उत्तर: ज्या गावांत CTS लागू होऊन 'प्रॉपर्टी कार्ड ' सुरु करण्यात आलेली आहेत अशा गावातील सात-बारा बंद करण्याचे शासनाचे आदेश आहेत. अशी दुहेरी व्यवस्था सुरु ठेवणे अडचणीचे तर असतेच पण त्यामुळे अशा जागांची खरेदी विक्री करताना काहीवेळा मालकी हक्कासंदर्भात जटिल स्वरूपाच्या गुंतागुंती देखील निर्माण निर्माण होण्याची शक्यता असते.
त्यासाठी तहसील कार्यालय व उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय यांनी संयुक्तपणे मेळ घेऊन प्रॉपर्टी कार्ड लागू झालेल्या मिळकतींची प्रत भूमी अभिलेख कार्यालयाकडून प्राप्त करून घ्यावी. त्यानंतर त्याबाबत एकच फेरफार नोंदवून संबंधित मिळकतींचे सात-बारा बंद करण्याची कार्यवाही करावी.
डॉ. संजय कुंडेटकर
बी.ए., एन.डी., डी.मॅग., एम.बी.ए.,
एम.डी., पीएच.डी.
उपजिल्हाधिकारी,
महाराष्ट्र शासन, (महसूल विभाग)
Rate This Article
या लेखात, आम्ही आपणाला ज्या गावांत CTS लागू होऊन 'प्रॉपर्टी कार्ड ' सुरु करण्यात आलेली आहेत अशा गावातील सात-बारा बंद करण्याची प्रक्रिया कशी असावी ?. याबाबत माहिती दिली आहे आम्हाला आशा आहे की, तुम्हाला ती आवडली असेल. माहिती आवडली असेल तर, सदरची माहिती तुमच्या मित्रांनाही शेअर करा.
आपले महसूल कायद्याविषयक प्रश्न विचारण्यासाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या. आणि आमच्या टेलिग्राम चॅनेललाही आजच जॉईन व्हा. Website Link Telegram Channel Link धन्यवाद !