उत्तर: हिंदू उत्तराधिकार अधिनियम१९५६, कलम १५ अन्वये विनामृत्यूपत्र मयत झालेली हिंदू स्त्री खातेदाराची संपत्ती पुढील प्रमाणे वारसाहक्काने जाईल.
- अ) पहिल्यांदा, मुलगे व मुली (कोणताही मयत मुलगा किंवा मुलगी यांची अपत्ये धरून) आणि पती यांच्याकडे
- आ) दुसर्यांदा, पतीच्या वारसाकडे
- इ) तिसर्यांदा, तिच्या माता आणि पिता यांच्याकडे
- ई) चवथ्यांदा, पित्याच्या वारसाकडे आणि
- उ) शेवटी, मातेच्या वारसांकडे प्रक्रांत होईल.
तथापि, हिंदू स्त्री जर विनामृत्यूपत्र मरण पावली तर तिला तिच्या पित्याकडून किंवा मातेकडून वारसा हक्काने मिळालेली कोणतीही संपत्ती त्या मृत स्त्रिचा कोणताही मुलगा किंवा मुलगी (कोणत्याही मयत मुलाची किंवा मुलीची अपत्ये धरून) यांच्याकडे जाईल. असे वारस नसल्यास अशी संपत्ती मृत स्त्रिच्या पित्याच्या वारसाकडे प्रक्रांत होईल आणि हिंदू स्त्रिला तिच्या पतीकडून किंवा तिच्या सासर्याकडून वारसा हक्काने मिळालेली कोणतीही संपत्ती, त्या मृत स्त्रिचा कोणताही मुलगा किंवा मुलगी (कोणत्याही मयत मुलाची किंवा मुलीची अपत्ये धरून) यांच्याकडे जाईल.
असे वारस नसल्यास, मृत स्त्रिच्या पतीच्या वारसाकडे प्रक्रांत होईल.
डॉ. संजय कुंडेटकर
बी.ए., एन.डी., डी.मॅग., एम.बी.ए.,
एम.डी., पीएच.डी.
उपजिल्हाधिकारी,
महाराष्ट्र शासन, (महसूल विभाग)
Rate This Article
या लेखात, आम्ही आपणाला विनामृत्युपत्र मयत हिंदू स्त्रिची मालमत्ता कशी प्रक्रांत होईल ?. याबाबत माहिती दिली आहे आम्हाला आशा आहे की, तुम्हाला ती आवडली असेल. माहिती आवडली असेल तर, सदरची माहिती तुमच्या मित्रांनाही शेअर करा.
आपले महसूल कायद्याविषयक प्रश्न विचारण्यासाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या. आणि आमच्या टेलिग्राम चॅनेललाही आजच जॉईन व्हा. Website Link Telegram Channel Link धन्यवाद !