उत्तर: शासन परिपत्रक, सामान्य प्रशासन विभाग, दि.११ सप्टेंबर २०१४ मधील अनुक्रमांक १ व २ अन्वये, प्रथम’ नियुक्तीच्या पदावर ३ वर्षाची नियमित सेवा पूर्ण करणार्या गट अ व ब (राजपत्रित) अधिकार्याच्या बाबतीत संबंधीत नियुक्ती प्राधिकार्याने आणि गट ब (अराजपत्रित) तसेच गट क व गट ड कर्मचार्यांच्या बाबतीत संबंधीत कार्यालय प्रमुखाने स्थायित्व प्रमाणपत्र देणे आवश्यक आहे.
स्थायित्व प्रमाणपत्रासाठी
- कर्मचार्याची नियुक्ती सेवाप्रवेश नियमानुसार व विहित पद्धतीने होणे.
- कर्मचारी सेवेस पात्र असल्याबाबतचे वैद्यकीय प्रमाणपत्र असणे.
- कर्मचार्याने सेवाप्रवेशोत्तर प्रशिक्षण परीक्षा उत्तीर्ण होणे.
- कर्मचार्याचा सेवाभिलेख (उदा. गोपनीय अहवाल, उपस्थिती, सचोटी इ.) चांगला असणे आवश्यक आहे.
स्थायित्व प्रमाणपत्राची नोंद सेवापुस्तकात घेण्याची दक्षता संबंधीत कार्यालय प्रमुखांनी घ्यावी.
डॉ. संजय कुंडेटकर
बी.ए., एन.डी., डी.मॅग., एम.बी.ए.,
एम.डी., पीएच.डी.
उपजिल्हाधिकारी,
महाराष्ट्र शासन, (महसूल विभाग)
Rate This Article
या लेखात, आम्ही आपणाला स्थायित्व प्रमाणपत्र म्हणजे काय ?. याबाबत माहिती दिली आहे आम्हाला आशा आहे की, तुम्हाला ती आवडली असेल. माहिती आवडली असेल तर, सदरची माहिती तुमच्या मित्रांनाही शेअर करा.
आपले महसूल कायद्याविषयक प्रश्न विचारण्यासाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या. आणि आमच्या टेलिग्राम चॅनेललाही आजच जॉईन व्हा. Website Link Telegram Channel Link धन्यवाद !