उत्तर: होय. पतीचे निधन होताच त्याच्या पत्नीचा वारसा हक्क सुरू होतो. पतीच्या निधनानंतर त्याची विधवा पत्नी, हिंदू वारसा कायदा १९५६, कलम १४ अन्वये, मयत पतीच्या मिळकतीची पूर्ण मालक (Absolute Owner) ठरते. (सर्वोच्च न्यायालय- चेरोट्टे सुगाथन वि. चेरोट्टे भारेथी-ए.आय.आर. २००८-एससी १४६५) अशा हिंदू विधवेने पुनर्विवाह केल्यास तिचा हिंदू वारसा कायदा १९५६, कलम १४ अन्वये मिळालेला हक्क नष्ट होत नाही.
पती-पत्नीचा घटस्फोट झाल्यावर, घटस्फोटित पतीच्या हयातित जर अशा असतांना, घटस्फोटित पत्नीने दुसरे लग्न केले असेल तर तिला घटस्फोटित पतीच्या मृत्यू नंतर त्याच्या मिळकतीत हिस्सा मिळण्याचा अधिकार नाही.
डॉ. संजय कुंडेटकर
बी.ए., एन.डी., डी.मॅग., एम.बी.ए.,
एम.डी., पीएच.डी.
उपजिल्हाधिकारी,
महाराष्ट्र शासन, (महसूल विभाग)
Rate This Article
या लेखात, आम्ही आपणाला हिंदू विधवेने पुनर्विवाह केल्यास तिला मयत पतीच्या मिळकतीत हिस्सा मिळेल काय ?. याबाबत माहिती दिली आहे आम्हाला आशा आहे की, तुम्हाला ती आवडली असेल. माहिती आवडली असेल तर, सदरची माहिती तुमच्या मित्रांनाही शेअर करा.
आपले महसूल कायद्याविषयक प्रश्न विचारण्यासाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या. आणि आमच्या टेलिग्राम चॅनेललाही आजच जॉईन व्हा. Website Link Telegram Channel Link धन्यवाद !