेस जशा घटना घडल्या त्याप्रमाणे आमच्या समक्ष अचूक लिहिला गेला आहे (संगणकावर टाईप केला गेला आहे.)असे लिहून दोन्ही पंच, आरोपींचा मित्र किंवा वकील (हजर असल्यास), तपासी अंमलदार यांची दिनांकीत स्वाक्षरी घ्यावी. कार्यकारी दंडाधिकार्‍याने स्वत:ची दिनांकीत स्वाक्षरी करून शिक्का उमटवावा.

· पंचनाम्यावर शेवटी लिहावे: उपरोक्त ओळख परेड, मी स्वत:, पंच, नामे १.------   .---- यांचे (आरोपींचा एक मित्र किंवा वकील हजर असल्यास त्‍याचा उल्‍लेख करावा), तपासी अंमलदार यांच्‍या समक्ष घेतलेली आहे, त्यांनी याबाबत वर स्वाक्षरी केली आहे.’ त्याखाली स्वत:ची दिनांकीत स्वाक्षरी करून शिक्का उमटवावा.

· पंचनाम्याच्या प्रत्येक पानावर कार्यकारी दंडाधिकारी यांनी स्वत:ची दिनांकीत स्वाक्षरी करून शिक्का उमटवावा तसेच दोन्ही पंच, आरोपींचा मित्र किंवा वकील (हजर असल्यास), तपासी अंमलदार यांनी दिनांकीत स्वाक्षरी करावी. पंचनाम्याची मूळ प्रत पोलीसांना द्यावी. एक प्रत कार्यकारी दंडाधिकारी यांच्‍या कार्यालयात ठेवावी.

· आभूषणांच्‍या ओळख परेडचा पंचनामा हा कधीही सायक्‍लोस्‍टाइल्‍ड आणि रिकाम्‍या जागा भरून केलेला नसावा. असा पंचनामा न्‍यायालयात ग्राह्‍य धरला जात नाही.  

b|b

Comments

Mahsul Guru

Subscribe YouTube Channel