आपले महसूल कायद्याविषयक प्रश्न आमच्या वेबसाईटवर विचारावेत. 📌Mahsul Guru📌

मतदान आणि संबंधित तरतुदी

 

मतदान आणि संबंधित तरतुदी

n मतदारांच्या प्रवेशाचे नियमन

महिला व पुरुष मतदारांसाठी स्वतंत्र रांग असावी.

मतदारांच्‍या रांगेचे नियमन करणारा अधिकारी एका वेळी तीन किंवा चार मतदारांना, केंद्राध्‍यक्ष निर्देश देतील त्‍याप्रमाणे मतदान केंद्रात प्रवेश देईल. इतर मतदारांना बाहेर रांगेत उभे केले जाईल.

अशक्त, दिव्‍यांग, कडेवर मुल असणार्‍या महिला, ज्‍येष्‍ठ नागरिक या मतदारांना रांगेतील इतर मतदारांपेक्षा प्राधान्य दिले जाऊ शकते.

दोन महिला मतदारांनंतर एक पुरुष मतदाराला मतदान करण्याची मुभा दिली जाऊ शकते.

मतदान केंद्रांमध्ये राजकीय पक्षाचे नाव, चिन्ह किंवा घोषणा असलेल्या टोप्या, शाल, मफलर इत्यादी परिधान करण्यायोग्य वस्तूंना परवानगी दिली जाणार नाही. तथापि, कोणतेही चिन्ह किंवा घोषणा नसलेली साधी टोपी, शाल, मफलर प्रतिबंधित नाही.

n मतदान कक्षात कॅमेरा किंवा मोबाईल फोन

निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार केंद्राध्‍यक्षांना (Presiding Officers) त्यांचे मोबाईल फोन सायलेंट मोड (silent mode) मध्ये ठेवण्याची परवानगी आहे.

ज्‍या मतदान केंद्रावर सूक्ष्म निरीक्षक (Micro Observers) तैनात असतील तेथे सूक्ष्म निरीक्षकांना त्यांचे मोबाईल फोन सायलेंट मोडमध्ये ठेवता येतील.

वृत्तपत्र प्रतिनिधी छायाचित्रकारांनी शांतता सुव्यवस्था राखून मतदान केंद्राबाहेरील रांगेतील मतदारांचे छायाचित्र घेण्यास कोणतीही हरकत नाही. तथापि, राज्य शासनाच्या प्रसिद्धी कर्मचाऱ्यासह इतर कोणालाही निवडणूक आयोगाच्या प्राधिकारपत्राशिवाय मतदान केंद्रात प्रवेश करण्‍याची आणि मतदार मत नोंदवताना त्याचे छायाचित्र घेण्यास कोणत्‍याही परिस्थितीत अनुमती असणार नाही.

अन्‍य कोणत्‍याही मतदारास, मतदान कक्षात कॅमेरा किंवा मोबाईल फोन अनुज्ञेय नाही.

n मतदानासाठी खालील ओळखपत्रे अनुज्ञेय आहेत

मतदार ओळखपत्र            

डिजिटल लॉकरमधील संग्रहीत केलेली फोटोसह ओळखपत्रे

आधार कार्ड                    

मनरेगा योजना ओळखपत्र (फोटोसह)

बँक किंवा टपालाचे पासबुक (फोटोसह)        

पॅनकार्ड        

वाहन चालक परवाना

पासपोर्ट (अनिवासी भारतीयांसाठी मूळ पासपोर्ट आवश्यक)

भारतीय महानिबंधक आणि जनगणना आयुक्तांनी दिलेले स्मार्ट कार्ड (फोटोसह)

कामगार मंत्रालयाचे आरोग्य विमा स्मार्ट कार्ड (फोटोसह)

केंद्र किंवा राज्य शासनाचा निवृत्ती वेतनाचा फोटोसह असलेला दस्तऐवज

सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम, पब्लिक लिमिटेड कंपन्यांनी कर्मचाऱ्यांची (फोटोसह) ओळखपत्रे

आमदार, खासदार यांच्‍यासाठी, त्‍यांचे अधिकृत ओळखपत्र (फोटोसह) 

भारत सरकारच्या सामाजिक न्याय मंत्रालयाने दिव्यांग व्यक्तींना वितरीत केलेले फोटोसह विशेष ओळखपत्र

n मतदानासाठी अपात्र व्‍यक्‍ती

कोणत्याही मतदारसंघाच्या मतदार यादीत वेळोवेळी नाव नोंदवलेल्या प्रत्येक व्यक्तीला त्या मतदारसंघात मतदान करण्याचा अधिकार असेल तथापि,

लोकप्रतिनिधी कायदा १९५०, कलम १६ मध्ये नमूद केलेल्या कोणत्याही अपात्रतेच्या अधीन असणार्‍या कोणत्याही व्यक्तीला कोणत्याही मतदारसंघातील निवडणुकीत मतदान करता येणार नाही.

कोणत्याही व्यक्तीला एकाहून अधिक मतदारसंघात मतदान करता येणार नाही. एखाद्या व्यक्तीने एकाहून अधिक मतदारसंघात मतदान केले तर, अशा सर्व मतदारसंघांतील तिची मते निरर्थक ठरतील.

कोणत्याही व्यक्तीला त्याच मतदारसंघातील कोणत्याही निवडणुकीत एकापेक्षा जास्त वेळा मतदान करता येणार नाही, कोणत्‍याही मतदाराचे नाव मतदार यादीत एकापेक्षा जास्त वेळा नोंदवले गेले असेल आणि त्याने असे मतदान केल्‍यास, त्याची त्या मतदारसंघातील सर्व मते निरर्थक ठरतील.

लोकप्रतिनिधीत्‍व कायदा, १९५१, कलम ६२(५) अन्‍वये,

कोणतीही व्यक्ती कारावासाच्या शिक्षेखाली किंवा अन्यथा तुरुंगात बंदिस्त असल्यास किंवा पोलिसांच्या कायदेशीर कोठडीत असल्यास कोणत्याही निवडणुकीत मतदान करू शकणार नाही. परंतु, या उपकलम मधील कोणतीही गोष्ट सध्या लागू होणाऱ्या कोणत्याही कायद्याखाली प्रतिबंधात्मक नजर कैदेत असलेल्या व्यक्तीला लागू होणार नाही. अशी व्‍यक्‍ती टपाली मतदान करू शकेल.

या उपकलम मधील कोणतीही गोष्ट या कायद्यान्वये मतदारासाठी प्रॉक्सी म्हणून मतदान करण्यासाठी प्राधिकृत असलेल्या व्यक्तीला लागू होणार नाही.  

n मतदान केंद्रात प्रवेश करण्यास परवानगी असणाऱ्या व्यक्ती

मतदार               

मतदान अधिकारी             

कर्तव्यार्थ लोकसेवक

उमेदवार

उमेदवाराचा निवडणूक प्रतिनिधी 

उमेदवारांचा मतदान प्रतिनिधी (एकावेळी फक्‍त एक)

निवडणूक आयोगाने प्राधिकृत केलेल्या व्यक्ती

मतदारासोबत असलेले कडेवरील एखादे मूल

जे मदतीशिवाय चालू शकत नाहीत आणि मतदान करू शकत नाही अशा अंध अपंग मतदारासोबतच्या व्यक्ती

मतदान केंद्राध्यक्ष मतदारांची ओळख पटवण्याच्या किंवा अन्यथा मतदान घेण्यात ज्‍याला सहाय्य करण्याच्या प्रयोजनार्थ बोलवेल अशा इतर व्यक्ती.

मतदान केंद्राच्‍या आत, गणवेश परिधान केलेल्‍या पोलीसांना थांबता येणार नाही.

n मतदान प्रतिनिधींसाठी बैठक व्यवस्था

उमेदवारांतर्फे नियुक्‍त मतदान प्रतिनिधींची बैठक व्यवस्था अशा प्रकारे करण्यात यावी की त्यांना मतदारांची ओळख पटविणे, मतदान केंद्राध्यक्ष किंवा तिसरा मतदान अधिकारी यांच्या ज्या टेबलवर कंट्रोल युनिट (Control Unit) ठेवले आहे तेथील संपूर्ण कार्यवाही पाहण्याची आणि त्याचबरोबर मतदाराचे मतदान कक्षात जाणे मतदान कक्षात ठेवलेल्या मतदान युनिटवर मत नोंदवून बाहेर येणे हे पाहण्याची पुरेशी संधी मिळेल.

मतदान प्रतिनिधींची बैठक व्यवस्था पुढील प्राथम्य क्रमाने करावी.

(एक) मान्यताप्राप्त राष्ट्रीय पक्षाचे उमेदवार, (दोन) मान्यताप्राप्त राज्य पक्षाचे उमेदवार,

(तीन) ज्यांना मतदारसंघातील त्यांच्या राखीव चिन्हांचा वापर करण्याची परवानगी दिलेली आहे असे इतर राज्यांचे मान्यताप्राप्त राज्य पक्षांचे उमेदवार,

(चार) नोंदणीकृत मान्यताप्राप्त नसलेल्या पक्षांचे उमेदवार,

(पाच) अपक्ष उमेदवार.                                 

मतदान कालावधी दरम्यान, मतदान केंद्रातील मतदान प्रतिनिधींनी आणि बदली मतदान प्रतिनिधी याने निवडणूक आयोगाने विहित केलेल्‍या नमुन्‍यातील ओळखपत्र/ प्रवेशपत्रिका त्‍यांच्‍या पोशाखाच्‍या दर्शनी भागावर प्रदर्शित करावे.

एका मतदान प्रतिनिधीबरोबरच बदली मतदान प्रतिनिधी म्हणून आणखी एक अतिरिक्त मतदान प्रतिनिधी नियुक्त करण्यात आला असेल तरी, मतदान केंद्रात एका वेळी त्यापैकी केवळ एकाच मतदान प्रतिनिधीला उपस्थित राहू दिले जाईल. कोणत्याही परिस्थितीत मतदान प्रतिनिधींना मतदान समाप्त होण्यापूर्वी मतदार यादीची प्रत मतदान केंद्राबाहेर नेण्यास अनुमती दिली जाणार नाही.

मतदान प्रतिनिधी किंवा त्‍याचा बदली मतदान प्रतिनिधी, मतदान केंद्रात संपूर्ण मतदान कालावधीत उपस्थित राहतील.

मतदान प्रतिनिधींना नैसर्गिक विधी इत्यादीकरिता मतदान केंद्राबाहेर जाण्यास आणि मतदान केंद्रात परत येण्यास अनुमती देता येईल. तथापि, मतदान केंद्राच्या आत एकावेळी केवळ एकच मतदान प्रतिनिधी किंवा बदली प्रतिनिधी उपस्थित राहील याची खबरदारी घ्यावी.

 n अभिरूप मतदान (Mock Poll)

मतदान यंत्रणा, उमेदवार, उमेदवारांचे प्रतिनिधी आणि उपस्थित मतदार यांचे, इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र (बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट) आणि व्हीव्हीपॅट व्यवस्थित चालू आहे आणि यात  अगोदरच कोणतेही मत नोंदविण्यात आलेले नाही याची स्वतःची आणि उपस्थितांची खात्री करण्‍याच्‍या दृष्टीकोनातून अभिरूप मतदान घेण्‍यात येते.

प्रत्‍यक्ष मतदानाला सुरूवात होण्‍याच्‍या किमान ९० मिनिटे आधी अभिरूप मतदान प्रक्रिया सुरू करण्‍यात येते. या प्रक्रियेत ‘नोटा’सह किमान ५० मतांचे एकूण मतदान करण्‍यात येते. 

कोणत्याही अभिरूप मतदानासाठी उमेदवार, त्‍यांचा मतदान प्रतिनिधी, मतदार उपस्थित नसतील तरीही मतदार अधिकाऱ्यांपैकी किंवा इतर उपस्थितांपैकी कोणीही एका उमेदवाराकरिता मत नोंदवू शकेल. मतदान कक्षात उपस्थित असणारे मतदान अधिकारी निवडणूक लढविणाऱ्या प्रत्येक उमेदवाराकरिता नोटा सहित समान मते नोंदविण्यात आली आहेत याची खात्री करून घेतील.

अभिरूप मतदान

१. B.U. आणि VVPAT जोडणी करून मतदान कक्षात ठेवा

२. C.U. मतदान अधिकारी क्र.३ यांच्या टेबलवर ठेवा

३. C.U. चा स्विच ऑन करा

४. VVPAT मध्‍ये सेल्फ चेकिंग स्लिप तयार झाल्‍याची खात्री करा.

५. C.U. वरील Total बटन दाबून मतदान 0 असल्याची खात्री करा.

     उपस्थितांना VVPAT चा Drop box उघडून दाखवा.

६. आता Mock Poll सुरू करा. प्रत्येक उमेदवारास किमान एक मत, NOTA सह

    देऊन ५० वेळा मतदान करा.

७. उमदेवारांना दिलेल्या मतांची नोंद ठेवा.

८. ५० मते झाल्यावर C.U. वरील Close बटन दाबा.

९. C.U. वरील Result बटन दाबा. प्राप्त मतांची नोंद घ्या.

१०. VVPAT च्या Drop box मधील ५०+७ स्लिपची उमेदवार निहाय मोजणी करा.

११. उमेदवार निहाय नोंदविलेली मते, Result नुसार उमेदवार निहाय नोंदविलेली मते VVPAT    

      च्या Drop box मधील स्लिपची उमेदवार निहाय पडताळणी करा.

१२. Result Tally झाल्यावर C.U. वरील Clear बटन दाबून C.U. मधील डाटा Clear करा.

१३. पुन्हा C.U. वरील Total बटन दाबून 0 मताची खात्री करा.

१४. VVPAT च्या Drop box मध्ये paper Slip नसल्याची खात्री करा.

१५. C.U. चा Switch बंद करा. यावेळी VVPAT नॉब मध्ये कोणताही बदल करु नये.

१६. C.U. मतदानाकरीता विहित पध्‍दतीने सील करा.

१७. निर्देशित केल्‍याप्रमाणे उमेदवार / प्रतिनिधी / PRO यांची स्वाक्षरी घ्या.

१८. Mock Poll च्या वेळी तयार झालेल्‍या VVPAT च्‍या सर्व Paper Slips च्या मागे Mock Poll   

      Slip असा शिक्का मारा.

१९. सर्व Paper Slip काळया रंगाच्या लिफाफा मध्ये ठेवा. तपशील लिहा.

मतदान केंद्राचे नांव - क्रंमाक - दिनांक व प्रतिनिधीच्या सहया घ्या. त्यानंतर लिफाफा प्लास्टीक बॉक्स मध्ये ठेवून बॉक्स विहित पेपर सिल लावून सिलबंद करा. त्यावर उपस्थित मतदान प्रतिनिधी मतदान केंद्राध्यक्ष यांची स्वाक्षरी घ्‍या.

२०. अचूक Mock Poll Certificate तयार करा.

n  काम न करणारे युनिट बदलणे :

प्रत्यक्ष मतदान सुरु करण्यापूर्वी कोणतेही युनिट काम करीत नसल्याचे आढळून आल्यास, केवळ संबंधित काम न करणारे युनिट बदलण्यात येईल आणि नवीन युनिटसह अभिरूप मदान पूर्ण करण्यात येईल. मतदान केंद्राध्यक्ष त्‍याबाबत अहवाल तयार करून क्षेत्रीय अधिकाऱ्याकडे देतील.

जर नियंत्रण युनिटची पॉवर पॅक (बॅटरी) सुरळीतपणे कार्य करीत नसेल किंवा लो (कमी) बॅटरी दाखवत असल्यास, मतदान केंद्राध्यक्ष लगेच नियंत्रण युनिटचा पॉवर पॅक बदलेल. या प्रयोजनासाठी, नियंत्रण युनिटचे अतिरिक्त पॉवर पॅक (बॅटरी) क्षेत्रीय अधिकाऱ्याकडे देण्यात येतात.

मतदान केंद्राध्यक्ष, नियंत्रण युनिटचा पॉवर पॅक, मतदान प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत बदलेल आणि कंट्रोल युनिटचा बॅटरी विभाग धागा पत्ताखूण चिठ्ठी वापरून पुन्हा मोहोरबंद करील आणि खुणचिठ्ठी वर मतदान प्रतिनिधींची स्वाक्षरी घेईल.

n प्रत्यक्ष मतदानादरम्यान युनिटची बदली करणे :

प्रत्यक्ष मतदानादरम्यान बॅलेट युनिट किंवा कंट्रोल युनिट काम करीत नसल्याचे आढळून आल्यास, बॅलेट युनिट+कंट्रोल युनिट+व्हीव्हीपीएटी (BU + CU + VVPAT) हा संपूर्ण संच बदलण्यात येईल.

नवीन संचासह सर्व उमेदवारांसाठी नोटासह प्रत्येकी एक मत देऊन अभिरूप मतदान करण्यात येईल. मतदान केंद्राध्यक्षांच्या याबात अहवाल तयार करून क्षेत्रीय अधिकाऱ्याला देईल.

कंट्रोल युनिट "लो बॅटरी व्हीव्हीपॅट" असे दाखवित असल्यास, व्हीव्हीपॅटचा पॉवर पॅक (बॅटरी) बदलावी, अशा प्रसंगी पुन्‍हा अभिरूप मतदान करण्याची आवश्यकता नाही.

व्हीव्हीपॅट व्यवस्थित काम करीत नसल्यास, केवळ व्हीव्हीपॅट बदलावा. अशा प्रसंगी पुन्‍हा अभिरूप मतदान करणे आवश्यक नाही. मतदान केंद्राध्यक्षांच्या याबात अहवाल तयार करून क्षेत्रीय अधिकाऱ्याला देईल.

n मतदान गुप्ततेबाबत इशारा

मतदानास प्रारंभ करण्यापूर्वी, मतदान केंद्राध्यक्षाने सर्व उपस्थितांना, मतदान गोपनियतेच्या कोणत्याही भंगासाठी शिक्षेचा इशारा द्‍यावा आणि मतदानाची गुप्तता राखण्यासाठी त्‍यांच्‍या  कर्तव्याशी संबंधित, लोक प्रतिनिधित्व अधिनियम १९५१, कलम १२८ च्या तरतुदी स्पष्ट कराव्‍यात.

मतदानाची गुप्तता राखणे :

ज्याला मतदान करण्यास परवानगी देणे अपेक्षित आहे असा प्रत्येक मतदार, मतदान केंद्रामध्ये मतदानाची संपूर्ण गुप्तता राखील आणि विहित मतदान प्रक्रियेचे काटेकोरपणे पालन करील. जर मतदान प्रक्रियेचे पालन करण्याची ताकीद देऊनही एखाद्या मतदाराने त्‍यास नकार दिला असेल तर, मतदान केंद्राध्यक्षाच्या निर्देशान्‍वये मतदान अधिकाऱ्याने अशा मतदारास मतदान करू देऊ नये. जर अशा मतदारास अगोदरच मतदान चिठ्ठी दिली असेल तर, त्याच्याकडून अशी मतदान चिठ्ठी परत घ्यावी आणि ती रद्द करावी. मतदार केंद्राध्यक्षाने मतदार नोंदवहीमध्ये (नमुना १७ए) मतदार नोंदवहीतील त्या मतदाराच्या संबंधातील नोंदीसमोरील शेऱ्याच्या स्तंभामध्ये मतदान "मतदान प्रक्रियेचा भंग केला" अशा अर्थाचा शेरा नोंदवावा आणि स्वाक्षरी करावी. मतदार नोंदवहीच्या स्तंभ (१) मधील त्या मतदाराच्या किंवा त्यानंतरच्या कोणत्याही मतदाराच्या अनुक्रमांकामध्ये कोणताही बदल करण्याची आवश्यकता नाही.

n लोक प्रतिनिधित्व अधिनियम, १९५१ (The Representation of the People Act, 1951)

कलम-१२८ अन्‍वये घोषणा.

(१) जो निवडणुकीच्यावेळी मत नोंदणीच्या किंवा मतमोजणीच्या संबंधात काहीही काम करतो असा प्रत्येक अधिकारी, लिपिक किंवा अन्य इसम याला मतदान गुप्त राखावे लागेल, तसेच ते राखण्यास मदत करावी लागेल आणि ज्यामुळे अशी गुप्तता भंग पावेल असे मानण्याजोगी कोणतीही माहिती, कोणत्याही व्यक्तीला सांगता येणार नाही.

(२) जी व्यक्ती, उक्‍त पोटकलम (१) मधील उपबंधाचे व्यतिक्रमण करील ती व्यक्ती, तीन महिन्यापर्यंत असू शकेल इतक्या मुदतीच्या कारावासास किंवा द्रव्यदंडास, किंवा दोन्ही शिक्षांस पात्र होईल.

n मतदान केंद्रातील घटनांचा अनुक्रम

१. एखादा मतदार मत नोंदविण्यासाठी मतदान केंद्रात प्रवेश करेल तेव्हा तो प्रथम मतदान अधिकारी क्रमांक १ कडे जाईल.

मतदान अधिकारी क्रमांक १:

(एक) प्रथम, मतदार यादीमध्ये त्‍या मतदाराचे नाव आहे की नाही याची तपासणी करील.

(दोन) मतदार यादीत नाव असल्‍यास, तो मतदाराची ओळख पटविण्यासाठी पुरावे मागून त्‍या पुराव्‍यांची तपासणी करेल.

(तीन) त्‍या मतदाराचे नाव अनुक्रमांक मोठ्याने वाचून दाखविल जेणेकरून मतदान प्रतिनिधीस त्याच्या मतदार यादीच्या प्रतीत त्याची नोंद घेता येईल.

(चार) मतदाराची ओळख पटल्याची सुनिश्चिती झाल्यावर सदर मतदान अधिकारी, मतदाराचे नाव तपशील असलेल्या रकान्यात फुली मारील. महिला उमेदवारांच्या बाबतीत गोल वर्तुळ करेल म्हणजे महिला मतदारांची संख्या मोजण्यास मदत होईल.

२. मतदान अधिकारी क्रमांक १ ने उक्‍त प्रक्रिया पूर्ण केल्‍यानंतर तो, मतदाराला मतदान अधिकारी क्रमांक २ कडे पाठवेल.

मतदान अधिकारी क्रमांक २:

(एक) मतदान अधिकारी क्रमांक २, पहिल्या मतदान अधिकार्‍याने, त्‍या  मतदाराचा मोठ्याने वाचून दाखविलेला मतदार यादीतील अनुक्रमांक त्‍याच्‍याकडील नोंदवहीत नोंदवून घेईल.

(दोन) मतदाराच्या डाव्या हाताच्या तर्जनीवर पक्क्या/शाईने अशा रीतीने खूण करील की, बोटाची त्वचा आणि नखाचे मूळ यामधील सांध्यावरही थोडी शाई पसरेल आणि बोटावर एक स्पष्ट खूण उमटेल. जर एखाद्या मतदाराने स्वतःच्या डाव्या हाताची तर्जनी तपासून घेण्यास किंवा सूचनेप्रमाणे तिच्यावर खूण करून घेण्यास नकार दिला तर किंवा त्याच्या डाव्या हाताच्या तर्जनीवर आधीच अशी खूण असेल किंवा त्यास शाई पुसण्याच्या उद्देशाने कोणतेही कृत्य केले तर त्याला मतदान करण्यास परवानगी देऊ नये. तोतयेगिरीच्या विरोधात आणि एकाच मतदाराने एकापेक्षा अधिक मत देऊ नये याची खातरजमा करण्यासाठी पक्की शाई लावणे हा सुरक्षेचा महत्वपूर्ण उपाय आहे.

जेव्हा एखाद्या मतदाराला डाव्या हाताची तर्जनी नसेल तेव्हा त्याच्या/तिच्या डाव्या हाताच्या कोणत्याही बोटावर पक्की शाई लावावी.

त्याच्या डाव्या हाताला एकही बोट नसेल तर त्याच्या उजव्या हाताच्या तर्जनीला शाई लावावी.

त्याला उजव्या हाताची तर्जनी नसेल तर, त्‍याच्‍या उजव्या तर्जनीपासून उजव्या हातावर असलेल्या कोणत्याही बोटाला शाई लावावी.

त्याच्या दोन्ही हातांना बोटे नसतील तर, त्याला असलेल्या डाव्या/उजव्या हाताचे जे टोक असेल त्यावर शाई लावावी.

मतदान अधिकारी क्रमांक २:

(तीन) विहित नमुन्‍यातील मतदार नोंदवहीमध्ये संबंधित रकान्यात मतदाराची सही किंवा अंगठ्याचा ठसा घेईल. ओळख पटविण्याच्या दस्तऐवजाचे शेवटचे चार अंक मतदार नोंदवहीमध्‍ये नोंदवेल.

मतदार छायाचित्र ओळखपत्राच्या आधारे मतदान करीत असेल अशा प्रकरणी, संबंधित रकान्यात अनुक्रमे मतदार छायाचित्र ओळखपत्र दर्शविणारे इपी असे नमूद करणे पुरेसे आहे आणि त्यामुळे पूर्ण मतदार छायाचित्र ओळखपत्र क्रमांक लिहिण्याची आवश्यकता नाही. तथापि, जर कोणी मतदार पर्यायी दस्तऐवजांच्या आधारे मतदान करीत असेल तर, त्या दस्तऐवजातील शेवटचे चार आकडे लिहून आणि सादर केलेले पुरावे याची देखील नोंद करण्यात येईल.

(चार) सर्व आवश्यक तपशील नोंदवून मतदार चिठ्ठी तयार करून मतदाराला देईल आणि त्‍याला  मतदान अधिकारी क्रमांक ३ कडे पाठवेल.  

मतदान अधिकारी क्रमांक ३:

सर्वसाधारणपणे, मतदान अधिकारी क्रमांक ३ हा कंट्रोल युनिटचा प्रभारी असतो. काही ठिकाणी मतदान केंद्राध्यक्ष कंट्रोल युनिटचा प्रभारी असतो.    

(एक) प्रथम मतदाराच्या डाव्या हाताच्या बोटावरील पक्क्या शाईची तपासणी करील. जर ती खूण अस्पष्ट असल्याचे किंवा पुसण्यात आली असल्याचे आढळून आल्यास, त्यावर पुन्हा एकदा शाईची खूण करील.

(दोन) त्यानंतर तो, मतदान अधिकारी क्रमांक २ र्न मतदाराला दिलेली मतदार चिठ्ठी घेईल आणि मतदाराला त्याचे मत नोंदविण्यासाठी मतदान कक्षात जाण्याचे निर्देश देईल. यासाठी तो कंट्रोल युनिटवरील बॅलेट'' बटण दाबेल.

n मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्‍यानंतर

मतदार त्याचे मत नोंदवील तेव्‍हा त्याने ज्या उमेदवाराला मत दिले आहे अशा उमेदवाराचा अनुक्रमांक, नाव चिन्ह दर्शविणारी मुद्रित कागदी चिठ्ठी, VVPAT पारदर्शक खिडकीतून काही सेकंदासाठी पाहता येणे शक्य होईल. नंतर ही मुद्रित कागदी चिठ्ठी VVPAT च्या ड्रॉप बॉक्समध्ये जतन करण्‍यात येईल. VVPAT मधील कागदी चिठ्ठी बघितल्यानंतर, मतदाराला तात्काळ मतदान कक्ष सोडावे लागेल.

 n मतांचे प्रकार:

आक्षेपित मत (Challenged Vote):

एखादा मतदार मतदान करण्‍यासाठी मतदान केंद्रात आल्‍यानंतर मतदान अधिकारी क्र. १ त्‍याचे मतदार यादीत असणारे नाव मोठ्‍याने पुकारतो. त्‍यावेळेस जर उमेदवाराच्‍या मतदान प्रतिनिधीने, नाव पुकारण्‍यात आलेली व्‍यक्‍ती आणि मतदानास आलेली व्‍यक्‍ती भिन्‍न आहेत असा आक्षेप घेतल्‍यास,  आक्षेप घेणार्‍याला, मतदान केंद्राध्यक्षाकडे अशा प्रत्येक आक्षेपासाठी रुपये इतकी रोख रक्कम जमा करावी लागते. त्‍यानंतर मतदान केंद्राध्यक्ष अशा आक्षेपाची संक्षिप्त चौकशी करतात. संबंधीत मतदाराकडे ओळखीचे पुरावे मागतात. चौकशी अंती मतदान जर आक्षेप सिद्ध झाला नाही तर, मतदान केंद्राध्यक्ष त्या मतदाराला मतदान करण्याची परवानगी देतात आणि आक्षेपासाठी भरलेली  रक्‍कम शासन जमा करण्‍यात येते.

तथापि, उक्‍त मतदार स्‍वत:ची ओळख सिध्‍द करू शकला नाही तर, मतदान केंद्राध्यक्ष त्याला मतदान करण्यास मनाई करून अशा व्यक्तीस लेखी तक्रार करून पोलिसांच्या हवाली करतात.

वरील प्रमाणे आक्षेप सिध्‍द झाला आणि संबंधीत मतदार स्‍वत:ची ओळख सिध्‍द करू शकला नाही तर, आक्षेपासाठी जमा केलेली रुपये इतकी रोख रक्कमसंबंधीत आक्षेप घेणार्‍याला परत करण्‍यात येते.

मतदान केंद्राध्यक्ष, निवडणुका घेण्याबाबतचे नियम, १९६१ याला जोडलेल्या नमुना १४ मध्ये अशा आक्षेपित मतांचा अभिलेख ठेवतात.

बदली व्यक्तीद्वारे (प्रॉक्सी) मतदान (Proxy Vote):

सेनादलातील वर्गीकृत मतदाराला जे मतदान केंद्र नेमून देण्यात आले अशा मतदान केंद्रामध्ये सेना दलातील वर्गीकृत मतदाराच्यावतीने बदली व्यक्तीला मतदान करता येते. याकरिता संबंधित सेनादलातील वर्गीकृत मतदाराच्या घराचा पत्ता ज्या क्षेत्रात येतो त्या क्षेत्रासाठी नेमून दिलेले मतदान केंद्र असेल तिथे अन्य कोणताही मतदार ज्या पद्धतीने मतदान करील त्याच पद्धतीने त्या मतदान केंद्रावर बदली व्यक्तीला मतदान येते.

तथापि, असे बदली (प्रॉक्सी) मतदान केलेल्‍या बदली व्‍यक्‍तीच्‍या डाव्या हाताच्या मधल्या बोटावर पक्क्या शाईची खूण करण्यात येते. (नियम ३७ अन्वये)

प्रदत्त मत (Tendered Vote) :

जेव्‍हा एखादा मतदार मतदानासाठी आल्‍यानंतर, त्‍याच्‍या नावावर दुसऱ्या एखाद्या व्यक्तीने आधीच मतदान केल्याचे आढळून येते तेव्‍हा निवडणूक घेण्याबाबतचे नियम १९६१, नियम ४९पी अन्वये, मतदान केंद्राध्यक्ष मतदानासाठी आलेल्‍या मतदाराच्‍या ओळखी संबंधात त्याखात्री झाल्‍यानंतर, त्या मतदारास, मतदान यंत्राद्वारे मत देण्याची मुभा देण्याऐवजी, त्यास प्रदत्त मतपत्रिका पुरवितो.

प्रदत्त मतपत्रिका मतदान यंत्रावर प्रदर्शित केलेल्‍या मतपत्रीकेसारखीच असते तथापि,  अशा प्रत्येक मतपत्रिकेच्या मागच्या बाजूस "प्रदत्त मतपत्रिका" असा ठसा उमटवलेला असतो.

निवडणूक निर्णय अधिकारी प्रत्येक मतदान केंद्रास छापील स्वरूपातील वीस (२०) प्रदत्त मतपत्रिका देतात आणि त्‍यावर मतदान करण्‍यासाठी बाण-फुलीचा रबरी शिक्‍का देण्‍यात येतो.

मतदान केंद्राध्यक्ष, नमुना १७बी मध्ये मतदारांना दिलेल्या प्रदत्त मतपत्रिकांची नोंद ठेवतात. मतदाराला प्रदत्त मतपत्रिका देण्यापूर्वी, नमुन्याच्या स्‍तंभ ५ मध्ये मतदाराची स्वाक्षरी किंवा अंगठ्याचा ठसा घेण्‍यात येतो.                           

प्रदत्त मतपत्रिका प्राप्त झाल्यानंतर, संबंधित मतदार, मतदान कक्षामध्ये जाऊन, त्याला मतपत्रिकेवरील ज्या उमेदवाराला मत देण्याची इच्छा असेल त्या उमेदवाराच्या चिन्हावर किंवा त्याच्या बाजूला बाण-फुलीचे चिन्ह उमटवेल.

जर असा मतदार अंधत्वामुळे किंवा निःसमर्थतेमुळे सहाय्याशिवाय त्याचे मत नोंदविण्यास असमर्थ असेल तर मतदान केंद्राध्यक्ष विहित कार्यपद्धतीनुसार त्याच्यासोबत एक सोबती आणण्याची त्यास परवानगी देईल.

असे मतदान झाल्‍यानंतर प्रदत्त मतपत्रिका, "प्रदत्त मतपत्रिका" असे ठळकपणे लिहिलेल्या लिफाफ्यामध्ये मोहोरबंद करण्यात येईल.

मतदान केंद्राध्यक्ष - (एक) प्रदत्त मतपत्रिका म्हणून वापरण्यासाठी त्याला प्राप्त झालेल्या

(दोन) मतदाराना देण्यात आलेल्या आणि

(तीन) वापरता परत केलेल्या प्रदत्त मतपत्रिकांचा अचूक हिशेब फॉर्म १७ - सी च्या भाग एक च्या बाब ९ मध्ये ठेवील.

  निवडणूक कार्य प्रमाणपत्राव्‍दारे मतदान (Election Duty Certificate) :

निवडणूक घेण्याबाबत नियम १९६१, नियम २०(२) अन्‍वये, जर, निवडणूक कर्तव्‍यार्थ नियुक्‍त अधिकारी/कर्मचारी, तो ज्या मतदारसंघाचा मतदार असेल अशा मतदारसंघामध्ये निवडणूक कार्यासाठी, मतदान अधिकारी, मतदान केंद्राध्यक्ष किंवा इतर लोकसेवक म्हणून निवडणूक कर्तव्यावर नियुक्‍त असेल आणि त्‍याची त्या मतदार संघातील निवडणुकीत जातीने मतदान करण्याची इच्छा असेल तर, त्‍याला निवडणूक निर्णय अधिकाऱ्यामार्फत दिलेल्‍या  निवडणूक कार्य प्रमाणपत्राव्‍दारे मतदान करता येईल.

 निवडणूक कार्य प्रमाणपत्र सादर करणाऱ्या व्यक्तीची निवडणूक कार्य प्रमाणपत्रावर सही घेण्‍यात येईल, मतदार यादीच्या सविस्तर तपशिलासोबत मतदार यादीच्या चिन्हांकित प्रतीच्या शेवटी नोंदलेल्या निवडणूक कार्य प्रमाणपत्रात नमूद केलेले त्याचे नाव मतदार यादीचा तपशील तपासला जाईल. अशी प्रत्येक नोंदी मतदार यादीच्या संबंधित भागात शेवटच्या अनुक्रमांकाच्या नोंदीनंतर, लागोपाठचे अनुक्रमांक देऊन घेण्यात येईल. पहिला मतदान अधिकारी निवडणूक कार्य प्रमाणपत्र ठेवून घेईल त्यानंतर, अशा व्यक्तीला नेहमीच्या पद्धतीनुसार मतदान करण्यास परवानगी देण्यात येईल.

सहाय्‍यकाची मदत घेऊन मतदान:

अंध, दिव्‍यांग अथवा स्‍वत: मतदान करण्‍यास असमर्थ मतदार, सहाय्‍यकाची मदत घेऊन मतदान करू शकतात. जर अंधत्वामुळे किंवा अन्य प्रकारच्या शारीरिक विकलांगतेमुळे एखाद्या मतदाराला दुसऱ्याचे सहाय्य घेतल्याशिवाय मतदान यंत्रावर असलेल्‍या मतपत्रिकेवरील चिन्ह ओळखणे किंवा त्यावरील योग्य ते बटण दाबून आपले मत नोंदविणे अशक्य आहे, याविषयी मतदान केंद्राध्यक्षाची खात्री पटली तर, मतदान केंद्राध्यक्ष, नियम ४९८ अन्वये अशा मतदाराला त्याच्यावतीने त्याच्या इच्छेनुसार आपले मत नोंदविण्यासाठी, ज्याचे वय १८ वर्षांपेक्षा कमी नाही अशा एखाद्या सोबत्यास आपल्याबरोबर मतदान कक्षात नेण्याची परवानगी देईल.

जे मतदार अपंग असून स्वतः ईव्हीएमच्या मतदान युनिटवरील त्याच्या पसंतीच्‍या उमेदवाराचे बटण दाबण्यास समर्थ आहेत त्यांच्यासोबत अधिकृत सोबतीला केवळ मतदान कक्षापर्यंत जाण्याची परवानगी देण्यात येईल परंतु मतदान कक्षात जाता येणार नाही.

कोणत्याही व्यक्तीला, त्याच दिवशी कोणत्याही मतदान केंद्रावर एका मतदारापेक्षा अधिक मतदारांचा सोबती म्हणून काम करण्यास परवानगी दिली जाणार नाही.

नियम ४९ढ च्या उप-नियम (१) च्या पहिल्या उपबंधानुसार, एकच व्यक्ती एका मतदारापेक्षा अधिक मतदारांचा सोबती म्हणून काम करू शकत नाही. या तरतुदींचे खात्रीपूर्वक पालन करण्याकरिता मतदान कर्मचारी वर्गाला सोयीस्कर होण्यासाठी, पक्क्या शाईचा वापर सोबती असणाऱ्या व्यक्तीसाठीसुद्धा करता येईल. पक्की शाई सोबत्याच्या उजव्या तर्जनीवर लावण्यात यावी.

मतदाराला मतदान कक्षात सोबती घेऊन जाण्याची परवानगी देण्‍यापूर्वी, सोबतीच्या उजव्या तर्जनीवर पक्क्या शाईची खूण आधीच केलेली नाही याची खात्री करावी. जर अगोदरच खूण केली असल्याचे आढळल्यास अशी व्यक्तीला नियम ४९ढ च्या प्रयोजनासाठी सोबती म्हणून परवानगी देता येणार नाही.

कोणत्याही व्यक्तीस मतदाराचा सोबती म्हणून काम करण्यास परवानगी देण्यापूर्वी,  मतदाराच्यावतीने त्याने केलेले मतदान तो अगदी गुप्त राखील आणि त्याने त्या दिवशी अन्य कोणत्याही मतदान केंद्रावर यापूर्वी कोणत्याही मतदाराचा सोबती म्हणून काम केलेले नाही अशा अर्थाचे आयोगाने विहित केलेल्या नमुन्यात प्रतिज्ञापत्र त्यांच्याकडून घेणे आवश्यक आहे.

n व्हीव्हीपॅट पेपर स्लिपवरील मुद्रित तपशिलाबाबत तक्रार: (नियम ४९एमए ) :

जर मतदाराने त्याचे मत नोंदविल्यावर व्हीव्हीपॅटद्वारे दृश्‍यमान होणाऱ्या कागदी स्लिपवर, ज्या उमेदवारास मतदान केले आहे त्यापेक्षा वेगळ्या उमेदवाराचे नाव निवडणूक चिन्ह दर्शिवत आहे अशी तक्रार मतदाराने केल्‍यास, मतदान केंद्राध्यक्ष, मतदाराकडून, खोटे प्रतिज्ञापत्र दिल्यास होणाऱ्या परिणामांबाबत इशारा देईल आणि त्‍या मतदाराकडून त्याने केलेल्या तक्रारीच्‍या अनुषंगाने प्रतिज्ञापत्र (जोडपत्र-५५) लिहून घेईल. जर उमेदवाराने असे प्रतिज्ञापत्र दिले तर, मतदान केंद्राध्यक्ष नमुना १७ सी मध्ये मतदाराच्या संबंधात दुसऱ्यांदा नोंद करील आणि मतदारास त्याच्या मतदान केंद्रात उपस्थित असलेल्या उमेदवार किंवा मतदान प्रतिनिधी यांच्या समक्ष मतदान यंत्रात एक चाचणी मत देण्यास सांगेल आणि व्हीव्हीपॅटद्वारे दृश्‍यमान होणार्‍या स्लिपचे निरीक्षण करेल, जर मतदाराने  केलेली तक्रार खरी असल्याचे निदर्शनास आले तर, मतदान केंद्राध्यक्ष निवडणूक निर्णय अधिकाऱ्यास तात्काळ वस्तुस्थितीची माहिती देईल आणि मतदान यंत्रात मत नोंदविणे थांबवील आणि निवडणूक निर्णय अधिकाऱ्याने दिलेल्या निदेशानुसार कृती करील.                                              परंतु, मतदाराने