आपले महसूल कायद्याविषयक प्रश्न आमच्या वेबसाईटवर विचारावेत. 📌 Mahsul Guru 📌 YouTube Channel Link!

विभागीय चौकशी.(विभागीय चौकशीचे उगमस्थान)

Sanjay Kundetkar,संजय कुंडेटकर,MahsulGuru,Vibhagiy Chaukashi,महसूल गुरु,sanjay kundetkar,kundetkar book,Satbara,Ferfar,mahsul,DE,विभागीय चौकशी,
Please wait 0 seconds...
Scroll Down and click on Go to Link for destination
Congrats! Link is Generated
विभागीय चौकशी विभागीय चौकशीचे उगमस्थान
  • १. तक्रार अर्ज, प्राथमिक चौकशीमध्ये तक्रारीत तथ्‍य आढळणे.
  • २. सचोटीने न वागणे- म.ना.से. (वर्तणूक) नियम ३ (१) (एक) चा भंग
  • ३. कर्तव्यपरायणता न राखणे -म.ना.से. (वर्तणूक) नियम ३ (१) (दोन) चा भंग

टिप: विहित वेळेत कार्यालयात अनुपस्‍थित राहणे, कार्यालयात उशीरा येणे, विना परवानगी अनुपस्‍थित राहणे हा म.ना.से. (वर्तणूक) नियम ३ (१) (दोन) चा भंग आहे.

  • ४. अशोभनीय वर्तन - म.ना.से. (वर्तणूक) नियम ३ (१) (तीन) चा भंग
  • ५. प्रदान अधिकारांचा गैरवापर करणे - म.ना.से. (वर्तणूक) नियम ३ (३) (एक) चा भंग
  • ६. वरिष्‍ठांचे लेखी आदेश न पाळणे - म.ना.से. (वर्तणूक) नियम ३ (३) (दोन) चा भंग

टिप:म.ना.से. (वर्तणूक) (सुधारणा) नियम ३ (१), दिनांक २४ फेब्रुवारी २०१४ आणि महाराष्ट्र शासन राजपत्र, दिनांक ६ मार्च २०१४ अन्वये, कार्यालयीन वरिष्ठांचे निर्देश सामान्यतः लिखित स्वरूपात असावे. मौखिक निर्देश देण्याचे शक्य असेल तेथवर टाळले जाईल मौखिक निर्देश देणे अपरिहार्य असेल तेव्हा कार्यालयीन वरिष्ठ त्यास त्यानंतर तात्काळ लिखित पुष्टी देईल. शासकीय कर्मचारी त्याला त्याच्या कार्यालयीन वरिष्ठांकडून मौखिक निर्देश मिळाल्यानंतर शक्य तेवढ्या लवकर त्यास लेखी पुष्टी मिळवेल आणि अशा प्रकरणी निर्देशाची लेखी पुष्टी देणे हे कार्यालयीन वरिष्ठांचे कर्तव्य असेल अशी तरतुद करण्‍यात आली आहे.

  • ७. स्‍वत:ला, कुटुंबाला किंवा मित्रांना आर्थिक व भौतिक लाभ मिळविण्‍याचा प्रयत्‍न करणे - म.ना.से. (वर्तणूक) नियम ३ (३) (चौदा) चा भंग
  • ८. जवळच्या नातेवाईकांची कंपन्यांमध्ये किंवा भागीदारी संस्थांमध्ये नियुक्ती करणे -म.ना.से. (वर्तणूक) नियम ४ चा भंग
  • ९. राजकारण आणि निवडणुका या मध्ये भाग घेणे - म.ना.से. (वर्तणूक) नियम ५ चा भंग
  • १०. निदर्शने करणे, संपात सहभागी होणे - म.ना.से. (वर्तणूक) नियम ६ चा भंग
  • ११. भारताच्या सार्वभौमत्वाला आणि एकात्मतेला बाधक असणार्‍याया संघटनेत सहभागी होणे -म.ना.से. (वर्तणूक) नियम ७ चा भंग
  • १२. अनधिकृतपणे कार्यालयीन माहिती/दस्तऐवज पुरविणे - म.ना.से. (वर्तणूक) नियम ८ चा भंग
  • १३. स्‍वत:च्‍या पूर्णत: किंवा अंशत: मालकी असणारे वृत्तपत्र/नियतकालिक प्रकाशीत करणे तसेच वृत्तपत्रे, आकाशवाणी, दूरदर्शन यांना शासनाच्‍या धोरणाविरूध्‍द लेख /मुलाखत देणे - म.ना.से. (वर्तणूक) नियम ९ चा भंग
  • १४. शासनाच्‍या मान्‍यतेशिवाय समिती/प्राधिकरणासमोर साक्ष देणे - म.ना.से. (वर्तणूक) नियम १० चा भंग
  • १५. शासनाच्‍या मान्‍यतेशिवाय अंशदान/वर्गणी गोळा करणे - म.ना.से. (वर्तणूक) नियम ११ चा भंग
  • १६. देणग्या (भेटवस्तू) स्वीकारणे - म.ना.से. (वर्तणूक) नियम १२ चा भंग
  • १७. शासकीय कर्मचार्‍याच्या सन्मानार्थ सार्वजनिक समारंभात सहभागी होणे, अशा समारंभासाठी वर्गणी गोळा करणे - म.ना.से. (वर्तणूक) नियम १३ चा भंग
  • १८. दुसर्‍या व्यक्तीच्या हिताकरिता एखाद्या शासकीय व्यक्तीवर राजीनाम्याकरिता दबाव आणणे - म.ना.से. (वर्तणूक) नियम १५ चा भंग
  • १९. शासनाच्या पूर्वपरवानगी शिवाय खाजगी व्यापार किंवा दुसरी कोणतीही नोकरी स्वीकारणे - म.ना.से. (वर्तणूक) नियम १६ चा भंग
  • २०. शेअर्स, कर्जरोखे किंवा इतर गुंतवणूक यांची वारंवार खरेदी विक्री करणे, उसने पैसे देणे आणि उसने पैसे घेणे - म.ना.से. (वर्तणूक) नियम १७ चा भंग
  • २१. नादार आणि कर्जबाजारी होणे - म.ना.से. (वर्तणूक) नियम १८ चा भंग
  • २२. स्थावर, जंगम व मौल्यवान मालमत्ता संदर्भात मत्ता व दायित्व विवरणपत्र सादर न करणे - म.ना.से. (वर्तणूक) नियम १९ चा भंग
  • २३. परवानगी न घेता स्वतः च्या नावाने किंवा कुटुंबीयांच्या नावाने मालमत्ता खरेदी करणे किंवा ,,वात बोली बोलणे - म.ना.से. (वर्तणूक) नियम २० चा भंग
  • २४. परवानगी शिवाय लवाद म्‍हणून काम कररे - म.ना.से. (वर्तणूक) नियम २१ चा भंग
  • २५. शासकीय कर्मचार्‍यायाच्या कृतीचे आणि चारित्र्याचे प्रतीसमर्पण करणे - म.ना.से. (वर्तणूक) नियम २२ चा भंग
  • २६. महिलांच्‍या लैंगिक छळवादाचे कृत्य करणे - म.ना.से. (वर्तणूक) नियम २२-अ चा भंग
  • २७. अशासकीय व्यक्तीकडून शासकीय सेवेसंबंधीच्या बाबीच्या संदर्भात वरिष्ठ प्राधिकरणावर दबाव आणणे - म.ना.से. (वर्तणूक) नियम २३ चा भंग
  • २८. विभिन्न जमातीमध्ये द्वेष भावना निर्माण होईल अशी कृती करणे - म.ना.से. (वर्तणूक) नियम २४ चा भंग
  • २९. शासनाच्या पुर्वामान्यतेशिवाय स्वतः चे नाव सार्वजनिक संस्थेला, रस्त्याला किंवा इतर गोष्टीला जोडणे - म.ना.से. (वर्तणूक) नियम २५ चा भंग
  • ३०. जीवन साथी हयात असतांना विवाह करार करणे - म.ना.से. (वर्तणूक) नियम २६ चा भंग
  • ३१. हुंडा घेणे किंवा हुंडा घेण्यास चिथावणी देणे - म.ना.से. (वर्तणूक) नियम २७ चा भंग
  • ३२. बाल कामगारास नोकरीवर ठेवणे - म.ना.से. (वर्तणूक) नियम २७-अ चा भंग
  • ३३. मादक पेयाचे अथवा मादक औषधीद्रव्याचे सेवन करणे - म.ना.से. (वर्तणूक) नियम २८ चा भंग
  • ३४. अपहार करणे, गैरव्यवहार करणे,
  • ३५. शासकीय मालमत्तेचे नुकसान करणे इत्यादी

डॉ. संजय कुंडेटकर
बी.ए., एन.डी., डी.मॅग., एम.बी.ए.,
एम.डी., पीएच.डी.
उपजिल्हाधिकारी,
महाराष्ट्र शासन, (महसूल विभाग)

Rate This Article

या लेखात, आम्ही आपणाला विभागीय चौकशी.(विभागीय चौकशीचे उगमस्थान). याबाबत माहिती दिली आहे आम्हाला आशा आहे की, तुम्हाला ती आवडली असेल. माहिती आवडली असेल तर, सदरची माहिती तुमच्या मित्रांनाही शेअर करा.

आपले महसूल कायद्याविषयक प्रश्न विचारण्यासाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या. आणि आमच्या टेलिग्राम चॅनेललाही आजच जॉईन व्हा. Website Link Telegram Channel Link धन्यवाद !

Getting Info...

About the Author

Hi, I am Mahsul Guru, a content writer. I’ve always been passionate about writing and blogging. I hope you enjoy my blog posts as much as I enjoy writing it!

Post a Comment

Cookie Consent
We serve cookies on this site to analyze traffic, remember your preferences, and optimize your experience.
Oops!
It seems there is something wrong with your internet connection. Please connect to the internet and start browsing again.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.