हिंदू उत्तराधिकार (सुधारणा) कायदा, २००५ अन्‍वये झालेले बदल

 


हिंदू उत्तराधिकार (सुधारणा) कायदा, २००५ अन्‍वये झालेले बदल

हिंदू उत्तराधिकार अधिनियम- १९५६ मध्‍ये सुधारणा करण्‍यासाठी केंद्र शासनाने दिनांक

९ सप्‍टेंबर २००५ रोजी हिंदू उत्तराधिकार (सुधारणा) कायदा-२००५ अंमलात आणला.

उक्‍त सुधारणेन्‍वये हिंदू उत्तराधिकार अधिनियम- १९५६ मध्‍ये नेमके काय बदल झाले त्‍याबाबत माहिती.  

हिंदू उत्तराधिकार (सुधारणा) कायदा-२००५

THE HINDU SUCCESSION (AMENDMENT) ACT, 2005

(क्रमांक ३९, सन२००५ चा)

(NO. 39 OF 2005)

[५ सप्टेंबर २००५.]

[5th September, 2005.]

हिंदू उत्तराधिकार कायदा, १९५६ मध्ये सुधारणा करणारा कायदा.

An Act further to amend the Hindu Succession Act, 1956.

भारतीय प्रजासत्ताकाच्या छप्पनाव्या वर्षी संसदेने खालीलप्रमाणे कायदा केला आहे.

BE it enacted by Parliament in the Fifty-sixth Year of the Republic of India as follows:

 . घू शीर्षक आणि प्रारंभ:

(१) या कायद्याला हिंदू उत्तराधिकार (दुरुस्ती) कायदा, २००५ असे म्हटले जाईल.

1. Short title and commencement:

(1) This Act may be called the Hindu Succession (Amendment) Act, 2005.

 (२) केंद्र सरकार नियुक्त करेल अशा तारखेपासून अधिकृत राजपत्रातील अधिसूचनेद्वारे, तो अंमलात येईल.

(2) It shall come into force on such date as the Central Government may, by notification in the Official Gazette, appoint.

 . कलम ची दुरुस्ती: हिंदू उत्तराधिकार कायदा, १९५६ (१९५६ चा ३०) च्या कलम मध्ये (यापुढे मुख्य कायदा म्हणून संदर्भित), उप-कलम () वगळण्यात येईल.

कलम नवीन, बदलण्‍यात येईल.

वगळलेला पूर्वीचा कलम ४(२): शंकानिरसनार्थ याद्‍वारे असे घोषित करण्यात येत आहे की, या अधिनियमात अंतर्भूत  असलेल्या कोणत्याही गोष्टींमुळे, कृषि धारण जमिनीच्या तुकडेबंदीसाठी किंवा कमाल मर्यादांच्या निश्चितीसाठी अथवा अशा धारणजमिनीसंबंधी कुळवहिवाट अधिकारांच्या प्रक्रांतीसाठी उपबंध करणाऱ्या त्या त्या काळी अंमलात असलेल्या कोणत्याही कायद्याच्या उपबंधांवर परिणाम होतो असे मानले जाणार नाही.

 2. Amendment of section 4.-In section 4 of the Hindu Succession Act, 1956 (30 of 1956) (hereinafter referred to as the principal Act), sub-section (2) shall be omitted.

Substitution of new section for section 6.

बदलण्‍यात आलेला पूर्वीचा कलम ६:- जेव्हा एखादा हिंदू पुरुष या अधिनियमाच्या प्रारंभानंतर मृत्यू पावला असून त्याच्या मृत्यूसमयी मिताक्षरा सहदायकी संपत्तीत त्याचा हितसंबंध असेल तेव्हा, त्याचा त्या संपत्तीतील हितसंबंध उत्तरजीवित्वाच्या तत्वानुसार सहदायकीतील उत्तरजीवी सदस्यांकडे प्रक्रांत होईल, या अधिनियमानुसार नव्हे :

परंतु, जर मृताच्या मागे, अनुसूचीच्या १ च्‍या वर्गामध्ये विनिर्दिष्ट केलेल्या स्त्री-नातलग किंवा जो अशा

स्त्री-नातलगांमार्फत दावा सांगतो असा त्या वर्गातील विनिर्दिष्ट पुरुष-नातलग हयात असेल तर, मृताचा

मिताक्षरा सहदायकी संपत्तीतील हितसंबंध या अधिनियमाखाली, मृत्युपत्रीय किंवा प्रकरणपरत्वे, अमृत्युपत्रीय उत्तराधिकारानुसार प्रक्रांत होईल, उत्तरजीवित्वाच्या तत्त्वानुसार नव्हे.

 ३. कलम ६- नवीन कलम बदलणे: मुख्य कायद्याचा कलम ६ बदलला जाईल, म्हणजे:

'६ʼ. सहदायिकी मालमत्तेमध्ये स्‍वारस्‍याचे हस्तांतरण.

(१) हिंदू उत्तराधिकार (सुधारणा) कायदा, २००५ च्या प्रारंभापासून आणि मिताक्षरा कायद्याद्वारे शासित संयुक्त हिंदू कुटुंबात, सहपरिवाराची मुलगी,

(अ) जन्माने मुलाप्रमाणेच तिच्या स्वत: च्या अधिकाराने एक सहदायक बनेल;

() जर अशी मुलगी मुलगा असती तर तिला सहदायिकी मालमत्तेमध्ये जे समान अधिकार मिळाले असते ते सर्व अधिकार तिला मिळतील;

() ती उक्त सहदायिकी मालमत्तेच्या संदर्भात मुलाला असणार्‍या समान दायित्वांच्या अधीन असेल, आणि हिंदू मिताक्षरा संदर्भातील कोणत्याही संदर्भामध्ये सहदायक म्‍हणून मुलीचा संदर्भ समाविष्ट आहे असे मानले जाईल:

तथापि, या उप-कलममध्ये समाविष्ट असलेली कोणतीही बाब २० डिसेंबर २००४ या दिवसापूर्वी झालेल्या मालमत्तेच्‍या कोणत्‍याही विभाजनाला किंवा कोणत्याही हस्‍तांतरणाला, मृत्युपत्राद्‍वारे झालेल्‍या विभाजन किंवा हस्‍तांतरणासह, प्रभावित करणार नाही किंवा अवैध ठरविणार नाही.

 3. Substitution of new section for section 6.-For section 6 of the principal Act, the following section shall be substituted, namely:

'6. Devolution of interest in coparcenary property. –

(1) On and from the commencement of the Hindu Succession (Amendment) Act, 2005, in a Joint Hindu family governed by the Mitakshara law, the daughter of a coparcener shall,

(a) by birth become a coparcener in her own right in the same manner as the son;

(b) have the same rights in the coparcenary property as she would have had if she had been a son;

(c) be subject to the same liabilities in respect of the said coparcenary property as that of a son,

and any reference to a Hindu Mitakshara coparcener shall be deemed to include a reference to a daughter of a coparcener:

Provided that nothing contained in this sub-section shall affect or invalidate any disposition or alienation including any partition or testamentary disposition of property which had taken place before the 20th day of December, 2004.

 (२) कलम ६, पोट-कलम (१) अन्‍वये जी हिंदू महिला ज्या संपत्तीची हक्कदार बनेल, ती संपत्ती तिच्याकडे सहदायिकीच्‍या मालकी हक्‍कासह जाईल आणि या कायद्यात किंवा त्‍यावेळी अंमलात असलेल्‍या इतर कोणत्याही कायद्यामध्ये काहीही नमुद असले तरीही, अशा मालमत्तेची तिच्याकडून मृत्‍युपत्राद्‍वारे विल्हेवाट लावली जाऊ शकेल.

 (2) Any property to which a female Hindu becomes entitled by virtue of sub-section (1) shall be held by her with the incidents of coparcenary ownership and shall be regarded, notwithstanding anything contained in this Act, or any other law for the time being in force, as property capable of being disposed of by her by testamentary disposition.

 (३) हिंदू उत्तराधिकार (सुधारणा) कायदा, २००५ अंमलात आल्यानंतर हिंदू व्‍यक्‍तीचा मृत्यू झाल्यास, मिताक्षरा कायद्याद्वारे शासित संयुक्त हिंदू कुटुंबाच्या मालमत्तेतील त्याचे स्वारस्य या कायद्यानुसार मृत्युपत्राद्वारे किंवा वारसाहक्कानुसार वितरीत केले जाईल, जिविताधिकारानुसार नाही, आणि सहदायिकी मालमत्तेचे विभाजन झाले आहे असे मानले जाईल आणि,

(अ) वाटपात मुलाला जो हिस्‍सा वाटप केला जातो तोच समान हिस्सा मुलीला मिळेल.

(ब) पूर्व-मृत मुलगा किंवा पूर्व-मृत मुलीचा हिस्‍सा, वाटपाच्‍या वेळी ते जिवंत असते तर त्यांना मिळाला असता तो हिस्‍सा, अशा पूर्वमृत मुलाच्या किंवा अशा पूर्व-मृत मुलीच्या हयात असलेल्या आपत्‍याला वाटप केला जाईल; आणि

() पूर्व-मृत मुलाच्‍या किंवा पूर्व-मृत मुलीच्‍या पूर्व-मृत मुलाचा हिस्सा, जसे की वाटपाच्‍या वेळी तो किंवा ती जिवंत असती तर मिळाले असते, त्याच प्रकारे पूर्व-मृत मुलाच्या किंवा पूर्व-मृत मुलीच्‍या आपत्‍याला वाटप केला जाईल.

स्पष्टीकरण: या पोटकलमच्या हेतूसाठी, हिंदू मिताक्षर सहदायकाचा हिस्‍सा हा त्याच्या मृत्यूपूर्वी मालमत्तेचे विभाजन झाले असते तर त्याला मालमत्तेतील जो हिस्‍सा वाटप करण्यात आला असता तो हिस्‍सा मानला जाईल, मग तो विभाजनाचा दावा करण्यास पात्र असो किंवा नसो.

(3) Where a Hindu dies after the commencement of the Hindu Succession (Amendment) Act, 2005, his interest in the property of a Joint Hindu family governed by the Mitakshara law, shall devolve by testamentary or intestate succession, as the case may be, under this Act and not by survivorship, and the coparcenary property shall be deemed to have been divided as if a partition had taken place and,

(a) the daughter is allotted the same share as is allotted to a son;

(b) the share of the pre-deceased son or a pre-deceased daughter, as they would have got had they been alive at the time of partition, shall be allotted to the surviving child of such predeceased son or of such pre-deceased daughter; and

(c) the share of the pre-deceased child of a pre-deceased son or of a pre-deceased daughter, as such child would have got had he or she been alive at the time of the partition, shall be allotted to the child of such pre-deceased child of the pre-deceased son or a pre-deceased daughter, as the case may be.

Explanation. For the purposes of this sub-section, the interest of a Hindu Mitakshara coparcener shall be deemed to be the share in the property that would have been allotted to him if a partition of the property had taken place immediately before his death, irrespective of whether he was entitled to claim partition or not.

 (४) पवित्र जबाबदारी रद्‍द: हिंदू उत्तराधिकार (सुधारणा) कायदा, २००५ अंमलात आल्‍यानंतर, कोणतेही न्यायालय मुलगा, नातू किंवा पणतू यांच्या विरुद्ध वडील, आजोबा किंवा पणजोबा यांच्याकडून देय असलेल्या कर्जाच्या वसुलीसाठी कारवाई करण्याचा हिंदू कायद्यांतर्गत असलेला पवित्र जबाबदारी या केवळ धार्मिक कर्तव्याच्या आधारावर कोणताही अधिकार मान्य करणार नाही.

परंतु हिंदू उत्तराधिकार (दुरुस्ती) कायदा, २००५ अंमलात येण्यापूर्वी करार झालेल्या कोणत्याही कर्जाच्या बाबतीत, या उपकलमामध्ये समाविष्ट असलेल्या खालील कोणत्याही गोष्टीवर परिणाम होणार नाही.

(अ) कोणत्याही धनकोचा मुलगा, नातू किंवा पणतू यांच्या विरुद्ध कारवाई करण्याचा अधिकार, किंवा

(ब) अशा कोणत्याही कर्जाच्या संदर्भात केलेले कोणतेही हस्‍तांतरण आणि असा कोणताही अधिकार, पवित्र जबाबदारीच्‍या धार्मिक दायित्वाच्या नियमांतर्गत त्याच पद्धतीने आणि त्याच मर्यादेपर्यंत लागू असेलसा तो हिंदू उत्तराधिकार (सुधारणा) कायदा, २००५ अंमलात येण्‍यापूर्वी लागू केला गेला असता.

स्पष्टीकरण: खंड (अ) च्या हेतूसाठी, "मुलगा", "नातू" किंवा "पणतू" ही अभिव्यक्ती यथास्‍थिती मुलगा, नातू किंवा पणतू, ज्याचा जन्म किंवा दत्तक विधान, हिंदू उत्तराधिकार (सुधारणा) कायदा, २००५ अंमलात येण्यापूर्वी झाला आहे असे मानले जाईल.

 (4) After the commencement of the Hindu Succession (Amendment) Act, 2005, no court shall recognize any right to proceed against a son, grandson or great-grandson for the recovery of any debt due from his father, grandfather or great-grandfather solely on the ground of the pious obligation under the Hindu law, of such son, grandson or great-grandson to discharge any such debt:

Provided that in the case of any debt contracted before the commencement of the Hindu Succession (Amendment) Act, 2005, nothing contained in this sub-section shall affect

(a) the right of any creditor to proceed against the son, grandson or great-grandson, as the case may be; or

(b) any alienation made in respect of or in satisfaction of any such debt, and any such right or alienation shall be enforceable under the rule of pious obligation in the same manner and to the same extent as it would have been enforceable as if the Hindu Succession (Amendment) Act, 2005 had not been enacted.

Explanation. For the purposes of clause (a), the expression "son", "grandson" or "great-grandson" shall be deemed to refer to the son, grandson or great-grandson, as the case may be, who was born or adopted prior to the commencement of the Hindu Succession (Amendment) Act, 2005.

 (५) या कलमात समाविष्ट असलेली कोणतीही बाब त्‍या विभाजनाला लागू होणार नाही, जे विभाजन २० डिसेंबर २००४ या दिवसापूर्वी अंमलात आले असेल.

स्पष्टीकरण: या कलमाच्या उद्देशांसाठी "विभाजन" म्हणजे नोंदणी कायदा, १९०८ अन्‍वये  रीतसर नोंदणी केलेल्या विभाजनाच्या दस्‍तऐवजाद्वारे केलेले कोणतेही विभाजन किंवा न्यायालयाच्या डिक्रीद्वारे झालेले विभाजन.'

 (5) Nothing contained in this section shall apply to a partition, which has been affected before the 20th day of December, 2004.

Explanation. For the purposes of this section "partition" means any partition made by execution of a deed of partition duly registered under the Registration Act, 1908 (16 of 1908) or partition effected by a decree of a court.'.

. कलम २३ वगळण्‍यात येईल: मुख्य कायद्याचे कलम २३ वगळण्यात येईल.

4. Omission of section 23.- Section 23 of the principal Act shall be omitted. 

वगळण्‍यात आलेले कलम २३. जेथे एखाद्या अकृतमृत्युपत्र हिंदूच्या मागे अनुसूचीच्या वर्ग १मध्ये विनिर्दिष्ट केलेले पुरुष व स्त्रिया असे विविध वारस हयात असतील व त्याच्या किंवा तिच्या संपत्तीत संपूर्णपणे त्याच्या किंवा तिच्या कुटुंबातील घटकव्यक्तींचे वास्तव्य असणार्‍या राहत्या घराचा समावेश असेल तेथे, या अधिनियमात काहीही अंतर्भूत असले तरी, अशा कोणत्याही स्त्री-वारसदाराचा राहत्या घराच्या वाटणीची मागणी करण्याचा अधिकार पुरुष वारसदार त्यातील आपापले हिस्से विभागण्याचे ठरवीपर्यंत उद्भवणार नाही, पण स्त्री-वारसदाराला तेथे राहण्याचा अधिकार असेल.

परंतु, अशी स्त्री-वारसदार कन्या असेल त्याबाबतीत, जर ती अविवाहित असेल किंवा तिच्या पतीने तिला टाकले असेल किंवा ती त्याच्यापासून विभक्त झाली असेल किंवा विधवा असेल तरच तिला त्या राहत्या घरात राहण्याचा अधिकार प्राप्त होईल.

 

. कलम २४ वगळण्‍यात येईल: मुख्य कायद्याचे कलम २४ वगळण्यात येईल.

5. Omission of section 24-Section 24 of the principal Act shall be omitted. 

वगळण्‍यात आलेले कलम २४. अकृतमृत्युपत्र व्यक्तीशी जी व्यक्ती पूर्वमृत पुत्राची विधवा, पूर्वमृत पुत्राच्या पूर्वमृत पुत्राची विधवा किंवा भावाची विधवा म्हणून संबंधित आहे अशी कोणतीही बारसदार स्त्री, जर उत्तराधिकार खुला होतो त्या दिनांकास ती पुनर्विवाहित असेल तर, अशी विधवा म्हणून ती अकृतमृत्युपत्र व्यक्तीच्या संपत्तीची उत्तराधिकारी होण्यास हक्कदार असणार नाही.

 

६. कलम ३० मध्ये सुधारणा: मुख्य कायद्याच्या कलम ३० मध्ये, "त्याच्याद्वारे विल्हेवाट लावली",  या शब्दांऐवजी, "त्याच्‍या किंवा तिच्याद्वारे विल्हेवाट लावली" असे शब्द बदलण्‍यात येतील.

6. Amendment of section 30.-In section 30 of the principal Act, for the words "disposed of by him", the words "disposed of by him or by her" shall be substituted.

Amendment of Schedule.

७. अनुसूचीत सुधारणा: मुख्य अधिनियमाच्या अनुसूचीमध्ये (कलम ८), "वर्ग " या उप-शीर्षकाखाली "पूर्व-मृत मुलाच्या पूर्व-मृत मुलाची विधवा" या शब्दांनंतर,

"पूर्वमृत मुलीच्या पूर्वमृत मुलीचा मुलगा (पणतु)

पूर्वमृत मुलीच्या पूर्वमृत मुलीची मुलगी (पणती)

पूर्वमृत मुलाच्या पूर्वमृत मुलाची मुलगी (पणती)

पूर्वमृत मुलाच्या पूर्वमृत मुलीची मुलगी (पणती)

हे वारस जोडले जातील. 

मुख्‍य कायद्‍यामध्‍ये नमुद वर्ग १ चे वारस:१. पुत्र, २. कन्या, ३. विधवा, ४. माता, ५. पूर्वमृत पुत्राचा पुत्र, ६. पूर्वमृत पुत्राची कन्या, ७. पूर्वमृत कन्येचा पुत्र, ८. पूर्वमृत कन्येची कन्या, ९. पूर्वमृत पुत्राची विधवा, १०. पूर्वमृत पुत्राच्या पूर्वमृत मुलाचा पुत्र, ११. पूर्वमृत पुत्राच्या पूर्वमृत पुत्राची कन्या, १२. पूर्वमृत पुत्राच्या पूर्वमृत पुत्राची विधवा.

7. Amendment of Schedule. In the Schedule to the principal Act, under the sub-heading "Class 1", after the words "widow of a pre-deceased son of a pre-deceased son", the words "son of a pre-deceased daughter of a pre-deceased daughter; daughter of a pre-deceased daughter of a pre-deceased daughter; daughter of a pre-deceased son of a pre-deceased daughter; daughter of a pre-deceased daughter of a pre-deceased son" shall be added.

 टी.के.विश्वनाथन,

भारत सरकारचे सचिव.

 T. K. VISWANATHAN,

Secy. to the Govt. of India.

                                                         š=š

Comments