आपले महसूल कायद्याविषयक प्रश्न आमच्या वेबसाईटवर विचारावेत. 📌 Mahsul Guru 📌 YouTube Channel Link!
Posts

सहधारक

Please wait 0 seconds...
Scroll Down and click on Go to Link for destination
Congrats! Link is Generated

सहधारक

महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६, कलम ८५ आणि महाराष्ट्र जमीन महसूल (धारण जमिनीचे विभाजन) नियम, १९६७ मध्‍ये धारण जमिनीच्‍या विभाजनाची/ वाटपाची तरतुद आहे. या तरतुदीची सुरूवात खालील प्रमाणे आहे. 

F कलम ८५:
) दिवाणी न्यायालयाच्या हुकूमनाम्यावरून किंवा सहधारकांनी अर्ज केल्यानंतर, .....................

महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, १९६६ किंवा त्‍याखालील नियमांमध्‍ये "सहधारक" या शब्‍दाची व्‍याख्‍या कुठेही आढळत नाही. त्‍यामुळे "सहधारक" म्‍हणजे नेमका कोण? याबाबत अनेक महसूल अधिकार्‍यांच्‍या मनात संभ्रम आहे. या संभ्रमामुळे उपरोक्‍त कलम ८५ अन्‍वये दाखल अर्जांवर भिन्‍न भिन्‍न आदेश पारीत ‍होतांना दिसतात.

· म.ज.म.अ. १९६६, कलम २(१२) अन्‍वये 'जमीन धारण करणे' किंवा 'जमिनीचा धारक असणे' म्‍हणजे वैधरीत्‍या जमिनीचा कब्‍जा प्रत्‍यक्षात असो किंवा नसो, अशी व्‍याख्‍या नमूद आहे.
'जमिनीचा कब्‍जा प्रत्‍यक्षात असो किंवा नसो' याचा अर्थ, एखाद्‍या जमिनीची वहिवाट, त्‍या जमिनीचा मालक कायदेशीररित्‍या मजूर, कुळ किंवा अन्‍य व्‍यक्‍तींकडून करून घेत असेल तरी त्‍या जमिनीवर त्‍या जमीन मालकाचाच कायदेशीर कब्‍जा आहे असे मानले जाईल.
तसेच एखाद्‍या एकत्र कुटुंबाच्‍या जमिनीची वहिवाट त्‍या एकत्र कुटुंबाचा 'कर्ता' करीत असेल तरी त्‍या जमिनीवर त्‍या संपूर्ण एकत्र कुटुंबातील प्रत्‍येक सदस्‍याचा  कायदेशीर कब्‍जा आहे असे मानले जाईल.

ज्‍या मूळ 'मुंबई जमीन महसूल अधिनियम, १८७९' ला निरसीत करून आणि त्‍यातील काही तरतुदींचा वापर करून महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, १९६६ तयार करण्‍यात आला आहे, त्‍यातील कलम ३ (२५) मध्‍ये 'संयुक्‍त धारक' किंवा 'संयुक्‍त वहिवाटदार' ची व्‍याख्‍या पुरेशी समर्पक आहे.    
    

"The Bombay Land Revenue Code, 1879".
Sec. 3 [(25): "Joint holders", "Joint occupants". - The term "joint holders", or "joint occupants" means, holders or occupants who hold land as co-sharers, whether as co-sharers in a family undivided, according to Hindu law or otherwise, and whose shares are not divided by metes and bounds; and where land is held by joint holders or joint occupants, "holder" or "occupants", as the case may be, means all of the joint holders or joint occupants.

वरील व्‍याखेवरून 'सहधारक' म्हणजे फक्‍त सात-बारा सदरी नाव असल्‍या व्‍यक्‍तीच नव्‍हे तर एकत्र हिंदू  कुटुंबातील, भविष्यात वारसा हक्‍काने, सात-बारा सदरी दाखल होणारे कायदेशीर वारस हे देखील 'सहधारक' किंवा 'संयुक्त धारक' आहेत हे स्‍पष्‍ट होते.

वरील बाबतीत मा. सर्वोच्‍च न्‍यायालयाने पारीत केलेल्‍या काही निकालातील संबंधीत विधाने खालील प्रमाणे आहेत:

· Supreme Court of India
Syed Shah Ghulam Ghouse Mohiuddin v/s Syed Shah Ahmed Moriuddin Kamisul - 7 February, 1971.
'Possession by one co-owner is not by itself adverse to other co-owners. On the contrary, possession by one co-owner is presumed to be the possession of all the co-owners unless it is established that the possession of the co-owner is in denial of title of co-owners and the possession is in hostility to co-owners by exclusion of them'.


· Supreme Court of India
Kailash Rai v/s Jai Jai Ram & Others- 22 January, 1973.
'One can very well visualize a family consisting of father and two sons, both of whom are minors. Normally, the cultivation will be done only by the father. Does it mean that when the father is found to be cultivating the land, he alone is entitled to the bhumidhari rights in the land and that his two minor sons are not entitled to any such rights?
In our opinion, the normal principal that possession by one co-sharer is possession for all has to be, applied. Further, even when one co-sharer is in possession of the land, the other co- sharers must be considered to be in constructive possession of the land. The expression 'possession', in our opinion, takes in not only actual physical possession, but also constructive possession that a person has in law'.

· हिंदू वारसा संबंधी 'मिताक्षरा' कायद्‍यान्‍वये (Mitakshara law) सहदायकीची (coparcenary) सुरूवात एक व्यक्तीच्या कुटुंबातील मुलाचा जन्म आहे, ज्‍याला त्याच्या वडिलांपासून किंवा आजोबांपासून किंवा पणजोबांपासून वारसा हक्‍काने मालमत्ता किंवा मालमत्तेतील हिस्‍सा मिळणार आहे किंवा तो अशा मालमत्तेचा एकमेव हयात सहदायाद/ समान उत्तराधिकारी (coparcener) असणार आहे.
Under the Mitakshara law, the starting point of the coparcenary is the birth of the son in the family of a person, who after inheriting the property from his father, or paternal grandfather, or paternal great-grandfather or obtaining property on partition hold it as a sole surviving coparcener.


· हिंदू वारसा कायदा आणि हिंदू अविभक्‍त कुटुंब या संबंधात 'सहदायाद' (coparcener) या शब्दाचा अर्थ फार  व्‍यापक प्रमाणात घेतला जातो. हिंदू अविभक्‍त कुटुंबाच्‍या मालमत्तेसंदर्भात, सहदायाद म्हणजे अशी व्यक्ती जी जन्मानंतर वडिलोपार्जित संपत्तीमध्ये हक्क प्राप्त करते तसेच ज्‍या व्यक्तीला हिंदू अविभक्‍त कुटुंबाच्‍या संपत्तीत हिस्‍सा मागण्‍याचा हक्‍क असतो.

The word coparcener has been used very widely in relation to the Hindu law and the HUF. In relation to HUF property, a coparcener is a person who acquires a right in the ancestral property by birth and a person who has a right to demand partition in the HUF property.

· 'मिताक्षरा सहदायाद' या शब्दामध्ये आता मुलींचा समावेश करण्‍यात आला आहे. हिंदू वारसा हक्क अधिनियम, २००५ च्‍या प्रारंभापूर्वी विवाहित असणार्‍या मुलींव्‍यतिरिक्‍त सर्व विवाहीत मुलींना हा अधिनियम लागू आहे.

The term Mitakshara Coparcener now includes daughters in it. The Hindu Succession Act, 2005 applies to all daughters including those who are married, but this act does not apply to daughters married before the commencement of the Hindu Succession Amendment Act, 2005.

वरील विवेचनावरून, हिंदू एकत्र कुटुंबातील सर्व सदस्य हे त्या कुटुंबप्रमुखाच्या नावे असलेल्या जमिनीचे सहधारक असतात हे लक्षात येऊन "सहधारक" ही संकल्‍पना स्‍पष्‍ट झाली असावी.
         
bžb



Rate This Article

या लेखात, आम्ही आपणाला सहधारक. याबाबत माहिती दिली आहे आम्हाला आशा आहे की, तुम्हाला ती आवडली असेल. माहिती आवडली असेल तर, सदरची माहिती तुमच्या मित्रांनाही शेअर करा.

आपले महसूल कायद्याविषयक प्रश्न विचारण्यासाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या. आणि आमच्या टेलिग्राम चॅनेललाही आजच जॉईन व्हा. Website Link Telegram Channel Link धन्यवाद !

Getting Info...

About the Author

Deputy Collector in Revenue Dept. Government of Maharashtra

Post a Comment

Cookie Consent
We serve cookies on this site to analyze traffic, remember your preferences, and optimize your experience.
Oops!
It seems there is something wrong with your internet connection. Please connect to the internet and start browsing again.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.