आपले महसूल कायद्याविषयक प्रश्न आमच्या वेबसाईटवर विचारावेत. 📌Mahsul Guru📌

स्‍वतंत्र मालमत्ता (separate property)

 

"स्‍वतंत्र मालमत्ता (separate property)"

मुल्ला यांच्या हिंदू कायद्याच्या तत्त्वांमध्ये, १२ वी आवृत्ती, पृष्ठ ३३७ वर खालील नऊ प्रकारे मिळवलेली मालमत्ता, स्वतंत्र मालमत्ता (separate property) किंवा अधिग्रहित करणाऱ्याची स्व-अधिग्रहित मालमत्ता (self-earned property) म्हणून निर्दिष्ट केलेली आहे. (AIR 1966 Madras Page 266)

 जी मालमत्ता संयुक्त (joint) नसते तीला स्वतंत्र (separate) मालमत्ता म्हणतात. ती मालमत्ता अशा प्रकारे संपादन करण्‍यात आली आहे की त्‍यावर ती संपादन करणार्‍या व्‍यक्‍तीशिवाय अन्‍य कोणाचाही अधिकार नसतो.

() संयुक्त कुटुंबाची असलेली परंतु संयुक्त कुटुंबाने गमावलेली मालमत्ता, नंतर त्‍या संयुक्त कुटुंबाच्‍या एखाद्‍या सदस्याने, संयुक्त कौटुंबिक निधीच्या मदतीशिवाय पुनर्प्राप्त केली तर ती त्याची स्वतंत्र मालमत्ता मानली जाईल.

 () एखाद्‍या हिंदू व्‍यक्‍तीला पित्याद्वारे, पितृ मालमत्तेतून स्‍नेहाने दिलेल्या भेटवस्तू किंवा मालमत्ता किंवा त्‍याच्‍या आजोबांनी, पणजोबांनी भेट म्‍हणून दिलेली मालमत्ता स्वतंत्र मालमत्ता असेल. तथापि, अशी भेट त्‍याच्‍या कुटुंबाच्या फायद्यासाठी (benefit) दिलेली नसावी.  

 () शासनाकडून अनुदान म्‍हणून मिळालेली किंवा प्रदान केली गेलेली मालमत्ता /संपत्ती स्‍वतंत्र मालमत्ता मानली जाईल.

 (४) जेव्‍हा संयुक्त कुटुंबातील सदस्य त्‍याचा स्‍वतंत्र व्यवसाय करून मोठ्या प्रमाणात पैसे कमवतो आणि मालमत्ता खरेदी करतो तेव्‍हा त्‍याने मिळविलेले सर्व उत्पन्न आणि मालमत्ता ही त्यांची स्वतंत्र मालमत्ता असेल.

मा. सर्वोच्‍च न्‍यायालयाने मकलियन सिंग वि. कुलवंत सिंग  या प्रकरणात असे निरीक्षण नोंदविले आहे की,

संयुक्त हिंदू कुटुंबातील एका पुरुष सदस्याने स्वत:च्या पगाराच्या उत्पन्नातून मालमत्ता खरेदी केली असेल तर अशी मालमत्ता त्‍याची स्वत:ची संपत्ती आहे. अशा मालमत्तेत उत्तराधिकाराने त्‍याच्‍या वारसदारांना वारसा मिळेल. अशा मालमत्तेला संयुक्त हिंदू कुटुंबाची मालमत्ता म्हणता येणार नाही.

() संयुक्त हिंदू कुटुंबाच्या विभाजनाचा भाग म्हणून हिंदू व्‍यक्‍तीने सहदायक (coparcener) म्‍हणून मिळविलेली कोणतेही मालमत्ता स्वतंत्र मालमत्ता मानली जाईल. जेव्‍हा एखादी हिंदू व्‍यक्‍ती, संयुक्त कुटुंबातील मालमत्तेत त्याला मिळालेल्‍या हिश्‍शाच्‍या आधारे काही मालमत्ता संपादन करेल तर ती मालमत्ता त्याची स्वतंत्र मालमत्ता मानली जाईल.

 () एकमेव हयात वारस म्‍हणून वारसाहक्‍काने मिळालेली मालमत्ता त्याची स्वतंत्र मालमत्ता मानली जाईल.

 (७) एका हिंदू व्‍यक्‍तीने स्वत:च्या प्रयत्नांद्वारे मिळवलेली मालमत्ता ही त्यांची स्वतंत्र मालमत्ता असेल कारण संयुक्त कुटुंबातील इतर सदस्यांच्‍या संयुक्त श्रमांशिवाय आणि संयुक्त कुटुंब मालमत्तेस नुकसान न करता ती प्राप्त केलेली असते.

 () शिक्षणाद्वारे किंवा व्‍यवसायाव्‍दारे किंवा तज्‍ज्ञ किंवा विशेष बुद्धिमत्तेद्वारे एकत्रित संयुक्त कुटुंबातील सदस्याने मिळविलेले कोणतेही उत्पन्न त्याची स्वतंत्र मालमत्ता मानले जाईल. (Hindu Gains of Learning Act 1930)

 (९) एखाद्या व्यक्तीला भाऊ, काका इत्यादीसारख्या दुय्‍यम नातेवाईकांकडून मिळालेली मालमत्ता स्‍वतंत्र मालमत्ता असेल ती वडिलोपार्जित मानली जाऊ शकत नाही.

 याशिवाय, जेव्‍हा एखादी व्यक्ती प्रतिकूल ताब्‍याने (adverse possession) मालमत्ता संपादन करेल तर ती मालमत्ता त्‍याची स्‍वतंत्र मालमत्ता आहे असे मानले जाईल.  

 हिंदू व्‍यक्‍ती एकावेळेस स्वतंत्र मालमत्ता आणि वडिलोपार्जित मालमत्ताही धारण करू शकतो. (मदनलाल फुलचंद जैन वि. महाराष्ट्र राज्य)  

 

hœf

 

 

 

Comments

Archive

Contact Form

Send

Mahsul Guru

Subscribe YouTube Channel