आपले महसूल कायद्याविषयक प्रश्न आमच्या वेबसाईटवर विचारावेत. 📌Mahsul Guru📌

स्‍त्रीयांचा मालमत्ताविषयक अधिकार

 

स्‍त्रीयांचा मालमत्ताविषयक अधिकार

n हिंदू स्‍त्री:

हिंदू वारसा कायदा, कलम १५ अन्‍वये मृत्‍युपत्र न करता मयत झालेल्‍या हिंदू स्‍त्रीच्‍या मालमत्तेच्या वारसांची यादी आहे. या ठिकाणी मयत हिंदू स्‍त्रीला संबंधीत मालमत्ता कशी प्राप्‍त झाली हे बघणे महत्‍वाचे ठरते. कलम १५ () 'सामान्य मालमत्ते' शी म्हणजेच, स्व-अधिग्रहित मालमत्तेशी संबंधित आहे तर कलम १५ (), केवळ तिला वारस हक्‍काने मिळालेल्या मालमत्तेशी संबंधित आहे.

n ख्रिश्चन स्त्री:

भारतीय उत्तराधिकार कायदा, १९२५ अन्‍वये, मयत ख्रिश्चन स्त्रीच्‍या मालमत्तेपैकी एक तृतीयांश मालमत्ता विधुराला मिळते आणि शिल्लक मालमत्ता वंशजांमध्ये वाटली जाते. जर कोणतेही वंशज नसतील तर फक्त नातेवाईक, विधुर यांना अर्धी मालमत्ता मिळते आणि शिल्लक मालमत्ता नातेवाईकांमध्ये वाटली जाते. जर नातेवाईक नसतील तर विधुराला संपूर्ण मालमत्ता मिळते.

 n मुस्लिम स्‍त्री:

मुस्लिम कायद्यानुसार, स्व-अधिग्रहित आणि वडिलोपार्जित दोन्ही मालमत्ता समान मानल्या जातात आणि समान नियमांचे पालन करतात. कायदेशीर वारसांना भागधारक (sharers) आणि अवशेषांमध्ये (residuary) मध्‍ये विभागले गेले आहे, ज्यामध्ये भागधारकांना पहिला वाटा आणि अवशेषांना शिल्लक राहिलेला भाग मिळतो. जर स्त्रीला कोणत्याही नातेवाईकाकडून मालमत्ता वारसाहक्काने मिळाली असेल, मग ती पती, मुलगा, वडील किंवा आई असो, ती तिच्या हिश्श्याची पूर्ण मालक असते आणि ती त्याची विल्हेवाट लावू शकते. जर तिने मृत्‍युपत्र केले असेल तर ती तिच्या मालमत्तेतील एक तृतीयांशपेक्षा जास्त हिस्सा मृत्‍युपत्रान्‍वये देऊ शकत नाही आणि जर तिचा नवरा एकमेव वारस असेल तर ती त्‍याला मृत्‍युपत्रान्‍वये दोन तृतीयांश मालमत्ता देऊ शकते.

n सुनेचा मालमत्तेवरील अधिकार:

हिंदू उत्तराधिकार कायद्यान्‍वये सुनेचे मालमत्ता विषयक अधिकार अत्यंत मर्यादित आहेत. सासरच्या वडिलोपार्जित किंवा स्व-अधिग्रहित मालमत्तेवर सूनेचा अधिकार नाही. ती अशा मालमत्तेवर फक्त तिच्या पतीच्या मृत्‍युनंतर तिला वारसाहक्‍क आणि वाटा मिळण्‍याचा अधिकार असतो. पतीच्या मृत्यूनंतर, म्हणजे, विधवा म्हणून, सुनेचा तिच्या पतीच्या संपत्तीवर हक्क असतो. ही मालमत्ता एकतर वडिलोपार्जित किंवा स्व-अधिग्रहित असू शकते. मृत पतीची विधवा म्हणून तिला मिळालेला हक्क.

सुनेला, पतीसोबत वैवाहिक संबंध असेपर्यंतच एका घरात राहण्याचा अधिकार आहे. जर घर भाड्याचे असले तरीही तिला राहण्याचा हक्क आहे. जर मालमत्ता सासर्‍याची स्व-अधिग्रहित मालमत्ता असेल तर, पतिच्‍या मृत्‍युनंतर किंवा घटस्‍फोटानंतर तिला तिच्या सासऱ्याच्‍या घरात राहण्याचा अधिकार नाही.  हिंदू दत्तक आणि देखभाल कायदा, १९५६ अन्‍वये विधवा सुनेला तिच्या सासरकडून फक्त काही अटींनुसार पालनपोषण मिळण्‍याचा अधिकार आहे.

 n घटस्फोटित महिलेचा मालमत्तेवरील अधिकार:

घटस्फोटित स्त्री भरणपोषण आणि पोटगीची मागणी करू शकते परंतु तिच्या माजी पतीच्या मालमत्तेवर तिचा हक्‍क नसतो.  जर एखादी मालमत्ता संयुक्तपणे पती-पत्‍नीच्‍या मालकीची असेल, तर पत्नीने अशी मालमत्ता खरेदी करतांना दिलेले योगदान तिला सिद्ध करावे लागेल. मग महिलांसाठीच्या मालमत्ता कायद्यांनुसार, तिला केवळ उक्त मालमत्तेतील तिच्या योगदानापर्यंतच हिस्सा मिळू शकेल. औपचारिक घटस्फोटाशिवाय विभक्त झाल्यास, पत्नी आणि मुले पुरुषाच्या मालमत्तेवर वारसा हक्काने हक्कदार असतात, मग त्याने पुनर्विवाह केला असो वा नसो.

 n पुनर्विवाहित विधवेचा मालमत्तेवरील अधिकार:

विधवेने पुनर्विवाह केला तरीही तिचा, तिच्‍या मयत पतीच्‍या मालमत्तेवरील वारस हक्‍क कायम राहतो.

 n दुसऱ्या पत्नीचा मालमत्तेवरील अधिकार:

हिंदू विवाह कायदा १९५५ अन्‍वये बहुपत्नीत्व बेकायदेशीर मानले गेले आहे. एखाद्या पुरुषाला कोणत्याही वेळी एकापेक्षा जास्त कायदेशीर पत्नी ठेवता येत नाही. जर पुरुषाने आपल्या पत्नीच्या मृत्यूनंतर किंवा औपचारिक घटस्फोटानंतर पुनर्विवाह केला तर दुसरी पत्नी त्याच्या मालमत्तेची वर्ग एकची वारस आहे. जर तसे झाले नाही, तर दुसरी पत्नी मत पुरुषाच्या मालमत्तेवर हक्कदार नाही.

                                                hœf

 

 

 

Comments

Archive

Contact Form

Send

Mahsul Guru

Subscribe YouTube Channel