हिबा - हिबानामा
१) प्रस्ताव/घोषणा (Ijab) (Offer/Declaration):- दात्यामार्फत (donor) म्हणजेच ज्याने हिबा द्यायचे
ठरविले आहे त्याने,
तो कोणाला आणि काय बक्षीस देत
आहे याची घोषणा करणे किंवा तसा प्रस्ताव ठेवणे आवश्यक आहे. ही घोषणा स्वेच्छेने
आणि स्पष्ट शब्दात असावी. संदिग्ध शब्दात (ambiguous words) केलेली घोषणा अवैध
ठरते. तसेच
धमकीमुळे किंवा बळजबरीमुळे अथवा अयोग्य, अनधिकृत प्रभावाखाली
किंवा फसवणूक करून दिलेला/घेतलेला 'हिबा' अवैध ठरतो.
२) स्वीकार (qabtil) (Acceptance):- ज्याला असे बक्षीस/हिबा मिळणार आहे (donee) त्याने 'हिबा' चा स्वीकार केला पाहिजे.
'हिबा' चे
किमान दोन साक्षीदार असावे. 'हिबा'च्या बदल्यात कोणताही मोबदला अपेक्षीत नाही.
अ) तो सज्ञान (adult) असावा: 'हिबा' देणारा पुरूष किंवा स्त्री दाता
(donor) सज्ञान
असावा. त्याचे वय अठरा वर्षापेक्षा जास्त असावे. तो जर न्यायालयाने नेमलेल्या
पालकाच्या देखरेखीखाली असेल तर वयाच्या एकवीस वर्षानंतर त्याला सज्ञान समजण्यात
येते. अज्ञानाने दिलेला 'हिबा' अवैध ठरेल.
तथापि,
'हिबा' नंतर एखाद्या मुस्लिम व्यक्तीने मुस्लिम धर्माचा त्याग केला तरी, त्याने
मुस्लिम असतांना दिलेला 'हिबा' अंमलात राहील.
ज्याला
'हिबा' मिळणार आहे (donee) ती व्यक्ती कोणत्याही धर्माची, लिंगाची, वयाची किंवा मानसिकतेची असू
शकेल. मुस्लिम धर्मिय व्यक्तीला,
हिंदू, ख्रिश्चन किंवा अन्य बिगर मुस्लिम व्यक्ती, पुरूष, स्त्री, अज्ञान व्यक्ती,
वेडसर व्यक्तीच्या हक्कात 'हिबा' करता येईल.
¿ कायद्याने स्थापित व्यक्ती (Juristic Person): कायद्याने स्थापित व्यक्ती म्हणजे कायद्याद्वारे स्थापन झालेले महामंडळ, नोंदणीकृत संस्था, विद्यापीठ, शाळा, मस्जिद इत्यादी. यांचे जैविक अस्तित्व नसले तरीही कायदा यांना व्यक्ती (person) मानतो. कायद्यानुसार 'व्यक्ती' या संज्ञेत फक्त जैविक व्यक्तीच नव्हे तर कायद्याने स्थापित व्यक्तींचाही समावेश होतो. कायद्याने स्थापित व्यक्ती या सज्ञान (adult) आणि स्वस्थचित्त (of sound mind) मानल्या जातात. कायद्याद्वारे स्थापित अशा व्यक्तींचे काही हक्क (rights) असतात व त्यांच्यावर काही कर्तव्ये (duties) सोपविलेली असतात. अशा कायद्याने स्थापित व्यक्तींच्या लाभात केलेला 'हिबा' वैध असतो. अशा 'हिबा' चा स्वीकार, या संस्थांचे प्रबंधक किंवा सक्षम अधिकारी करतात.
क)
वडील
ख)
वडीलांचा व्यवस्थापक
ग)
वडीलांचे वडील
घ)
वडीलांच्या वडीलांचा व्यवस्थापक
वडीलांच्या
उपस्थितीत, वडीलांचा व्यवस्थापक किंवा वडीलांचे वडील किंवा वडीलांच्या
वडीलांचा व्यवस्थापक 'हिबा' चा स्वीकार करू शकणार नाही. वरील अग्रक्रमाचे
काटेकोरपणे पालन व्हावे.
¿ गर्भस्थ आपत्य (Child in Womb): गर्भात असलेल्या आपत्याच्या हक्कात 'हिबा' करता येतो. यावेळी प्रमुख अट आहे की, असे आपत्य 'हिबा' करतांना आईच्या गर्भात जीवंत असावे आणि असे गर्भात असलेले आपत्य (en ventur sa mere) 'हिबा' च्या दिनांकापासून सहा महिन्याच्या आत जीवंत जन्मले पाहिजे. गर्भस्थ आपत्य जरी अस्तित्वात नसले तरी कायदा त्याला जीवंत व्यक्ती मानतो. असे आपत्य जर कोणत्याही कारणामुळे जीवंत जन्मले नाही किंवा 'हिबा' करतांना आईच्या गर्भात जीवंत नसेल तर असा 'हिबा' रद्द/अवैध ठरेल.
१) जर पतीने पत्नीला किंवा पत्नीने
पतीला 'हिबा' दिलेला असेल तर.
२) जर 'हिबा' देणार आणि घेणार हे
एकमेकांशी प्रतिबंधित नातेसंबंधांनी संबंधित असतील तर.
३) जर 'हिबा' 'सदका' म्हणून
(धार्मिक कामासाठी) दिला असेल तर.
४) जर 'हिबा' घेणार (donee) मयत झाला असेल तर.
५) जर 'हिबा' म्हणून स्वीकारलेली वस्तू, 'हिबा' घेणार (donee) याने विकल्यामुळे, बक्षीस दिल्यामुळे किंवा अन्य कारणामुळे त्याच्या ताब्यातून निघून गेली असेल तर.
६) जर 'हिबा' म्हणून दिलेली वस्तू
गहाळ झाली असेल किंवा नष्ट झाली असेल तर.
७) जर कोणत्याही कारणामुळे 'हिबा'
म्हणून दिलेल्या वस्तूचे मूल्य वाढले असेल तर.
८) जर 'हिबा' म्हणून दिलेल्या
वस्तूचे स्वरूप ओळखता येणार नाही इतके बदलले असेल तर.
(उदा. गव्हाचे पीठात रूपांतर)
९) जर दात्याने (donor) 'हिबा'च्या बदल्यात काही मोबदला स्वीकारला असेल तर.
याबाबत
बराच संभ्रम आहे. विविध न्यायालयांनी याबाबत परस्पर विरोधी मते व्यक्त केलेली आहेत.
मुस्लिम कायद्यान्वये
'हिबा' हा तोंडीसुध्दा असू शकतो. त्यामुळे तोंडी 'हिबा' नोंदणीकृत असावा असे
बंधन नाही.
´ 'हिबा' संदर्भात मा. न्यायालयांचे काही महत्वपूर्ण निकाल:
ü मा. सर्वोच्च न्यायालय, हफीजाबीबी
व इतर वि. शेख फरीद (मयत) व इतर,
दिनांक
५५.२०११.
या
प्रकरणात निकाल देतांना, परिच्छेद क्रमांक २८ मध्ये, मालमत्ता हस्तांतरण
अधिनियम १८८२, कलम १२९ च्या तरतुदीचा अर्थ अपरिहार्य प्रतिबंध (sine qua non) असा
मानण्यात येऊ नये.
ʻʻSection 129 Transfer of Property Act, excludes the rule of
Mahomedan law from the purview of Section 123, which mandates that the gift of
immovable property must be affected by a registered instrument as stated
therein. However, it cannot be taken as a sine qua non in all cases that
whenever there is writing about a Mahomedan gift of immovable property, there must be registration thereofʼʼ
रिट
याचिका क्र. १८४३२००९, दि. १०.११.२००९,
प्रतिवादीने
दाखल केलेला दस्तऐवज अनोंदणीकृत असल्यामुळे कनिष्ठ न्यायालयाने
तो पुरावा म्हणुन दाखल करून घेण्यास नकार
दिला.
कायदेशीरपणा: - दस्तऐवजाचे अवलोकन असे दर्शविते की, तो दस्त मुस्लिम कायद्यानुसार एक भेट किंवा हिबा आहे - मालमत्ता हस्तांतरण कायद्याचे कलम १२३ अन्वये तो अनिवार्यपणे नोंदणीयोग्य नाही - मुल्लाच्या तत्त्वांमध्ये असेही नमूद केले आहे की, मुस्लिम देणगीदाराने लेखी स्वरूपात केलेली भेट अनिवार्यपणे नोंदणी करण्यायोग्य नाही – सदर गिफ्ट डीड हे देणगीदाराच्या घोषणेचे स्वरूप आहे, सदर गिफ्ट डीडद्वारे तिन्ही आवश्यक बाबी पूर्ण झाल्यामुळे, प्रतिवादीच्या नावे दिलेली भेट पूर्ण आणि अपरिवर्तनीय बनली आहे.
Writ Petition No.1843 of 2009, 10th November, 2009.
Mulla's Principle of Mahomedan Law Ss.149, 150(3) -
Transfer of Property (1882), S.123 - Registration Act (1908 Ss.17, 49 - Civil
P.C. (1908), Gift - Document filed by defendant, Court refused to exhibit the
same for want of registration –
Legality – Perusal of document shows that it is a Gift or Hiba under Mahomedan Law - Not being a u/s.123 of Transfer of Property Act it is not compulsorily registerable - S.150(3) of Mulla's principles also states that a gift made by Mahomedan donor in writing not compulsorily registerable - Court ought to have exhibited the document concern. The gift deed ......is a form of declaration by the donor and not an instrument of gift as contemplated under Section 17 of the Registration Act.
As all the three essential requisites are satisfied by
the gift deed ........., the gift in favour of defendant
became complete and irrevocable. ʼʼ
मुस्लीम कायद्यानुसार, भेटवस्तूची घोषणा आणि स्वीकृती ही मौखिक असू शकते. जिथे भेटवस्तू लिखित
स्वरूपात दिली जाते, त्याला हिबानामा म्हणतात.
हे गिफ्ट-डीड (हिबानामा) स्टॅम्प-पेपरवर असणे आवश्यक नाही
आणि ते प्रमाणित किंवा नोंदणीकृत असणे आवश्यक नाही.
हिबा तोंडी बनवला जाऊ शकतो. लेखन आवश्यक नाही. देणगीदार
कोणत्याही प्रकारच्या मालमत्तेची भेटवस्तू, कोणत्याही मूल्यमापनाची, तोंडी किंवा एक करार लिहून
घोषित करू शकतो. मुस्लिम कायद्यानुसार, मालमत्ता जंगम असो वा
स्थावर असो, भेटवस्तूच्या वैधतेसाठी लेखन आवश्यक नाही.
मालमत्ता हस्तांतरण कायद्याचे कलम १२३ अन्वये स्थावर मालमत्तेची भेट लेखी आणि
नोंदणीकृत असणे आवश्यक आहे, ही तरतुद मुस्लिमांनी दिलेल्या
भेटवस्तूंना लागू होत नाही.
A Hiba may be made orally. Writing is not necessary. The
donor may declare the gift of any kind of property, of any valuation, either
orally or write a deed. Under Muslim Law, writing is not necessary for the
validity of gift whether property is movable or immovable. Section 123 of the
Transfer of Property Act which provides that gift of immovable property must be
in writing and registered, is not applicable to gift made by Muslims.
महोमेदन कायद्याच्या कलम १४७ अन्वये, जंगम किंवा
स्थावर मालमत्तेच्या भेटीच्या वैधतेसाठी लेखन आवश्यक नाही. कलम १४८ अन्वये हे आवश्यक आहे की, भेटवस्तूच्या वैधतेसाठी देणगीदाराने
भेटवस्तूच्या विषयावरील सर्व मालकी आणि प्रभुत्व/स्वारस्य पूर्णपणे
काढून घेतले पाहिजे.
कलम १४९ अन्वये, भेटवस्तूच्या वैधतेसाठी तीन गोष्टी आवश्यक असाव्यात, (i) भेटवस्तूची घोषणा देणगीदाराकडून, (ii) देणगीदाराकडून किंवा त्याच्या वतीने व्यक्त किंवा निहित, देणगी स्वीकारणे आणि (iii) कलम १५० मध्ये नमूद केल्याप्रमाणे देणगीदाराकडून देणगीच्या
विषयाचा ताबा देणे.
जर या अटींचे पालन केले जात असेल तर ती भेट पूर्ण होते. कलम १५० अन्वये, वैध भेटवस्तूसाठी भेटवस्तूचा ताबा देणे आणि देणगीदाराकडून प्रत्यक्षात किंवा रचनात्मकपणे भेटवस्तू ताब्यात घेणे. असा उल्लेख आहे.
हिबा किंवा भेट म्हणजे " तात्काळ
आणि कोणतीही देवाण-घेवाण न करता मालमत्तेचे हस्तांतरण" एका व्यक्तीद्वारे दुसऱ्या
व्यक्तीकडे, आणि त्या व्यक्तीने किंवा त्याच्या वतीने भेट स्वीकारली
जाणे.
‘भेट’ किंवा ‘हिबा’ याचा शब्दशः
अर्थ असा आहे की, अशी वस्तू देणे ज्यातून ज्या व्यक्तीच्या नावे भेटवस्तू दिली जाते
त्याला लाभ मिळू शकेल. हिबा किंवा गिफ्टची व्याख्या कन्झ उल दाकिकमध्ये खालील
शब्दांत दिली आहे: "हिबा म्हणजे दुसर्या व्यक्तीला त्याचे मत विचारात न घेता
मालमत्तेचा मालक बनवणे."
देणगीदाराने दिलेली भेट देणगी
घेणार्याने स्वत: किंवा त्याच्या वतीने अधिकृत केलेल्या एखाद्या व्यक्तीने
स्वीकारणे, परंतु भेट
देणाऱ्याने त्याच्याकडून भेट दिलेल्या मालमत्तेतील त्याचे सर्व हक्क आणि अधिकार स्वेच्छेने
पूर्णपणे सोडले पाहिजेत.
भेट तत्त्वाचा आधार पैगंबराचे म्हणणे
आहे, "आपसात
भेटवस्तूंची देवाणघेवाण करा जेणेकरून प्रेम वाढेल."
ही भेट मृत्युपत्र मानले जाऊ शकत नाही कारण मृत्युपत्राचा अंमल मृत्युपत्र करणार्याच्या मृत्युनंतर दिला जातो. जेव्हा मालकी पूर्णपणे हस्तांतरित केली गेली आहे तेव्हा ती एक भेट आहे आणि जर त्यावर कोणतीही अट लादलेली असेल तर ते अवैध ठरेल. भेट स्वीकारली पाहिजे आणि कबूल केल्याप्रमाणे ताबा पूर्णपणे प्रदान केला पाहिजे.
(१) देणगीदाराकडून
भेटीची घोषणा (२) देणगी घेणाऱ्याने किंवा त्याच्या वतीने भेट
स्वीकारणे आणि (३) देणगीदाराकडून भेट देणगी घेणार्याच्या ताब्यात देणे. या अटी
पूर्ण झाल्यास, भेट प्रक्रिया पूर्ण होते.
महोमेदन कायद्याने विहित केलेल्या औपचारिकतेचे पालन केले गेले तर भेट वैध आहे जरी ती नोंदणीकृत दस्तान्वये दिली गेली नाही तरी. आणि जेथे लेखी दस्तान्वये भेट दिली जाते तो दस्त नोंदणीकृत नसला तरी चालेल परंतु कायद्यातील औपचारिकतेचे पालन न केल्यास, भेट वैध ठरणार नाही तर ती मालमत्ता हस्तांतरण कायदा कलम १२३ ला पात्र ठरेल.
स्थावर मालमत्तेचा ताबा असल्यास, देणगीदाराने स्वतःला त्या
मालमत्तेतुन पूर्णपणे दूर केले पाहिजे.
तोंडी दिली जाऊ शकते, तेव्हा तो व्यवहार लिखित दस्तऐवजाने बनवल्यामुळे त्याचे स्वरूप आणि वर्णन बदलला नाही.
महोमेदन कायद्यांतर्गत वैध भेट साठी
काय महत्त्वाचे आहे तर तीन आवश्यकतांचे पालन करणे. स्वरूप अभौतिक आहे. वैध भेट
असलेल्या तीनही आवश्यक बाबींची पूर्तता झाल्यास, भेटचा व्यवहार अवैध ठरविला जाणार नाही कारण
तो एका साध्या कागदावर लिहिलेला आहे.
A Hiba or gift is "a transfer of property, made immediately, and without any exchange," by one person to another, and accepted by or on behalf of the latter.
‘Gift’ or ‘Hiba’ literally means the giving away of such
a thing from which the person in whose favour the gift is made may draw benefit. The definition of Hiba or Gift has been
given in Kanz al Daquiq in the following words:
" Hiba is the making of another person owner of the corpus of property
without taking its consideration from him."
the enjoyment of the property is invalid. The gift must
be accepted and completed by such delivery of possession as the nature of the property admits.
Under Mahomedan Law writing is not essential for the
validity of a gift either of movable or immovable property. There are three essentials of a gift under Mahomedan
Law, namely, (1) a declaration of gift
by the donor; (2) an acceptance of the gift, express or implied, by or on
behalf of the donee, and (3) delivery of possession of the subject of
the gift by the donor to the donee. If these conditions are fulfilled, the gift is complete.
actually, or constructively. Only on the proof of these
essential conditions, the gift becomes complete and valid.
In case of possession of immovable property, the donor should completely divest himself physically of the subject of gift.
However, the donor may record the transaction of gift in writing. Merely because the gift is reduced to
writing by a Mahomedan instead of it having been made orally, such writing does not become a formal document or
instrument of gift. When a gift
could be made by Mahomedan orally, its nature and character are not changed because of it having been made by a written document.
are satisfied constituting a valid gift, the transaction
of gift would not be rendered invalid because it has been written on a plain piece of paper.
=
Rate This Article
या लेखात, आम्ही आपणाला हिबा - हिबानामा . याबाबत माहिती दिली आहे आम्हाला आशा आहे की, तुम्हाला ती आवडली असेल. माहिती आवडली असेल तर, सदरची माहिती तुमच्या मित्रांनाही शेअर करा.
आपले महसूल कायद्याविषयक प्रश्न विचारण्यासाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या. आणि आमच्या टेलिग्राम चॅनेललाही आजच जॉईन व्हा. Website Link Telegram Channel Link धन्यवाद !