आपले महसूल कायद्याविषयक प्रश्न आमच्या वेबसाईटवर विचारावेत. 📌 Mahsul Guru 📌 YouTube Channel Link!
Posts

महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६, कलम १३८ सीमा निश्चिती

Please wait 0 seconds...
Scroll Down and click on Go to Link for destination
Congrats! Link is Generated

 

महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६, कलम १३८

सीमा निश्चिती

 कोणत्याही तरतुदींन्वये ठरवण्यात आलेली सीमा ही पुढील गोष्टींच्या संबंधात निर्णायक असल्याचे मानण्यात येईल:

(क) सीमा रेषांची किंवा सीमा चिन्हांची खरी जागा, आणि

 (ख) निश्चित केलेल्या सीमेच्या दोन्‍ही बाजूंवरील जमीन धारण करणाऱ्यांनी धारण केलेल्या जमिनीशी संबंध आहे किंवा नाही असा ज्या जमिनीबाबत निर्णय केला असेल त्या जमिनीबद्दलचे त्यांचे हक्क.

हद्द निश्चिती झाल्यानंतर ती बाब पुढील बाबींसाठी निर्णायक (Determinative) ठरते.

 सीमा रेषा (Boundary Line) व हद्द खुणांचे अचूक स्थान निश्चित होते.

 दोन्ही बाजूच्या जमीनधारकांचे अधिकार निश्चित होतात, म्हणजे कोणती जमीन कोणाच्या मालकीची आहे हे स्पष्ट होते.

जर हद्द निश्चितीनंतर एखादा जमीनधारक दुसऱ्याच्या जमिनीवर बेकायदेशीर ताब्यात असल्याचे आढळले, तर जिल्हाधिकारी त्याला संक्षिप्त (Summary) पद्धतीने बेदखल करू शकतात. यासाठी स्वतंत्र दिवाणी दावा दाखल करण्याची आवश्यकता नसते.

 w बेकायदेशीररीत्या जमीन कब्जात असणाऱ्या कोणत्याही जमीन धारकास काढून टाकणे:

वरील प्रमाणे सीमा निश्चित करण्यात आली असेल त्याबाबतीत, जिल्हाधिकार्‍यांना सीमा निश्चित करतांना जमीनधारकांच्या धारण जमिनीशी किंवा जिच्यामार्फत किंवा जिच्याकडून ते मागणी करीत असतील अशा कोणत्याही व्यक्तींच्या धारण जमिनीशी संबंध नाही असा निर्णय देण्यात आला असेल अशी कोणतीही जमीन बेकायदेशीररीत्या कब्जात असणाऱ्या कोणत्याही जमीनधारकास संक्षिप्तरीत्या चौकशी करून कोणत्याही वेळी काढून टाकता येईल.

 wआदेश अपिलास किंवा फेरतपासणीस अधीन:

जमिनीतून काढून टाकण्याबाबत दिलेला आदेश या संहितेच्या तरतुदींनुसार केलेल्या अपिलास किंवा फेरतपासणीस अधीन असेल.

जर कोणत्याही व्यक्तीला उक्‍त तरतुदीन्वये कोणत्याही जमिनीतून काढून टाकण्यात आले असेल किंवा काढण्यात येत असेल तर, काढून टाकण्यात आल्याच्या दिनांकापासून किंवा सीमा निश्चित करण्यात आल्याच्या दिनांकापासून एक वर्षाच्या मुदतीत, त्या जमिनीवर आपला मालकी हक्क प्रस्थापित करण्यासाठी तिला दिवाणी दावा दाखल करता येईल.

परंतु, राज्य शासनास किंवा जिल्हाधिकार्‍यांना किंवा कोणत्याही महसूल अथवा भू-मापन अधिकाऱ्याला त्या दाव्यातील पक्षकार बनविता येणार नाही.

जमिनीतून काढून टाकण्याच्या कोणत्याही आदेशाविरुद्ध दिवाणी दावा दाखल केला असेल तेव्हा, असा आदेश अपिलास किंवा फेरतपासणीस अधीन असणार नाही.

 w फेरआकारणी: अपिलाच्या फेर तपासणीच्या किंवा, यथास्थिति, दाव्याच्या निर्णयावरून जमीन महसुलाची फेरआकारणी करण्यात यावी असे जिल्हाधिकार्‍यांना वाटत असेल तर त्यास फेर आकारणी करण्याबाबत आदेश देता येईल व अशी फेरआकारणी त्या आदेशाच्या दिनांकानंतर येणाऱ्या महसुली वर्षाच्या सुरुवातीपासून अंमलात येईल.

 w सुधारणा:

संदर्भ: महाराष्ट्र शासन, महसूल विभाग. परिपत्रक क्रमांक : संकीर्ण-२०२६/प्र.क्र.७२/ जमीन-०५-अ (ई-१४४८१०१) दिनांक : १४ जुलै, २०२६

 महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६, कलम १३८  अन्‍वये सीमा निश्चित करणे, हद्दीचे वाद मिटविणे तसेच बेकायदेशीररित्या कब्जात असणार्‍या कोणत्याही जमीनधारकास संक्षिप्तरित्या चौकशी करुन कोणत्याही वेळी काढून टाकणे याबाबत तरतुदी आहेत.

 wअधिकारांचे प्रदान:

उक्‍त सुधारणेन्‍वये, जिल्हाधिकारी यांना असलेले अधिकार उपविभागीय अधिकारी यांना प्रत्यार्पीत प्रदान करता येतील.

w व्याप्ती:

उक्‍त कलम १३८ अन्‍वये कार्यवाही करण्यापूर्वी संबंधित सीमारेषा कायदेशीररित्या निश्चित झालेली असणे आवश्यक आहे. अंतिम सीमारेषा निश्चितीचा आदेश अस्तित्वात नसताना केवळ मोजणी अहवाल (Measurement Report) पुरेसा नसतो. सदर कलमान्‍वये थेट बेदखलीची कार्यवाही सुरू करता येणार नाही.

 w सीमारेषा निश्चितीचा आधार:

सीमारेषा निश्चितीची कार्यवाही अधिकृत भूमापन अभिलेख, मूळ टिपण, गाव नकाशा, फेरमोजणी अभिलेख, हद्द खूण, क्षेत्रमोजणी पत्रक व इतर वैध महसुली अभिलेखांच्या आधारे करण्यात यावी. केवळ खाजगी पक्षकारांनी सादर केलेल्या दस्तऐवजांच्या आधारे सदर कलमान्‍वये आदेश पारित करू नयेत.

 आवश्यकतेनुसार महसूल अधिकारी किंवा भूमापन अधिकारी यांच्यामार्फत प्रत्यक्ष स्थळ पाहणी करण्यात यावी. नोटीस बजाऊन दोन्‍ही पक्षांना स्थळ पाहणीसाठी हजर ठेवावे.

 मोजणी दरम्यान उपस्थित व्यक्तींची नावे, आक्षेप व निवेदने पंचनाम्यात नमूद करावीत. मोजणी अहवाल, नकाशा व स्थळ पाहणी अहवाल आदेशाचा अविभाज्य भाग मानण्यात यावा.

 w आदेश लेखन:

कलम १३८ अन्‍वये पारित करण्यात येणारे आदेश कारणयुक्त (Speaking Order) असावेत.

 आदेशामध्ये खालील बाबींचा स्पष्ट उल्लेख करावा.

ए. संबंधित सर्व्हे / गट /भूमापन क्रमांक

बी. सीमारेषा निश्चिती आदेशाचा तपशील

सी. मोजणीचा आधार

डी. अतिक्रमित अथवा चुकीच्या ताब्यातील क्षेत्र

इ. संबंधित पक्षकारांचे म्हणणे व त्यावरील निष्कर्ष

फ. स्‍थळ पाहणी तपशिल

 w अधिकाराची मर्यादा:

१. कलम १३८ अन्‍वये महसूल अधिकारी केवळ सीमारेषा निश्चितीच्या परिणाम स्वरूप ताबा काढून देण्याचा प्रश्न निकाली काढू शकतात.

 २. मालकीहक्क, वारसा, दस्तनोंदणीची वैधता, कराराची वैधता, शीर्षक (Title) विषयक गुंतागुंतीचे प्रश्न अथवा दिवाणी स्वरूपाचे वाद महसूल अधिकाऱ्यांनी निकाली काढू नयेत.

अशा प्रश्नांचा निर्णय घेण्याचा अधिकार सक्षम दिवाणी न्यायालयास आहेत.

∙ मालकी हक्काचा वाद असल्यास तो दिवाणी न्यायालयातच निकाली काढला जातो, महसूल अधिकारी मालकी हक्‍काबाबत अंतिम निर्णय देऊ शकत नाहीत.

 w बेदखलीची कार्यवाही:

अ. विहित पध्‍दतीने, सर्व हितसंबंधित पक्षकारांचे म्‍हणणे ऐकून घेतल्‍यानंतर, आदेश अंतिम झाल्यानंतर संबंधित अतिक्रमण करणार्‍या व्यक्तीस जागा रिकामी करण्यासाठी वाजवी मुदत द्यावी.

 ब. मुदतीनंतरही आदेशाचे पालन न झाल्यास पंचनाम्यासह प्रत्यक्ष बेदखलीची कार्यवाही करावी.

 क. ताबा देताना पंचनामा तयार करून प्रत्यक्ष ताबा द्‍यावा. ताबे पावती करावी.

 w कायदा व सुव्यवस्था:

ए. बेदखली दरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्यास स्थानिक पोलीस प्रशासनाची मदत घ्यावी.

 बी. कोणत्याही परिस्थितीत बेकायदेशीर किंवा बळाचा अवाजवी वापर होणार नाही याची दक्षता घ्यावी.

अर्जाचा नमुना

प्रति,
मा. उपविभागीय अधिकारी / जिल्हाधिकारी
........... उपविभाग, जिल्‍हा.......

 विषय : महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६, कलम १३८(२) अन्वये अतिक्रमण काढून ताबा मिळण्याबाबत अर्ज.

 मा. महोदय,

मी नामे ................(अर्जदाराचे नाव) गट नं./सर्व्हे नं./भूमापन क्र........ येथील जमीन धारक आहे.

सदर जमिनीची अधिकृत मोजणी दिनांक ........ रोजी भूमापन विभागामार्फत करण्यात आली असून सीमा निश्चिती आदेश पारित झाला आहे. सदर मोजणीमध्ये  माझ्या जमिनीतील....हे. ... आर  क्षेत्रावर .......... (अतिक्रमण करणार्‍याचे नाव) यांनी अतिक्रमण झाल्‍याचे स्पष्ट झाले आहे.

 कृपया, महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ च्या कलम १३८(२) नुसार उक्‍त अतिक्रमण करणार्‍यास बेदखल करून मला माझ्‍या पूर्ण क्षेत्राचा प्रत्यक्ष ताबा देण्यात यावा.

आवश्यक त्‍या पोलीस बंदोबस्ताचे काही शुल्‍क असल्‍यास मी ते भरायला तयार आहे.

 ठिकाण:                                                                                         आपला नम्र

दिनांक:                                                                               (अर्जदाराचे नाव व स्‍वाक्षरी)

 सोबत कागदपत्रे :

∙ गाव नमुना ७/१२ चा चालु उतारा

∙ संबंधित फेरफार नोंदीचा उतारा

∙ मोजणी नकाशाची प्रत

∙ आधार कार्ड/ओळखपत्र

∙ सीमा निश्चिती आदेश

lœ

 

Rate This Article

या लेखात, आम्ही आपणाला महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६, कलम १३८ सीमा निश्चिती. याबाबत माहिती दिली आहे आम्हाला आशा आहे की, तुम्हाला ती आवडली असेल. माहिती आवडली असेल तर, सदरची माहिती तुमच्या मित्रांनाही शेअर करा.

आपले महसूल कायद्याविषयक प्रश्न विचारण्यासाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या. आणि आमच्या टेलिग्राम चॅनेललाही आजच जॉईन व्हा. Website Link Telegram Channel Link धन्यवाद !

Getting Info...

About the Author

Deputy Collector in Revenue Dept. Government of Maharashtra

Post a Comment

Cookie Consent
We serve cookies on this site to analyze traffic, remember your preferences, and optimize your experience.
Oops!
It seems there is something wrong with your internet connection. Please connect to the internet and start browsing again.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.