- शासकीय कर्मचारी ज्या सेवेत असेल ती सेवा किंवा तो धारण करीत असलेले पद, ज्या नियमान्वये किंवा आदेशान्वये विनियमित केले जात असेल, त्या नियमांनुसार व आदेशांनुसार किंवा त्याच्या नियुक्तीच्या शर्तीनुसार कोणतीही विभागीय परीक्षा किंवा हिंदी आणि मराठी भाषा परीक्षा उत्तीर्ण न झाल्याबद्दल वेतनवाढ रोखून ठेवणे.
- शासकीय कर्मचारी दक्षतारोध पार करण्यास अयोग्य असल्याच्या कारणास्तव दक्षताणोधावर त्याची वेतन वाढ थांबविणे.
- शासकीय कर्मचाऱ्यांच्या प्रकरणाचा विचार केल्यानंतर तो त्याच्या वर्तणुकीशी संबंधित नसणाऱ्या प्रशासकीय बाबींच्या आधारे ज्या सेवेत, श्रेणीत किंवा पदावर बढती मिळविण्यास पात्र ठरला असता त्या सेवेत, श्रेणीत किंवा पदावर कायम किंवा स्थानापन्न बढती न देणे.
- उच्च सेवेत, श्रेणीत किंवा पदावर स्थानापन्न या नात्याने काम करणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्याला तो अशा उच्च सेवेत, श्रेणीत किंवा पदावर काम करण्यास अयोग्य आहे या कारणावरून किंवा प्रशासकीय कारणावरून निम्न सेवेत किंवा निम्न पदावर पदावनत करणे.
- अन्य कोणत्याही सेवेत, श्रेणीत किंवा पदावर परिविक्षाधीन नियुक्त केलेल्या शासकीय कर्मचाऱ्याला त्याच्या नियुक्तीच्या अटीनुसार किंवा अशा परिविक्षेचे नियंत्रण करणारे नियम व आदेश यानुसार परिविक्षा काळामध्ये किंवा परिविक्षा काळाच्या अखेरीस त्याच्या कायम सेवेत, श्रेणीत किंवा पदावर पदावनत करणे.
- भारतातील कोणत्याही शासनाकडून किंवा त्यांच्या नियंत्रणाखालील कोणत्याही ही अधिकाऱ्याकडून प्राधिकरणाकडून ज्याच्या सेवा उसन्या घेण्यात आल्या होत्या, त्या शासनाकडे किंवा प्राधिकरणाकडे त्या शासकीय कर्मचाऱ्यांच्या सेवा सुपूर्त करून अन्य कर्मचाऱ्याच्या सेवा उपलब्ध करून घेणे.
- शासकीय कर्मचाऱ्यांच्या नियत सेवा कालावधी किंवा सेवानिवृत्ती यासंबंधीच्या तरतुदीनुसार त्याला सक्तीने सेवनिवृत्त करणे.
- (अ) परिविक्षाधीन नियुक्ती केलेल्या शासकीय कर्मचाऱ्याची सेवा, त्याच्या परिविक्षा काळामध्ये किंवा त्याच्या अखेरीस, त्याच्या नियुक्तीच्या अटीनुसार किंवा अशा परिविक्षेचे नियंत्रण करणारे नियम व आदेश यानुसार समाप्त करणे. किंवा
- (ब) अस्थाई शासकीय कर्मचाऱ्यांची सेवा, त्याच्या वर्तणुकीशी संबंधित नसलेल्या कारणावरून समाप्त करणे. किंवा
- (क) करारानुसार नियुक्त केलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांची सेवा, अश्या कराराच्या अटीनुसार समाप्त करणे.
- महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम १९७९ च्या नियम ८ अन्वये, मोठ्या शिक्षा करण्याची कार्यपध्दती नमूद आहे.
- महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम १९७९ च्या नियम १० अन्वये, किरकोळ शिक्षा देण्याबाबतची कार्यपध्दती नमूद आहे.
बी.ए., एन.डी., डी.मॅग., एम.बी.ए.,
एम.डी., पीएच.डी.
उपजिल्हाधिकारी,
महाराष्ट्र शासन, (महसूल विभाग)
Rate This Article
या लेखात, आम्ही आपणाला शिक्षा न ठरणार्या बाबी (विभागीय चौकशी). याबाबत माहिती दिली आहे आम्हाला आशा आहे की, तुम्हाला ती आवडली असेल. माहिती आवडली असेल तर, सदरची माहिती तुमच्या मित्रांनाही शेअर करा.
आपले महसूल कायद्याविषयक प्रश्न विचारण्यासाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या. आणि आमच्या टेलिग्राम चॅनेललाही आजच जॉईन व्हा. Website Link Telegram Channel Link धन्यवाद !