उत्तर: हिंदू विवाह कायदा १९५५, कलम ५ मध्ये विविहासाठी ज्या शर्ती आहेत त्यांन्वये विवाहाच्या प्रसंगी वर आणि वधू पैकी कोणीही मनोविकल, मानसिक रूग्ण, भ्रमिष्ट, अपस्माराचे झटके येणारा, वयाने अज्ञान, निषिध्द नातेसंबंधी नसावा.
कलम १७ व १८ अन्वये, विवाहाच्या प्रसंगी वराची पत्नी आणि वधुचा पती हयात (जीवंत) नसावा. भारतीय दंड संहिता १८६०, कलम ४९४ हा गुन्हा आहे. (कायदेशीर घटस्फोट झाला असेल तर अपवाद). बेकायदेशीरपणे लग्न झालेल्या दुसर्या पत्नीला नवर्याच्या मिळकतीत हक्क येत नाही. (ए.आय.आर. २००२, गोहत्ती ९६) दुसरे लग्न अवैध असल्यामुळे आणि दुसर्या पत्नीला नवर्याच्या मिळकतीत हक्क येत नसल्यामुळे तिचे नाव अधिकार अभिलेखात दाखल करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.
तथापि, हिंदू विवाह कायदा, कलम १६(३) अन्वये अनौरस संततीला वडिलांच्या स्वकष्टार्जित तसेच वंशपरंपरागत संपत्तीमध्ये वारसाहक्क आहे. (सर्वोच्च न्यायालय, रेवनसिदप्पा वि. मल्लिकार्जून-३१/३/२०११).
त्यामुळे वर नमुद प्रकरणांमध्ये मयताचा वारस ठराव, मयताची पहिली पत्नी व मुले/मुली तसेच दुसर्या पत्नीची सर्व आपत्ये यांचे नावे नोंदवावा. स्थानिक चौकशी करावी. वारस ठराव मंजूर करून त्याचा फेरफार नोंदवावा. नोटीस बजावल्यानंतर जर दुसर्या पत्नीने हरकत नोंदवी तर मंडल अधिकार्यांनी तक्रार केसची सुनावणी घ्यावी. सर्वांचे म्हणणे नोंदवावे. व वरील तरतुदी नमूद करून निकाल द्यावा. जरूर तर दुसर्या पत्नीला दिवाणी न्यायालयातून तिचा वारस हक्क सिध्द करून आणण्यास सांगावा.
वारस ठराव/ फेरफार नोंद नोंदविण्याआधीच सर्वांनाच दिवाणी न्यायालयातून वारस हक्क सिध्द करून आणण्याचा सल्ला देऊ नये. कायद्यात नमूद तरतुदींचे पालन करून काम करणे हे आपले कर्तव्य आहे.
डॉ. संजय कुंडेटकर
बी.ए., एन.डी., डी.मॅग., एम.बी.ए.,
एम.डी., पीएच.डी.
उपजिल्हाधिकारी,
महाराष्ट्र शासन, (महसूल विभाग)
Rate This Article
या लेखात, आम्ही आपणाला एका मयत खातेदाराची दोन लग्न झाली होती. दोन्ही बायकांना त्याच्यापासून झालेली मुले आहेत. आता वारस दाखल करण्यासाठी अर्ज आला आहे. अशावेळेस कोणाचे नाव वारस म्हणून दाखल करावे? अनौरस संततीला वडिलांच्या मिळकतीमध्ये वारसाहक्क मिळतो काय ?. याबाबत माहिती दिली आहे आम्हाला आशा आहे की, तुम्हाला ती आवडली असेल. माहिती आवडली असेल तर, सदरची माहिती तुमच्या मित्रांनाही शेअर करा.
आपले महसूल कायद्याविषयक प्रश्न विचारण्यासाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या. आणि आमच्या टेलिग्राम चॅनेललाही आजच जॉईन व्हा. Website Link Telegram Channel Link धन्यवाद !