निलंबन ही शिक्षा नसली तरी, महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम १९७९, नियम १७ अन्वये निलंबन अथवा मानीव निलंबन आदेशांविरूध्द कर्मचार्यास अपील करता येते. असे अपील त्याने त्याच्या नियुक्ती प्राधिकार्याकडे करावे लागते. अपीलीय प्राधिकरणांची माहिती नियम १८ मध्ये नमुद आहे.
निलंबनाचा आदेश प्राप्त झाल्यापासून ४५ दिवसांचे आत नियुक्ती प्राधिकार्याकडे अपील करणे आवश्यक असते. अपील करण्यास विलंब झाला असेल तर नियम १९ च्या तरतुदीनुसार विलंब क्षमापीत करण्याचे अधिकार नियुक्ती प्राधिकार्यास आहेत, मात्र त्यासाठी योग्य व समाधानकारक कारणे असले आवश्यक आहे.
अपीलीय अधिकारी यांचेकडून न्याय न मिळाल्यास निलंबन आदेशाविरुध्द न्यायालयात दाद मागता येते. आकसापोटी व सदहेतुने न केलेली निलंबनाची कारवाई विधीग्राहय ठरत नाही.
शासन स्तरावून निलंबन आदेश निर्गमित झाले असतील तर मा. राज्यपाल महोदय, महाराष्ट्र राज्य, राज भवन, मलबार हिल, मुंबई – ४०००३५ strong>यांचेकडे, शासन आदेश मिळाल्यापासून ४५ दिवसाचे आत अपिल करावे. मा. राज्यपाल महोदय अपिल अर्जावर योग्य तो निर्णय देण्यासाठी असंबधीत खात्याचे मंत्री महोदय यांची नेमणूक करतात आणि मंत्री महोदय मा. राज्यपाल यांचेवतीने सुनावणी घेतात. सुनावणीचे वेळी अपिलकर्ता व शासन प्रतिनिधी यांचे म्हणणे ऐकून योग्य तो निर्णय देतात.
डॉ. संजय कुंडेटकरबी.ए., एन.डी., डी.मॅग., एम.बी.ए.,
एम.डी., पीएच.डी.
उपजिल्हाधिकारी,
महाराष्ट्र शासन, (महसूल विभाग)
Rate This Article
या लेखात, आम्ही आपणाला निलंबन आदेशा विरूध्द अपील (विभागीय चौकशी). याबाबत माहिती दिली आहे आम्हाला आशा आहे की, तुम्हाला ती आवडली असेल. माहिती आवडली असेल तर, सदरची माहिती तुमच्या मित्रांनाही शेअर करा.
आपले महसूल कायद्याविषयक प्रश्न विचारण्यासाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या. आणि आमच्या टेलिग्राम चॅनेललाही आजच जॉईन व्हा. Website Link Telegram Channel Link धन्यवाद !