महाराष्ट्र जमीन महसूल
अधिनियम, १९६६ कलम ८५ अन्वये धारण जमिनीचे विभाजन
(१) महाराष्ट्र जमीन
महसूल
अधिनियम १९६६, कलम ८५
n कलम ८५:
(१) दिवाणी न्यायालयाच्या हुकूमनाम्यावरून किंवा सहधारकांनी
अर्ज केल्यानंतर, मुबईचा जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व
त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत अधिनियम,
१९४७ याच्या तरतुदींना अधीन राहून, धारण
जमिनीचे विभाजन यात यापुढे तरतूद केलेल्या रीतीने करण्यात येतील.
हिंदू मिताक्षरा कायद्यानुसार, 'कोपार्सनर' (सह-वारसदार)
अशी व्यक्ती असते जिला जन्मापासूनच कुटुंबाच्या वडिलोपार्जित मालमत्तेत अधिकार/हक्क
प्राप्त होतात. हा अधिकार 'हिंदू अविभक्त कुटुंब' (HUF) या
रचनेचा एक भाग आहे आणि तो 'हिंदू वारसा कायदा, १९५६' द्वारे
नियंत्रित केला जातो. व्यावहारिकदृष्ट्या पाहायचे झाल्यास, कोपार्सनर
ही केवळ कुटुंबातील एक सामान्य व्यक्ती नसते; त्यांना
वडिलोपार्जित मालमत्तेची विभागणी करण्याची आणि त्यात आपला हिस्सा मागण्याची
कायदेशीर पात्रता असते.
(१) जन्मत:
च हक्क (Right by birth)
(२) अनुजिविताधिकाराचा
हक्क (Right of survivorship)
(३) विभाजनाचा
हक्क (Right to partition)
(४) संयुक्त
ताबा आणि उपभोग घेण्याचा हक्क (Right to
joint possession and enjoyment)
(५) अनधिकृत
कृत्यांना रोखण्याचा हक्क (Right to
restrain unauthorised acts)
(६) हस्तांतरणाचा
हक्क (Right of alienation)
(७) हिशोब
मागण्याचा हक्क (Right to accounts)
(८)
स्वतः चा हिस्सा अधिग्रहण करण्याचा हक्क (Right
to make self-acquisition)
२) मा. सर्वोच्च न्यायालय, विनीता
शर्मा विरुद्ध राकेश शर्मा,
दिवाणी अपील क्रमांक. डायरी
क्रमांक. २०१८ दि. ११ ऑगस्ट २०२०.
परंतु:
∙ पती जीवंत
असताना केवळ पत्नी असल्यामुळे तिला पतीच्या वडिलोपार्जित जमिनीत स्वतंत्र हिस्सा
मिळत नाही.
∙ ती सहदायक (coparcener) नसल्यामुळे जन्मसिद्ध हिस्सा मागू शकत नाही.
∙ तिचा हक्क
वारसा किंवा इतर वैध हस्तांतरणातून निर्माण झालेला असणे आवश्यक आहे.]
म.ज.म. अ.
कलम ८५ अन्वये दाखल केलेल्या वाटणी अर्जात नमुद केलेली मालमत्ता
ही
'वडिलोपार्जित'
(ancestral) असावी.
'स्वतंत्र' किंवा 'स्वकष्टार्जित'
(Separate
Property/ Self-Acquired) मालमत्तेला,
मूळ मालकाच्या हयातीत वारस कायदा लागू होत नाही.
'स्वतंत्र' किंवा 'स्वकष्टार्जित'
मालमत्तेबाबत नोंदणीकृत बक्षीसपत्र किंवा मृत्युपत्र करता येईल.
म.ज.म.अ.
१९६६, कलम ८५ (२)
मध्ये एकाहून अधिक सहधारकांपैकी एकाने अर्ज केल्यास ...... असा उल्लेख आहे. याचा अर्थ अनेक सहधारकांपैकी एका सहधारकाला या कलमान्वये वाटपासाठी अर्ज
करता येईल. परंतु यासाठी इतर सर्व सहधारकांची संमती आवश्यक आहे. एकाही सहधारकाची,
स्वामित्व हक्काबाबत हरकत असेल तर कलम ८५ अन्वये वाटप करता येणार नाही. वाटपास
सहधारकाची हरकत असल्यास दिवाणी न्यायालयातच वाटपाचा दावा दाखल करावा लागेल.
∙ उक्त अर्जात,महाराष्ट्र जमीन महसूल (धारण जमिनीचे विभाजन) नियम १९६७,
नियम दोन अन्वये विहित माहिती समाविष्ठ असावी.
म.ज.म.अ.
१९६६, कलम ८५
(३) मध्ये सहधारकांची बाजू ऐकून घेऊन वाटप करावे असे नमूद आहे. याचाच अर्थ कलम
८५ अन्वये वाटप करतांना नोटीस बजावून, त्यांना सुनावणीची
संधी देऊन त्यांना त्यांचे म्हणणे मांडण्याची संधी देणे आवश्यक असेल.
∙
उक्त नोटिस महाराष्ट्र जमीन महसूल (धारण जमिनीचे
विभाजन) नियम, १९६७ नियम ३, नमुना ’अ’ मध्ये असेल.
∙ उक्त उद्घोषणा, महाराष्ट्र
जमीन महसूल (धारण जमिनीचे विभाजन) नियम, १९६७ नियम ३, नमुना ’ब’ मध्ये असेल.
अर्जदार, सहधारक आणि हजर होतील अशा
कोणत्याही व्यक्ती यांची सुनावणी घेतल्यानंतर तहसिलदारचे मत होईल की, जिच्यासाठी
अर्ज केला आहे त्या धारण जमिनीमध्ये अर्जदाराचा हितसंबंध नाही किंवा अर्जदाराचा
धारण जमिनीसंबंधीचा हक्क विवादग्रस्त आहे ततहसिलदार असा अर्ज नाकारील आणि
अर्जदाराचा धारण जमिनीसंबंधीचा हक्क विवादग्रस्त असेल त्याबाबतीत त्याच्या
हक्कासंबंधीचा प्रश्न दिवाणी न्यायालयामार्फत सोडविण्याचा अर्जदारास निर्देश देईल.
∙ उक्त तरतूद महाराष्ट्र जमीन महसूल
(धारण जमिनीचे विभाजन) नियम, १९६७ नियम ४ अन्वये आहे.
तहसिलदारने वाटपाचा अर्ज फेटाळला नसेल
तर तो जातीने किंवा तो नियुक्त करील अशा अभिकरणामार्फत, महाराष्ट्र जमीन महसूल
(धारण जमिनीचे विभाजन) नियम, १९६७ नियम ५ अन्वये, विभाजन करण्याच्या कामास लागेल. तालुका भुमी अभिलेख
कार्यालयाच्या मदतीने, अर्जदाराच्या विनंती नुसार, व्यवहार्य असेल तेथवर,
संपूर्ण भू-मापन क्रमांक किंवा भू-मापन क्रमांकाच्या उप-विभाग नेमून देण्यात येतील
व फारच क्वचित प्रसंगी उप-विभागाचे आणखी विभाजन करण्याचा अवलंब करण्यात येईल.
प्रत्येक पक्षकाराला शक्यतो जमिनीचे
सलग क्षेत्र नेमून देण्यात येईल.
प्रत्येक पक्षकाराला नेमून देण्यात
आलेल्या क्षेत्राची उत्पादन क्षमता, धारण जमिनीतील त्याच्या भागाच्या प्रमाणात आहे
हे सुनिश्चित करण्यासाठी दक्षता घेण्यात येईल. म्हणजेच सरस-निरस पध्दतीने
जमिनीचे वाटप होणे अपेक्षीत आहे. सुपिक जमीन फक्त एका हिस्सेदाराला आणि नापिक
जमीन इतर हिस्सेदारांना असे होता कामा नये.
म.ज.म.अ.
१९६६, कलम ८५ अन्वये जमिनीचे वाटप करतांना 'शेत जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध आणि एकत्रीकरण अधिनियम १९४७'
च्या तरतूदींना आधिन राहून केले जाते. म्हणजेच वाटप
करतांना जमिनीचा प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी आकाराचा तुकडा होणार नाही याची
दक्षता घेणे बंधनकारक असते.
महाराष्ट्र जमीन महसूल (धारण जमिनीचे विभाजन) नियम, १९६७ नियम ६ अन्वये, धारण जमिनीच्या आकारणीचे सहधारकांनी धारण जमिनीत धारण
केलेल्या भागांच्या प्रमाणात विभाजन करण्यात येईल. तथापि, अशा धारण जमिनीतील
कोणत्याही भू-मापन क्रमांकाच्या सर्व उप-विभागांवरील एकूण आकारणी त्या भू-मापन
क्रमांकाच्या संपूर्ण आकारणीपेक्षा कमी होत असेल अथवा अधिक होत असेल तर तसा फरक
आकारणीत भर घालून किंवा तीमधून कपात करुन उप-विभागावर अशा रितीने सम प्रमाणात
विभागण्यात येईल की, त्यांची बेरीज मूळ भू-मापन क्रमांकाच्या आकारणी इतकी होईल.
विभाजन पूर्ण करण्यात आल्यानंतर, महाराष्ट्र
जमीन महसूल (धारण जमिनीचे विभाजन) नियम, १९६७ नियम ७ अन्वये, तहसिलदार सर्व पक्षकारांना ते दाखवेल व पक्षकार त्यावर
ज्या कोणत्याही हरकती घेतील त्या ऐकून घेईल आणि विभाजनात सुधारणा करील किंवा ते
कायम करील. विभाजनात अशी सुधारणा करण्यात आल्याच्या किंवा ते कायम करण्यात
आल्याच्या तारखेनंतर येणार्या कृषी वर्षाच्या प्रारंभापासून हे विभाजन अंमलात
येईल.
तहसिलदारच्या
म.ज.म.अ. १९६६, कलम ८५ च्या आदेशाविरूध्द म.ज.म.अ. १९६६ कलम २४७ अन्वये उप
विभागीय अधिकारी यांच्याकडे अपील दाखल करता येते.
शर्ती :-
(१) ही अधिसूचना,
महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध केल्याच्या तारखेपूर्वी, कोणत्याही पक्षकाराने आधीच
नोंदणी शुल्क प्रदान केलेले असेल त्या बाबतीत. कोणताही परतावा देण्यात येणार नाही.
(२) या अधिसूचनेखालील नोंदणी शुल्कातील कपातीचा लाभ, केवळ महाराष्ट्र
जमीन महसूल संहिता १९६६, कलम ८५ अन्वये शेतजमिनीच्या विभाजनाच्या संलेखांसच लागू
असेल.
|
अर्जाचा नमुना |
|||||||
|
महाराष्ट्र जमीन महसूल (धारण जमिनीचे विभाजन) नियम,
१९६७ नियम २ अन्वये, महाराष्ट्र
जमीन महसूल अधिनियम १९६६, कलम
८५ अन्वये धारण जमिनीचे विभाजन करून मिळणेकामी अर्ज |
|||||||
|
प्रती, मा. तहसिलदार, तालुका
......., जिल्हा......... दिनांक: वय: संपूर्ण पत्ता: घर
नं.........., घराचे/इमारतीचे नाव.............., वार्ड/मोहल्ला............., रस्ता........, पोष्ट........., गाव.............,
तालुका.........., जिल्हा.......... संपर्क/मोबाईल क्रमांक:............. |
|||||||
|
मा. महोदय, खाली नमूद केलेल्या माझ्या/ आमच्या वडीलोपार्जित
(Ancestral) शेतजमिनीचे खालील प्रमाणे विभाजन, महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, १९६६, कलम ८५ अन्वये
करायचे आहे. त्याकरीता आपणास या अर्जाव्दारे विनंती करण्यात येते की, आपण आमच्या खाली
वर्णन केलेल्या जमिनीची उपरोक्त कायद्याप्रमाणे विभागणी करुन द्यावी. त्याकरीता आवश्यक शासकीय
शुल्क आम्ही अदा करण्यास तयार आहोत. |
|||||||
|
विभागणी करावयाच्या
शेतीचे वर्णन व तपशील: |
|||||||
|
मौजे |
साझा |
तालुका |
जिल्हा |
||||
|
|
|
|
|
||||
|
भूमापन क्रमांक/ उपविभाग क्रमांक |
एकूण
क्षेत्र (पो.ख. सह) हे. आर
चौमी |
आकारणी रुपये पैसे |
|||||
|
|
|
|
|
|
|
|
|
|
सत्ता प्रकार / धारणाधिकार: |
|||||||
|
· उत्तरेकडे: · पूर्वेकडे : · दक्षिणेकडे: · पश्चिमेकडे: |
|||||||
|
उपरोक्त शेतजमिनीचे
सहधारक (Co-Holders), त्यांचे नाव व पत्ते आणि वाटप करायचे क्षेत्र खालीलप्रमाणे
आहे. |
|||||||
|
अ.क्र. |
नाव व पत्ता |
वय |
मूळ मालकाशी नाते |
भूमापन क्रमांक |
एकूण क्षेत्र (हे. आर) |
पैकी मिळणारा हिस्सा (हे. आर.) |
हिश्शाच्या चतु:सीमा |
|
१ |
(अर्जदार) |
|
|
|
|
|
उ. द. पू. प. |
|
२ |
|
|
|
|
|
|
उ. द. पू. प. |
|
३ |
|
|
|
|
|
|
उ. द. पू. प. |
|
४ |
|
|
|
|
|
|
उ. द. पू. प. |
|
अर्जासोबत खालील कागदपत्रे सादर केली आहेत. १. वाटप
करावयाच्या शेतजमिनीचा चालू मूळ सात-बारा उतारा २. संबंधीत
फेरफार नोंदींच्या प्रमाणित प्रती/नक्कल ३. सहधारकनिहाय हिस्से दर्शविलेला कच्चा
नकाशा –
अर्जदारासह सर्व सहहिस्सेदारांकडून स्वसाक्षांकीत ४. वंशावळ – अर्जदारासह सर्व सहहिस्सेदारांकडून स्वसाक्षांकीत w आम्ही सर्व सहधारक असे कबूल करतो की,
अ. सदर
वाटपकामी मोजणी आवश्यक असल्यास आवश्यक ती मोजणी फी अदा करण्यास आम्ही तयार
आहोत. ब. प्रस्तुत विभाजन कोणत्याही
प्रचलीत कायद्यातून पळवाट काढण्यासाठी करण्यात आलेले नाही. क. सदर जमीन कोणत्याही प्रकल्पाच्या
लाभक्षेत्रात येत नाही. ड. सदर विभाजनामुळे अंमलात असणार्या
कोणत्याही कायदे/नियमाचा भंग होत नाही. इ. सदर मिळकतीबाबत कोणत्याही दिवाणी
किंवा महसुली न्यायालयात कोणताही वाद/दावा प्रलंबित नाही किंवा मनाई हुकूम
पारीत झालेला नाही. फ. वर दिलेली कोणतीही माहिती किंवा मजकूर खोटा/बनावट असल्याचे
आढळून आल्यास आम्ही भारतीय न्याय संहिता २०२३ च्या तरतुदीनुसार शिक्षेस
पात्र असू याची आम्हाला जाणीव आहे. तरी, वरील प्रमाणे वाटप करून देण्यास विनंती आहे. स्थळ : १. अर्जदाराचे नाव:
सही दिनांक : २.
सहधारकाचे नाव:
सही
३. सहधारकाचे नाव:
सही
४. सहधारकाचे नाव:
सही |
|||||||
hf
नोटीस
महाराष्ट्र जमीन महसूल
(धारण जमिनीचे विभाजन) नियम,१९६७
(नियम ३ पहा)
नमुना ’अ’
श्री/श्रीमती................................................(वडिलांचे नाव) ..........................., राहणार .................... तालुका...................,
जिल्हा......................यांस,
ज्याअर्थी, गाव ....................., तालुका ....................... जिल्हा ............ मधील खाली विनिर्दिष्ट केलेल्या धारण जमिनीचे सहधारक श्री ............................... (वडिलांचे
नाव).................................., याने उक्त धारण जमिनीतील त्याच्या
हिश्श्याच्या विभाजनाकरीता अर्ज केला आहे.
|
भूमापन
क्रमांक/पोट हिस्सा क्रमांक |
एकूण
क्षेत्र हे. आर चौमी. |
आकारणी
रू. पै. |
||
|
|
|
|
|
|
|
सत्ता प्रकार / धारणाधिकार: |
||||
मुद्रा तहसिलदार
दिनांक:
..../..../ २०... तालुका...., जिल्हा..... hf
उद्घोषणा
महाराष्ट्र जमीन महसूल
(धारण जमिनीचे विभाजन) नियम,१९६७
(नियम ३ पहा)
नमुना ’ब’
आणि ज्याअर्थी, उक्त धारण जमिनीचे
विभाजन करण्याचे योजिले आहे व ....../......./२०...... ही तारीख सुनावणीसाठी निश्चित करण्यात आली असून,
सुनावणी ............................. येथे ....... .......... वाजता करण्यात येणार आहे.
· धारण जमिनीचा तपशील:
|
भूमापन
क्रमांक/पोट हिस्सा क्रमांक |
एकूण
क्षेत्र हे. आर चौमी. |
आकारणी
रू. पै. |
||
|
|
|
|
|
|
|
सत्ता प्रकार / धारणाधिकार: |
||||
मुद्रा तहसिलदार
दिनांक:
..../..../ २०... तालुका....,
जिल्हा.....
प्रत: १. ........... सहकारी बॅंक, यांना
माहितीस्तव
२. ........... भू-विकास बॅंक यांना
माहितीस्तव
hf
आदेश
२. महाराष्ट्र जमीन महसूल (धारण जमिनीचे विभाजन) नियम, १९६७
३. मा. जिल्हाधिकारी, ... यांचा आदेश
क्र. .............., दि. .......अन्वये अधिकार प्रदान
केल्याचा आदेश.
४. श्री. ...............,
रा............ रा .....यांचा
दिनांक / /२० रोजीचा अर्ज.
तहसिल कार्यालय ........
क्र. ८५-वाटप/सी.आर./
/२०
दिनांक: / /२०
आदेश
ज्याअर्थी श्री. .......................,
रा..................... यांनी त्यांच्या
कब्जे वहिवाटीच्या मौजे......... येथील भूमापन क्र. ........./उपविभाग क्रमांक
........ एकूण क्षेत्र हे..........आर....., चौ.मी....,
आकारणी रु. ..... पै....., सत्ता प्रकार /
धारणाधिकार ............ या शेतजमिनीच्या
विभाजनासाठी महाराष्ट्र जमीन
महसूल अधिनियम
१९६६, कलम ८५ अन्वये या कार्यालयात अर्ज सादर केला होता.
१. सदर मिळकत ही अर्जदारांची वडिलोपार्जित मिळकत आहे.
५. प्रस्तुत विभाजन कोणत्याही कायद्यातून पळवाट काढण्यासाठी
करण्यात आलेले नाही असे अर्जदार व सर्व सहधारक लेखी कबूल करतात.
६. सदर जमीन कोणत्याही प्रकल्पाच्या लाभक्षेत्रात येत
नाही असा पुनर्वसन अधिकारी, ....... यांचा
दाखला प्रकरणी दाखल आहे.
त्याअर्थी मी, (नाव)
........................, तहसिलदार......, तालुका ...... जिल्हा .....
मला महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६, कलम ८५ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या
अधिकाराचा वापर करून, मौजे......... तालुका
...... जिल्हा .....येथील भूमापन क्रमांक.....
एकूण क्षेत्र ..... हे. .....आर....., चौमी......, आकारणी रु. ..... पै..... या शेतजमिनीचे खालील परिशिष्टात दर्शविल्यानुसार विभाजन खालील अटी व शर्तींवर करून देत आहे.
|
अ.क्र. |
हिस्सा
धारकाचे नाव |
वय |
भूमापन /उपविभाभ क्रमांक |
धारण जमिनीचे
एकूण क्षेत्र (हे. आर) |
पैकी मिळणारा
हिस्सा (हे. आर.) |
प्रत्येकी आकारणी रु. पै. |
हिश्शाच्या
चतु:सीमा |
|
१ |
(अर्जदार) |
|
|
|
|
|
उ. द. पू. प. |
|
२ |
|
|
|
|
|
|
उ. द. पू. प. |
|
३ |
|
|
|
|
|
|
उ. द. पू. प. |
|
४ |
|
|
|
|
|
|
उ. द. पू. प. |
१.
विभाजनातील शेतजमिनीच्या मूळ अटी व शर्तींना बाधा पोहोचता कामा नये.
र्६. सदर आदेशाविरूध्द मा. उपविभागीय अधिकारी, ......... उपविभाभ,........ जिल्हा यांच्याकडे, सदर आदेश प्राप्त झाल्यापासून ६० दिवसात अपील दाखल करता येईल.
मुद्रा तहसिलदार
दिनांक:
..../..../ २०... तालुका...., जिल्हा.....
१. सर्व संबंधित
२. ग्राम महसूल अधिकारी, मौजे
........., तालुका......., जिल्हा......... यांना माहिती व पुढील कार्यवाहीसाठी
३. मंडळ अधिकारी, मंडळ .........,
तालुका......., जिल्हा.........यांना माहिती व पुढील कार्यवाही साठी
मुद्रा तहसिलदार
दिनांक:
..../..../ २०... तालुका...., जिल्हा.....
hf
n इतर महत्वाचे:
w मा. उच्च न्यायालय, नागपूर खंडपीठ याचिका
क्र.
२८१५/ २००२ श्री. अरविंद यशवंतराव
देशपांडे विरुद्ध महाराष्ट्र शासन व इतर या प्रकरणी मा. उच्च न्यायालयाने
असा निर्णय दिला आहे की, 'हिंदू एकत्र कुटुंबाच्या मालकीच्या मिळकतीचे वाटप
होवून सहधारकाला मिळकत प्राप्त होणे, ही प्रक्रिया हस्तांतरण
या संज्ञेखाली येत नाही.
w
म.ज.म.अ.
१९६६, कलम ८५ अन्वयेचे मूळ अधिकार मा. जिल्हाधिकार्यांचे आहेत. सदर अधिकार शासन
निर्णयानुसार तहसिलदारांना प्रदान करण्यात आलेले आहेत. तहसिलदारांनी ते अधिकार
परस्पर आधिनस्त अधिकार्यांना प्रदान करणे बेकायदेशीर आहे. ज्याला वरिष्ठ
अधिकारी अधिकार प्रदान करतात, त्याला तेच अधिकार पुन्हा आधिनस्त अधिकार्यांना
प्रदान करता येत नाहीत. जरूर तर काही विशिष्ठ कालावधीसाठी हे अधिकार नायब
तहसिलदारांना प्रदान करण्याची विनंती मा. जिल्हाधिकार्यांकडे करता येऊ शकेल.
मा. जिल्हाधिकारी त्यावर योग्य तो निर्णय घेतील.
¨ म.ज.म.अ. १९६६, कलम ८५ अन्वये वाटप करतांना, ज्याला वाटप करून देणे आहे
तो सहधारक आहे काय याची खात्री करणे आवश्यक आहे. 'सहधारक' म्हणजे
फक्त सात-बारा सदरी नाव असल्या व्यक्तीच
नव्हे तर एकत्र हिंदू
कुटुंबातील, भविष्यात वारसा हक्काने,
सात-बारा सदरी दाखल होणारे कायदेशीर वारस (कोपारर्सनर) हे देखील 'सहधारक'
किंवा 'संयुक्त धारक' असतात.
¨ सुनावणी नोटीसचा
दिनांक आणि सुनावणीचा दिनांक यांदरम्यान ३० दिवसांपेक्षा कमी नाही आणि ६०
दिवसांपेक्षा जास्त नाही इतका कालावधी अपेक्षीत आहे.
¨ सामाईक मिळकतीत एका सहहिस्सेदाराने घर बांधले असल्यास असे घर हे कायदेशीरच राहते व त्यास
सामाईक मिळकतीतून बाजूस हटविता येत नाही; मात्र
त्या जागेचा मोबदला अदा करून इतर बाधित सहहिस्सेदारांना देता येतो.
¨ म.ज.म.अ. कलम
८५ अन्वये वाटप करताना सर्व सहहिस्सेदारांची संमती असणे आवश्यक आहे. अशी संमती
नसेल तर दिवाणी न्यायालयातून वाटप करून घ्यावे लागेल.
¨ वाटप करताना विवाहीत बहिणींना कायद्याप्रमाणे समान हिस्सा दिला जाईल याची
दक्षता घ्यावी. कोणत्याही व्यक्तीला त्याला कायदेशीर हक्कानुसार प्राप्त
होणारा हक्क सोडून द्यावयाचा असल्यास अश्या व्यक्तीने
नोंदणीकृत हक्कसोड पत्र करून घेणे
आवश्यक आहे.
¨ पोट हिश्याची
मोजणी फी उप अधिक्षक भूमी अभिलेख ह्यांचेकडेच जमा करावी.
¨ कलम ८५, पोट-कलम (५) अन्वये विभाजनाचा खर्च
अर्जदाराकडून तहसिलदारला वसूल करता येईल. विभाजनाचा खर्च देण्यास अर्जदाराने
टाळाटाळ केली तर असा खर्च संबंधित व्यक्तीच्या हिश्श्यामधून महसुलाची मागणी असल्याप्रमाणे वसूल करण्यात
येईल.
¨ वाटपामध्ये एका हिस्सेदाराला उच्च प्रतीची सुपिक जमीन आणि इतर
हिस्सेदारांना कमी प्रतीची नापिक जमीन असे वाटप करता येणार नाही. प्रत्येक हिस्सेदाराला
शक्यतो जमिनीचे सलग क्षेत्र नेमून देण्यात येईल व प्रत्येक हिस्सेदाराला नेमून
देण्यात आलेल्या क्षेत्राची उत्पादन क्षमता, धारण जमिनीतील त्याच्या भागाच्या
प्रमाणात आहे हे सुनिश्चित करण्यासाठी दक्षता घेण्यात येईल. म्हणजेच सरस-निरस पध्दतीने
जमिनीचे वाटप करण्यात येईल.
¨ तहसिलदारने पारित केलेल्या वाटप आदेश दुय्यम
निबंधकाकडे नोंदविणे आवश्यक
नाही, तो आदेश असल्यामुळे ग्राम महसूल अधिकारी यांनी त्याची
नोंद अधिकार अभिलेखात करणे आवश्यक आहे.
¨ तहसिलदारने पारित केलेल्या वाटप आदेशाची नोंद अधिकार अभिलेखात
करतांना ग्राम महसूल अधिकारी यांनी संबंधित पक्षकारांना पुन्हा नोटीस बजावण्याची
आवश्यकता नसते.
संदर्भ: महाराष्ट्र जमीन महसूल अधिकार अभिलेख आणि
नोंदवह्या (तयार करणे आणि सुस्थितीत ठेवणे) नियम
१९७१ मधील नियम ३६.
संदर्भ: मा. सर्वोच्च न्यायालय, शुभ करण बुबना वि. सीता सरन
बुबना आणि इतर (2009)9 SCC 689
¨मालमत्तेची विभागणी (partition) केवळ अशा व्यक्तींमध्येच होऊ शकते ज्यांचा त्या मालमत्तेत हिस्सा किंवा हितसंबंध आहे. ज्या व्यक्तीचा अशा मालमत्तेत कोणताही हिस्सा नाही, ती व्यक्ती साहजिकच विभागणी प्रक्रियेत सहभागी होऊ शकत नाही. 'हिस्सा वेगळा करणे' (separation of share) हा 'विभागणी'चाच (partition) एक प्रकार आहे. जेव्हा सर्व सह-धारक (co-owners) एकमेकांपासून वेगळे होतात, तेव्हा त्याला 'विभागणी' (partition) असे म्हणतात.
'हिस्सा वेगळा करणे' म्हणजे
अशी विभागणी जिथे अनेक सह-धारकांपैकी किंवा सह-वारसांपैकी (coparceners) केवळ एक किंवा काहीजण वेगळे होतात आणि इतरजण संयुक्त स्थितीत राहतात किंवा
उर्वरित मालमत्ता कोणत्याही स्पष्ट सीमांकन किंवा प्रत्यक्ष विभाजनाशिवाय (metes and bounds) संयुक्तपणे धारण करणे सुरू ठेवतात. जेव्हा एखाद्या
मालमत्तेचे मालक असलेले चार भाऊ ती मालमत्ता आपापसात स्पष्ट सीमांकन करून विभागतात, तेव्हा
त्याला 'विभागणी'
(partition) म्हणतात. परंतु, जर
केवळ एका भावाला आपला हिस्सा वेगळा करून घ्यायचा असेल आणि इतर तीन भाऊ संयुक्त (joint) स्थितीतच
राहत असतील, तर तिथे केवळ एका भावाचा हिस्सा वेगळा केला जातो.
संदर्भ: मा. सर्वोच्च न्यायालय, शुभ करण बुबना वि. सीता सरन
बुबना आणि इतर (2009)9 SCC 689
¨मालमत्तेच्या वाटपासाठी किंवा हिस्सा वेगळा करून मिळवण्यासाठी दाखल केलेल्या दाव्यात, केवळ दाव्यातील मालमत्तेमध्ये वादीचा हिस्सा असल्याचे घोषित करण्याचीच मागणी केली जात नाही, तर त्याच्या हिश्श्याचे प्रत्यक्ष सीमांकन करून (metes and bounds) विभाजन करण्याचीही मागणी केली जाते. यामध्ये तीन मुद्द्यांचा समावेश होतो:
(i) विभाजन
मागणारी व्यक्ती दाव्यातील मालमत्तेमध्ये हिस्सा किंवा हितसंबंध आहे काय?
(ii) ती
व्यक्ती विभाजन आणि स्वतंत्र ताबा मिळवण्याच्या दाव्यासाठी पात्र आहे काय?
(iii) मालमत्तेचे
विभाजन प्रत्यक्ष सीमांकन करून कशा प्रकारे आणि कोणत्या पद्धतीने केले जावे?
संदर्भ: मा. सर्वोच्च न्यायालय, शुभ करण बुबना वि. सीता सरन
बुबना आणि इतर (2009)9 SCC 689
¨संयुक्त कुटुंबाच्या मालमत्तेच्या विभाजनानंतर, प्रत्येक सदस्याला वाटप केलेला हिस्सा हा त्यांची स्वतंत्र मालमत्ता (Separate Property) बनते आणि अशी मालमत्ता धारण करणाऱ्या व्यक्तीला ती विक्री करण्याचा, हस्तांतरित करण्याचा किंवा त्याचे मृत्युपत्र करण्याचा अधिकार असतो.
संदर्भ: मा. सर्वोच्च न्यायालय, दिवाणी अपील क्रमांक
५४०१/२०२२ (एसएलपी (सी) क्रमांक ६७९९ मधून उद्भवणारी) अंगादी चंद्रन विरुद्ध शंकर
आणि इतर मा. न्यायमूर्ती श्री. आर. महादेवन निकाल दिनांक २२ एप्रिल २०२५.
b|b
Rate This Article
या लेखात, आम्ही आपणाला महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, १९६६ कलम ८५ अन्वये धारण जमिनीचे विभाजन. याबाबत माहिती दिली आहे आम्हाला आशा आहे की, तुम्हाला ती आवडली असेल. माहिती आवडली असेल तर, सदरची माहिती तुमच्या मित्रांनाही शेअर करा.
आपले महसूल कायद्याविषयक प्रश्न विचारण्यासाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या. आणि आमच्या टेलिग्राम चॅनेललाही आजच जॉईन व्हा. Website Link Telegram Channel Link धन्यवाद !