आपले महसूल कायद्याविषयक प्रश्न आमच्या वेबसाईटवर विचारावेत. 📌Mahsul Guru📌

उपाय: रजोनिवृत्ती (Menopause)

विशिष्ट वयानंतर स्त्रियांची मासिक पाळी संपते त्यावेळेस वजन वाढणे, चिडचिड होणे, मन अस्वस्थ होणे (Mood swing), पायात पेटके (cramp) येणे, पित्त वाढणे, गोंधळ उडणे, भावनांचा उद्रेक इत्यादी समस्या निर्माण होतात. याचे मुख्य कारण शरीरात कॅल्शियमची कमी होणे हे आहे. तसेच रजोनिवृत्तीच्‍या या काळातइस्ट्रोजनया हार्मोनच्या कमतरतेमुळे हाडे ठिसूळ बनतात व वाढत्या वजनामुळे हाडांवर ताण पडूनऍस्टिओपोरोसिसहा हाडांचा विकार होण्याची शक्यता वाढते. त्यासाठी....
* अर्धाग्लास पाण्यात गहुच्या दाण्या इतका खाण्याचा चुना मिसळून ते पाणी नियमित घ्यावे.
* रजोनिवृत्ती काळातस्टिओपोरोसिसहा हाडांचा विकार होऊ नये म्‍हणून दोन चमचे पांढरे तीळ रात्री एक कप पाण्यात भिजवून सकाळी त्याची पेस्ट करावी, हवे असल्यास मध किंवा दुधाबरोबर द्यावी.
* नियमित व्यायामाची सवय लावावी.
* दिवसातून दोनदा एक कप डाळिंब रस मध घालून पिणे.
* चार किलो गव्हाच्या पिठात 200 ग्रॅम सोयाबीन पीठ अशा प्रमाणात पिठाच्या पोळ्या करून खाव्यात.
* मेनोपॉज जवळ आलेल्या स्त्रिया, तीस वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या स्त्रिया व ज्यांची पहिली मासिक पाळी लवकरच सुरू होणार आहे अशा मुलींनीही आहारात सोयाबीनचा वापर विविध प्रकारे करावा.
* मेथीदाण्याचे चूर्ण करून 2-3 चमचे चूर्ण सकाळी काही न खाता घेणे. किंवा रात्री दोन चमचे मेथीचे दाणे भिजवुन ठेवावे व सकाळी चावुन खावेत.
* रोज रात्री झोपताना दहा मनुका व दोन ओले खजूर दुधात उकळून ते दूध प्यावे व मनुका व खजूर चावून खाणे.
* अंतर्गत उष्णतेमुळे कधी कधी तळव्यांची आग होते. कारल्याच्या पानांचा रस तळव्यांना लावल्यास आराम मिळतो.
*चंदनासवकिंवासारस्वतारिष्ट’ (आयुर्वेदिक/काष्ठौषधी दुकानात मिळते) या औषधांचा प्रयोग वैद्यकीय सल्ल्याने करावा.

* शतावरी चूर्ण, दिवसातून दोनदा, दुधातन नियमीत घ्यावे.

Comments

Archive

Contact Form

Send

Mahsul Guru

Subscribe YouTube Channel