उत्तर: भारतीय वारसा कायदा, १९२५, कलम २ (एच) अन्वये मृत्यूपत्राची व्याख्या दिली आहे. आणि याच कायद्याच्या भाग ६ मध्ये कलम ५७ पासून मृत्युपत्राबाबत तरतुदी दिलेल्या आहेत. भारतीय वारसा कायदा, १९२५, कलम १५२ अन्वये, फक्त स्वत:च्या मालकीच्या मिळकतीचे किंवा मिळकतीतील स्वत:च्या हिश्शाचेच मृत्यूपत्र करता येते.
तसेच स्वत:च्या मालकीच्या मिळकतीची स्वेच्छेने विल्हेवाट लावण्याचा हक्कही आहे. मृत्यपत्र करणार्या व्यक्तीला, त्याच्या हयातीत, त्याच्याच मृत्यपत्रात नमुद मिळकतीची विल्हेवाट लावण्याचा पूर्ण हक्क आहे. वरील प्रकरणात फेरफार नोंदवितांना मूळ मृत्युपत्रातील मजकूर, मृत्यपत्र करणार्याने जमीन विकल्याचा उल्लेख आणि उर्वरीत क्षेत्राचा सविस्तर उल्लेख करून, मृत्यपत्र करणार्या व्यक्तीच्या नावे आज जितकी जमीन शिल्लक आहे त्याची नोंद ज्याच्या नावे मृत्यपत्र करून दिले आहे त्याच्या नावे करावी.
डॉ. संजय कुंडेटकर
बी.ए., एन.डी., डी.मॅग., एम.बी.ए.,
एम.डी., पीएच.डी.
उपजिल्हाधिकारी,
महाराष्ट्र शासन, (महसूल विभाग)
Rate This Article
या लेखात, आम्ही आपणाला एका व्यक्तीने मृत्युपूर्वी २०१२ साली त्याच्या नातवास मृत्युपत्राने ३.०० हेक्टर आर जमीन दिली, त्यानंतर २०१५ मध्ये त्यानेच, त्याच जमिनीपैकी १.०० हेक्टर क्षेत्राची दुसऱ्या व्यक्तीस विक्री केली. २०१६ मध्ये मृत्यपत्र करणार्याचा मृत्यू झाल्यानंतर आज नातवाने ३.००हेक्टर चे मृत्युपत्र फेरफार नोंदविण्यासाठी दाखल केले आहे. परंतु मृत्यपत्र करणार्याच्या नावे फक्त २.०० हेक्टर जमीन शिल्लक आहे. या प्रकरणात काय कार्यवाही करावी.. याबाबत माहिती दिली आहे आम्हाला आशा आहे की, तुम्हाला ती आवडली असेल. माहिती आवडली असेल तर, सदरची माहिती तुमच्या मित्रांनाही शेअर करा.
आपले महसूल कायद्याविषयक प्रश्न विचारण्यासाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या. आणि आमच्या टेलिग्राम चॅनेललाही आजच जॉईन व्हा. Website Link Telegram Channel Link धन्यवाद !