महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६, कलम १३८
सीमा निश्चिती
(क) सीमा रेषांची किंवा सीमा चिन्हांची खरी जागा,
आणि
हद्द निश्चिती झाल्यानंतर ती बाब पुढील बाबींसाठी निर्णायक
(Determinative) ठरते.
जर हद्द निश्चितीनंतर एखादा जमीनधारक दुसऱ्याच्या जमिनीवर
बेकायदेशीर ताब्यात असल्याचे आढळले, तर जिल्हाधिकारी
त्याला संक्षिप्त
(Summary) पद्धतीने बेदखल करू
शकतात. यासाठी स्वतंत्र दिवाणी दावा दाखल करण्याची
आवश्यकता नसते.
वरील
प्रमाणे सीमा निश्चित करण्यात आली असेल त्याबाबतीत, जिल्हाधिकार्यांना सीमा निश्चित करतांना जमीनधारकांच्या
धारण जमिनीशी किंवा जिच्यामार्फत किंवा जिच्याकडून ते मागणी करीत असतील अशा
कोणत्याही व्यक्तींच्या धारण जमिनीशी संबंध नाही असा निर्णय देण्यात आला असेल अशी
कोणतीही जमीन बेकायदेशीररीत्या कब्जात असणाऱ्या कोणत्याही जमीनधारकास
संक्षिप्तरीत्या चौकशी करून कोणत्याही वेळी काढून टाकता येईल.
जमिनीतून काढून टाकण्याबाबत दिलेला
आदेश या संहितेच्या तरतुदींनुसार केलेल्या अपिलास किंवा फेरतपासणीस अधीन असेल.
जर कोणत्याही व्यक्तीला उक्त तरतुदीन्वये
कोणत्याही जमिनीतून काढून टाकण्यात आले असेल किंवा काढण्यात येत असेल तर, काढून
टाकण्यात आल्याच्या दिनांकापासून किंवा सीमा निश्चित करण्यात आल्याच्या
दिनांकापासून एक वर्षाच्या मुदतीत, त्या जमिनीवर आपला मालकी हक्क प्रस्थापित करण्यासाठी तिला दिवाणी
दावा दाखल करता येईल.
परंतु,
राज्य शासनास किंवा जिल्हाधिकार्यांना
किंवा कोणत्याही महसूल अथवा भू-मापन अधिकाऱ्याला त्या दाव्यातील पक्षकार बनविता
येणार नाही.
जमिनीतून काढून टाकण्याच्या
कोणत्याही आदेशाविरुद्ध दिवाणी दावा दाखल केला असेल तेव्हा,
असा आदेश अपिलास किंवा फेरतपासणीस
अधीन असणार नाही.
संदर्भ: महाराष्ट्र शासन, महसूल विभाग. परिपत्रक क्रमांक : संकीर्ण-२०२६/प्र.क्र.७२/
जमीन-०५-अ (ई-१४४८१०१) दिनांक : १४ जुलै, २०२६
उक्त सुधारणेन्वये, जिल्हाधिकारी यांना असलेले अधिकार उपविभागीय
अधिकारी यांना प्रत्यार्पीत प्रदान करता येतील.
w व्याप्ती:
उक्त कलम १३८ अन्वये कार्यवाही करण्यापूर्वी संबंधित सीमारेषा
कायदेशीररित्या निश्चित झालेली असणे आवश्यक आहे. अंतिम सीमारेषा निश्चितीचा
आदेश अस्तित्वात नसताना केवळ मोजणी अहवाल (Measurement Report) पुरेसा नसतो. सदर कलमान्वये थेट बेदखलीची कार्यवाही सुरू करता येणार नाही.
∙ सीमारेषा
निश्चितीची कार्यवाही अधिकृत भूमापन अभिलेख, मूळ टिपण, गाव नकाशा,
फेरमोजणी अभिलेख, हद्द खूण, क्षेत्रमोजणी पत्रक व इतर वैध महसुली अभिलेखांच्या आधारे करण्यात यावी. केवळ
खाजगी पक्षकारांनी सादर केलेल्या दस्तऐवजांच्या आधारे सदर कलमान्वये आदेश पारित
करू नयेत.
∙ कलम
१३८ अन्वये पारित करण्यात येणारे आदेश कारणयुक्त (Speaking Order) असावेत.
ए. संबंधित
सर्व्हे / गट /भूमापन क्रमांक
बी.
सीमारेषा निश्चिती आदेशाचा तपशील
सी. मोजणीचा
आधार
डी. अतिक्रमित
अथवा चुकीच्या ताब्यातील क्षेत्र
इ. संबंधित
पक्षकारांचे म्हणणे व त्यावरील निष्कर्ष
फ.
स्थळ पाहणी तपशिल
१. कलम
१३८ अन्वये महसूल अधिकारी केवळ सीमारेषा निश्चितीच्या परिणाम स्वरूप ताबा काढून
देण्याचा प्रश्न निकाली काढू शकतात.
अशा प्रश्नांचा निर्णय घेण्याचा अधिकार सक्षम दिवाणी
न्यायालयास आहेत.
∙ मालकी हक्काचा वाद असल्यास तो दिवाणी न्यायालयातच निकाली
काढला जातो,
महसूल अधिकारी मालकी हक्काबाबत अंतिम निर्णय देऊ शकत नाहीत.
अ. विहित
पध्दतीने, सर्व हितसंबंधित पक्षकारांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर, आदेश अंतिम
झाल्यानंतर संबंधित अतिक्रमण करणार्या व्यक्तीस जागा रिकामी करण्यासाठी वाजवी
मुदत द्यावी.
ए. बेदखली
दरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्यास स्थानिक
पोलीस प्रशासनाची मदत घ्यावी.
अर्जाचा नमुना
प्रति,
मा. उपविभागीय अधिकारी / जिल्हाधिकारी
........... उपविभाग, जिल्हा.......
मी
नामे ................(अर्जदाराचे नाव) गट नं./सर्व्हे नं./भूमापन क्र........ येथील जमीन धारक आहे.
सदर
जमिनीची अधिकृत मोजणी दिनांक ........ रोजी भूमापन विभागामार्फत
करण्यात आली असून सीमा निश्चिती आदेश पारित झाला आहे. सदर मोजणीमध्ये माझ्या जमिनीतील....हे. ... आर क्षेत्रावर .......... (अतिक्रमण करणार्याचे
नाव) यांनी अतिक्रमण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
आवश्यक
त्या पोलीस बंदोबस्ताचे काही शुल्क असल्यास मी ते भरायला तयार आहे.
दिनांक:
(अर्जदाराचे
नाव व स्वाक्षरी)
∙
गाव नमुना ७/१२ चा चालु उतारा
∙
संबंधित फेरफार नोंदीचा उतारा
∙
मोजणी नकाशाची प्रत
∙
आधार कार्ड/ओळखपत्र
∙
सीमा निश्चिती आदेश
l
Rate This Article
या लेखात, आम्ही आपणाला महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६, कलम १३८ सीमा निश्चिती. याबाबत माहिती दिली आहे आम्हाला आशा आहे की, तुम्हाला ती आवडली असेल. माहिती आवडली असेल तर, सदरची माहिती तुमच्या मित्रांनाही शेअर करा.
आपले महसूल कायद्याविषयक प्रश्न विचारण्यासाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या. आणि आमच्या टेलिग्राम चॅनेललाही आजच जॉईन व्हा. Website Link Telegram Channel Link धन्यवाद !