उत्तर: मृत्युपत्र न करता मयत झालेल्या व्यक्तीचा कायदेशीर वारस कोण किंवा सात किंवा अधिक वर्षे परागंदा असलेल्या व्यक्तीचा कायदेशीर वारस कोण याबाबत संभ्रम असल्यास दिवाणी न्यायालयाकडून वारस दाखला (Succession Certificate) मिळवावा लागतो.
यासाठी मयत व्यक्तीच्या कायदेशीर वारसाने संबंधित दिवाणी न्यायालयात दावा दाखल करावा. दाव्यात, दावा करणार्याचे नाव, पत्ता, रेशन कार्ड पॅन कार्ड, मयत व्यक्तीशी असलेले नाते, मयत व्यक्तीचे अन्य वारस आणि त्यांचे पत्ते, पॅन कार्डस्, रेशन कार्ड, वंशावळ, मयताचा मृत्यू दाखला आणि मयत व्यक्तीच्या नावावर असलेली सर्व स्थावर व जंगम मालमत्ता यांचा तपशील नमुद असावा.
अर्जावर कोर्ट फी अधिनियम, 1870 अन्वये आवश्यक ती कोर्ट फी अदा करावी. दावा दाखल झाल्यानंतर, न्यायालय 45 दिवस मुदतीची नोटीस वर्तमान पत्रात प्रसिध्द करते. जर त्याबाबत कोणाचीही तक्रार प्राप्त झाली नाही तर वादीच्या नावे वारस दाखला दिला जातो. या सर्व प्रक्रियेला अंदाजे 5 ते 7 महिन्यांचा कालावधी लागतो.
डॉ. संजय कुंडेटकर
बी.ए., एन.डी., डी.मॅग., एम.बी.ए.,
एम.डी., पीएच.डी.
उपजिल्हाधिकारी,
महाराष्ट्र शासन, (महसूल विभाग)
Rate This Article
या लेखात, आम्ही आपणाला न्यायालयाकडून वारस दाखला मिळविण्याची प्रक्रिया कशी असते ?. याबाबत माहिती दिली आहे आम्हाला आशा आहे की, तुम्हाला ती आवडली असेल. माहिती आवडली असेल तर, सदरची माहिती तुमच्या मित्रांनाही शेअर करा.
आपले महसूल कायद्याविषयक प्रश्न विचारण्यासाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या. आणि आमच्या टेलिग्राम चॅनेललाही आजच जॉईन व्हा. Website Link Telegram Channel Link धन्यवाद !