उत्तर: महाराष्ट्र जमीन महसुलाच्या वसुलीबाबत नियम, १९६७, नियम २ अन्वये, जिच्या बाबतीत महसूल देय असेल अशी जमीन, ज्या गावात असेल त्या गावाच्या तलाठ्याकडे जमीन महसुलाच्या सर्व रकमा प्रदान करण्यात येतील. परंतु जिल्हाधिकार्यांच्या मंजुरीने, विशेष प्रकरणांत अशी प्रदानाची रक्कम ती ज्या जिल्ह्याशी संबंधित असेल त्या जिल्ह्यामधील शासकीय कोषागारात भरता येईल.
आणखी असे की, जिल्हाधिकार्यांनी त्या बाबतीत विनिर्दिेष्ट केले असेल अशा गावांच्या बाबतीत जमीन महसुलाच्या प्रदानासाठी केंद्र म्हणून तालुक्यातील कोणतेही गाव घोषित केले असेल अशा बाबतीत, अशा प्रकारे विनिर्दिष्ट केलेल्या गावांमध्ये, त्या गावांच्या तलाठ्यांना देय असलेल्या जमीन महसुलाच्या प्रदानाची रक्कम, अशा घोषित केलेल्या केंद्राच्या ठिकाणी भरण्यात येईल.
डॉ. संजय कुंडेटकर
बी.ए., एन.डी., डी.मॅग., एम.बी.ए.,
एम.डी., पीएच.डी.
उपजिल्हाधिकारी,
महाराष्ट्र शासन, (महसूल विभाग)
Rate This Article
या लेखात, आम्ही आपणाला जमीन महसूल कोठे व कोणाला द्यावा याबाबत काय तरतुद आहे ?. याबाबत माहिती दिली आहे आम्हाला आशा आहे की, तुम्हाला ती आवडली असेल. माहिती आवडली असेल तर, सदरची माहिती तुमच्या मित्रांनाही शेअर करा.
आपले महसूल कायद्याविषयक प्रश्न विचारण्यासाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या. आणि आमच्या टेलिग्राम चॅनेललाही आजच जॉईन व्हा. Website Link Telegram Channel Link धन्यवाद !