आपले महसूल कायद्याविषयक प्रश्न आमच्या वेबसाईटवर विचारावेत. 📌 Mahsul Guru 📌 YouTube Channel Link!
Posts

जन्‍म-मृत्‍यू नोंदणी कायदा सुधारणा - २०२३

Please wait 0 seconds...
Scroll Down and click on Go to Link for destination
Congrats! Link is Generated

 

जन्‍म-मृत्‍यू नोंदणी कायदा सुधारणा - २०२३

 सन २०१३ पर्यंत, जन्म-मृत्‍युबाबतची नोंदणी, जन्म-मृत्यू नोंदणी कायदा १९६९, कलम १३(३) आणि व महाराष्ट्र जन्म-मृत्‍यू नोंदणी नियम २०००, नियम ९(३) अन्‍वये जर एखादी जन्म अथवा मृत्युची घटना घडल्यापासून एक वर्षाच्या आत त्‍याची नोंदणी झाली नसेल, तर त्या कार्यक्षेतील कार्यकारी दंडाधिकारी (तहसिलदार) यांच्या आदेशाने जन्म-मृत्‍यू नोंदणी करण्यात येत होती.

 तथापि, मा. उच्‍च न्यायालय, मुंबई, नागपूर खंडपीठ यांनी फ्रीडम फर्मने, निन्सी मोहन बेबी मार्फत दाखल फौजदारी जनहित याचिका क्र. /२०१३ च्या संदर्भात दिनांक १७/१२/२०१३ रोजी पारीत केलेले आदेश आणि महाराष्ट्र शासन, विधी व न्याय विभाग, मंत्रालय, मुंबई यांचे इंग्रजी परिपत्रक क्र. ५९-१२ / एमआयएससी / २०१३/ए ब्रँच, दिनांक ३१/१२/२०१३ अन्‍वये यापुढे ज्या जन्म-मृत्यू घटनांची नोंदची घटना घडल्यापासून एक वर्षाच्या आत झाली नसेल, अशा घटनांच्या नोंदणीसाठी फक्त ‘प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी’ किंवा ‘महानगर दंडाधिकारी’ यांचेच आदेश ग्राहय मानण्यात यावेत असे आदेश पारीत करण्‍यात आले.

 याबाबत, राज्‍य आरोग्‍य माहिती व जीवन विषयक आकडेवारी कार्यालय, पुणे  यांनी त्‍यांचे पत्र जा.क्र. आमाजीआ/कक्ष ८३ / उशिरा नोंद सुधारीत आदेश / ५०४-३८/१४,

दिनांक २०.१. २०१४ अन्‍वये सर्व संबंधितांना कळविले आहे.

 सुधारणा कायदा, २०२३: कायदा आणि न्याय मंत्रालय, (विधी विभाग) नवी दिल्ली, यांनी    मा. राष्ट्रपतींची संमती मिळाल्‍यानंतर दिनांक ११.८.२०२३ रोजी, ‘‘जन्म आणि मृत्‍युची नोंदणी (सुधारणा) कायदा, २०२३’’ प्रसिध्‍द केला आहे आणि गृह मंत्रालय, रजिस्ट्रार जनरल यांचे कार्यालय, नवी दिल्ली यांनी दिनांक १३.९.२०२३ रोजीच्‍या राजपत्रानुसार, उक्‍त सुधारीत कायद्‍याच्‍या तरतुदी दिनांक १.१०.२०२३ पासून अंमलात येतील असे कळवले आहे.

 सुधारीत तरतुदी: ‘‘जन्म आणि मृत्‍युची नोंदणी (सुधारणा) कायदा, २०२३’’ यामधील सुधारीत तरतुदी पुढीलप्रमाणे आहेत.

 . () या कायद्याला जन्म आणि मृत्‍युची नोंदणी (सुधारणा) कायदा,  २०२३ म्हटले जाऊ शकते.

(२) केंद्र सरकार, अधिकृत राजपत्रातील अधिसूचनेद्वारे, नियुक्त करेल अशा तारखेपासून तो अंमलात येईल. (दिनांक १.१०.२०२३ पासून)

२. जन्म आणि मृत्यू नोंदणी कायदा, १९६९ (यापुढे प्रमुख कायदा म्हणून संदर्भित) मध्ये, "महानिबंधक (Registrar-General)" या शब्दासाठी जिथे जिथे तो येईल तिथे, "भारताचे महानिबंधक (Registrar General of India)" हे शब्द बदलले जातील.

. प्रमुख कायद्याच्या कलम , पोट-कलम () मध्ये.—

(i) खंड (अ) ला खंड (ab) म्‍हणले जाईल आणि त्‍यात आधी खालील कलमे समाविष्‍ट केली जातील,

(a) आधार क्रमांक (Aadhaar number), (याचा अर्थ आधार (आर्थिक आणि इतर सबसिडी, लाभ आणि सेवांचे लक्ष्यित वितरण) कायदा २०१६, कलम (अ) मध्ये अभिप्रेत असल्‍याप्रमाणेच असेल.)

(aa) "दत्तक (adoption)" (याचा अर्थ बाल न्याय (मुलांची काळजी आणि संरक्षण) कायदा, २०१५, कलम () मध्ये अभिप्रेत असल्‍याप्रमाणेच असेल.)

(ii) खंड () ला खंड (ba) म्हणले जाईल आणि त्‍यात आधी खालील कलमे समाविष्‍ट केली जातील,

(b) "डेटाबेस (database)" म्हणजे डेटाचे पध्‍दतशीर संकलन, सामान्यत: संगणक नेटवर्कवरून इलेक्ट्रॉनिक स्वरूपात संग्रहित केले जाते;'.

 ४. प्रमुख कायद्याच्या कलम मध्ये,-

(i) सामासीक शीर्षकामध्ये (marginal heading), "महानिबंधक, भारत (Registrar-General, India)" या शब्दांसाठी, "भारताचे महानिबंधक (Registrar General of India)" हे शब्द बदलले जातील;

(ii) पोट-कलम () मध्ये, "महानिबंधक, भारत (Registrar-General, India)" या शब्दांसाठी, "भारताचे महानिबंधक (Registrar General of India)" हे शब्द बदलले जातील;

(iii) पोट-कलम () मध्ये, "आणि सादर करील (and submit)" या शब्दांसाठी, "आणि नोंदणीकृत जन्म आणि मृत्‍युचा डेटाबेस सादर रील (and the database of registered births and deaths and submit)" हे शब्द बदलले जातील;

(iv) पोट-कलम () नंतर, खालील उप-कलमे समाविष्ट केले जातील,

"() भारताचे महानिबंधक राष्ट्रीय स्तरावर नोंदणीकृत जन्म आणि मृत्‍युंचा डेटाबेस जतन/देखभाल करतील आणि मुख्य निबंधक (Chief Registrars) आणि निबंधक (Registrars) यांना नोंदणीकृत जन्म आणि मृत्यूचा डेटा अशा डेटाबेसमध्ये सामाविष्‍ट करणे बंधनकारक असेल.

() कलम १७() च्या तरतुदीच्या अधीन राहून आणि केंद्र शासनाच्या पूर्व परवानगीने, उक्‍त पोट-कलम () अन्‍वये ठेवलेल्या नोंदणीकृत जन्म आणि मृत्‍यु नोंदणीचा डेटाबेस, विनंतीनुसार, खालील बाबतीत डेटाबेस तयार किंवा जतन/देखभाल करणार्‍या अधिकार्‍यांना उपलब्ध करून दिला जाऊ शकेल:-

(a) लोकसंख्या नोंदवही (Population Register)

(b) मतदार याद्या (Electoral Rolls)

(c) आधार क्रमांक (Aadhaar number)

(d) शिधापत्रिका (Ration card)

(e) पासपोर्ट (Passport)

(f) वाहन चालविण्याचा परवाना (Driving licence)

(g) मालमत्तेची नोंदणी (Property Registration)

(h) राष्ट्रीय स्तरावरील असे इतर डेटाबेस ज्यांना अधिसूचित केले जाईल, (such other databases at the National level as may be notified)

 आणि प्राधिकरण वेळोवेळी अधिसूचित केल्या जाणाऱ्या कालावधीत केलेल्या कारवाईची माहिती केंद्र शासनाला देईल.

परंतु, खंड (b) मधील मतदार याद्यांशी संबंधित डेटाबेस तयार करणे किंवा देखभाल करणे हे लोकप्रतिनिधी कायदा, १९५० च्या तरतुदींशी कोणताही पूर्वग्रह न ठेवता असेल."

 . प्रमुख कायद्याच्या कलम () नंतर, खालील पोट-कलमे समाविष्ट केली जातील:-

"(५) मुख्य निबंधक (Chief Registrar), भारताच्या महानिबंधकांनी मंजूर केलेल्या पोर्टलचा वापर करून जन्म किंवा मृत्‍युची नोंदणी करण्यासाठी आणि राज्य स्तरावर नोंदणीकृत जन्म आणि मृत्‍युचा एक एकीकृत डेटाबेस (unified database) जतन/देखभाल करण्यासाठी पावले उचलतील आणि अशा डेटाबेसमध्ये नोंदणीकृत जन्म आणि मृत्‍युचा डेटा पाठविणे (share) हे निबंधकांवर बंधनकारक असेल.

() कलम १७() च्या तरतुदीच्या अधीन राहून आणि राज्य शासनाच्‍या पूर्व परवानगीने, पोटकलम () अन्‍वये, नोंदणीकृत जन्म आणि मृत्‍युचा डेटाबेस राज्य स्तरावर विनंतीनुसार, राज्य स्तरावरील इतर डेटाबेसशी व्यवहार करणार्‍या प्राधिकरणास उपलब्ध करून देता येईल आणि प्राधिकरण राज्य शासनाला वेळोवेळी सूचित केल्या जातील अशा कालावधीत केलेल्या कारवाईची माहिती देईल.

परंतु मतदार याद्यांशी संबंधित डेटाबेस तयार करणे किंवा त्याची देखभाल करणे हे लोकप्रतिनिधी कायदा, १९५० च्या तरतुदींशी कोणताही पूर्वग्रह न ठेवता असेल."

 . प्रमुख कायद्याच्या कलम मध्ये,-

(i) पोट-कलम () मध्ये, -

(a) "त्‍या प्रयोजनार्थ ठेवलेल्‍या नोंदवहीमध्ये करील" या शब्दांनंतर, "इलेक्ट्रॉनिक किंवा अन्यथा" (electronically or otherwise) हे शब्द समाविष्‍ट केले जातील;

(b) ‘प्रत्‍येक निबंधक कलम ८ किंवा कलम ९ खाली’ या शब्द आणि आकड्‍यानंतर, "त्याच्या अधिकारक्षेत्रात झालेल्या जन्म आणि मृत्‍युच्या संदर्भात" (in respect of births and deaths which has taken place in his jurisdiction) हे शब्द समाविष्ट केले जातील;

 

(ii) पोट-कलम () मध्ये,—

(a) ‘‘मुख्‍य निबंधकाच्‍या पूर्व मान्‍यतेने निबंधकास दुय्‍यम निबंधकाची नियुक्ती करून...’’ च्‍या ऐवजी " दुय्‍यम निबंधकाची नियुक्ती करून आणि, कोणतीही आपत्ती किंवा साथीचा रोग पसरल्‍यास (disaster or epidemic), विशेष उप-निबंधकांची नियुक्ती करून" हे शब्द समाविष्‍ट केले जातील;

(b) खालील स्पष्टीकरण समाविष्ट केले जाईल:-

'स्पष्टीकरण: या पोट-कलमाच्‍या प्रयोजनार्थ, अभिव्यक्ती.—

(i) "आपत्ती (disaster)" चा अर्थ, आपत्ती व्यवस्थापन कायदा, २००५, कलम () मध्ये अभिप्रेत असल्‍याप्रमाणे असेल;

(ii) " साथीचा रोग" म्हणजे साथ रोग कायदा १८९७ (Epidemic Diseases Act 1897) मध्ये नमूद केलेला साथीचा रोग.

 

७. प्रमुख कायद्याच्या कलम ८(१) मध्ये,—

(i) सुरुवातीच्या मजकुरात

(a) "तोंडी किंवा लेखी (orally or in writing)" या शब्दांऐवजी "तोंडी किंवा लेखी स्वाक्षरी (orally or in writing with signature)" हे शब्द समाविष्‍ट केले जातील;

(b) "विविध तपशील (several particulars)" या शब्दांनंतर, "जन्‍माच्‍या बाबतीत, पालकांच्या आणि माहिती देणार्‍याच्‍या आधार क्रमांकासह, उपलब्ध असल्यास," (including the Aadhaar number of parents and the informant, if available, in case of birth) हे शब्द समाविष्‍ट केले जातील.

(ii) खंड (a) मध्ये, "पुरुष (male)" हा शब्द वगळण्यात येईल;

(iii) खंड (a) नंतर, खालील कलमे समाविष्ट केली जातील :-

(aa) गैर-संस्थात्मक दत्तक (non-institutional adoption), दत्तक पालकांच्या (the adoptive parents) संदर्भात;

(ab) मुलाच्या जन्माच्या संदर्भात, एकल पालक (single parent) किंवा अविवाहित आईला (unwed mother) तिच्या गर्भातून (from her womb), पालक (parent)

(ac) सरोगसीद्वारे (surrogacy) मुलाच्या जन्माच्या संदर्भात, जैविक पालक (biological parent)" (iv) खंड () नंतर, खालील कलमे समाविष्ट केली जातील:-

(da) विशेष दत्तक एजन्सीडून (Specialized Adoption Agency) दत्तक घेतलेल्या मुलाच्या बाबतीत, विशेष दत्तक एजन्सीची प्रभारी व्यक्ती (person in-charge).

स्पष्टीकरण. या कलमाच्या हेतूसाठी, "विशेष दत्तक एजन्सी" या अभिव्यक्तीचा अर्थ बाल न्याय (मुलांची काळजी आणि संरक्षण) कायदा, २०१५(Juvenile Justice (Care and Protection of Children) Act, 2015), कलम २(५७) मध्ये अभिप्रेत असलेल्‍या अर्थासमान असेल;

(db) कोणत्याही बाल संगोपन संस्थेमध्ये अनाथ किंवा परित्यक्त बालक (abandoned child) किंवा समर्पित केलेल्या मुलाच्या (surrendered child) संदर्भात, बाल संगोपन संस्थेचा प्रभारी किंवा काळजीवाहू व्यक्ती (person in-charge or caretaker).

स्पष्टीकरण: या खंडाच्या हेतूंसाठी, "परित्यक्त मूल" किंवा "बाल संगोपन संस्था" किंवा "अनाथ" किंवा "समर्पित केलेले मूल" या अभिव्यक्तींचा अर्थ, बाल न्याय (मुलांची काळजी आणि संरक्षण) कायदा २०१५, कलम २ पोट-कलम क्रमशः (), (), (४२) आणि ६० मध्ये अभिप्रेत असलेल्‍या अर्थासमान असेल.

(dc) सरोगसी क्लिनिकमध्ये सरोगसीद्वारे मुलाच्या जन्माच्या संदर्भात, सरोगसी क्लिनिकची प्रभारी व्यक्ती.

स्पष्टीकरण: या कलमाच्या हेतूंसाठी, "सरोगसी" आणि "सरोगसी क्लिनिक" या अभिव्यक्तींचा अर्थ, सरोगसी (नियमन) कायदा २०२१, [Surrogacy (Regulation) Act, 2021] कलम (), खंड

(zd) आणि (ze) मध्ये अभिप्रेत असलेल्‍या अर्थासमान असेल.

८. प्रमुख कायद्याच्या कलम १०() आणि () साठी, खालील पोट-कलमे बदलली जातील:-

(२) विशेष उपचार किंवा सामान्य उपचार देणाऱ्या कोणत्याही वैद्यकीय संस्थेमध्ये (any medical institution providing specialized treatment or general treatment,) मृत्यू झाल्यास, अशी प्रत्येक संस्था, मालकीचा विचार न करता (irrespective of ownership), आजारपणाच्या इतिहासासह, जर उपलब्‍ध असेल तर, मृत्‍युच्या कारणाचे प्रमाणपत्र, त्या व्यक्तीला नुकत्याच झालेल्या आजाराच्या वेळी त्‍यावर उपचार केलेल्‍या वैद्यकीय व्यवसायिकाच्‍या स्वाक्षरीने,  विहित नमुन्‍यामध्‍ये  निबंधकाकडे विनामूल्‍य पाठवेल आणि अशा प्रमाणपत्राची प्रत मयत व्‍यक्‍तीच्‍या जवळच्या नातेवाईकाला देईल. (Where death occurs in any medical institution providing specialized

treatment or general treatment, every such institution, irrespective of ownership, shall, free of charge, provide a certificate of the cause of death, including the history of illness, if any, signed by the medical practitioner who attended that person during his recent illness to the Registrar in such form as may be prescribed and provide a copy of such certificate to the nearest relative.)

(३) वैद्यकीय संस्थेव्यतिरिक्त इतर कोणत्याही ठिकाणी कोणत्याही व्यक्तीचा मृत्यू झाल्यास, आणि अशा व्यक्तीला, त्याच्या अलीकडील आजाराच्या वेळी, वैद्यकीय व्यवसायिकाने भेट दिली असेल, अशा वैद्यकीय व्‍यवसायिकाने, त्या व्यक्तीच्या मृत्‍युनंतर, मृत्‍युच्या कारणाचे प्रमाणपत्र, आजारपणाच्या इतिहासासह, जर उपलब्‍ध असेल तर, या कायद्यांतर्गत विहित केलेल्या नमुन्‍यात  ताबडतोब विनामूल्‍य जारी करावे आणि अशा मृत्‍युची माहिती देणे आवश्यक असलेल्या व्यक्तीला आवश्यकतेनुसार मृत्‍युची माहिती द्‍यावी आणि निबंधकाकडे पाठवावे." (In the event of death of any person occurring in any place other than medical institution, and such person was, during his recent illness, attended to by a medical practitioner, such medical practitioner shall, after the death of that person, free of charge, forthwith issue, a certificate of the cause of death, including the history of illness, if any, to the person required under this Act to give information concerning the death in such form as may be prescribed, and the person, on receipt of the certificate, shall deliver the same to the Registrar at the time of giving information of the death as required under this Act.”.

 

९. प्रमुख्य कायद्याच्या कलम ११ मध्ये, "निवासाची जागा, आणि जर तो लिहू शकत नसेल तर" या शब्दांऐवजी, "निवासाची जागा आणि जर तो लिहू शकत नसेल तर त्यावर त्याची स्वाक्षरी करेल." हे शब्द समाविष्‍ट केले जातील. (the words “place of abode, and, if he cannot write”, the words “place of abode and put his signature thereto, and, if he cannot write” shall be substituted).

 १०. प्रमुख कायद्याच्या कलम १२ ऐवजी, खालील कलम समाविष्‍ट केले जाईल:-

१२. निबंधक, जन्म किंवा मृत्‍युची नोंदणी पूर्ण होताच, परंतु सात दिवसांच्‍या आत, कलम किंवा कलम ९ अन्‍वये माहिती देणाऱ्या व्यक्तीला, अशा जन्म किंवा मृत्‍युशी संबंधित नोंदवहीचा विहित नमुन्‍यातील प्रमाणपत्राची प्रत, त्याच्या स्वाक्षरीने इलेक्ट्रॉनिक किंवा अन्य माध्‍यमातून विनामूल्य देईल."

(The Registrar shall, as soon as the registration of a birth or death has been completed, but not later than seven days, give, free of charge, electronically or otherwise under his signature, to the person who gives information under section 8 or section 9, a certificate extracted from the register relating to such birth or death in such form and manner as may be prescribed.)

 ११. प्रमुख कायद्यातील कलम १३() आणि () खालील प्रमाणे बदलली जातील:-

(२) कोणत्‍याही जन्म किंवा मृत्‍युची माहिती निबंधकास तीस दिवसांनंतर परंतु एक वर्षाच्या आत दिली जाईल तेव्‍हा, जिल्हा निबंधक किंवा अन्य सक्षम प्राधिकार्‍याच्‍या लेखी परवानगीने त्‍याची नोंदणी, विहित फी आकारून आणि विहित नमुन्‍यातील स्व-साक्षांकित दस्तऐवज सादर केल्यावर विहित रीतीने केली जाईल.

(Any birth or death of which delayed information is given to the Registrar after thirty days but within one year of its occurrence, shall be registered only with the written permission of the District Registrar or such other authority, on payment of such fee and on production of self-attested document in such form and manner as may be prescribed.)

(३) कोणताही जन्म किंवा मृत्यू, ज्याची विलंबित माहिती निबंधकास त्या घटनेच्या एक वर्षानंतर दिली जाईल, तर ती केवळ ज्या भागात जन्म किंवा मृत्यू झाला आहे त्या भागावर अधिकार क्षेत्र असलेल्‍या जिल्हा दंडाधिकारी किंवा उपविभागीय दंडाधिकारी यांच्‍या किंवा जिल्हा दंडाधिकारी यांनी प्राधिकृत केलेल्या कार्यकारी दंडाधिकारी यांनी, जन्म किंवा मृत्‍युच्या अचूकतेची पडताळणी केल्यानंतर पारीत केलेल्‍या आदेशान्‍वये आणि विहित केलेले शुल्क अदा केल्‍यानंतर नोंदविली जाईल.

(Any birth or death of which delayed information is given to the Registrar after one year of its occurrence, shall be registered only on an order made by a District Magistrate or Sub-Divisional Magistrate or by an Executive Magistrate authorized by the District Magistrate, having jurisdiction over the area where the birth or death has taken place, after verifying the correctness of the birth or death and on payment of such fee as may be prescribed.)

 

स्पष्टीकरण: या पोट-कलमच्या उद्देशांसाठी, "कार्यकारी दंडाधिकारी" या अभिव्यक्तीचा अर्थ फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३, कलम २०(१) अन्‍वये नियुक्त केलेला कार्यकारी दंडाधिकारी असा आहे.

फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३, कलम २०(१): प्रत्‍येक जिल्‍ह्‍यात आणि प्रत्‍येक महानगर क्षेत्रात, राज्‍य शासन, योग्‍य वाटतील तितक्‍या व्‍यक्‍ती ‘कार्यकारी दंडाधिकारी’ म्‍हणून नियुक्‍त करू शकेल आणि त्‍यांपैकी एका व्‍यक्‍ती'जिल्‍हा दंडाधिकारी' म्‍हणून नियुक्‍त रेल.

 

१२. प्रमुख कायद्याच्या कलम १६(१) मध्ये, "जन्म आणि मृत्‍युची नोंद" या शब्दांनंतर, "इलेक्ट्रॉनिक किंवा अन्यथा (electronically or otherwise)" हे शब्द समाविष्ट केले जातील.

 १३. प्रमुख कायद्याच्या कलम १७ मध्ये, -

(i) पोट-कलम () मध्ये, खंड (b) ऐवजी खालील खंड समाविष्‍ट केला जाईल:-

(b) अशा नोंदवहीतून विहित केलेल्या नमुन्‍यात आणि रीतीने जारी केलेले इलेक्ट्रॉनिक किंवा अन्यथा, जन्म किंवा मृत्‍युचे प्रमाणपत्र मिळवता येईल तथापि, कोणत्याही व्यक्तीला जारी केलेले, कोणत्याही मृत्‍युशी संबंधित, कोणतेही प्रमाणपत्र, नोंदवहीत नोंदवल्याप्रमाणे मृत्‍युच्‍या कारणासंबंधित तपशील उघड करणार नाही";

(ii) पोट-कलम () मध्ये, दोन्ही ठिकाणी नमूद "उतारा (extract)" या शब्दाऐवजी, "प्रमाणपत्र (certificates)" हा शब्द समाविष्‍ट केला जाईल;

(iii) पोट-कलम () नंतर, खालील पोट-कलम समाविष्ट केला जाईल:-

(३) इतर कोणत्याही प्रचलीत कायद्यामध्ये काहीही नमूद असले तरी, पोट-कलम () किंवा कलम १२ मध्ये संदर्भित प्रमाणपत्राचा वापर, जन्म आणि मृत्यू नोंदणी (सुधारणा) कायदा, २०२३ अंमलात आल्‍याच्‍या दिनांकानंतर जन्मलेल्या व्यक्तीची जन्मतारीख आणि जन्मस्थान सिद्ध करण्यासाठी खालील बाबतीत केला जाईल:-

(a) शैक्षणिक संस्थेत प्रवेश (admission to an educational institution);

(b) ड्रायव्हिंग लायसन्स जारी करणे (issuance of a driving licence);

(c) मतदार यादी तयार करणे (preparation of a voter list);

(d) विवाहाची नोंदणी (registration of a marriage);

(e) केंद्र शासन किंवा राज्य शासन किंवा स्थानिक संस्था किंवा सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम किंवा केंद्र शासन किंवा राज्य शासनाच्या अंतर्गत कोणत्याही वैधानिक किंवा स्वायत्त संस्थेमध्ये एखाद्या पदावर नियुक्ती;( appointment to a post in the Central Government or State

Government or a local body or public sector undertaking or in any statutory or autonomous body under the Central Government or State Government);

(f) पासपोर्ट जारी करणे (issuance of a passport);

(g) आधार क्रमांक जारी करणे (issuance of an Aadhaar number);

(h) केंद्र शासनाद्वारे निर्धारित केलेले इतर कोणतेही उद्दिष्ट (any other purpose as may be determined by the Central Government.)"

१४. प्रमुख कायद्याच्या कलम १८ मध्ये, "जिल्हा निबंधकाद्वारे (by the District Registrar)" या शब्दाऐवजी, "मुख्य निबंधकाच्‍या सर्वसाधारण किंवा विशेष आदेशान्‍वये (in general or special order by the Chief Registrar)" हे शब्द बदलले जातील.

 

१५. प्रमुख कायद्याच्या कलम २३ मध्ये, -

(a) पोट-कलम (१) मध्ये,—

(i) सुरुवातीच्या मजकुरात, "जर कोणतीही व्यक्ती" या शब्दांऐवजी, "कोणतीही व्यक्ती, पोट-कलम (IA) मध्ये निर्दिष्ट केलेली व्यक्ती वगळता [Any person, except the person specified in sub-section (1A)]" हे शब्‍द समाविष्‍ट केले जातील;

(ii) खंड (c) मध्ये, "अंगठ्याचा ठसा (thumb mark) " या शब्दांनंतर "किंवा यथास्थिती स्वाक्षरी, (or signature, as the case may be,)" हे शब्द समाविष्‍ट केले जातील;

(iii) "पन्नास रुपये (fifty rupees) या शब्दांऐवजी, "दोनशे पन्नास रुपये (two hundred

and fifty rupees)" हे शब्द समाविष्‍ट केले जातील;

(b) पोट-कलम () नंतर, खालील पोट-कलमे समाविष्ट केली जातील:-

(1A) जी कोणी व्‍यक्‍ती, कलम च्या पोट-कलम (), खंड (b), (c), (d), (da), (db), (dc) आणि (e) मध्ये निर्दिष्ट केलेली व्यक्ती आहे, ती-

(a) कोणतीही माहिती, जी देणे त्याचे कर्तव्य आहे, ती देण्यास वाजवी कारणाशिवाय अपयशी ठरला आहे; किंवा

(b) जन्म आणि मृत्‍युच्या कोणत्याही नोंदवहीमध्ये समाविष्ट करण्याच्या हेतूने, जी माहिती खोटी आहे किंवा खोटी असल्‍याचे त्‍याला माहित आहे तरीही अशी माहिती देतो; किंवा

(c) त्याचे नाव, वर्णन आणि राहण्याचे ठिकाण लिहिण्यास नकार देतो किंवा कलम ११ अन्‍वये आवश्‍यक त्‍या नोंदवहीमध्ये अंगठ्याची खूण किंवा स्वाक्षरी करण्‍यास नकार देईल अशी व्‍यक्‍ती, प्रत्येक जन्म किंवा मृत्‍युच्या संदर्भात एक हजार रुपयांपर्यंतच्या दंडास पात्र ठरेल";

(c) पोट-कलम () मध्ये,—

(i) "त्याच्या अधिकारक्षेत्रात (in his jurisdiction)" या शब्दांनंतर "किंवा कलम १२ अन्‍वये माहिती देणाऱ्यास प्रमाणपत्र देण्‍यास (or to give a certificate to the informant under section 12)" हे शब्द आणि आकडे समाविष्ट केली जातील;

(ii) "पन्नास रुपयापर्यंत" या शब्दांऐवजी "दोनशे पन्नास रुपये" हे शब्द समाविष्ट केले जातील;

 (d) पोट-कलम () ऐवजी खालील मजकूर समाविष्ट केला जाईल:-

() कोणतीही व्यक्ती, जी पोट-कलम () किंवा कलम १०(३) अन्‍वये आवश्यक असलेले प्रमाणपत्र प्रदान करण्यास किंवा देण्यास दुर्लक्ष करील किंवा नकार देईल किंवा कोणतीही व्यक्ती असे प्रमाणपत्र निबंधकाकडे देण्यास दुर्लक्ष करेल किंवा नकार देईल तर ती व्‍यक्‍ती रूपये पन्नास पर्यंतच्या दंडास पात्र ठरेल.";

(e) पोट-कलम (४) मध्ये,—

(i) "कोणतीही व्यक्ती" या शब्दाऐवजी "पोट-कलम (IA) मध्ये निर्दिष्ट केलेली व्यक्ती वगळता कोणतीही व्यक्ती" हे शब्‍द समाविष्ट केले जातील;

(ii) "दहा रुपये" या शब्दांऐवजी "अडीचशे रुपये" हे शब्द समाविष्ट केले जातील;

(f) पोट-कलम () नंतर, खालील पोट-कलमे समाविष्ट केले जातील:-

(4A) पोट-कलम (1A) मध्ये निर्दिष्ट केलेली कोणतीही व्यक्ती, जी वाजवी कारणाशिवाय, या कायद्याच्या कोणत्याही तरतुदीचे उल्लंघन करेल, ज्याच्या उल्लंघनासाठी या कलमात कोणत्याही दंडाची तरतूद केलेली नाही, ती प्रत्येक जन्म किंवा मृत्यूच्या संदर्भात रूपये एक हजार पर्यंत वाढू शकेल इतक्‍या दंडास पात्र ठरेल."

(g) पोट-कलम () मध्ये, "फौजदारी प्रक्रिया संहिता, १८९८" या शब्‍द आणि आकड्‍याऐवजी, "फौजदारी प्रक्रिया संहिता, १९७३" हे शब्द आणि आकडे समाविष्ट केले जातील.

 १६. प्रमुख कायद्याच्या कलम २४() मध्ये, "या कायद्यान्‍वये कार्यवाही" या शब्दांनी सुरू होणाऱ्या आणि "पन्नास रुपये" या शब्दांनी समाप्त होणाऱ्या भागासाठी, पुढील गोष्टी बदलल्या जातील:-

"या कायद्याखालील कार्यवाही,-

(a) कलम २३(१-अ) मध्ये निर्दिष्ट केलेली व्यक्ती वगळता, ज्याने या कायद्यांतर्गत गुन्हा केला आहे किंवा केल्याचा वाजवी संशय आहे अशा व्यक्तीकडून तडजोड म्‍हणून रुपये अडीचशे रुपयांपेक्षा जास्त नाही;

(b) कलम २३(१-अ) मध्ये निर्दिष्ट केलेली व्यक्ती, ज्याने या कायद्यांतर्गत गुन्हा केला आहे किंवा केल्याचा वाजवी संशय आहे अशा व्यक्तीकडून प्रत्येक जन्म किंवा मृत्यूच्या संदर्भात तडजोड म्‍हणून रुपये एक हजारांपेक्षा जास्त जास्त नाही;

 १७. प्रमुख कायद्याच्या कलम २५ नंतर, खालील कलम समाविष्ट केले जाईल:-

२५ए. () कोणत्याही कृतीने किंवा आदेशाने बाधीत झालेली कोणतीही व्यक्ती, -

(i) निबंधकाच्‍या कृती/आदेशाविरूध्‍द जिल्हा निबंधकाकडे अपील करू शकेल; किंवा

(ii) जिल्हा निबंधक यांच्‍या कृती/आदेशाविरूध्‍द, यथास्थिती अशा कृती/आदेशाच्या तारखेपासून किंवा असा आदेश मिळाल्यापासून तीस दिवसांच्या आत, मुख्य निबंधकांकडे विहित पध्‍दतीने आणि रीतीने अपील करू शकेल,.

(२) जिल्हा निबंधक किंवा मुख्य निबंधक, यथास्थिती, पोट-कलम (१) मध्ये नमूद केलेल्या अपीलवर, ते दाखल केल्याच्या तारखेपासून नव्वद दिवसांच्या आत निर्णय देतील."

 १८. प्रमुख कायद्याच्या कलम ३०(२) मध्ये,—

(i) खंड (d), (e) आणि (f) ऐवजी खालील कलमे समाविष्‍ट केली जातील:-

(d) कलम १०(२) आणि १०() अन्‍वये मृत्‍युच्या कारणाचे प्रमाणपत्राचे स्वरूप;

[the form of certificate of the cause of death under section 10(2) and (3)]

(e) कलम १२ अन्‍वये जन्म किंवा मृत्‍युचे प्रमाणपत्र ज्या नमुन्‍यात आणि पद्धतीने दिले जाऊ शकते; (the form and manner in which the certificate of birth or death may be given under section 12)

(f) जन्म किंवा मृत्‍युच्या नोंदणीसाठी आणि कलम १३(२) अन्‍वये स्व-साक्षांकित दस्तऐवज तयार करण्याच्या नमुना आणि पद्धतीसाठी परवानगी देऊ शकेल असे प्राधिकरण;" [the authority which may grant permission for registration of a birth or death and the form and manner of production of self-attested document under section 13 (2)];

 (ii) खंड (g) नंतर, खालील कलमे समाविष्ट केली जातील:-

(ga) कलम १७(१), खंड (b) अन्‍वये जन्म किंवा मृत्‍युचे प्रमाणपत्र ज्या नमुन्‍यात आणि पद्धतीने मिळू शकते;

(gb) कलम २५ए(१) अन्‍वये अपील दाखल करण्याचा नमुना आणि पद्धत;

(iii) खंड (i) मध्ये, "उतारा" शब्दासाठी, "प्रमाणपत्र" हा शब्द समाविष्‍ट केला जाईल.

 

hœf

महसूल अधिकार्‍यांसाठी महत्‍वाचे

जन्‍म आणि मृत्‍यू सुधारणा कायदा २०२३ चे  कलम ११ अन्‍वये, प्रमुख कायदा कलम १३(३) मध्‍ये केलेली दुरूस्‍ती महसूल अधिकार्‍यांसाठी महत्‍वाची आहे ज्‍याची तरतूद खालीलप्रमाणे आहे:

११. प्रमुख कायद्यातील कलम १३() आणि १३() खालील प्रमाणे बदलली जातील:-

कलम १३(२) कोणत्‍याही जन्म किंवा मृत्‍युची माहिती निबंधकास तीस दिवसांनंतर परंतु एक वर्षाच्या आत दिली जाईल तेव्‍हा, जिल्हा निबंधक किंवा अशा अन्य प्राधिकार्‍याच्‍या लेखी परवानगीने त्‍याची नोंदणी, विहित फी आकारून आणि विहित नमुन्‍यातील स्व-साक्षांकित दस्तऐवज सादर केल्यावर विहित रीतीने केली जाईल.

कलम १३(३) कोणताही जन्म किंवा मृत्यू, ज्याची विलंबित माहिती निबंधकास त्या घटनेच्या एक वर्षानंतर दिली जाईल, तर ती केवळ ज्या भागात जन्म किंवा मृत्यू झाला आहे त्या भागावर अधिकार क्षेत्र असलेल्‍या जिल्हा दंडाधिकारी किंवा उपविभागीय दंडाधिकारी यांच्‍या किंवा जिल्हा दंडाधिकारी यांनी प्राधिकृत केलेल्या कार्यकारी दंडाधिकारी यांनी, जन्म किंवा मृत्‍युच्या अचूकतेची पडताळणी केल्यानंतर पारीत केलेल्‍या आदेशान्‍वये आणि विहित केलेले शुल्क अदा केल्‍यानंतर नोंदविली जाईल.

 

यात लक्षात घ्‍यायची बाब अशी की,

१. कोणत्‍याही जन्म किंवा मृत्‍युच्‍या घटनेची नोंदणी एक वर्षानंतर निबंधकाकडे करायची असेल तर त्‍यासाठी सक्षम महसूल अधिकार्‍याचा ‘‘आदेश’’ आवश्‍यक असेल. (विहित केलेले शुल्क निबंधकाकडे अदा करायचे आहे.)

२. ज्या भागात जन्म किंवा मृत्‍युची घटना घडली आहे तो भाग त्‍या सक्षम महसूल अधिकार्‍याच्‍या अधिकार क्षेत्राखाली ( jurisdiction) असावा.

३. उक्‍त आदेश पारीत करण्‍याचे मूळ अधिकार क्षेत्र ‘‘जिल्हा दंडाधिकारी’’ (District Magistrate) किंवा ‘‘उपविभागीय दंडाधिकारी’’ (Sub Divisional Magistrate) यांचे आहेत.

४. जरूर तर जिल्हा दंडाधिकारी स्‍वत:चे उक्‍त आदेश पारीत करण्‍याचे अधिकार, राज्‍य शासनाने ज्‍या तहसिलदारची किंवा नायब तहसिलदार अथवा अन्‍य व्‍यक्‍तीची ‘कार्यकारी दंडाधिकारी’ म्‍हणून नियुक्‍ती केली आहे अशा व्‍यक्‍तीला प्रदान करता येतील.

५. उपविभागीय दंडाधिकारी यांनी स्‍वत:चे उक्‍त आदेश पारीत करण्‍याचे अधिकार प्रदान करण्‍याबाबत या कायद्‍यात स्‍पष्‍ट सूचना नाहीत.

६. दिनांक ४..१९८२ च्‍या गृह विभागाच्‍या विशेष परिपत्रकान्‍वये बृहन्‍मुंबई बाहेर नेमणूकीस असलेल्‍या सर्व निवासी नायब तहसिलदार आणि नायब तहसिलदार यांना 'कार्यकारी दंडाधिकारी' चे अधिकार तसेच फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३, कलम १४३ (सार्वजनिक उपद्रव पुन्‍हा न करणे/चालू न ठेवणे), १४४ (सार्वजनिक शांततेला बाधा न आणणे), आणि १७४ (अकस्‍मात मृत्‍यू प्रकरणी चौकशी) चे अधिकार प्रदान करण्‍यात आले आहेत.  

७. उक्‍त आदेश पारीत करण्‍यासाठी कोणताही नमुना सध्‍यातरी शासनाने विहित केलेला नाही.

८. उक्‍त आदेश पारीत करतांना, संबंधिताच्‍या जन्‍म किंवा मृत्‍युच्‍या घटनेचे पुरावे,

उदा.

अ. जन्‍म किंवा मृत्‍युची घटना ज्‍या वैद्‍यकीय संस्‍थेत घडली असेल त्‍या वैद्‍यकीय संस्‍थेचे किंवा संबंधित व्‍यक्‍तीवर उपचार करणार्‍या वैद्‍यकीय व्‍यवसायिक किंवा प्रभारी व्‍यक्‍तीचे प्रमाणपत्र

हा कायदा अंमलात आल्‍यानंतर [जन्‍माच्‍या बाबतीत सुधारीत कलम ८(१) अन्‍वये आणि मृत्‍युच्‍या बाबतीत सुधारीत कलम १०() आणि () अन्‍वये] दिलेले.

ब. अर्जदाराचे सत्‍यप्रतिज्ञेवर स्‍वयं-घोषणापत्र

क. जन्‍माच्‍या बाबतीत, जर जन्‍म घरातच झाला असेल तर प्रसुती करणार्‍या दाई अथवा प्रसुती करणार्‍या व्‍यक्‍तीचा जबाब किंवा स्‍वयं घोषणापत्र

९. ज्‍या स्‍थानिक स्‍वराज्‍य संस्‍थेच्‍या कार्यक्षेत्रात सदर जन्‍म किंवा मृत्‍यू झाला असेल त्‍या स्‍थानिक स्‍वराज्‍य संस्‍थेत सदर जन्‍म किंवा मृत्‍युची नोंद नाही असे संबंधीत स्‍थानिक स्‍वराज्‍य संस्‍थेचे पत्र.

१०. अर्जदाराचे सत्‍य प्रतिज्ञेवर स्‍वयं घोषणापत्र किंवा जबाब.

११. सक्षम अधिकार्‍यास आवश्‍यक आणि योग्‍य वाटतील असे अन्‍य पुरावे.

१२. अंतिम (जन्‍म किंवा मृत्‍यू प्रमाणपत्र (Final Birth or Death Certificate) हे विहित नमुन्‍यात निबंधकाकडून दिले जाईल.

hœf hœf

 

 

Rate This Article

या लेखात, आम्ही आपणाला जन्‍म-मृत्‍यू नोंदणी कायदा सुधारणा - २०२३. याबाबत माहिती दिली आहे आम्हाला आशा आहे की, तुम्हाला ती आवडली असेल. माहिती आवडली असेल तर, सदरची माहिती तुमच्या मित्रांनाही शेअर करा.

आपले महसूल कायद्याविषयक प्रश्न विचारण्यासाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या. आणि आमच्या टेलिग्राम चॅनेललाही आजच जॉईन व्हा. Website Link Telegram Channel Link धन्यवाद !

Getting Info...

About the Author

Deputy Collector in Revenue Dept. Government of Maharashtra

Post a Comment

Cookie Consent
We serve cookies on this site to analyze traffic, remember your preferences, and optimize your experience.
Oops!
It seems there is something wrong with your internet connection. Please connect to the internet and start browsing again.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.