आपले महसूल कायद्याविषयक प्रश्न आमच्या वेबसाईटवर विचारावेत. 📌Mahsul Guru📌

जन्म आणि मृत्‍यु नोंदणी आदेश प्रक्रिया

 

जन्म आणि मृत्‍यु नोंदणी आदेश प्रक्रिया

जन्म आणि मृत्‍युची नोंदणी (सुधारणा) कायदा, २०२३

अर्जाची तपासणी सूची

 

अनुक्रमांक;

अर्ज/का.वि. क्रमांक,

दिनांक

 

अर्जदाराचे नाव

 

अर्जदाराचा पत्ता

 

अर्जदाराचा संपर्क क्रमांक

 

अर्जदाराची मागणी

जन्‍म नोंदणी आदेश -  मृत्‍यू नोंदणी आदेश

(लागू नसेल ते खोडावे)

अर्जाची पडताळणी (योग्‍य पर्यायावर P खूण करावी)

अर्जावर योग्‍य किमतीचा कोर्ट फी स्‍टँप लावला आहे काय?

होय /नाही

अर्जावर ओळख म्‍हणून अर्जदाराने त्‍याचे अलीकडचे छायाचित्र लावले आहे काय?

होय /नाही

अर्जावर अर्धी आणि स्‍वत:च्‍या छायाचित्रावर अर्धी अशी स्‍वाक्षरी केली आहे काय?

होय /नाही

१०

स्‍थानिक स्‍वराज्‍य संस्‍थेकडून अर्जदाराला जन्‍म/मृत्‍यू दाखला मिळालेला नाही याबाबत त्‍याने काय पुरावा सादर केला आहे?

स्‍थानिक स्‍वराज्‍य संस्‍थेचा दाखला

विहित नमुन्‍यातील स्‍वयं-घोषणापत्र

११

जन्‍म/मृत्‍यू नोंदणी आदेश ज्‍याच्‍या नावे पाहिजे आहे त्‍याचे अर्जदारासोबत नाते काय?

(नाते लिहावे)

 

१२

जन्‍म/मृत्‍यू झाल्‍याबाबत जोडलेला पुरावा

वैद्‍यकीय दाखला

स्‍वयं-घोषणापत्र

अन्‍य पुरावे

१३

स्‍वत:ची ओळख म्‍हणून अर्जदाराने स्‍वत:चे छायाचित्र असलेला आणि स्‍व सांक्षांकीत असा काय पुरावा सादर केला आहे?

आधार कार्ड

पॅन कार्ड

वाहन चालविण्‍याचा परवाना

पासपार्ट

बँक पासबूक

१३-अ

उक्‍त पुराव्‍याचा क्रमांक

 

१४

ज्‍या नावे जन्‍म/मृत्‍यू नोंदणी आदेशाची मागणी केली आहे ते नाव

 

१५

ज्‍या नावे जन्‍म/मृत्‍यू  नोंदणी आदेशाची मागणी केली आहे त्‍याच्‍या वडिलाचे नाव

 

१६

ज्‍या नावे जन्‍म नोंदणी आदेशाची मागणी केली आहे त्‍याच्‍या आईचे नाव

 

१७

जन्‍म/मृत्‍यू चा अदमासे किंवा अचूक  दिनांक, महिना आणि वर्ष

 

१८

जन्‍म/मृत्‍यू चे ठिकाण

मौजे:

तालुका:

जिल्‍हा:

१९

ज्‍या नावे जन्‍म/मृत्‍यू नोंदणी आदेशाची मागणी केली आहे त्‍याचा/ची

धर्म:

जात:

राष्‍ट्रीयत्‍व:

२०

जन्‍माच्‍या बाबतीत, जर जन्‍म घरातच झाला असेल तर प्रसुती करणार्‍या दाई अथवा प्रसुती करणार्‍या व्‍यक्‍तीचा जबाब किंवा स्‍वयं घोषणापत्र

होय /नाही

२१

मृत्‍युच्‍या बाबतीत, जर मृत्‍यू घरातच झाला असेल तर शेवटी उपचार करणार्‍या वैद्‍यकीय अधिकार्‍याकडून प्राप्‍त मृत्‍युचा दाखला/जबाब किंवा स्‍वयं घोषणापत्र

होय /नाही

२२

जन्‍म/मृत्‍यू दाखल्‍यासाठी अर्जदार नोंदणी अधिकार्‍याकडे विहित शूल्‍क अदा करण्‍यास तयार आहेत काय?

होय /नाही

 

 

 

नाव:                                        नाव:                                            नाव:

महसूल सहायक                    अव्‍वल कारकुन                           नायब तहसिलदार

 

दिनांकीत स्‍वाक्षरी                दिनांकीत स्‍वाक्षरी                        दिनांकीत स्‍वाक्षरी

 


स्‍वयं-घोषणापत्र

 मा. तहसिलदार तथा तालुका दंडाधिकारी, तालुका ........, जिल्हा ....., यांचे कडे सादर

 विषय:  जन्म आणि मृत्‍युची नोंदणी (सुधारणा) कायदा, २०२३’’ च्‍या तरतुदीन्‍वये जन्‍म/ मृत्‍यू नोंदणी आदेश मिळणेबाबत.

 मी, अर्जदार नामे (संपूर्ण नाव)                       वय:        पत्ता:

  संपर्क क्रमांक:

या स्‍वयं घोषणाद्‍वारे सत्‍य प्रतिज्ञेवर असे घोषीत करतो की,

 माझा/झी (अर्जदासोबतचे नाते लिहावे) .......... नामे............. (संपूर्ण नाव) याचा/ हिचा जन्‍म/मृत्‍यू दिनांक .../.../.... रोजी मौजे ........, तालुका........., जिल्‍हा ......... येथे झाला आहे आणि त्‍याचा/तिचा  धर्म:......,  जात........., राष्‍ट्रीयत्‍व ........... आहे.

 ज्‍याचे नावे मी जन्‍म/मृत्‍यू नोंदणी आदेशाची मागणी केली आहे त्‍याच्‍या वडीलाचे नाव........... असे आहे/होते आणि त्‍याच्‍या/तिच्‍या आईचे नाव ........... असे आहे/होते.

 त्‍याच्‍या/तिच्‍या जन्‍म/मृत्‍यू समयी काही अपरिहार्य कारणांमुळे स्‍थानिक स्‍वराज्‍य संस्‍थेकडून किंवा अन्‍य सक्षम अधिकार्‍याकडून त्‍याच्‍या/तिच्‍या नावे जन्‍म/मृत्‍यू प्रमाणपत्र प्राप्‍त करता आले नाही हे मी शपथेवर कबूल करतो./ याबाबत मी संबंधीत स्‍थानिक स्‍वराज्‍य संस्‍थेचा दाखला सादर केला आहे.  

 आज उक्‍त जन्‍म/मृत्‍यू घटनेला एक वर्षापेक्षा अधिक काळ झाला आहे. काही कायदेशीर बाबींसाठी मला उक्‍त नातेवाईकाच्‍या नावे जन्‍म/मृत्‍यू नोंदणी आदेशाची आवश्‍यकता आहे.

 जर माझ्‍याकडे उक्‍त नातेवाईकाच्‍या नावे, मला आपण देत असलेल्‍या जन्‍म/मृत्‍यू नोंदणी आदेशाच्‍या  तारखे पूर्वीचे जन्‍म/मृत्‍यू प्रमाणपत्र आढळून आल्‍यास आपण दिलेला हा जन्‍म/मृत्‍यू नोंदणी आदेश रद्‍द समजण्‍यात येर्ईल याची मला जाणीव आहे आणि सदर बाब मला मान्‍य आहे.

 उक्‍त नातेवाईकाच्‍या जन्‍म/मृत्‍यूचा कोणताही पुरावा माझ्‍याकडे उपलब्‍ध नाही हे मी शपथेवर कबूल करतो.

जन्‍माच्‍या बाबतीत, उक्‍त नातेवाईकाचा जन्‍म घरातच झाला असल्‍याने, प्रसुती करणार्‍या दाई अथवा प्रसुती करणार्‍या व्‍यक्‍तीचा जबाब किंवा स्‍वयं घोषणापत्र मी सादर करीत आहे./

मृत्‍युच्‍या बाबतीत, उक्‍त नातेवाईकाचा मृत्‍यू घरातच झाला असल्‍याने, त्‍यांच्‍यावर शेवटी उपचार करणार्‍या वैद्‍यकीय अधिकार्‍याकडून प्राप्‍त मृत्‍युचा दाखला/त्‍यांचा जबाब किंवा त्‍यांचे स्‍वयं घोषणापत्र मी सादर करीत आहे.

आपणास अन्‍य काही जादा पुरावे आवश्‍यक असल्‍यास ते सादर करण्‍यासाठी मी बांधील आहे आणि मागणीनुसार मी तसे पुरावे सादर करण्‍यास तयार आहे.

विहित नमुन्‍यात जन्‍म/मृत्‍यू प्रमाणपत्र, नोंदणी अधिकार्‍याकडून प्राप्‍त करतांना आवश्‍यक ते शूल्‍क अदा करण्‍यास मी तयार आहे.  

या स्‍वयं-घोषणापत्रातील  उक्‍त मजकूर माझ्या माहितीप्रमाणे खरा आणि बरोबर आहे. यातील कोणतीही बाब चुकीची किंवा खोटी आढळल्‍यास मी, मा.द.वि. कलम १९९, २०० व २०३ तसेच त्‍या त्‍या वेळी अंमलात असलेल्‍या अन्‍य कायद्‍यान्‍वये आणि नियमान्‍वये कायदेशीर कारवाईस पात्र ठरेन याची मला जाणीव आहे आणि ते मला कबूल आहे.

 मी स्‍वयं-घोषणापत्र करणार्‍यास ओळखतो.

 ओळख देणार्‍याचे नाव:                                         स्‍वयं-घोषणापत्र करणार्‍याचे नाव

पत्ता/शिक्‍का:                                                     पत्ता:

दिनांकीत स्‍वाक्षरी                                               दिनांकीत स्‍वाक्षरी  

 

                                                    टिप्‍पणी:

............. शाखा

दिनांक:

 विषय: जन्म आणि मृत्‍युची नोंदणी (सुधारणा) कायदा, २०२३’’ च्‍या तरतुदीन्‍वये जन्‍म/ मृत्‍यू नोंदणी आदेश मिळणेबाबत.

 संदर्भ: जन्‍म आणि मृत्‍यू सुधारणा कायदा २०२३ चे  कलम ११ अन्‍वये, सन १९६९ चा प्रमुख कायदा कलम १३(३) मधील सुधारीत तरतूद. (पताका क्र.१)

 महोदय, सादर...

 अर्जदार नामे ...............,   वय........, रा. ............., यांचा जन्‍म/मृत्‍यू नोंदणी आदेशाची विनंती करणारा अर्ज, दिनांक.........    

 (१) संदर्भिय दुरूस्‍ती नुसार अर्जदार नामे ...............   रा. ............. यांनी जन्‍म/मृत्‍यू नोंदणी आदेशाची विनंती करणारा अर्ज, दिनांक.........   रोजी या कार्यालयात सादर केला आहे.

 (पताका क्र….)

 (२) अर्जदार यांचे/चा ............ (अर्जदासोबतचे नाते लिहावे) नामे (संपूर्ण नाव) ........ यांचा जन्‍म/मृत्‍यू दिनांक .......... रोजी झालेला आहे असे अर्जदाराचे म्‍हणणे आहे.

 (३) उक्‍त  जन्‍म/मृत्‍यू चे प्रमाणपत्र अर्जदाराने काही अपरिहार्य कारणांमुळे संबंधीत स्‍थानिक स्‍वराज्‍य संस्‍थेकडून किंवा अन्‍य सक्षम अधिकार्‍याकडून प्राप्‍त केलेले नाही असेही अर्जदाराने अर्जात सादर केले आहे. उक्‍त जन्‍म/मृत्‍यू घटनेला एक वर्षापेक्षा अधिक काळ झाला आहे. काही कायदेशीर बाबींसाठी अर्जदाराला त्‍याच्‍या उक्‍त नातेवाईकाच्‍या नावे जन्‍म/मृत्‍यू नोंदणी आदेशाची आवश्‍यकता आहे.

 (४) अर्जदाराच्‍या उक्‍त म्‍हणण्‍याच्‍या पृष्‍ठार्थ, अर्जदाराने शपथेवर सादर केलेल्‍या स्‍वयं-घोषणापत्राव्‍दारे कबूल केले आहे./ संबंधीत स्‍थानिक स्‍वराज्‍य संस्‍थेचा दाखला सादर केला आहे. (पताका क्र….)

 (५) अर्जदाराने अर्जासोबत खालील पुरावे सादर केले आहेत.

ए.                                                                          (पताका क्र.......)

 बी.                                                                         (पताका क्र.......)

 सी.                                                                         (पताका क्र.......)

 डी.                                                                         (पताका क्र.......)

  (६) जन्‍म आणि मृत्‍यू सुधारणा कायदा २०२३, कलम ११ अन्‍वये, सन १९६९ चा प्रमुख कायदा कलम १३(३) मध्‍ये केलेल्‍या दुरूस्‍तीन्‍वये कोणताही जन्म किंवा मृत्यू, ज्याची विलंबित माहिती निबंधकास त्या घटनेच्या एक वर्षानंतर दिली जाईल, तर ती केवळ ज्या भागात जन्म किंवा मृत्यू झाला आहे त्या भागावर अधिकार क्षेत्र असलेल्‍या जिल्हा दंडाधिकारी किंवा उपविभागीय दंडाधिकारी यांच्‍या किंवा जिल्हा दंडाधिकारी यांनी प्राधिकृत केलेल्या कार्यकारी दंडाधिकारी यांनी, जन्म किंवा मृत्‍युच्या अचूकतेची पडताळणी केल्यानंतर पारीत केलेल्‍या आदेशान्‍वये आणि विहित केलेले शुल्क अदा केल्‍यानंतर नोंदविली जाईल अशी तरतूद करण्‍यात आली आहे.

(७ ) उक्‍त तरतुदीत, जरूर तर जिल्हा दंडाधिकारी स्‍वत:चे उक्‍त आदेश पारीत करण्‍याचे अधिकार, राज्‍य शासनाने ज्‍या तहसिलदारची किंवा नायब तहसिलदार अथवा अन्‍य व्‍यक्‍तीची ‘कार्यकारी दंडाधिकारी’ म्‍हणून नियुक्‍ती केली आहे अशा व्‍यक्‍तीला प्रदान करता येतील असेही नमूद आहे आणि त्‍यानुसार, मा. जिल्हा दंडाधिकारी/ उप विभागीय दंडाधिकारी...............

यांनी त्‍यांचे उक्‍त अधिकार आदेश क्रमांक ........, दिनांक अन्‍वये तालुका दंडाधिकारी..... यांना प्रदान केले आहेत. (पताका क्र.......)

 (८) नमूद अर्जदार यांच्‍या अर्जानुसार, त्‍याची ज्‍याच्‍या नावे जन्‍म/मृत्‍यू नोंदणी आदेशाची मागणी केली आहे तो जन्‍म/मृत्‍यू ............... (कार्यालयाचे नाव नमूद करावे) या कार्यालयाच्‍या अधिकार क्षेत्रात घडलेला आहे. त्‍यामुळे उक्‍त जन्‍म/मृत्‍यू नोंदणी आदेश पारीत करण्‍याचे अधिकार या कार्यालयाला आहेत.  

 (९) कोणतेही प्रमाणपत्र देण्‍यासाठी करण्‍यात येणारी चौकशी ही महाराष्‍ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६, कलम २३८ अन्‍वये सामान्‍य चौकशी आहे, जी कोणत्याही महसूल किंवा भू-मापन अधिकार्‍या त्याची कायदेशीर कर्तव्ये बजावण्यासाठी, कोणत्याही प्रसंगी करणे आवश्यक वाटेल तेव्‍हा  करता  येते.

राज्य शासनाने किंवा अशी चौकशी करणार्‍या अधिकार्‍याच्या वरिष्ठ प्राधिकार्‍याने, त्यासाठी लागू असणारे जे सामान्य किंवा विशेष नियम विहित केले असतील त्या नियमांनुसार सामान्‍य चौकशी करता येते अशा नियमांन्वये ज्या मर्यादेपर्यंत नियंत्रण ठेवण्यात आले असेल त्या मर्यादेस अधीन राहून, आवश्यक त्या वस्तुस्थितीची खात्री करून घेण्यासाठी सार्वजनिक हित वृद्धिगंत करण्यासाठी जी रीत अधिकार्‍याच्या मते योग्य असेल त्या रीतीने सामान्‍य चौकशी चालविण्यात येते. विरूध्‍द पुरावे समोर आल्‍यास किंवा चौकशी अधिकार्‍यास योग्‍य वाटत असेल तर ते सामान्‍य चौकशीचे रुपांतर, रीतसर चौकशी मध्‍ये करु शकतात व ते चौकशी अधिकार्‍याचे स्‍वेच्‍छाधिन अधिकार आहेत आणि असे करणे कायदेशीर आहे.

त्‍यामुळे उक्‍त आदेश निर्गमीत करण्‍यासाठी वकीलांमार्फत अर्ज किंवा दावा सादर करण्‍याची आवश्‍यकता नाही असे मत आहे.

 (१०) उक्‍त प्रकरणात अर्जदाराने सादर केलेली कागदपत्रे, पुरावे आणि स्‍वयं-घोषणापत्र यांची छाननी केल्‍यानंतर, अर्जदाराने उक्‍त नातेवाईकाच्‍या नावे जन्‍म/मृत्‍यू प्रमाणपत्र संबंधीत स्‍थानिक स्‍वराज्‍य संस्‍थेकडून किंवा अन्‍य सक्षम अधिकार्‍याकडून प्राप्‍त केलेले नाही असे प्रथम दर्शनी दिसून येते.

 (११) अर्जदाराकडे, उक्‍त नातेवाईकाच्‍या नावे या जन्‍म/मृत्‍यू नोंदणी आदेशाच्‍या  तारखेच्‍या पूर्वीचे जन्‍म/मृत्‍यू प्रमाणपत्र आढळून आल्‍यास सदर जन्‍म/मृत्‍यू नोंदणी आदेशा रद्‍द समजण्‍यात येर्ईल याची अर्जदाराला जाणीव आहे आणि सदर बाब अर्जदाराला मान्‍य आहे तसेच अर्जदाराने सादर केलेल्‍या स्‍वयं-घोषणापत्रातील  मजकूर खरा आणि बरोबर आहे आणि त्‍यातील कोणतीही बाब चुकीची किंवा खोटी आढळल्‍यास अर्जदार, भा.द.वि. कलम १९९, २०० व २०३ तसेच त्‍या त्‍या वेळी अंमलात असलेल्‍या अन्‍य कायद्‍यान्‍वये आणि नियमान्‍वये कायदेशीर कारवाईस पात्र ठरेल ही बाब अर्जदाराने स्‍वयं-घोषणापत्रात कबूल केली आहे. (पताका क्र.......)

 (१२) अर्जदार, विहित नमुन्‍यात जन्‍म/मृत्‍यू प्रमाणपत्र, नोंदणी अधिकार्‍याकडून प्राप्‍त करतांना आवश्‍यक ते शूल्‍क अदा करण्‍यास तयार आहेत.  

अर्जदाराचा प्राप्‍त अर्ज, त्‍याने सादर केलेली कागदपत्रे, पुरावे आणि स्‍वयं-घोषणापत्र यांचा एकत्रित विचार करता, अर्जदाराला त्‍याने मागणी केल्‍यानुसार, त्‍याच्‍या ............ (अर्जदासोबतचे नाते लिहावे) .......... नामे (संपूर्ण नाव) ........ याच्‍या नावे जन्‍म/मृत्‍यू नोंदणी आदेश निर्गमित करण्‍यात हरकत नसावी असे येथील मत आहे.

 मान्‍य असल्‍यास टिप्‍पणीवर आणि आदेशाच्‍या प्रारूपवर स्‍वाक्षरी होणेस विनंती आहे.

 दिनांक .........

 महसूल सहायक (श्री. ..........)

 अव्‍वल कारकुन (श्रीमती. ........)

 नायब तहसिलदार (श्री...........)

 

तहसिलदार (श्री.........)

                                            प्रारूप आदेश

 तहसिलदार तथा तालुका दंडाधिकारी, तालुका         , जिल्हा          , यांचे कार्यालय.

 

आदेश क्र. ..........

दिनांक:

वाचा:

१. जन्‍म आणि मृत्‍यू सुधारणा कायदा २०२३, कलम ११ अन्‍वये, सन १९६९ चा प्रमुख कायदा कलम १३(३) मध्‍ये केलेली दुरूस्‍ती

२. अधिकार प्रदान आदेश क्र. य दिनांक

३. अर्जदार ................., यांचा जन्‍म/मृत्‍यू नोंदणी आदेशाची विनंती करणारा अर्ज, दिनांक.......    

h आदेश f

 ज्‍या अर्थी, जन्‍म आणि मृत्‍यू सुधारणा कायदा २०२३, कलम ११ अन्‍वये, सन १९६९ चा प्रमुख कायदा, कलम १३(३) मध्‍ये दुरूस्‍ती करण्‍यात आली आहे आणि त्‍यान्‍वये अर्जदार नामे ...............   रा. ............. यांनी त्‍यांचे/चा (अर्जदासोबतचे नाते लिहावे) .......... नामे (संपूर्ण नाव) ........... यांच्‍या/हिच्‍या नावे जन्‍म/मृत्‍यू नोंदणी आदेश मिळण्‍यास विनंती केली आहे.

 आणि ज्‍या अर्थी, उक्‍त अर्जदाराने सादर केलेली कागदपत्रे, पुरावे आणि स्‍वयं-घोषणापत्र यावरून माझी खात्री झाली आहे की, अर्जदाराचे/ची ................ (अर्जदासोबतचे नाते लिहावे) .......... नामे (संपूर्ण नाव) ............ यांच्‍या/हिच्‍या नावे जन्‍म/मृत्‍यू प्रमाणपत्र संबंधीत स्‍थानिक स्‍वराज्‍य संस्‍थेकडून किंवा अन्‍य सक्षम अधिकार्‍याकडून निर्गमीत करण्‍यात आलेले नाही आणि सदर जन्‍म/मृत्‍यू च्‍या घटनेला एक वर्षापेक्षा अधिक कालावधी झालेला आहे.

 त्‍या अर्थी, मी ...................., (नाव) तहसिलदार तथा तालुका दंडाधिकारी, तालुका         , जिल्हा          , मला, वाचा क्र. २ अन्‍वये प्रदान करण्‍यात आलेल्‍या अधिकाराचा वापर करून खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.

 १. अर्जदार ............., रा.......... यांचा विनंती अर्ज मान्‍य करण्‍यात येत आहे.

 २. जन्‍म- मृत्‍यू नोंदणी अधिकार्‍याने, उक्‍त अर्जदार यांच्‍या .............. (अर्जदासोबतचे नाते लिहावे) .......... नामे (संपूर्ण नाव) ........ यांच्‍या/हिच्‍या नावे जन्‍म/मृत्‍यू प्रमाणपत्र, विहित शूल्‍क वसूल करून निर्गमीत करावे.

 ३. अर्जदाराने सादर केलेली कागदपत्रे, पुरावे आणि स्‍वयं-घोषणापत्र हे किंवा यातील कोणताही मजकूर खोटा, बनावट आहे असे आढळून आल्‍यास सदर जन्‍म/मृत्‍यू नोंदणी आदेश रद्‍द समजण्‍यात येईल याची नोंद घ्‍यावी.

 ठिकाण:                                   मुद्रा                    तहसिलदार तथा तालुका दंडाधिकारी,                      

                                                                            तालुका         , जिल्हा          ,     

 प्रत:

१. संबंधीत स्‍थानिक स्‍वराज्‍य संस्‍था किंवा जन्‍म/मृत्‍यू प्रमाणपत्र देण्‍यास अन्‍य सक्षम अधिकारी

२. अर्जदार ..............................................

                                                             hœf

   

 

 

Comments

Archive

Contact Form

Send

Mahsul Guru

Subscribe YouTube Channel