प्रतिबंधीत सत्ताप्रकार/भाडेपट्टयाने प्रदान जमिनी मालकी हक्काने देणे
या सुधारीत नियमामुळे आता महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम
१९६६ च्या तरतुदीन्वये कृषीक, निवासी, वाणिज्यिक किंवा औदयोगिक
प्रयोजनासाठी, प्रतिबंधीत सत्ताप्रकाराने अथवा भाडेपट्टयाने प्रदान केलेल्या
जमिनी मालकी हक्काच्या होणार आहेत.
तथापि, अटी व शर्तींचा झालेला असा भंग सक्षम प्राधिकार्याने
नियामानुकूल केला असल्यास त्या मालकी हक्कामध्ये रूपांतरीत करता येतील.
अ.क्र. |
जमीन ज्या क्षेत्रात
समाविष्ट आहे ते क्षेत्र आणि जमिनी चा वापर |
दिनांक ०८.०३.२०१९ या
दिनांका पासून दिनांक ०८.०३.२०२२ या कालावधीसाठी आकारावयाची अधिमूल्य रक्कम |
दिनांक ०८.०३.२०२२ नंतर
आकारावयाची अधिमूल्य रक्कम |
१ |
२ |
३ |
४ |
१ |
नगर पंचायत/ नगर परिषद/ म.न.पा./ विशेष नियेाजन प्राधिकरणाच्या हद्दी बाहेरील कृषी प्रयोजनासाठी प्रदान केलेल्या जमिनी ज्या प्रादेशिक विकास आराखडयात शेती/ नाविकास वापर विभागात स्थित आहेत |
प्रचलित वार्षिक दर विवरणपत्रातील (रेडीरेकनर) शेतीच्या
दराप्रमाणे येणार्या किंमतीच्या ५०% |
प्रचलित वार्षिक दर विवरणपत्रातील (रेडीरेकनर) शेतीच्या
दराप्रमाणे येणार्या किंमतीच्या ७५% |
२ |
नगर पंचायत / नगर परिषद/ म.न.पा. / विशेष नियोजन
प्राधिकरणाच्या हद्दी बाहेरील कृषी प्रयोजनासाठी प्रदान केलेल्या जमिनी ज्या
प्रादेशिक विकास आराखडयात अकृषिक (बिनशेती) विभागात स्थित आहेत |
प्रचलित वार्षिक दर विवरणपत्रातील (रेडीरेकनर)
बिनशेतीच्या दराप्रमाणे येणार्या किंमतीच्या ५०% |
प्रचलित वार्षिक दर विवरणपत्रातील (रेडीरेकनर) बिनशेतीच्या
दराप्रमाणे येणार्या किंमतीच्या ७५% |
३ |
कृषी प्रयोजनासाठी प्रदान केलेल्या व सदयःस्थितीमध्ये
नगर पंचायत / नगर परिषद/ म.न.पा. / विशेष नियोजन प्राधिकरणाच्या हद्दीमध्ये
स्थित असलेल्या जमिनी – ज्यांचा विकास आराखडयाप्रमाणे बिनशेती वापर अनुज्ञेय
आहे किंवा बिनशेती वापर अनुज्ञेय नाही
अशा जमिनी |
प्रचलित वार्षिक दर विवरणपत्रातील (रेडीरेकनर)
दराप्रमाणे येणार्या किंमतीच्या ५०% |
प्रचलित वार्षिक दर विवरणपत्रातील (रेडीरेकनर)
दराप्रमाणे येणार्या किंमतीच्या ७५ % |
४ |
वाणिज्यीक अथवा औदयोगिक प्रयोजनासाठी कब्जेहक्काने
किंवा भाडेपट्टयाने धारण केलेल्या जमिनी |
प्रचलित वार्षिक दर विवरणपत्रातील (रेडीरेकनर)
दराप्रमाणे येणार्या किंमतीच्या ५०% |
प्रचलित वार्षिक दर विवरणपत्रातील (रेडीरेकनर)
दराप्रमाणे येणार्या किंमतीच्या ६० % |
५ |
रहिवास प्रयोजनासाठी कब्जेहक्काने धारण केलेल्या जमिनी |
प्रचलित वार्षिक दर विवरणपत्रातील (रेडीरेकनर)
दराप्रमाणे येणार्या किंमतीच्या १५% |
प्रचलित वार्षिक दर विवरणपत्रातील (रेडीरेकनर) दराप्रमाणे येणार्या किंमतीच्या ६०% |
६ |
रहिवास प्रयोजनासाठी भाडेपट्टयाने धारण केलेल्या
जमिनी |
प्रचलित वार्षिक दर विवरणपत्रातील (रेडीरेकनर)
दराप्रमाणे येणार्या किंमतीच्या २५% |
प्रचलित वार्षिक दर विवरणपत्रातील (रेडीरेकनर)
दराप्रमाणे येणार्या किंमतीच्या ७५% |
७ |
सहकारी गृहनिर्माण संस्थांना भाडेपट्टयाने प्रदान केलेल्या
आणि आजही सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या भेागवटयात असलेल्या जमिनी |
प्रचलित वार्षिक दर विवरणपत्रातील (रेडीरेकनर)
दराप्रमाणे येणार्या किंमतीच्या १५% |
प्रचलित वार्षिक दर विवरणपत्रातील (रेडीरेकनर)
दराप्रमाणे येणार्या किंमतीच्या ७५% |
८ |
सहकारी गृहनिर्माण संस्थांना कब्जेहक्काने प्रदान केलेल्या आणि आजही सहकारी गृहनिर्माण
संस्थेच्या भोगवटयात असलेल्या जमिनी. |
प्रचलित वार्षिक दर विवरणपत्रातील (रेडीरेकनर)
दराप्रमाणे येणार्या किंमतीच्या १५% |
प्रचलित वार्षिक दर विवरणपत्रातील (रेडीरेकनर) दराप्रमाणे येणार्या किंमतीच्या ६०% |
कब्जेहक्काच्या रक्कमेमध्ये, कब्जेहक्काची रक्कम वसूल करून, रहिवास प्रयोजनासाठी कब्जेहक्काने
प्रदान करण्यात आलेल्या भूखंडाचा/जमिनीचा धारणाधिकार भोगवटदार वर्ग – १ मध्ये
रूपांतरीत करतांना अशा जमिनीच्या प्रचलित वार्षिक दरविवरणपत्रातील दराप्रमाणे
येणार्या किंमतीच्या १०% इतकी रक्कम अधिमूल्य म्हणून आकारली जाईल. |
अर्ज-नमूना
प्रती,
तहसीलदार/ जिल्हाधिकारी
तालुका
जिल्हा
मा. महोदय,
राहणार ...................................................................................................
महाराष्ट्र जमीन महसूल (भोगवटादार वर्ग २ आणि
भाडेपट्टयाने प्रदान केलेल्या जमिनी भोगवटदार वर्ग – १ मध्ये रूपांतरीत करणे)
नियम, २०१९ अन्वये
खालीलप्रमाणे अर्ज सादर करीत आहे.
२. जमीन धारकाचा संपूर्ण पत्ता:
३. जमीन धारकाचा संपर्क क्रमांक:
४. जमीन धारकाला जमीन प्रदान करण्यात आलेल्या
आदेशाचा
क्रमांक व दिनांक:
५. जमीन धारकाला प्रदान करण्यात आलेली जमीन
कब्जेहक्काने
प्रदान करण्यात आली आहे की भाडेपट्टयाने?
६. जमिनीचा तपशील
गावाचे नाव: तालुका:
जिल्हा: |
|||
अ.क्र. |
भूमापन क्रमांक |
क्षेत्र |
|
|
हेक्टर |
आर |
|
१ |
२ |
३ |
|
|
|
|
|
|
|
|
|
उपरोक्
महाराष्ट्र जमीन महसूल (भोगवटादार वर्ग २ आणि भाडेपट्टयाने प्रदान केलेल्या जमिनी भोगवटदार वर्ग – १ मध्ये रूपांतरीत करणे) नियम, २०१९ अन्वये भोगवटदार वर्ग – १ मध्ये रूपांतरीत करणेकामी सर्व आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सादर करीत आहे.सदर जमिनीचे नियमानुसार होणारे अधिमूल्य शासनास अदा
करण्यास मी तयार आहे. कृपया माझी उपरोक्त जमीन वर्ग – १ मध्ये रूपांतरीत करून
मिळावी.
वरील माहिती माझ्या माहितीप्रमाणे खरी व बरोबर आहे.
ठिकाण: अर्जदाराची सही
दिनांक:
·
सूचना: अर्जासोबत
(१) संबंधित जमिनीचे चालू सात-बारा, (२) संबंधित फेरफार,
(३) संबंधित जमीन प्रदानाची सनद किंवा प्रदान आदेश (४) शर्तभंग झाला असल्यास
तो नियमानुकूल केलेला आदेश (५) वार्षिक दरविवरणपत्र यांच्या स्वसांक्षांकीत
प्रती सादर कराव्या.
............................................................................................
२. जमीन धारकाचे नाव:
३. जमीन धारकाला जमीन प्रदान करण्यात आलेल्या
आदेशाचा
क्रमांक व दिनांक:
४. जमीन धारकाला प्रदान करण्यात आलेली जमीन
कब्जेहक्काने
प्रदान करण्यात आली आहे की भाडेपट्टयाने?
४-अ. जमीन धारकाला सदर जमीन कोणत्या
प्रयोजनासाठी प्रदान करण्यात आली होती?
५. जमिनीचा तपशील-
गावाचे नाव: तालुका:
जिल्हा: |
|||
अ.क्र. |
भूमापन क्रमांक |
क्षेत्र |
|
|
एकर |
आर |
|
१ |
२ |
३ |
|
|
|
|
|
|
|
|
|
६. संबंधित जमिनीचे चालू सात-बारा अर्जासोबत जोडले आहेत
काय?
ती व्यक्तीच
अर्जदार आहे काय?
९. सदर प्रदान जमिनीवर वारस नोंद झाली आहे काय?
९-अ. असल्यास, फेरफार क्रमांक आणि वारसदारांची नावे:
(जरूर तर स्वतंत्र कागद
जोडावा)
१०. सदर प्रदान जमिनीबाबत शर्तभंग झाला आहे/होता काय?
नियमानुकूल करण्यात आला आहे काय?
सक्षम
अधिकार्याचे पदनाम:
आदेश
क्रमांक:
दिनांक:
बाहेरील शेतीच्या कारणासाठी प्रदान करण्यात
आली आहे काय?
शेती व
नाविकास विभागात स्थित आहे काय?
बाहेरील बिन-शेतीच्या
कारणासाठी प्रदान करण्यात आली आहे काय?
वापरासाठी
प्रदान करण्यात आली होती काय?
१४-अ. असल्यास, कब्जेहक्काने की भाडेपट्टयाने?
१६. सदर जमीन सहकारी गृहनिर्माण संस्थेला
प्रदान
करण्यात आली होती काय?
भोगवटयात
आहे काय?
इतकी रक्कम
अधिमूल्य म्हणून अदा करण्यास अर्जदार तयार आहे काय?
अव्वल कारकूनचा अभिप्राय आणि सही
तहसीलदारचा अभिप्राय आणि सही
bb
Rate This Article
या लेखात, आम्ही आपणाला प्रतिबंधीत सत्ताप्रकार/भाडेपट्टयाने प्रदान जमिनी मालकी हक्काने देणे. याबाबत माहिती दिली आहे आम्हाला आशा आहे की, तुम्हाला ती आवडली असेल. माहिती आवडली असेल तर, सदरची माहिती तुमच्या मित्रांनाही शेअर करा.
आपले महसूल कायद्याविषयक प्रश्न विचारण्यासाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या. आणि आमच्या टेलिग्राम चॅनेललाही आजच जॉईन व्हा. Website Link Telegram Channel Link धन्यवाद !