आपले महसूल कायद्याविषयक प्रश्न आमच्या वेबसाईटवर विचारावेत. 📌Mahsul Guru📌

सोलह सिंगार

 

सोलह सिंगार

 आपण बर्‍याच ठिकाणीसोलह सिंगारकिंवासोळा श्रृंगारहा शब्द ऐकला किंवा वाचला असेल. याचा निश्‍चित अर्थ फार कमी लोकांना माहीत आहे. ‘सिंगारकिंवाश्रृंगारयाचा अर्थ सजणे किंवा सजवणे. इंग्रजीत याला  Make-up करणे म्‍हणतात. पूर्वी हा शब्द प्रामुख्याने नववधू आणि विवाहित स्त्रियांच्या बाबतीत वापरला जात असे.

विवाहित स्त्री सुंदर, आकर्षक व चारचौघीत उठून दिसावी, नवर्‍याला तिचे सतत आकर्षण वाटावे हा उद्देश या मागे होताच परंतु सोलह सिंगार चा सखोल अभ्‍यास केल्‍यास असे लक्षात येते की आपल्या पूर्वजांनी अत्यंत सखोल अभ्यास आणि परीक्षण करून हे सोळा श्रृंगारतयार केले होते. हे सिंगारकिंवाश्रृंगार मागे फक्‍त सजणे किंवा सजविणे, सुंदर दिसणे हाच एकमेव उद्देश नसून यामागे शास्‍त्रीय आणि वैद्‍यकीय कारणे, शारीरिक स्वास्थ्य व अध्यात्माचाही सखोल विचार केलेला आहे. 

आजची आधुनिक विवाहित स्त्री यांचा अवलंब फारच कमी प्रमाणात करते. परंतु शारीरिक स्वास्थ्याच्या दृष्टीने यातील जमेल तितके श्रृंगार विवाहित स्त्रीने करावे असा माझा प्रामाणिक सल्ला आहे.

  F नववधूचेसोलह सिंगार: सर्वसामान्‍यत: बिंदी, सिंदूर, काजळ, मेंदी (मेहंदी), वधु वस्‍त्र, गजरा, मांग टीका, नथ, कर्णफूल, हार, बाजूबंद, कंगन आणि बांगड्‍या, अंगठी, कंबरपट्‍टा (कमरबंद), बिछवे (बिछुआ) आणि पैंजण (पायल) हे नववधूचेसोळा श्रृंगार आहेत.

यालाच काही ग्रंथात 'षोडश शृंगार' म्‍हटले आहे. 'षोडश शृंगाराबाबत' च्‍या एका म्‍हणीनुसार,

"अंगशुची, मंजन, वसन, माँग, महावर, केश।

     तिलक भाल, तिल चिबुक में, भूषण मेंहदी वेश।।

मिस्सी, काजल, अरगजा, वीरी और सुगंध।"

याचा अर्थ आंघोळ करणे, अंगाला उटणे लावणे, स्‍वच्‍छ कपडे परिधान करणे, मांग भरणे, महावर (अलता) लावणे, हनुवटीवर तिट लावणे, बिदी/कुंकू लावणे, केशरचना करणे, अलंकार धारण करणे, मेंदी लावणे, दात स्‍वच्‍छ करणे, डोळ्‍यात काजळ लावणे, सुगंधित द्रव्‍यांचा वापर करणे, पान खाणे, हार परिधान करणे, निळ्‍या रंगाचे फुल धारण करणे हे 'षोडश शृंगार' आहेत.

 लग्‍न प्रसंगी वर आणि वधुला समान महत्‍व असले तरी वधुचा श्रृंगार (Make-up) हे खास आकर्षण असते. नववधूच्‍यासोलह सिंगार बाबत माहिती घेतल्‍यास असे दिसून येते की, आजही सर्वसामान्‍यपणे यातील काही श्रृंगार वापरले जातात परंतु त्‍यांची नावे आणि प्रकार आधुनिक आहेत.  

प्राचीन काळी नववधूला लग्नासाठी सजवताना खालील सोळा प्रकारचे श्रृंगार केले जातात. काही समाजात आजही या प्रथेचा अवलंब केला जातो.

 ) मर्दन (Massage):- नववधूला उटणे, सुगंधित तेल, सुगंधित द्रव्ये लावून मर्दन/मालीश केला जातो. उटण्‍याचे एक प्रचलित नाव अंगराग असे आहे. चंदन आणि तत्‍सम सुगंधित चूर्ण एकत्र करून उटणे बनवले जाते.

मर्दन/मालीश मुळे शरीरातील रक्‍तप्रवाहास चालना मिळते. शरीरातील विषारी द्रव्‍ये (toxins) बाहेर पडतात. त्‍वचेवर तेज येते, उत्‍साह वाढतो.   

 ) मंगल स्नानम् (Bath):- नववधूला सुगंधित उटणे, दूध, इत्यादीने स्नान घातले जाते.

 ) केशपाश सुगंधी करणम् (Shampoo):- नववधूच्या केसांना सुगंधित तेल लावून नंतर शिकेकाई, नागरमोथा, कचुरा यांचा लेप लावून काही काळ ठेवून, धुतले जातात.

 ) अंगराग विलेपन:- नववधूच्या चेहर्‍याला, मानेला, खांद्यांना, हातापायांना चंदनाचा पातळ लेप लावला जातो. (आजच्या काळात स्त्रिया मेक-अप करतानाफाउंडेशनवापरतात तसे)

 ) काजल-रेखा दिपन:- नववधूच्या डोळ्यात काजळ लावले जाते. काजळ हे वाईट दृष्टीपासून रक्षण करण्यासाठी वापरले जाते असा समज आहे.

 ) तिलक प्रसाधन:- नववधूच्या कपाळावर कुंकू, मंगल चिन्हे इत्यादी लावली जातात.

 ) मुखप्रसाधन:- नववधूचा चेहरा हर्बल ब्लशर, सोने/चांदी/मोतीच्या पावडरने सजवला जातो.

 ) केशपाश रचना:- नववधूची आकर्षक केशरचना केली जाते.

 ) अल्कता निवेषण:- नववधूच्या ओठांना लिपस्टीक/ग्‍लॉस लावणे. प्राचीन काळी मधमाशीच्या पोळ्‍यापासुन मिळणारा विशिष्ट पदार्थ (Wax) व विशिष्ट फुलांच्या पाकळ्यांपासून (Petals) हर्बल लिपस्टीक तयार केली जात असे

 १०) हस्त सुशोभितम्:- नववधूचे हात सुशोभित केले जातात.

 ११) पद सुशोभितम्:- नववधूचे पाय, ’अलताइत्यादी लावून सुशोभित केले जातात.

 १२) महावस्त्र परीधानम्:- नववधूला लग्नाचा विशेष पोषाख नेसवला जातो.

 १३) पुष्प धारणम्:- नववधूला सुगंधित फुलांचे हार, हस्त माळ, गजरा इत्यादी घातला जातो.

 १४) अलंकार धारणम्:- नववधूला विविध अलंकारांनी सजवले जाते.

 १५) तांबूल सेवनम्:- नववधूला पानाचा सुगंधित विडा (Mouth freshener) खाण्यास दिला जातो.

 १६) दर्पण विलोकन:- नववधूला तिचे रूप आरशात दाखवले जाते.

 अशा रीतीने नववधूला उत्तम प्रकारे सजवून विवाह मंडपात नेले जाते. विवाह मंडपात तिची व वराची जी पहिली नजरभेट होते त्यालाशुभ दृष्टीअसे म्हणतात.

 वरील सोळा श्रृंगार प्रकारांपैकी बहुतेक सर्व प्रकार काही भागात आजही वापरले जातात.

 धर्म शास्‍त्रानुसार विवाहित स्त्रीने खालील सोळा श्रृंगार नियमीतपणे करणे आवश्‍यक आहे. या मागेही फक्‍त सजणे किंवा सुंदर दिसणे हाच एकमेव उद्देश नसून शास्‍त्रीय आणि वैद्‍यकीय कारणे, शारीरिक स्वास्थ्य व अध्यात्माचाही सखोल विचार केलेला आहे.    

 F  विवाहित स्त्रीचेसोळा श्रृंगार 

 हिंदू विचारसरणीनुसार कुंकू, मंगळसूत्र, जोडव(बिछवे-Toe rings), बांगड्या (Bangles) आणि नथ (Nose Ring) हे पाच विवाहित स्त्रीचे अत्यावश्यक अलंकार आहेत. विधवा आणि अविवाहित स्त्रीने हे अलंकार वापरू नये असा संकेत आहे. हे दागिने सौंदर्यवृद्धी करण्याबरोबरच शरीरस्वास्थ्याचीही काळजी घेतात आणि काही रोग बरे करण्यास मदत करतात असे आयुर्वेदात नमुद आहे. ज्या धातूचे दागिने असतात त्यांचा प्रभाव शरीरावर होतो. ते आपल्या शरीरातील काही दाबबिंदूंवर दबाव टाकतात आणि त्यामुळे शारीरिक समस्या दूर होण्यास मदत होते आणि मन व शरीर प्रसन्न राहते. आयुर्वेदानुसार सोन्याचे दागिने कमरेच्या वरील भागात तर चांदीचे दागिने संपूर्ण शरीरभर परिधान केले पाहिजेत.

 

१) बिंदी:- कपाळावर बिंदी/कुंकू लावणे हा विवाहित स्त्रीचा महत्त्वाचा श्रृंगार आहे. कपाळाच्या मध्यभागी, भ्रूमध्याला म्हणजेच दोन्ही भुवयांच्यामध्ये कुंकू लावायचे असते. कुंकू लावल्याने आज्ञाचक्र (Third Eye Chakra) प्रभावित होते. आज्ञा चक्र भ्रूमध्य म्हणजेच दोन्ही भुवयांच्‍या मध्‍ये असते. मानसशक्‍ती आणि इच्‍छाशक्‍तीचे हे केंद्र आहे. आज्ञा चक्राकडे बुध्‍दिमत्ता, चेहरा, डोळे, कान, सायनस, लहान मेंदू (Cerebellum), मज्‍जा संस्‍था (nervous system), मेंदुतील पिट्‍युटरी ग्रंथी, एन्‍डोकाईन ग्रंथी, माणसाचे विचार आणि शरीरातील सर्व प्रमुख चक्रांचे  यांचे नियंत्रण असते.

क्‍युप्रेशर पध्‍दतीनुसार मेंदूच्‍या पायथ्‍याशी असणार्‍या पियुषिका ग्रंथीचा मेंदूच्या पायथ्याशी असणार्‍या पियुषिका ग्रंथीचा (Pituitary Gland) दाब बिंदू (Pressure point) येथे आहे.

या ठिकाणी शुद्ध कुंकू लावले असता कुंकवातील औषधी घटक त्वचेवाटे पिच्यूटरी ग्रंथींना सक्रीय करतात. त्‍यामुळे पियुषिका ग्रंथी व्‍यवस्‍थित काम करू लागतात. महिलांच्‍या शरीरात हार्मोन्‍सची निमिर्ती व्‍यवस्‍थित होते. त्‍यांना मासिक पाळीचे त्रास होत नाहीत. बिंदी/कुंकूचा वापर आज्ञाचक्राशी संबंधित बाबींचा फायदे मिळवून देतो आणि संवेदनशक्ती तसेच स्नायूंच्या एकूण तंत्रावर नियंत्रण ठेवले जाते.

  ) सिंदूर:- सिंदूर लावणे हा विवाहित स्त्रीचा महत्त्वाचा श्रृंगार आहे. अविवाहित स्त्रीने सिंदूरचा वापर करू नये असा संकेत आहे. विवाहित स्त्रीने डोक्यावरील केसांचे मधोमध दोन भाग करून त्यात सिंदूर भरण्याची प्रथा आहे. यालामांग भरणेअसेही म्हणतात. चांगल्‍या प्रतीच्‍या सिंदूरमध्‍ये पार्‍याचा (Mercury) अंश असतो. पारा थंड असल्याने रागाचे शमन होते. सिंदूर लावण्याची जागा सहस्त्रार चक्राशी (Crown Chakra) संबंधित असते. सहस्त्रार चक्र हे मेंदूशी (Cerebrum) संबंधित असल्याने सिंदूरचा वापर हा मेंदूसाठी उपयोगी ठरतो. सिंदूर मधील पार्‍यामुळे मेंदू शांत राहतो. संसारात स्त्रीनेडोके शांत ठेवणेहे सुखी संसाराच्या दृष्टीने आवश्यक आहे. डोक्‍यातील सर्व दाब बिंदू (Pressure point) डोक्यावरील केसांच्‍या मधोमध असतात. सिंदूर लावतांना त्‍या बिंदूंवर दाब पडून ते सक्रिय होतात.  

 ) मांग-टिका:- विवाहित स्त्रीने डोक्यावरील केसांचे मधोमध दोन भाग करून त्यात सिंदूर भरण्याची प्रथा आहे. यावर मांग-टिका लावला जातो. मांग-टिका हा सोन्याचा बनलेला असतो. सोन्याच्या छोट्या चेनला एका बाजूला हूक व दुसर्‍या बाजूला नक्षीकाम केलेले पदक असते. हूक डोक्यावरील केसांना मागील बाजूस लावून नक्षीकाम केलेले पदक बरोबर कपाळावर येईल असे चेनच्या साहाय्याने लावतात. मांगेत भरलेला सिंदूर जास्त काळ टिकावा म्हणून मांग-टिका लावला जातो. डोक्‍यातील सर्व प्रेशर पॉइंटस्‌ डोक्यावरील केसांचे मधोमध असतात, त्‍या भागावर  दाब दिल्‍यास मेंदू उत्‍तेजीत होऊन त्‍याचे कार्य सुकर होते. मांग-टिक्‍यामुळे त्‍या जागेवर आपोआप दाब पडतो व मेंदू उत्तम पध्‍दतीने काम देतो. गुजरात, राजस्थानमध्‍ये आजही विवाहित स्त्रिया मांग-टिका वापरतात.

 ) अंजन:- डोळ्यात काजळ (Kajal) लावणे हा विवाहित स्त्रीच्या श्रृंगाराचा प्रकार आहे. काजळामुळे डोळे रेखीव व सुरेख दिसतात. काजळ बनवताना शुद्ध तूप व कापूर याचा वापर केला जातो त्यामुळे डोळ्याचे आरोग्यही राखले जाते. काजळ वाईट प्रवृत्तींपासुन रक्षण करते असेही मानले जाते.

 ) नथ:- नाकपुडीच्या डाव्या बाजूला नथ (Nose Ring) घातली जाते. नाक टोचल्याने सायनसचे विकार होत नाहीत व डोळ्यांचे तेज वाढते. जुन्याकाळी मुलींबरोबरच मुलांचेही नाक टोचून घेण्याची प्रथा होती. ज्योतिष शास्त्रातीललाल किताबअनुसार विशिष्ट ग्रहांचे शुभफळ प्राप्त करण्यासाठी पुरुषांनाही नाक टोचून घेण्याचा सल्ला दिला जातो. नथ घालण्याने कफाच्या व नाकाच्या रोगांपासून बचाव होतो असेही मानले जाते. आजकाल नथ हा प्रकार लग्न समारंभाशिवाय अभावानेच पाहायला मिळतो. नथचा आकार मोठा असतो त्‍यामुळे सतत नथ परिधान करणे अडचणीचे ठरते. त्‍यामुळे विवाहित स्‍त्रीया लग्‍न समारंभ, सण अशा प्रसंगी नथ वापरतात. विवाहित स्‍त्रीने नाकात आभुषण घालणे आवश्‍यक असल्‍याने दैनंदिन वापरासाठी नाकात चमकी(Nose Pin) घातली जाते. याला हिंदीत लौंग असे म्‍हणतात.  

 ) हार:- गळ्यात मंगळसूत्र व सोन्याचा अलंकार (Necklace) घालणे हा विवाहित स्त्रीचा महत्त्वाचा श्रृंगार आहे. हार हे परिधान केल्याने गळ्याच्या विशिष्ट भागांवर दाब पडतो आणि त्यामुळे डोळ्यांतील तेज पुष्कळ वेळ टिकून राहते. गालगुंड व मानेखालची हाडे यांच्यावर होणाऱ्या अनिष्ट परिणामांचा प्रभाव कमी होतो.

मंगल म्हणजे शुभ व सूत्र म्हणजे धागा किंवा बांधणे. विधवा व अविवाहित स्त्रीने मंगळसूत्राचा वापर करू नये असा संकेत आहे. मंगळसूत्र हा फक्त अलंकार म्हणूनच वापरला जात नाही तर याला एक पवित्र बंधन, प्रेमाचे प्रतीक समजले जाते. मंगळसूत्रात असलेला प्रत्येक काळा मणी वाईट शक्तींपासून विवाहित स्त्रीची, तिच्या संसाराची तसेच तिच्या पतीची रक्षा करतो असे मानले जाते. एका मान्यतेनुसार मंगळसूत्राच्या दोन वाट्या ह्या सासर व माहेरची प्रतीके असतात. विवाहित स्त्रीने सासर व माहेर हे दोन नसून एकच आहे व दोन्हीची प्रतिष्ठा सांभाळणे आपल्या हातात आहे हे लक्षांत ठेवण्यासाठी हे प्रतीक आहे.

एका अन्‍य मान्यतेनुसार मंगळसूत्राच्या दोन वाट्या ह्या पती-पत्नीच्या कधीही न तुटणार्‍या नात्याचे प्रतीक आहे.

काही ठिकाणी मंगळसूत्रात पोवळे (Coral)  वापरले जाते. पोवळे हे मंगळ ग्रहाचे रत्न असून मंगळ हा ग्रह शक्ती व साहस प्रदान करणारा आहे असे मानले जाते. पतीच्या शक्ती व साहसाचे प्रतीक म्हणून पोवळे वापरले जाते.

 

) कर्ण फुल (Ear rings):- कानात अलंकार धारण करणे हा विवाहित स्त्रीच्या श्रृंगाराचा प्रकार आहे. कर्णफुले शक्यतो सोन्याची असावीत. कान टोचल्याने सायनसचे विकार होत नाहीत, डोळ्यांचे व बुद्धीचे तेज वाढते. याच कारणासाठी काही ठिकाणी मुलांचेही कान टोचण्याची पद्धत आहे. जुन्याकाळी मुलींबरोबरच मुलांचेही कान टोचून घेण्याची प्रथा होती. ज्योतिष शास्त्रातीललाल किताबअनुसार विशिष्ट ग्रहांचे शुभफळ प्राप्त करण्यासाठी पुरुषांनाही कान टोचून घेण्याचा सल्ला दिला जातो. शरीराशी संबंधित जवळपास ८० केंद्रबिंदू आहेत. कानात कर्णफुले घातल्‍यामुळे हे सर्व बिंदू प्रभावित होतात आणि विविध रोगांवर नियंत्रण ठेवले जाते. यामुळे फेफरे येणे, टॉन्सिल, हार्निया या व्याधींपासून सुटका मिळते असे मानले जाते.

 ) मेंदी (Heena):- मेंदी लावणे हा विवाहित स्त्रीच्या श्रृंगाराचा प्रकार आहे. मेंदीमुळे अंगातील उष्णता शोषली जाते. हात सुंदर व आकर्षक दिसतात.

  ) बांगड्या (Bangles):- बांगड्या घालणे हा विवाहित स्त्रीच्या श्रृंगाराचा प्रकार आहे. बांगड्या काचेच्या, सोन्याच्या, लाखेच्या असतात. पूर्वीच्या महिलांच्या हातात खूप बांगड्या असायच्या आता हे प्रमाण फार कमी झाले आहे.  महिलांना दर महिन्याला मासिक पाळी येते, अक्युप्रेशर पध्‍दतीनुसार गर्भाशयाचा दाब बिंदू (Pressure point) मनगटावर, अंगठ्याच्या खालील बाजूस आहे आणि बीजांड कोषाचा (ovaries) दाब बिंदू (Pressure point) मनगटावरील करंगळी खालील बाजूस दोन्‍ही हातांवर आहेत.  बांगड्‍या घातल्‍यामुळे हे दाब बिंदू आपोआपच दाबले जातात.  पाळीच्या वेळी ओटीपोटात दुखणे,पाळी साफ न होणे, चाळीशी नंतर टाचा दुखणे वगैरे त्रास होत नाहीत. काही रोगांवर काचेच्या बांगड्‍यांचा चांगला उपयोग होतो. काचेच्‍या बांगड्‍या घातल्‍याने दात दुखी, रक्‍तदाब, तोतरेपणा यांवर अनुकुल परिणाम होतो.

स्त्रियांनी बांगड्या धारण केल्यामुळे त्यांचे हात सुंदर व आकर्षक दिसतातच तसेच बांगड्यांच्या मधुर किणकिणाटाने सभोवतालची नकारात्मक ऊर्जा सकारात्मक ऊर्जेत परावर्तित होते.

१०) बाजूबंद (Armlets):- हा अलंकार खांदा आणि हाताचा कोपरा याच्‍या मध्‍यभागी घालतात. बाजूबंद घातल्‍यामुळे फक्‍त हृदयाचीच कार्यक्षमता वाढत नाही तर हात व खांदा यांच्‍या वेदनेपासूनही आराम मिळतो. बाजूबंद घालणारी स्‍त्री संयमी आहे असे मानले जाते. वाढत्‍या वयाबरोबर स्‍नायूंमध्‍ये व हाडांमध्‍ये होणार्‍या वेदना बाजूबंद घातल्‍यामुळे होत नाहीत असेही मानले जाते.  

११) अंगठी (Finger ring):- अंगठी  हाताच्या बोटात घालण्याचा अलंकार आहे. वैदिक शास्त्रानुसार दोन्ही हातांच्या करंगळीच्या शेजारच्या बोटात घट्ट अंगठी घातली असता वजन वाढत नाही. अंगठीमुळे स्त्रीचे हात सुंदर व आकर्षक दिसतात. काही ठिकाणी अंगठी ही वाङनिश्‍चयाचे प्रतिक मानले जाते. हाताच्‍या विविध बोटात घातलेली अंगठी विविध रोगांसाठी प्रभावकारक ठरते. हाताच्‍या करंगळीमध्‍ये अंगठी घातली असता हृदयरोग, हृदयशूल, मानसिक तणाव, कफ विकार यावर प्रभावी ठरते. पचनसंस्‍थेच्‍या विकारांवर उपाय म्‍हणून चांदीची अंगठी घालण्‍याचा सल्‍ला दिला जातो. दमा, शरीराला कंप सुटणे यावर तांब्‍याची अंगठी घालण्‍याचा सल्‍ला दिला जातो.

१२) केश श्रृंगार (Hair styling):- केसांना विविध प्रकारे सजवणे  हा विवाहित स्त्रीच्या श्रृंगाराचा प्रकार आहे. वाईट शक्ती स्त्रियांच्या उघड्या केसांवर लवकर आकर्षीत होतात म्हणून स्त्रीने केस मोकळे सोडून अगर ओल्या केसांनी बाहेर जाऊ नये असे म्हटले जाते. ओल्या केसांमुळे सर्दी होण्याची शक्यता व मोकळे केस वार्‍यामुळे उडून जेवणाबरोबर पोटात जाण्याची शक्यता असतेच. काही समाजात केस स्‍त्रीयांनी केस मोकळे ठेवणे वाईट मानले जाते.

  १३) कमरबंध/ कंबरपट्टा (Waist Band):- कंबरपट्‍टा विवाहित स्त्रीच्या श्रृंगाराचा प्रकार आहे तो आज अभावानेच पाहायला मिळतो. कमरबंध बांधला असता वजन वाढीला आळा बसतो हा अनेक लोकांचा अनुभव आहे. कमरपट्टा बांधणार्‍या महिलांची पचनशक्ती वाढते व मासिक पाळी योग्‍यप्रकारे होते. कंबर दुखणे, पाठ दुखणे इत्‍यादी त्रास होत नाहीत.

 स्त्रियांनी शक्यतो चांदीचा कमरबंध बांधावा. पूर्वीच्या काळीकरदोडा’ (कमरेभोवती बांधायचा जाड धागा) बांधण्याची पद्धत होती. वजन नियंत्रित ठेवायचे असेल तर स्त्रियांनी शक्यतो चांदीचा कमरबंध व पुरुषांनीकरदोडा’ (कमरेभोवती बांधायचा जाड धागा) जरूर बांधावा.

  १४) पैंजण (Anklet):- पैंजण हा विवाहित स्त्रीच्या श्रृंगाराचा प्रकार आहे. स्त्रियांनी शक्यतो किमान सहा घुंगरू असलेले चांदीचे पैंजण पायात बांधावे. ह्यामुळे वजन वाढीला आळा बसतो, मधुमेहाचा रोग होत नाही. स्त्रीने घुंगरू (Bells) असलेले चांदीचे पैंजण पायात बांधल्याने, घुंगराच्या आवाजाने घरातील दरिद्रता दूर होते, बाहेरची बाधा असल्यास निघून जाते, घरात समृद्धी येते असा समज आहे. मधुमेह असलेल्या पुरुषांनी दोन्ही पायात चांदीचा जाड कडा घट्ट घालावा असे म्‍हणतात.  पैंजण घातल्यामुळे टाचा दुखणे, घोटे व पाठीच्या खालच्या भागात होणार्‍या वेदनांपासून आराम मिळतो. रक्‍तप्रवाह उत्तम प्रकारे होऊन हिस्‍टारीआ, श्‍वासाचे त्रास कमी होतात.

 १५) जोडव (बिछवे-Toe rings):- जोडवी चांदीच्या बनलेल्‍या असतात. त्या पायाच्या मधल्या किंवा करंगळीच्या शेजारच्या बोटात घट्ट घातल्‍या जातात. करंगळीच्या शेजारच्या बोटात तीन वेढ्या्या घट्ट जोडव्या घातल्यास शरीरातील पृथ्वी तत्त्वाचा समतोल साधला जाऊन वजन वाढीला आळा बसतो असा समज आहे. पायाच्‍या बोटात जोडवी अथवा तत्सम प्रकारच्या वस्तू घातल्या तर प्रसूतिवेदना कमी होतात आणि ताप येणे, चक्कर येणे या बाधा होत नाहीत असे मानले जाते.

  १६) अत्तर (scents) :- शरीराला दुर्गंध येऊ नये, मनाला प्रसन्नता व उत्साह लाभावा या उद्देशाने अत्तराचा वापर केला जातो. अत्तरामुळे सभोवतालचे वातावरण प्रसन्न व सुगंधित राहण्यास मदत मिळते तसेच संपर्कात येणार्‍या माणसालाही प्रसन्न वाटते.

 

b|b

 

 

Comments

Archive

Contact Form

Send

Mahsul Guru

Subscribe YouTube Channel