आपले महसूल कायद्याविषयक प्रश्न आमच्या वेबसाईटवर विचारावेत. 📌Mahsul Guru📌

पंचनामा बाबत कायदेशीर तरतुद कोणती ?

पंचनामा बाबत कायदेशीर तरतुद कोणती ?

उत्तर: 'पंचनामा' या शब्‍दाचा अर्थ कायद्‍यात कोठेही नमूद नाही. तथापि, 'पंचनामा' या शब्‍दाला कायद्‍यात फार महत्‍व दिले जाते. बहुतांष सर्वच न्‍यायालये 'पंचनामा' वर अवलंबून असतात व त्‍या आधारे निकाल देतात. फौजदारी न्‍यायालयांत 'पंचनामा' चा उपयोग स्वतंत्र पुराव्‍याला आधार म्‍हणून तर दिवाणी न्‍यायालयांत 'पंचनामा' चा उपयोग आदेशाच्‍या अंमलबजावणीचा पुरावा म्‍हणून केला जातो.

'पंचनामा' हा शब्‍द 'पंच' आणि 'नामा' या दोन शब्‍दांनी तयार झाला आहे. संस्‍कृत भाषेत 'पंच' म्‍हणजे प्रतिष्‍ठीत व्‍यक्‍ती असा आहे. 'नामा' म्‍हणजे लिखित दस्‍त. थोडक्‍यात प्रतिष्‍ठीत व्‍यक्‍तींच्‍या समक्ष घटनेबाबत केलेला लिखित दस्‍त म्‍हणजे 'पंचनामा'. घडलेल्‍या घटनेचे 'घटना चित्र' म्‍हणजे 'पंचनामा'.

'पंचनामा' या शब्‍दाचा अर्थ कायद्‍यात नमुद नसला अणि 'पंचनामा' कसा करावा हे कायद्‍यात स्‍पष्‍ट नमूद नसले तरी फौजदारी प्रक्रिया संहिता, १९७३ च्‍या कलम १००, उपकलम (४) आणि (५) चे वाचन केल्‍यास पंचनाम्‍याबाबत मार्गदर्शन मिळू शकते.


डॉ. संजय कुंडेटकर
बी.ए., एन.डी., डी.मॅग., एम.बी.ए.,
एम.डी., पीएच.डी.
उपजिल्हाधिकारी,
महाराष्ट्र शासन, (महसूल विभाग)

Comments

Archive

Contact Form

Send

Mahsul Guru

Subscribe YouTube Channel