३५१. मयत अविवाहीत हिंदू स्त्रीचे वारस: विनामृत्युपत्र मयत झालेल्या अविवाहीत हिंदू स्त्रीची संपत्ती तिचे आई, वडील, भाऊ, बहिण यांना मिळेल. जर तिचे आई-वडील, भाऊ, बहिण हयात नसतील तर तिच्या आजी-आजोबांना वारसा मिळू शकतो.
मयत खातेदार अविवाहित असल्याने त्याला वर्ग १ च्या वारस यादीतील, "आई" वगळता एकही वारस लागू
होणार नाही सबब, व्यक्तीची ʻआईʼ ही त्याची वर्ग १ ची वारस असेल.
अविवाहीत खातेदाराची आई हयात नसल्यास,
वर्ग २ वारसांच्या ९ गटांपैकी, गट (एक) मधील ʻवडीलʼ वारस ठरतील.
वडील हयात नसतील तरच, वर्ग २ वारसांपैकी, गट (दोन) मधील ʻभाऊʼ आणि ʻबहीणʼ हे
वारस ठरतील
आणि सामाईकपणे हिस्सा घेतील.
(भाऊ व बहीण यामध्ये एकच आई परंतु भिन्न वडील असलेला भाऊ किंवा बहीण यांचा समावेश होणार नाही)
वर्ग २ वारसांपैकी, गट (तीन) अविवाहीत मयत व्यक्तीस लागू नाही.
वर्ग २ वारसांच्या ९ गटांपैकी, गट (दोन) मधील एकही वारस हयात नसेल तरच, गट (चार) मधील ʻभावाचा मुलगाʼ, ʻबहिणीचा मुलगाʼ, ʻभावाची मुलगीʼ, ʻबहिणीची मुलगीʼ वारस ठरतील.
वर्ग २ वारसांच्या ९ गटांपैकी, गट (चार) मधील एकही वारस हयात नसेल तरच, गट (पाच) मधील ʻवडीलांचे वडीलʼ, ʻवडीलांची आईʼ वारस ठरतील.
वर्ग २ वारसांच्या ९ गटांपैकी, गट (पाच) मधील वारस हयात नसतील तरच, गट (सहा) मधील ʻभावाची विधवाʼ वारस ठरेल.
वर्ग २ वारसांच्या ९ गटांपैकी, गट (सहा) मधील वारस हयात नसतील तरच, गट (सात) मधील ʻवडीलांचा भाऊʼ ʻवडीलांची बहीणʼ वारस ठरतील.
वर्ग २ वारसांच्या ९ गटांपैकी, गट (सात) मधील वारस हयात नसतील तरच, गट (आठ) मधील ʻआईचे वडीलʼ, ʻआईची आईʼ वारस ठरतील.
वर्ग २ वारसांच्या ९ गटांपैकी, गट (आठ) मधील वारस हयात नसतील तरच, गट (नऊ) मधील ʻआईचा भाऊʼ, ʻआईची बहीणʼ वारस ठरतील.
वर्ग २ वारसांच्या नऊ गटांपैकी कोणत्याही गटात
प्रक्रांत होणारी संपत्ती, त्यात नमुद वारसांकडे समान हिस्स्यात प्रक्रांत होईल.
वर्ग २ वारसांच्या नऊ गटांपैकी कोणत्याही गटातील वारस उपलब्ध
नसतील तर मयत हिंदू पुरूषाच्या वर्ग ‘३'
(Class III) चे वारस- मयताचे गोत्रज म्हणजे मयताचे पितृबंधू म्हणजेच रक्ताच्या संबंधामुळे किंवा दत्तकग्रहणामुळे पूर्णपणे पुरुषाद्वारे संबंध असलेल्या, एक गोत्र असलेल्या
व्यक्ती वारस ठरतील.
मयत हिंदू पुरूषाच्या
वर्ग ‘३' (Class III) चे वारस उपलब्ध
नसतील तर मयत हिंदू पुरूषाचे वर्ग
‘४'
(Class IV) चे वारस, मयताचे भिन्न गोत्रज - मयताचे मातृबंधू, म्हणजेच रक्ताच्या नात्यामुळे किंवा दत्तकग्रहणामुळे पूर्णपणे पुरुषाद्वारे संबंध नसलेल्या, भिन्न गोत्र असलेल्या व्यक्ती वारस ठरतील.
मयताला,
वारस वर्ग १ ते ४ मधील कोणतही वारस नसल्यास त्याची मिळकत शासन जमा होईल.
३५३. गर्भस्थ अपत्य: विनामृत्युपत्र मयत झालेल्या खातेदाराच्या मृत्यूसमयी जे अपत्य गर्भात होते व नंतर जीवंत जन्मले, त्याला किंवा तिला जणु काही
ते अकृतमृत्युपत्र
व्यक्तिच्या मृत्युपूर्वी जन्मले होते अशाच
प्रकारे अकृतमृत्युपत्र व्यक्तीचा वारस होण्याचा अधिकार असेल.
(हिंदू वारसा कायदा १९५६, कलम २०)
मुस्लिम धर्मानुसार, वसियतनामा (मृत्युपत्र)
करणार्या व्यक्तीच्या मृत्युच्यावेळी जी व्यक्ती हयात असेल त्याच व्यक्तीच्या नावे वसियतनामा
करता येतो. तथापि, वसियतनामा करण्याच्या वेळी
गर्भात असणार्या शिशूचा जन्म, वसियतनामा करणार्या
व्यक्तीच्या मृत्युनंतर सहा महिन्यात झाला तरच
त्याच्या नावे केलेला वसियतनामा ग्राह्य मानला जातो.
३६३. प्रतिकात्मक वाटप (Notional partition ): हिंदू उत्तराधिकार (सुधारणा) अधिनियम २००५ अंमलात येण्यापूर्वी एखाद्या एकत्र हिंदू कुटुंबाच्या मिळकतीत हक्क असणारा सहदायक (कोपार्सनर) मयत झाल्यास त्याच्या मुलींना ज्या पध्दतीने मिळकतीचे वाटप होऊन हिस्सा मिळत होता त्याला प्रतिकात्मक वाटप असे म्हणत.
वर्ग दोनच्या वारसांना मालमत्ता मिळणार असेल तेव्हा वर्ग
दोनच्या पहिल्या गटात येणार्या वारसांना,
दुसर्या नोंदीतील वारसांपेक्षा प्राधान्य मिळेल. याप्रमाणे पुढे. (हिंदू वारसा कायदा १९५६, कलम ९)
जेव्हा दोन
व्यक्तींचा समान पूर्वज-पुरुषापासून, त्याच्या एकाच पत्नीच्याद्वारे वंशोद्भव
झालेला असतो तेव्हा त्या सख्ख्या नात्याने संबंधित असतात.
जेव्हा दोन व्यक्तींचा
समान पूर्वज-पुरुषापासून, पण त्याच्याच निरनिराळ्या पत्नींच्याद्वारे
वंशोद्भव झालेला असतो तेव्हा त्या सापत्न नात्याने संबंधित असतात.
जेव्हा दोन व्यक्तींचा
समान पूर्वज-स्त्रीपासून, पण तिच्या निरनिराळ्या पतींच्याद्वारे
वंशोद्भव झालेला असतो तेव्हा त्या सहोदर नात्याने संबंधित असतात. (पूर्वज-पुरुष यात पित्याचा तर पूर्वज-स्त्री यात मातेचा समावेश होतो.) [हिंदू विवाह
कायदा १९५५, कलम ३ (ग- c ;
(घ-d)]
संदर्भ: मा. सर्वोच्च न्यायालय- तीन न्यायमुर्तीच्या पिठाने, लछमन
सिंह विरूध्द कृपा सिंह आणि इतर (एआयआर १९८७ एससी १६१६) दिनांक १४.४.१९८७ रोजी दिलेला निकाल.
जर दोन व्यक्ती रक्ताच्या किंवा दत्तकाच्या नात्याने आणि संपूर्णपणे
पुरुषांच्याद्वारे संबंधीत असल्यास एक व्यक्ती दुसर्या व्यक्तीची गोत्रज असते आणि
जर दोन व्यक्ती रक्ताच्या किंवा दत्तकाच्या नात्याने आणि संपूर्णपणे पुरुषांच्याद्वारे
नव्हे अशा संबंधीत असल्यास एक व्यक्ती दुसर्या व्यक्तीची भिन्न गोत्रज असते.
सुधारीत हिंदू वारसा कायदा, २००५ अन्वये ही तरतूद रद्द करण्यात
आली आहे. तथापि, सन २००५ पूर्वी घेतलेल्या
कर्जास ही सुधारणा लागू होणार नाही.
स्त्रीने मुलाला दत्तक घ्यावयाचे असेल तर दत्तक
घेणार्या स्त्रीचे (दत्तक आईचे) वय दत्तक
मुलापेक्षा कमीत कमी २१ वर्षांनी जास्त हवे.
जर पुरुषांनी मुलीला दत्तक
घ्यावयाचे असेल तर दत्तक घेणाऱ्या पुरूषाचे वय दत्तक मुलीपेक्षा कमीत कमी २१ वर्षांनी
जास्त हवे.
दत्तक आपत्याला, दत्तकग्रहणापूर्वी मिळालेली
मालमत्ता किंवा त्यावरील दत्तकग्रहणापूर्वीची आबंधने त्याच्याकडेच निहित राहतील
तथापि, दत्तक गेल्यानंतर, दत्तक मुलाला, जनक कुटुंबाच्या मिळकतीत हिस्सा मिळत
नाही परंतु तो दत्तक गेलेल्या कुटुंबाच्या मिळकतीत त्याला हिस्सा मिळतो. (हिंदू दत्तक कायदा १९५६)
३७२.
उत्तराधिकार प्रमाणपत्र (Succession certificates):
उत्तराधिकार प्रमाणपत्र एक असा प्राथमिक दस्तऐवज आहे, ज्याद्वारे मृत्युपत्र करून
न ठेवता मयत झालेल्या नातेवाईकाच्या मालमत्तेवर त्याचे वारस दावा करू शकतात. (भारतीय
उत्तराधिकार कायदा १९२५, भाग -१ एक्स)
उत्तराधिकार प्रमाणपत्र प्रदान करण्याचा अधिकार फक्त दिवाणी
न्यायालयालाच आहे. कोणत्याही मयताच्या स्थांवर मालमत्तेबाबत वारसांमध्ये वाद
असल्यास उत्तराधिकार प्रमाणपत्र आवश्यक असते.
(भारतीय
उत्तराधिकार कायदा १९२५, कलम
३७०)
(मुंबई नियमन कायदा VIII
१८२७, कलम २)
३७४. मयत
शासकीय कर्मचारी-
वारस दाखला: फक्त मयत शासकीय
कर्मचारी मयत झाल्यास आणि यांच्या वारसांना, मयताच्या भविष्य निर्वाह निधी, ग्रॅच्युइटी
इत्यादींची रक्कम मिळणेकामी, वारसांमध्ये कोणताही वाद
नसेल तर, तहसिलदारांना वारस दाखला देण्याचा अधिकार आहे.
असा दाखला प्रदान करण्यापूर्वी तहसिलदारांनी संक्षिप्त चौकशी करणे आवश्यक आहे. हा
दाखला फक्त मयत शासकीय कर्मचार्याच्या भविष्य निर्वाह निधी, ग्रॅच्युइटी इत्यादींची रक्कम मिळणेकामीच वापरता येतो. अन्य कोणत्याही
कारणांसाठी नाही. (महाराष्ट्र ट्रेझरी
नियम,
१९६८, नियम ३५९)
ज्याची आई एकच आहे पण वडील वेगळे आहेत:- Uterine brother/ sister/half sister
ज्याचे वडील एकच आहेत पण आई वेगळी आहे:- Consanguine/ agnate brother/ sister
(जीवन
विमा कायदा १९३८, कलम ३९)
ही तरतूद
सामान्यतः एखाद्या त्रयस्थ-अनोळखी व्यक्तीला सामायिक किंवा एकत्र कुटुंबातील
मालमत्तेत प्रवेश करण्यापासून रोखण्यासाठी आणि विद्यमान नातेसंबंधांत सुसंवाद
राखण्यासाठी वापरली जाते.
(हिंदू वारसा कायदा, १९५६, कलम २२ )
३८०.
प्रोबेट (Probate): प्रोबेट म्हणजे मृत्युपत्राची शाबिती. एखाद्या व्यक्तीला मृत्युपत्राबाबत
काही आक्षेप असेल तर त्याला प्रोबेटव्दारे मृत्युपत्रास आव्हान देता येते.
(भारतीय
वारसा कायदा १९२५, कलम ६३; पुरावा कायदा १८७२, कलम ६८ व ७१)
प्रोबेट म्हणजे "सक्षम न्यायालयाने,
स्वत:च्या सही अणि शिक्क्यासह मयत व्यक्तीच्या मालमत्तेचे व्यवस्थापन करण्यासाठी
दिलेली मृत्युपत्राची प्रमाणित प्रत. म्हणजेच सक्षम न्यायालयाने संबंधित
मृत्युपत्र हे अस्सल आहे आणि कायदेशीरपणे अंमलात आणलेले आहे अशी पुष्टी देणे.
प्रोबेट प्रमाणपत्र सर्व
संबंधितांवर बंधनकारक असते. [भारतीय उत्तराधिकार कायदा १९२५, कलम २ (फ)]
(i) सप्टेंबर १८७० च्या पहिल्या दिवशी किंवा त्यानंतर हिंदू, बौद्ध, शीख किंवा जैन, जे त्या तारखेला बंगालच्या लेफ्टनंट-गव्हर्नरच्या अधिन असणार्या प्रदेशात राहात होते किंवा मद्रास आणि बॉम्बे येथील उच्च न्यायालयांच्या
सर्वसाधारण मूळ नागरी क्षेत्राच्या स्थानिक हद्दीत राहात होते. किंवा
(ii) मृत्युपत्र त्या प्रदेश आणि मर्यादेच्या बाहेरील स्थावर मालमत्तेशी संबंधित आहे.
जोपर्यंत सक्षम मृत्युपत्राबाबत प्रोबेट मंजूर
करीत नाही तोपर्यंत व्यवस्थापकाला मयताच्या मालमत्तेवर अधिकार मिळणार नाही.
तथापि, ही तरतूद केवळ
वरील प्रकरणांमध्येच लागू आहे. म्हणूनच, वर सांगितलेल्या
दोन प्रकरणांपैकी एखाद्यामध्ये मृत्युपत्र बनविले गेले असेल तर ʻप्रोबेट
ऑफ विलʼ अनिवार्यपणे आवश्यक आहे, अन्यथा, ʻप्रोबेट
ऑफ विलʼ अनिवार्य नाही. (भारतीय उत्तराधिकार कायदा, १९२५)
(i) जेव्हा अस्तित्वात असलेल्या मृत्युपत्राबाबत काही संशय असेल तर
(ii) जर मृत्युपत्राचा लाभार्थी, मृत्युपत्र करणार्या
व्यक्तीच्या आधी मृत पावला असेल तर.
मा. उच्च न्यायालयाचे मूळ अधिकार क्षेत्र
असलेल्या मुख्य न्यायालयात किंवा उच्च न्यायालयात, भारतीय
उत्तराधिकार कायदा १९२५, कलम ३७४ अन्वये प्रोबेटसाठी याचिका दाखल करावी
लागते.
(A petition has to be filed before
the Principal Court of Original Jurisdiction or before the Hon'ble High Court)
प्रोबेटसाठी वकीलांच्या मदतीने, ज्या उच्च न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रात मालमत्ता
स्थित असेल, त्या उच्च न्यायालयात अर्ज करावा लागतो. काही ठिकाणी कमी
किंमतीच्या स्थावर मालमत्तेसाठी प्रोबेटचे अधिकार कनिष्ठ न्यायालयांना प्रदान
करण्यात आले आहेत तथापि, उच्च किमतीच्या स्थावर मालमत्तेसाठी प्रोबेटचे अधिकार
उच्च न्यायालयांनाच आहेत. प्रोबेटसाठी मालमत्तेच्या किंमतीवर आधारित न्यायलीन
शुल्क अदा करणे आवश्यक असते.
प्रोबेटसाठी मालमत्तेच्या मुल्यांकनानुसार कोर्ट
फी भरावी लागते. महाराष्ट्र राज्यात, सध्या ती
मालमत्तेच्या किंमतीच्या २% ते ७.५०% परंतु जास्तीत जास्त ₹. ७५,००० आहे.
सक्षम दिवाणी न्यायालयामार्फत, एखाद्या मयत
व्यक्तीच्या मालमत्तेचे व्यवस्थापन करण्यासाठी व्यवस्थापक खालील परिस्थितीमध्ये
नियुक्त केला जातो.
मयत व्यक्तीने मृत्युपत्राव्दारे
मृत्युपत्राचा व्यवस्थापक (executor) नियुक्त
केला नसेल तर किंवा
मृत्युपत्रान्वये नियुक्त केलेला व्यवस्थापक
काम करण्यास नकार देत असेल तर किंवा
मृत्युपत्रान्वये नियुक्त केलेला व्यवस्थापकाचा
मृत्युपत्र अंमलात येण्याआधीच मृत्यू झाला असेल तर. जर वारस अज्ञान, लहान किंवा मतीमंद असेल तर
मृत्युपत्राद्वारे एक विश्वस्त नेमला जातो जो मृत्युपत्रातील ईच्छांच्या
अंमलबजावणीस जबाबदार असतो.
मालमत्ता हस्तांतरण अधिनियम १८८२ कलम १२२ मध्ये बक्षीस/दान
(gift) ची प्रक्रिया स्पष्ट केलेली आहे. परंतु 'हिबा' या प्रकाराला कायद्यानुसार
'व्यवहार (transaction) मानले जाते कारण मुस्लिम कायदा
'हिबा' (gift) ला कराराच्या कायद्याचा भाग (part
of contract law) मानतो कारण 'हिबा' साठी काहीठिराविक अटींची
पूर्तता होणे अनिवार्य असते. 'हिबा' तोंडी किंवा लेखी असू शकेल.
मालमत्ता हस्तांतरण कायदा १८८२, कलम १२९ अन्वये, या कायद्यातील
प्रकरण सात मधील दान (gift) बाबतच्या तरतुदी मुस्लिम कायदा पाळणार्यांना लागू होत नाहीत अशी
तरतूद आहे. त्यामुळे लेखी 'हिबा' नोंदणीकृत असावा
असे बंधन नाही.
'हिबा'चा समावेश 'शरीयत कायदा १९३७' या मुस्लिम व्यक्तीगत
कायद्यात करण्यात आला आहे म्हणून 'हिबा' मुळे भारतीय राज्यघटनेच्या कलम १४ चा
भंग होत नाही.
(अ) अविवाहित मुलगा किंवा मुलगी यांच्या बाबतीत वडील आणि त्याच्या
पश्चात आई. तथापि, ज्याच्या वयाला पाच
वर्षे पूर्ण झालेली नाहीत अशा अज्ञान मुलाची अभिरक्षा सामान्यतः मातेकडे असेल;
(ब) अनौरस अविवाहित मुलगा किंवा मुलगी यांच्या बाबतीत आई आणि तिच्या
पश्चात वडील.
(क) विवाहित मुलीच्या बाबतीत पती परंतु कोणतीही व्यक्ती--
(ड) जर ती हिंदू राहिली नसेल तर, किंवा
(इ) जर आई किंवा वडीलांनी वानप्रस्थाश्रम स्वीकारला असेल अथवा त्यांनी
संन्यासी बनून कायमचा प्रपंचाचा त्याग केलेला असेल तर ते अज्ञान व्यक्तीचा
नैसर्गिक पालक म्हणून कार्य करण्यास हक्कदार असणार नाहीत.
स्पष्टीकरण. या कलमात, ‘वडील’ व ‘आई’ या
शब्दप्रयोगात सावत्र वडील व सावत्र आई यांचा समावेश होणार नाही. (हिंदू
अज्ञानत्व आणि पालकत्व कायदा १९५६, कलम ६)
३८४. 'जंगी इनाम': (स्वातंत्र्यपूर्व शौर्य
पुरस्कार): भारतीय सैनिकांसाठी आणि त्यांच्या मृत्युनंतर
त्यांच्या पुढच्या पिढीसाठी 'दोन पिढींसाठी' विशेष
निवृत्ती वेतन तत्कालीन ब्रिटिश सरकारने सन १९२० ला सुरू केले होते. आणि सन १९४७
नंतर भारत सरकार हे विशेष निवृत्ती वेतन देत आहे. सध्या जंगी इनाम’ विशेष
निवृत्ती वेतन दर महा रु. १०००/- (रु. एक हजार फक्त) आहे. जंगी इनाम विजेत्यांच्या
सर्व श्रेणींना आणि पहिल्या महायुद्धातील त्यांच्या कायदेशीर वारसांना (दोन पिढी)
आणि दुसरे महायुद्ध (फक्त एक पिढी) असे त्याचे स्वरूप आहे.
(हैद्राबाद इनामे (आणि रोख अनुदाने) नष्ट करणे
कायदा १९५४)
(हैद्राबाद इनामे (आणि रोख
अनुदाने) नष्ट करणे कायदा१९५४) [तेलंगाना इनाम निर्मूलन कायदा १९५५, कलम २(इ)]
(हैद्राबाद इनामे (आणि रोख अनुदाने) नष्ट करणे
कायदा १९५४- कलम २-ए)
(Ref: MANUAL OF Revenue Accounts OF THE
Villages, Talukas and Districts OF THE BOMBAY STATE By F.
G. HARTNELL ANDERSON, M.A., I.C.S.)
३९१. 'नुकसान': कनिष्ठ
धारकांकडून जमीन महसूल वसूल करण्याच्या मोबदल्यात वरिष्ठ धारकांना जमीन
महसुलात मिळालेली पूर्ण किंवा अंशत: सूट अथवा मोबदला. याला 'नुकसान' म्हणतात. (इनाम/वतन कायदे)
(मा. उच्च न्यायालय, मुंबई - याचिका क्रमांक १८११/२०१९ -
सुवर्णा आप्पासाहेब क्षीरसागर विरुद्ध महाराष्ट्र राज्य- दिनांक १५ एप्रिल २०२५)
(Where only the Revenue out of the concerned
Land is given to the Devasthan and the Land is not transferred to the
Devasthan, the Devasthan is not an Owner where Revenue Grant is made. In case of Revenue Grant, the Devasthan has
right to receive revenue only.)
(Where the then Ruler or the Government has
granted complete ownership of land to the Devasthan, such land is called Soil
Grant. the Devasthan is owner of land only in those cases where Soil Grant is
made.)
महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६, कलम ७५ अन्वये जिल्हा किंवा तालुक्याच्या
ठिकाणी, महाराष्ट्र जमीन महसूल (दुमाला जमिनींची नोंदवही) नियम, १९६७ अन्वये एक नोंदवही ठेवलेली असते.
त्यात जिल्ह्यातील सर्व इनाम/वतन जमिनींची नोंद करण्यात येते. गाव पातळीवर ‘दुमाला जमीन’ ची नोंद तलाठी यांच्याकडील गाव नमुना ३ मध्ये असते. 'सनद' उपलब्ध नसेल तर या नोंदवहीमधील नोंद मालकी हक्काचा पुरावा म्हणून ग्राह्य मानण्यात येते.
'लँड
ऍलिनेशन रजिस्टर' मध्ये ज्या जमिनींना 'जुडी'
आकारल्याचे नमुद आहे त्या जमिनी ग्रँट ऑफ रेव्हेन्यू किंवा रेव्हेन्यू
ग्रँटच्या समजाव्या आणि ज्या जमिनींना 'जुडी' आकारल्याचे नमुद नाही त्या
जमिनी ग्रँट ऑफ सॉईल किंवा सॉईल ग्रँटच्या
समजाव्या.
एखाद्या
नदीमुळे एका गावाचे दोन भाग पडत असले तर ते दोन भाग समसमान कधीच नसत. एक भाग लहान
तर दुसरा मोठा असे. त्यातील मोठा भाग असलेल्या गावाला 'बुद्रुक' आणि लहान भाग
असलेल्या गावाला 'खुर्द' म्हणतात.
४०५ ‘नजर’ करणे: निजामकाळात, निजामाची भेट घेतांना नजराणा म्हणून तळहातावर हातरुमालाची घडी करून त्या घडीवर एक रुपया ठेवून तो तेथे उपस्थित अधिकार्याच्या समोर धरायचा. त्या अधिकार्याने फक्त रुपयाला स्पर्श करावयाचा. ‘नजर’ उचलून स्वीकारण्याचा मान फक्त निजामाचा असे.
४१०. पांढरी ज्वारी: रब्बी हंगामातील ज्वारी. हिवाळयातील पीक
४१६. आखाजी: खानदेशी भाषेत अक्षय तृतीया. खानदेशात अक्षय तृतीया म्हणजे लोकांचा महत्वाचा सण, सासरी गेलेल्या मुली माहेरी येतात. नवे कपडे शिवले जातात. आखाजीच्या दरम्यान घरोघरी झाडांना, घरात झोके बांधले जातात. सालदारांसाठी आखाजीला नवीन वर्ष सुरु होते. आखाजी पत्ते खेळण्यासाठी प्रसिध्द आहे, लहानमोठे सर्वजण त्या दिवशी पत्त्यांचा जुगार खेळतात.
(मुंबई प्रांतासाठीचा
मुंबई जमीन महसूल कायदा, १८७९)
४२०. इनामदार: ज्या व्यक्तीला जमीन किंवा गाव सरकररने इनाम म्हणून प्रदान केला आहे किंवा इनाम
जमिनीमध्ये त्याचा स्वत:च्या फायद्यासाठी अथवा वंशपरंपरागत हिस्सा आहे आणि
ज्याला पूर्णत: किंवा अंशत: जमीन महसूल वसूल करण्याचा हक्क प्राप्त झाला आहे
अशी व्यक्ती.
[तेलंगाना इनाम निर्मूलन
कायदा १९५५, कलम २(डी)]
४२१. ʻवतनʼ: वतन हा मूळचा अरबी शब्द आहे ज्याचा अर्थ स्वदेश
किंवा जन्मभूमी.
ʻवतनʼ म्हणजे वतनदाराने दिलेल्या सेवेचा मोबदला म्हणून
दिलेले ईनाम. (Inam in lieu
of services render by watandar) गावाकरिता किंवा देशाकरिता करत असलेल्या कर्तव्याबद्दल एखाद्या
व्यक्तीला उपजीविकेसाठी वंशपरंपरेने चालणारे उत्पन्नाचे साधन म्हणजे वतन होय. वतन' हा शब्द 'वर्तन' (उपजीविकेचे साधन) ह्या संस्कृत
शब्दापासून आला असावा. राहण्याच्या जागेला अरबी भाषेत वतन म्हणतात. जातधंदा,
वंशपरंपरागत काम, चाकरी, नेमणूक, उत्पन्न, अधिकार,
मानपान, हक्क, वडिलोपार्जित
मिळकत, स्थावर अगर स्थावराच्या योग्यतेची जंगम मालमत्ता,
जन्मभूमी ह्या सर्वांना वतन शब्द लावतात. वतन धारण करणाराला
वतनदार म्हटले जाते.
(Nazarana-Means an annual or occasional fixed payment
in commutation of all claims of Government in respect of succession and
transfer.)
(१) देशमुख, देसाई,
नरगौडा किंवा सर पाटील - पाटीलांचे
प्रमुख.
(२)
देशपांडे किंवा कार्य कुलकर्णी - कुलकर्णीचे प्रमुख.
हे
अधिकारी पाटील, कुलकर्णी यांच्यासारखे वतनदार सरकारी नोकर होते.
प्रत्येक परगण्यातील पाटलांचा
प्रमुख सरकारी देणी वसूल करण्याची जबाबदारी पार पाडत असे आणि कुलकर्णींचा प्रमुख
त्याच्याशी संबंधित हिशेब व पत्रव्यवहार ठेवत असे.
(The Hereditary District Officers were called
Pargana Watandars. A Pargana: consisted of several villages in each Taluka with
one town at the head. Some of their designations were as follows: -
(I) Deshmukh, Desai,
Nargauda or Sar Patil-Head of Patils.
(2) Deshpande or Karyat
Kulkarni-Head of Kulkarnis.
These officers were
Watandar Government servants like Patils and Kulkarnis of the present day.
'In each Pargana the head of the Patils was
responsible for the collection of Government dues and the head of Kulkarnis
kept accounts and correspondences connected therewith.)
Rate This Article
या लेखात, आम्ही आपणाला महसूल शब्दावली - 8. याबाबत माहिती दिली आहे आम्हाला आशा आहे की, तुम्हाला ती आवडली असेल. माहिती आवडली असेल तर, सदरची माहिती तुमच्या मित्रांनाही शेअर करा.
आपले महसूल कायद्याविषयक प्रश्न विचारण्यासाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या. आणि आमच्या टेलिग्राम चॅनेललाही आजच जॉईन व्हा. Website Link Telegram Channel Link धन्यवाद !