हक्कनोंद
चेक लिस्ट
अधिकार अभिलेखात विविध नोंदी
फेरफारनोंदवहीत नोंदवितांना खालील प्रमाणे
कागदपत्रे घ्यावीत.
अ.क्र. |
संपादनाचा
प्रकार |
आवश्यक
कागदपत्रे |
१ |
वारसा
हक्क, उत्तराधिकार नोंद |
w मृत्यु-दाखला - मूळ किंवा स्वसाक्षांकीत प्रत अथवा सक्षम न्यायालयाचे वारस प्रमाणपत्र w गाव नमुना सात-बारा उतार्याची चालू नक्कल w. गाव नमुना आठ-अ उतार्याची नक्कल w. मयत व्यक्तीचे नाव अधिकार अभिलेखात दाखल झालेल्या फेरफार
उतार्यांची नक्कल w सर्व वारसांच्या वयाच्या पुराव्याची स्व-साक्षांकीत प्रत w सर्व वारसांच्या ओळख पत्राची (आधार कार्ड/पॅन कार्ड, वाहन अनुज्ञप्ती इत्यादी.)
स्व-सांक्षांकीत प्रत w
वारसांबाबत विहित नमुन्यातील शपथपत्र-स्वयंघोषणापत्र w अर्जात नमुद सर्व वारसांबाबत वय,
पत्ता, दुरध्वनी/भ्रमण ध्वनी यांचा पुराव्यासह तपशील. w परदेशस्थ वारसाचा इ-मेल व पत्ता याचा पुरावा w वंशावळ w शिधापत्रिकेची
स्वसांक्षांकीत प्रत (असल्यास) w शक्य असल्यास,
पोलीस
पाटील/ग्रामसेवक/सरपंच किंवा गावातील
प्रतिष्ठीत व्यक्तीचा, मयत व्यक्तीला अर्जातील वारसांव्यतिरिक्त अन्य
वारस नसल्याचा जबाब. |
२ |
खरेदी/
बक्षीसपत्र/ गहाणखत/ भाडेपट्टा नोंद |
w अर्ज w संबंधित नोंदणीकृत दस्ताची प्रमाणीत
प्रत w सूची क्र. २ w शेतकरी पुरावा w अन्य धारण मिळकतींबाबत विस्तृत माहिती असलेले प्रतिज्ञापत्र/स्वयंघोषणापत्र w
सर्व हितसंबंधितांचा रहिवास पुरावा आणि संपर्क क्रमांक. |
३ |
हक्कसोडपत्र |
w अर्ज w नोंदणीकृत हक्कसोडपत्राची प्रमाणीत
प्रत w वंशावळ w मिळकतीतील हक्क व हिश्शाबाबत तसेच कोणकोणत्या
मिळकतीवरील हक्क सोडला आहे आणि कोणत्या मिळकतीवरील हक्क अबाधित ठेवला आहे
याबाबत खुलासा/जबाब/ प्रतिज्ञापत्र/स्वयंघोषणापत्र. w
सर्व हितसंबंधितांचा रहिवास पुरावा आणि संपर्क क्रमांक. |
४ |
मृत्युपत्र |
w अर्ज w मृत्यू दाखला- मूळ किंवा स्वसाक्षांकीत प्रत w
मृत्युपत्राची प्रमाणीत प्रत w मृत्युपत्रावर नमुद साक्षीदारांचे व लाभार्थीशिवाय अन्य वारस असल्यास त्यांचे पत्ते आणि संपर्क
क्रमांक. w वंशावळ w मृत्युपत्रान्वये
प्रदान केलेल्या मिळकतीचे कागदपत्र w मृत्युपत्र
खरे असल्याबद्दल व मयताशी नाते दर्शविणारे प्रतिज्ञापत्र |
५ |
खाजगी नोंदणीकृत वाटप |
w अर्ज w नोंदणीकृत वाटपत्राची प्रमाणीत प्रत w वाटप झालेल्या मिळकतीचे अधिकाराभिलेख |
६ |
म.ज.म.अ
कलम ८५ अन्वये वाटप |
w अर्ज w तहसिलदारांच्या आदेशाची प्रमाणीत प्रत w वाटप झालेल्या मिळकतीचे अधिकाराभिलेख |
७ |
विकसन
करार |
w अर्ज w नोंदणीकृत विकसनकराराची व संबंधित कागदपत्रांची प्रमाणीत
प्रत w
सूची क्र. २ w मूळ जमीन मालकाचा पत्ता आणि संपर्क क्रमांक. w
विकसन कराराबाबत प्रतिज्ञापत्र/स्वयंघोषणापत्र w संबंधित मिळकतीचे अधिकाराभिलेख w
सर्व हितसंबंधितांचा रहिवास पुरावा आणि संपर्क क्रमांक. . |
८ |
न्यायालयीन
आदेश |
w अर्ज w न्यायालयीन आदेशाची प्रमाणीत प्रत w सदर आदेश वैध असल्याबाबत व त्याविरूध्द अपील/स्थगिती
नसल्याबाबत प्रतिज्ञापत्र/स्वयंघोषणापत्र w
सर्व हितसंबंधितांचा रहिवास पुरावा आणि संपर्क क्रमांक. |
९ |
शासकीय
आदेश |
w अर्ज w शासकीय आदेशाची मूळ/प्रमाणीत प्रत w सदर आदेश वैध असल्याबाबत व त्याविरूध्द अपील/स्थगिती
नसल्याबाबत प्रतिज्ञापत्र/स्वयंघोषणापत्र
w सर्व हितसंबंधितांचा रहिवास पुरावा आणि संपर्क
क्रमांक. |
१० |
अपील
किंवा पुनरीक्षण प्राधिकार्याचा आदेश |
w अर्ज w आदेशाची प्रमाणीत प्रत w सदर आदेश वैध असल्याबाबत व त्याविरूध्द अपील/स्थगिती
नसल्याबाबत प्रतिज्ञापत्र/स्वयंघोषणापत्र
[महाराष्ट्र जमीन महसूल अधिकार
अभिलेख आणि नोंदवह्मा (तयार करणे व सुस्थितीत ठेवणे) नियम १९७१, नियम ३६ अन्वये, अपील आणि पुनरीक्षण
प्राधिकार्याने पारीत
केलेल्या आदेशाची नोंद, आदेशाव्दारे
परिणाम होणार्या
व्यक्तींवर नोटिसा न बजावता करण्यात येतील.] |
११ |
अकृषिक आदेशाची नोंद |
w अर्ज w शासकीय आदेशाची मूळ/प्रमाणीत प्रत w सदर आदेश वैध असल्याबाबत व त्याविरूध्द अपील/स्थगिती
नसल्याबाबत प्रतिज्ञापत्र/स्वयंघोषणापत्र w तालुका नमुना दोनमध्ये,
सदर आदेश नोंदविल्याचे तहसिलदारांचे पत्र. |
१२ |
रस्त्याची नोंद |
w अर्ज w आदेशाची मूळ/प्रमाणीत प्रत (म.ज.म.अ. कलम १४३ अन्वये नवीन रस्ता देतांना, तहसिलदारांनी
आदेशात स्पष्ट उल्लेख केला असेल तर अशा रस्त्याची नोंद ज्या खातेदाराच्या
भूमापन क्रमांकातून रस्ता देण्यात आला आहे त्याच्या गाव नमुना सातच्या इतर हक्कात
करता येईल.) |
१३ |
रस्ता खरेदीची नोंद |
w अर्ज w नोंदणीकृत खरेदी खताची प्रमाणीत प्रत w
सूची क्र. २ (खरेदी केलेल्या रस्त्याची नोंद ज्या खातेदाराच्या
भूमापन क्रमांकातून रस्ता खरेदी करण्यात आला आहे त्याच्या गाव नमुना सातच्या
इतर हक्कात करता करावी.) |
१४ |
कमी जास्त पत्रकाची नोंद |
क.जा.प. हा भूमि अभिलेख विभागाकडून प्राप्त होणारा अभिलेख
दुरूस्ती आदेश असतो. क.जा.प. ची नोंद कधीही इतर हक्कात करू नये. क.जा.प. मध्ये संपादन यंत्रणेची नोंद गाव नमुना सातच्या
कब्जेदार सदरीच करावी. तसेच क.जा.प. मध्ये
नमूद संपादीत क्षेत्र, गाव नमुना सातच्या लागवडीलायक क्षेत्रातून वजा करून ते
संपादीत क्षेत्र पोटखराब ‘ब’ मध्ये नोंदविण्यात यावे आणि क.जा.प. मध्ये नमूद
असल्याप्रमाणे आकारणीतील बदलाची नोंदही गाव नमुना सातमध्ये करावी. |
Ü प्रत्येक प्रतिज्ञापत्र/स्वयंघोषणापत्राच्या
शेवटच्या परिच्छेदात, ‘या प्रतिज्ञापत्र / स्वयंघोषणापत्रातील
मजकूर माझ्या माहितीप्रमाणे खरा आणि बरोबर
आहे’
असे
नमूद करावे.
आणि
त्याखाली शेवटी 'खोटे
प्रतिज्ञापत्र करणे हा भारतीय दंड
संहिता कलम १९१ अन्वये गंभीर गुन्हा असून असे कृत्य भारतीय दंड संहिता कलम १९३, १९९, २००, २०३ अन्वये
शिक्षेस पात्र आहे याची मला जाणिव आहे' असा उल्लेख
करणे बंधनकारक करावे. |
||
Ü वारसा हक्क, उत्तराधिकारबाबतच्या
प्रतिज्ञापत्र/स्वयंघोषणापत्रात उपरोक्त मजकूराच्या आधी 'याशिवाय कोणीही
वारस नाही आणि कोणताही वारस डावलला गेला नाही' असा उल्लेख
करणे बंधनकारक करावे. |
|||
Rate This Article
या लेखात, आम्ही आपणाला हक्कनोंद चेक लिस्ट. याबाबत माहिती दिली आहे आम्हाला आशा आहे की, तुम्हाला ती आवडली असेल. माहिती आवडली असेल तर, सदरची माहिती तुमच्या मित्रांनाही शेअर करा.
आपले महसूल कायद्याविषयक प्रश्न विचारण्यासाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या. आणि आमच्या टेलिग्राम चॅनेललाही आजच जॉईन व्हा. Website Link Telegram Channel Link धन्यवाद !