- महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६, कलम ३२७ अन्वये, नियमानुसार शुल्क अदा केल्यानंतर वाजवी वेळेत अभिलेखातील कागदपत्रे व नकाशे लोकांच्या तपासणीसाठी खुले असतात.
- महाराष्ट्र भूजल अधिनियम १९९३, कलम ३ अन्वये, कोणत्याही खाजगी व्यक्तीला सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या उद्भवापासून ५०० मीटर अंतरापर्यंत विहीर खोदता येत नाही. तथापि, विशिष्ट परिस्थिती तांत्रिक अधिकाऱ्यांचे मत घेऊन सक्षम अधिकारी याबाबत परवानगी देऊ शकतात.
- दिवाणी प्रक्रिया संहिता, आदेश ४१ नियम ३ अन्वये, मुदतीबाह्य अपिलासोबत उशीर माफीचा अर्ज सादर करणे आवश्यक आहे. अशा मुदतीबाह्य अपिला सोबत उशीर माफीचा अर्ज नसेल तर अपील स्वीकारता येणार नाही. उशीर माफीच्या अर्जामध्ये अपील दाखल करण्यास उशीर का झाला हे स्पष्टपणे विशद करणारे प्रतिज्ञापत्र सादर करणे ही आवश्यक आहे.
- भारतीय पुरावा कायदा, कलम ९१ व ९२ अन्वये, एखाद्या लेखी दस्तावर आपली सही फसवून घेतली गेली अशा तोंडी स्वरूपाच्या म्हणण्याला महत्त्व नाही.
- एखादा पक्षकार जर नोटीस बजावून सुद्धा सुनावणीसाठी हजर राहत नसेल तर त्याच्या अनुपस्थित सुनावणी घेऊन प्रकरणावर निर्णय घेता येतो किंवा प्रकरण काढून टाकता येता. परंतु अशा पक्षकाराने जर निर्णयाच्या दिनांकापासून तीस दिवसात त्याच्या अनुपस्थितीबाबत समाधानकारक कारण दिले तर त्याच्या अनुपस्थित पारित केलेला आदेश रद्द करून पुन्हा सुनावणी घेऊन नवीन आदेश पारित करता येतो.
- महसूल न्यायालयात एखादे वाद प्रकरण सुरू होताच मूळ तक्रारीच्या प्रती सर्व प्रतिवादींना देणे बंधनकारक आहे. महसूल अधिकाऱ्याने त्याबाबत स्पष्ट लेखी आदेश द्यावेत.
- महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६, कलम २२७, २२८ आणि २२९ अन्वये पुराव्याचे दस्तऐवज हजर करण्यासाठी समन्स काढून उपस्थित राहण्यास भाग पाडण्याची तरतूद आहे. असे समन्स काढण्याचे अधिकार अव्वल कारकून आणि त्यापेक्षा वरिष्ठ अधिकाऱ्यांना आहेत.
डॉ. संजय कुंडेटकर
बी.ए., एन.डी., डी.मॅग., एम.बी.ए.,
एम.डी., पीएच.डी.
उपजिल्हाधिकारी,
महाराष्ट्र शासन, (महसूल विभाग)
Rate This Article
या लेखात, आम्ही आपणाला महत्वाचे प्रश्न व त्यांची उत्तरे I Mahsul Guru. याबाबत माहिती दिली आहे आम्हाला आशा आहे की, तुम्हाला ती आवडली असेल. माहिती आवडली असेल तर, सदरची माहिती तुमच्या मित्रांनाही शेअर करा.
आपले महसूल कायद्याविषयक प्रश्न विचारण्यासाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या. आणि आमच्या टेलिग्राम चॅनेललाही आजच जॉईन व्हा. Website Link Telegram Channel Link धन्यवाद !