ई-पीक पाहणी-
अद्ययावत सुधारणा
महाराष्ट्र
राज्यातील सर्वच तालुक्यात ʻई-पीक पाहणीʼ प्रणालीद्वारे पीक पाहणी करण्याची योजना
यशस्वीरित्या राबविण्यात येत आहे आणि यापुढेही दरवर्षी पीक पाहणीची प्रक्रिया ʻई-पीक
पाहणीʼ प्रणालीद्वारेच राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
त्यानुसार मागच्या वर्षी
आपण ʻई-पीक
पाहणीʼ मोबाइल-ऍपद्वारे
यशस्वीरीत्या पूर्ण केली आहे. मागील वर्षी ʻई-पीक पाहणीʼ मोबाइल-ऍप वापरतांना
आलेल्या अडचणी, खातेदार, तलाठी तसेच अन्य व्यक्तीकडून आलेल्या सूचना यांचा विचार करून, यावर्षी ʻई-पीक पाहणीʼ साठी योग्य त्या सुधारणांसह ʻई-पीक पाहणी-व्हर्जन -२ʼ या नावाने
अद्ययावत मोबाइल-ऍप उपलब्ध करून देण्यात आले आहे.
या वर्षीच्या ʻई-पीक पाहणीʼ मध्ये काय सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत त्याची थोडक्यात
माहिती घेऊ.
ही सर्व माहिती मा. जमाबंदी आयुक्त कार्यालय, राज्य समन्वयक, ई-पीक
पाहणी प्रकल्प
यांच्याकडून उपलब्ध करून देण्यात आली आहे.
१) Geo
Fencing:
जिओफेन्सिंग
हे एक असे तंत्रज्ञान आहे जे वास्तविक जगाच्या भौगोलिक क्षेत्राभोवती आभासी सीमा
परिभाषित करते. असे केल्याने, संबंधीत क्षेत्राची त्रिज्या (radius is established) निश्चित केली
जाते, जी जिओ-सक्षम फोन (geo-enabled phone)
मध्ये दृश्यमान होते.
ʻई-पीक पाहणी- व्हर्जन-२ʼ मोबाइल-ऍपमध्ये राज्यातील प्रत्येक गटाच्या मध्यबिंदू (centroid) चे अक्षांश व रेखांश
समाविष्ट करण्यात आले असून, शेतकरी ज्यावेळी ʻई-पीक पाहणीʼ करतांना
पिकाचा फोटो घेतील त्यावेळेस फोटो घेण्याच्या ठिकाणापासून त्या गटाच्या
मध्यबिंदू पर्यंतचे अंतर आज्ञावलीमध्ये
दिसणार आहे आणि शेतकरी ʻई-पीक पाहणीʼसाठी निवडलेल्या गटापासून दूर असल्यास त्यांना त्याबाबत संदेश ʻई-पीक पाहणी- व्हर्जन -२ʼ मोबाइल-ऍपमध्ये दर्शवण्यात येणार आहे. या सुविधेमुळे पिकाचा अचूक
फोटो घेतला आहे किंवा नाही हे निर्धारित करता येणार आहे.
२. शेतकऱ्यांद्वारे स्वयं प्रमाणन: शेतकऱ्यांनी
ʻई-पीक पाहणीʼ द्वारे नोंदविलेल्या पिकांबाबत
आज्ञावलीमध्ये स्वयंघोषणापत्र घेतले जाणार असून अशा रीतीने शेतकऱ्यांनी केलेली ʻई-पीक पाहणीʼ स्वयंप्रमाणित मानण्यात येऊन गाव नमुना
बारामध्ये प्रतिबिंबित होणार आहे.
३. किमान दहा टक्के पडताळणी तलाठीमार्फत: शेतकऱ्यांनी
वरील प्रमाणे केलेल्या ʻई-पीक पाहणीʼ पैकी दहा टक्के नोंदींची पडताळणी तलाठींमार्फत
करण्यात येणार असून त्यामध्ये, पिकाचा फोटो नसलेल्या नोंदी, चुकीचा फोटो असलेल्या
नोंदी, विहित अंतराबाहेरून घेतलेले फोटो अशा नोंदी, तलाठी यांनी पडताळणी करून, आवश्यक
असल्यास त्यात योग्य ती दुरुस्ती करून, त्या नोंदी सत्यापित करायच्या आहेत. त्यानंतर
त्या गाव नमुना बारामध्ये प्रतिबिंबीत होतील.
४) अठ्ठेचाळीस (४८) तासात खातेदारास स्वतः पीक
पाहणी दुरुस्तीची सुविधा: शेतकऱ्यांनी मोबाईलद्वारे नोंदविलेली ʻई-पीक पाहणीʼ नोंदविल्यापासून ४८ तासांमध्ये स्वतःहून
केव्हाही ʻएक वेळʼ दुरूस्त करता येईल.
५. किमान आधारभूत किंमत योजनेंतर्गत पिकाच्या
विक्रीसाठी संमती नोंदविण्याची सुविधा: ʻई-पीक पाहणी- व्हर्जन-२ʼ मोबाइल-ऍपमध्ये ʻई-पीक पाहणीʼ करतांनाच शेतकऱ्याला, ʻʻआपणास
किमान आधारभूत योजनेअंतर्गत विक्रीसाठी नोंदणी करावयाची आहे काय?ʼʼ असा प्रश्न विचारला
जाईल. शेतकऱ्याने ʻहोयʼ हा पर्याय निवडल्यास, संबंधीत सर्व शेतकऱ्यांची माहिती वेब
आज्ञावलीद्वारे पुरवठा विभागाला दिली जाईल. या माहितीच्याआधारे पुरवठा विभागाच्या
ʻकिमान आधारभूत किंमत योजनेअंतर्गतʻ अशा शेतकऱ्यांची नोंदणी सदर योजनेसाठी आपोआप
होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना खरेदी केंद्रांमध्ये जाऊन रांगेत उभे राहून नोंदणी
करण्याची आवश्यकता भासणार नाही.
६. मिश्र पिकांमध्ये मुख्य पिकासह तीन घटक पिके
नोंदवण्याची सुविधा: यापूर्वीच्या मोबाईल ऍपएमध्ये, मुख्य पीक व दोन दुय्यम
पिके नोंदविण्याची सुविधा उपलब्ध होती. मात्र क्षेत्रीय अधिकाऱ्यांच्या मागणीप्रमाणे
एक मुख्य पीक व तीन दुय्यम पिके नोंदविण्याची सुविधा ʻई-पीक पाहणी- व्हर्जन-२ʼ मोबाइल-ऍपमध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच
दुय्यम पिकांचा लागवडीचा दिनांक, हंगाम व क्षेत्र निवडण्याची सुविधादेखील उपलब्ध
करून देण्यात आली आहे. त्यामुळे दुय्यम पिकाची अचूक माहिती उपलब्ध होण्यास मदत
होणार आहे.
७. संपूर्ण गावाची पीक पाहणी पाहण्याची सुविधा: ʻई-पीक पाहणी- व्हर्जन-२ʼ मोबाइल-ऍपमध्ये, त्या गावातील खातेदारांनी नोंदविलेल्या ʻई-पीक पाहणीʼ ची माहिती पाहण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामुळे खातेदारांना
पीक पाहणीमध्ये दुरुस्ती करावयाची असल्यास, विहीत वेळेत तलाठी यांच्याकडे अर्ज दाखल
करणे शक्य होणार आहे.
८. ʻमदतʼ बटन: ʻई-पीक पाहणी- व्हर्जन-२ʼ मोबाइल-ऍपमध्ये ʻमदतʼ हे बटन नव्याने देण्यात आले आहे. या मोबाइल-ऍपद्वारे ʻई-पीक पाहणीʼ करतांना, वापरकर्त्याला येणाऱ्या अडचणींचे
निराकरण करण्यासाठी हे बटन देण्यात आले आहे. ʻमदतʼ या बटनावर क्लिक केल्यानंतर, वारंवार विचारल्या
जाणार्या प्रश्नांची (FAQ) उत्तरे
उपलब्ध होतील. तसेच
कायम पड क्षेत्र नोंदविणे, बांधावरची झाडे नोंदविणे, पिकांची माहिती नोंदविणे, गावाच्या
ʻई-पीक पाहणीची माहिती पाहणे इत्यादी बाबतची माहिती दृकश्राव्य क्लिप लिंक (audio-video clip
link)
चा
वापर करून उपलब्ध होईल. यामुळे शेतकरी हे मोबाइल-ऍप वापरताना येणाऱ्या अडचणी सोडवू शकतील.
९) अभिप्राय नोंदणीची सुविधा: ʻई-पीक पाहणी- व्हर्जन-२ʼ मोबाइल-ऍपमध्ये या मोबाइल-ऍप
बाबत अभिप्राय नोंदविण्याची व रेटिंग देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात
आली आहे.
१०) खाता अपडेट करा ही सुविधा: पीक
पाहणी हंगाम सुरू असताना, खात्यामध्ये काही बदल झाल्यास, (उदाहरणार्थ क्षेत्रात बदल) ʻई- फेरफार
प्रणालीतून खाता अपडेट करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यासाठी मोबाइल-ऍपमध्ये ʻखाता
अपडेट कराʼ बटनवर क्लिक करावे.
११) याशिवाय: राष्ट्रीय
स्तरावरील पीक पाहणी नोंदविताना ʻमागील हंगामातील पीक पाणी कायम ठेवण्याचीʼ सुविधा,
एकाच प्रकारची कायम पड नोंदविताना ʻएकापेक्षा जास्त गट क्रमांक निवडून एकाच वेळी
नोंदविण्याचीʼ सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
हंगाम
निहाय पीक पाहणी कालावधी
|
(१)
शेतकर्यांनी करावयाची पीक पाहणी
|
हंगाम
|
कालावधी
|
खरीप
|
१ ऑगस्ट ते
१५ ऑक्टोबर
|
रब्बी
|
१५ नोव्हेंबर
ते ३१ जानेवारी
|
उन्हाळी
|
१५ फेब्रुवारी
ते १५ एप्रिल
|
(२)
तलाठी स्तरावर करावयाची पीक पाहणी
|
खरीप
|
१६ ऑक्टोबर
ते १५ नोव्हेंबर
|
रब्बी
|
१ फेब्रुवारी
ते २८ फेब्रुवारी
|
उन्हाळी
|
१६ एप्रिल ते
१५ मे
|
टिप: एखाद्या हंगामामध्ये काही
कारणास्तव शेतकरी स्तरावरील पीक पाहणी करण्यासाठी मुदत वाढ देण्यात आल्यास
त्याप्रमाणे कार्यवाही करावी.
|
4तलाठी लॉग-इनमधून
पीक पाहणी नोंद दुरुस्त करण्यासाठी, त्या हंगामातील शेतकरी स्तरावरील पीक पाहणीसाठी
दिलेला कालावधी अधिक (+) तलाठी स्तरावरील पीक पाहणी साठी दिलेला
कालावधी अधिक (+) पंधरा दिवस असा कालावधी.
|
8 मंडळ
अधिकारी लॉग-इनमधून पीक पाहणी नोंद दुरुस्त करण्यासाठी, त्या हंगामातील शेतकरी
स्तरावरील पीक पाहणीसाठी दिलेला कालावधी अधिक (+) तलाठी स्तरावरील
पीक पाहणीसाठी दिलेला कालावधी अधिक (+) पंधरा दिवस असा कालावधी.
|
=
Rate This Article
या लेखात, आम्ही आपणाला ई-पीक पाहणी- अद्ययावत सुधारणा. याबाबत माहिती दिली आहे आम्हाला आशा आहे की, तुम्हाला ती आवडली असेल. माहिती आवडली असेल तर, सदरची माहिती तुमच्या मित्रांनाही शेअर करा.
आपले महसूल कायद्याविषयक प्रश्न विचारण्यासाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या. आणि आमच्या टेलिग्राम चॅनेललाही आजच जॉईन व्हा. Website Link
Telegram Channel Link धन्यवाद !